प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद.

कसले सही आहेत सर्व दागिने फोटो. धनुडी गोड .

अमृताक्षर चिंचपेटी म्हणतात बहुतेक त्याला, गळ्याला फिट बसते. बहीणीला दिलं ते. बाकी दोन मोती दागिने भाचीला, भाची आईचं सर्वच ढापते म्हणा.

अनु ते मंगळसुत्र आणि कानातले आईला दिले.

अमृताक्षर तुमचं मोती दागिने कलेक्शन छान आहे.

हेमाताई हलव्याचे दागिने सुरेख.

माझ्या आईची पण जुनी नथ आहे, मला मोठी वाटते. बघते फोटो मिळाला तर.

IMG_20210930_002050.jpg

माझ्या आईची जुनी नथ, मला मोठी वाटते. एका लग्नात आईने घातलेली, मी फोटोपुरती घालून बघितली. माझ्याकडे लहान आहे स्वतःची. ही अस्सल मोत्याची वगैरे आहे, तशी माझी नाहीये. नेकपीस पुण्याच्या धाकट्या भाचीने स्वत:च्या हाताने केलाय.

थँक्स सामो, अंजली.

फोटोची क्वालिटी खास नाहीये, जुन्या फोनमधला आहे.

अनू थॅंक्स. ते हास्य कृत्रिम आहे, हाहाहा. मला फोटो काढताना स्माईल नीट देता येत नाही आणि फारसे स्वत:चे फोटो काढून घ्यायला आवडत नाही.

नथ सुरेखच अन्जू. ५५ वर्षे जुनी आहे ऐकून किती पिढ्यांनी ल्यायली असेल असं मनात आलं. आई, आजी. अशा दागिन्यांमध्ये आपल्या भावना जास्त गुंतलेल्या असतात. ( स्पेशली जे आईने वापरलय ते वापरायला आवडतं)
तुझं स्माईल ही खासच.

ए sssssss आम्ही पण घालायचो. किती मस्त दिसतो एक्झोरा. वेगळ्या रंगात असेल तर अजून च मस्त, केशरी आणि लाल असं वेगवेगळी फुलं घालायची.
सूर्यगंगा बिंदी मस्त आहे. ( मला लहानपणी बिंदी घालायची खुप क्रेझ होती)

सुर्यगंगा Happy , मांगटिका मस्त..मला पण लहानपणी फार आवडायचे

हो काय धनुडी सेम पिंच.
शाळेत झाडं होती हि , हा शोध शाळेत च लागला होता.

मृणाल, मस्त Happy
हा एक वेगळा दागिना
पूर्वी खंडोबाचा नाळ म्हणायचे, एवढ्यात गेले तर नेकलेस पॉइंट झाला होता IMG_20210925_151552__01__01.jpg

काय सुंदर फोटो आहे.
मी बऱ्याच जाहिराती वाचतेय, निअर भोर नेकलेस पॉईंट वगैरे.मी भोर एरिया पाहिला नाही अजून.

अस्मिता :))
ती राणी चिडली असेल नां?????

करेक्ट अनु,
धनुडी - भोर ला जाताना लागते हे ठिकाण.

वाह, सुंदर ट्रेंडी दिसतोय चोकर एकदम.मला वाटलं होतं आदिवासी गाव की गोरी दिसत असेल
हा एकदम यो फॅबइंडिया/इथनिसिटी/जहांगीर आर्ट गॅलरी दिसतोय.

धनुडी - भोर ला जाताना लागते हे ठिकाण.>>> धन्यवाद श्रद्धा.
माझे"मन" चोकर बघून माझं नाही राहिलं Happy खुपच सुरेख.
अमृताअक्षर सुरेखच सेट, नथणीच्या अलीकडे काय आहे? एकच आहे ते कानातले का?

Pages