प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

अमृताक्षर, धनुडी ,मी_अनू थॅंक्स

अमृताक्षर तुमचा बाजूबंद, बांगडी राखी आणि चक्रवाला ऑक्सिडाईज्ड सेट मस्त.
धनुडी : तुमचे वेटोळे आणि इतर कानातले मस्त.
मी_अनू : तुमचं जीन्सवरचं मंगळसूत्र, तिबेटी नेकलेस आणि काडेपेटीची राखी मस्त.
अनामिका, मृणाली, अस्मिता भाग्यश्रीचंही कलेक्शन छान. सायोचे ट्रायबल नेकलेस आणि हर्पेनचे बीडस् नेकलेस छान.
सामोच्या अख्ख्या कलेक्शनवर आणि सुनिधीच्या ड्रेसरवर माझा डोळा आहे.

हा माझा ऑटाफे ब्लॅक पर्ल्सचा सर.
F4B8E485-C74C-4299-849B-FDB3CB7FBEF6.jpeg

सुंदर ट्रेंडी दिसतोय चोकर एकदम.मला वाटलं होतं आदिवासी गाव की गोरी दिसत असेल >>>> हो ना. मला वाटले तो आफ्रिकन गळ्याला वेटोळे असतात तसा असेल .
पहिल्या फोटोत फार आवडला.

MazeMan , सुरेख दिसतोय चोकर! आधीच्या फोटोत तेवढी कल्पना आली नाही.पण ड्रेसवर सुरेख दिसतोय!

Happy
पांढर्या मोत्यांची माळ माझे स्त्रीधन आहे. आईच्या आईची आहे.
काळ्या मोत्यांची माझ्या नातीचे (जेव्हा कधी ती होइल तेव्हा) स्त्रीधन Wink कारण मला ती माझ्या नवर्‍याने घेतलेली आहे. ती पीढ्या न पीढ्या जाइल पुढे आता.

मस्त आहेत सर्व दागिने
मी कधी अमेरिकेत गेले तर पाहिले सामो चं कलेक्शन घेऊन येणार आहे उचलून ☺️

>>>>मी कधी अमेरिकेत गेले तर पाहिले सामो चं कलेक्शन घेऊन येणार आहे उचलून ☺️
तू ये तर खरं न्यु जर्सीला. खरच ये,

>>>मला oxidised jwellery फार आवडते..
हाहाहा अगं काळी पडलेली चांदी आहे ती.

सा तरीही.. कसली मस्त दिसते.. specially traditional oxidised jwellery.. aani तुमचं collection बघून आता मोठी मोठी स्टोन jwellery पण आवडायला लागलीय..

सामो तुझ्या अंगठ्या पण किती छान छान आहेत, त्या गळ्यातल्या वेटोळ्यावर माझे कानातले वेटोळे एकदम मॅच आहेत ना?

सगळ्यांचे दागदागिने पाहुन असं वाटतय की, मी माझ्या बायकोचं कलेक्शन टाकु शकतो कां? तिला टाकायला जमणार नाही म्हणुन.

Pages