प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

छान छान दागिने आलेत ईकडे. ब्रेसलेट्स नाजुक..क्युट आहेत.
सुनिधी.. इतकं आवरलेलं कपाट आणि माळा हे स्वप्नं आहे माझं. फार छान. Happy
हे इमिटेशन ज्वेलरीचे कानातले.
IMG_20210925_233520_Bokeh_copy_548x484.jpg

छान छान दागिने आलेत ईकडे. ब्रेसलेट्स नाजुक..क्युट आहेत.
सुनिधी.. इतकं आवरलेलं कपाट आणि माळा हे स्वप्नं आहे माझं. फार छान. Happy
हे इमिटेशन ज्वेलरीचे कानातले.
IMG_20210925_233520_Bokeh_copy_548x484.jpg

सुनिधी.. इतकं आवरलेलं कपाट आणि माळा हे स्वप्नं आहे माझं. फार छान. Happy+११११
अनामिका कलरफुल कानातले. सायो मस्तच. हे पण तूच केलयस ना?

कपाटाला आपलं केल्याबद्दल थँक्यु. पण तुम्ही सर्वांनी दागिने टाकुन मजा आणलीत.
मीअनु का गहिवरलीस? Lol

कसले सुरेख दागिने आहेत.
@सामो : तुमचं कलेक्शन प्रचंड आवडलंय आणि तुम्ही ते कॅरी ही फार छान करता.
@सायो : तुम्ही बनवलेले नेकपीसेस मस्त आहेत.
@मनीमोहोर : नथ हा आवडता दागिना आहे माझा. त्यामुळे तुमची "अनमोल नथ" फार फार आवडली आहे.
मला ही शेअर करायचं आहे पण मला अजून इमेज इन्सर्ट नाही करता येत सो माझा पास. Sad

माझं कपाट असं कधी राहत नाही म्हणून गहिवरले Happy
हे कसं फॅबइंडिया मध्ये वरच्या मजल्यावर डिस्प्ले ला चेस्ट ठेवलेलं असतं तसं चकाचक दिसतंय.

अनामिका किती सुंदर मोर आहेत. सायो मोती काय मस्त आहेत. असे तांदळाच्या दाण्यां सारख्या लांबट मोत्यांबद्दल ऐकले होते.

मस्त गं सायो...

अमृताक्षर छान आहे बांगड्या रेखीव एकदम.

IMG-20210929-WA0012.jpg

माझाही सहभाग इथे Lol

हे मागे मी आई, बहीण,भाचीला दिलं.

हा डान्स साठी घेतलेला माझा मोती सेट.. बिंदी आणि कानातले सापडत नाहीये ते सुद्धा अगदी मॅचींग आहे.. साऊथ इंडियन डान्स स्टाईल

IMG_20210929_101219.jpg

काय सुंदर प्रो आहेत दागिने
कोणाला कलेत काही अडचण आल्यास ममो आणि आख्ख्या कुटुंबाचे स्मरण करावे.रेषा आपोआप चांगल्या यायला लागतील.

काय सुंदर आहेत ते हलव्याचे दागिने.. बनवायला किती मेहनत लागली असेल इतके सुरेख दागिने.. कमाल त्या सुंदर हातांची..

वर्षानुवर्ष हौसेपोटी जमवलेले अलंकार जे आजतागायत एखाद्या मध्ययुगीन शालीन रमणीप्रमाणे असूर्यपश्य राहिले होते. या धाग्याच्या निमित्ताने त्यांना हवा लागतेय.
फार फार वर्षापूर्वी बांद्र्याला लिलावतीसमोर हॅंडलूमच्या प्रदर्शनातून घेतलेला चोकर आणि ब्रेसलेट

776D72F9-7204-41CF-BE56-BA443D154F19.jpeg

कोणाला कलेत काही अडचण आल्यास ममो आणि आख्ख्या कुटुंबाचे स्मरण करावे.रेषा आपोआप चांगल्या यायला लागतील. >> अनु Lol Lol Lol Lol

हलव्याचे दागिने आवडल्याच सांगते नणंद बाईंना. त्यांच्याकडून थॅंक्यु सगळ्यांना.

Pages