प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

मस्त आहे हे मिनार पण.
ते वेटोळे कानात कसे घालायचे ? मागचा दांडा दिसलाच नाही मला

छान आहेत सगळे फोटो , हलव्याचे दागिने तर फार सुरेख. त्या वेटोळ्यांसाठी छिद्रे मोठे करावे लागतील का जरा Lol

Please delete

अस्मिता Lol
सगळे दागिने भारी सुंदर आहेत. हा पण धागा चालू राहू देत जरा.

थॅंक्यु सामो, अमृताक्षर सुनिधी, मृ, खरं तर नुसत्या कानातल्याचा फोटो अपलोडच होत नव्हता, मग हा झाला.

हे अजून काही:
IMG_20210929_174350.jpg

धनुडी,अग किती सुरेख दिसतेस.बापरे मस्त स्कीन आहे.संतूर मॉमलाही पाठी टाकशील. >> अगदी हेच लिहायला आले होते.

गुलाबाच्या पाकळ्या सायीमध्ये कुसकरल्यावरती येइल तो रंग आहे गं बाई तुझ्या त्वचेचा. खरच क्रीमी सुंदर स्किन आहे.
---------
या कॉम्प्लिमेन्टबद्दल मला ते हिरव्या खड्याचे कानातले दे कसे.

मस्तच नवे दागिने
धनुडी चे काळ थांबवणारे जादूचे गुप्त ब्रेसलेट कुठे आहे? Happy

अगं नाही नाही बायांनो त्या लाईट ची आणि फोटोची कमाल आहे, वेगळ्या रंगाचा लाईट होता डोक्यावर. मला खुपच गुदगुल्या होताएत एवढं कौतुक वाचून त्याबद्दल थॅंक्यु. सामो कादंबरीत शोभेल असं वर्णन केलयस गं. घे घे तुला पाहिजे ते घे. मागच्या पानांवर मी पण लक्ष ठेवून आहे. Wink

Pages