आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खंग्री मॅन ला सुट्टी मिळाली एकदाची Proud
चेह र्‍यावर पूर्ण जगाच्या पर्यावरणाची जबाबदारी आहे>>>> फक्त
घरातील सगळी नाती, तब्बेती,सण-वार सांभाळेल अशी स्वार्थी नाही हो सुअरु.!

आजची सुरुवात अनघा अभी चहा चिवडा डिस्कशन चालू आहे. >>>>>>>> गौरीच घर म्हणजे देशमुख पुरुषान्साठी रोमॅण्टिक डेस्टीनेशन झाले आहे. आधी अन्या-सन्जना, नन्तर यश- गौरी आणि आता अभि-अनघा.

अरू फाजील पणा करू नका म्हणोन डांटते >>>>>>>> अभि आणि यशला त्यान्च्या पार्टनर्सवरुन चिडवतात, मग ईशाने काय पाप केल? तिला चिडवत नाही कोणी साहिलवरुन. हाउ अनफेअर!

मेहता ने अन्याला जितक परफेक्टली ओळखल तितक त्याच्या घरच्यान्नीही त्याला ओळखल नसेल. इगोइस्टिक, सेकण्ड मॅरिजसाठी उत्सुक नसलेला, दोन्ही बायका एन्जॉय करणारा, सन्जनाचा वापर करुन घेणारा अस बरच काही बोलला मेहता अन्याला.

संजनाला मेहता कॉम्प्रोमाईझ कर जसं अन्याला करत होतीस असं सांगतो तेव्हा हिने बोलायला हवं होतं मेहताला तोंडावर ,कसं का असेना अन्याने बायकोला घटस्फोट देऊन लग्न केलं तू सोडशील का तुझ्या बायकोला लीगली आणि लग्न करशील का?बसली धुसफूसत घरी येऊन .

अनिरुद्धने लग्न टाळायचे शेवटपर्यंत प्रयत्न केले होते. तो संजनालाही म्हणत होता की आहे तसंच चालू दे. त्याला घटस्फोटही नको होता.
गावाला अप्पांना म्हणाला मला संजनाशी लग्न करायचं नाही. ऐन लग्नात पळून गेला. पण जायला जागा नाही , अरुंधतीनेही त्याला लग्न करणे भाग आहे हे सांगितल्यावर लग्न केलं.

Happy patriarchy...!!!
अभि यश चे flirting चालते...इशाचे नाही!

काल अनघा आणि अभि, अनघाच्या घरी होते बहुतेक, गौरीच्या नाही. ईशा आणि साहिलंच अजून ऑफिशियल नाही.
काल गौरीचे कानातले छान होते मोरवाले.
आता पूर्ण कुटुंब जाऊन मेहताला मारणार. त्याआधी मोठी भाषणबाजी. अरुला तर संधीच मिळेल जगन्माता होण्याची ज्याची सुरुवात तिने कालच केली काय फायदा वगैरे बोलून.

हे असं सगळ्यांनी हातावर हात ठेवणं वगैरे आपल्याकडे फार फिल्मी वाटतं..म्हणजे मराठी घरांमध्ये असे करत नाहीत...
भलेही ते संजना ल सपोर्ट करतील..
आजी अप्पा यांनी शपथ घेणं ..वगैरे तर फारच झालं.
कैच्या कैच. अनुपमा मध्ये तिच्या सुनेला ऑफिस मधला बॉस त्रास देत असतो....तिच्या मागे सगळे उभे राहणे वेगळे आणि संजनाच्या मागे उभे राहणे वेगळे...तिने खरंच आधी बारा वर्षे अन्यासोबत flirting च तर केलं...

Ho anagha ghari

अरु हिरविण असल्याने ती कशी ग्रेट आहे हे दाखवणे हा एकमेव उद्देश आहे मालिकेचा. प्रत्यक्षात कोणी तरी थोडी तरी अक्कल असलेली बाई सवतीला एवढा सपोर्ट करेल का , सवतीच्या मुलाबरोबर एवढं गोड वागेल का ? सगळंच अ आणि अ.
बाकी मी इथे आमांचा वृ वाचायला लागल्या पासून ह्या मालिकेची व्ह्यूअरशिप एकाने वाढली आहे मात्र.

मनीमोहोर +१
काहि दिवसानी अरुने तिच्या सिग्नेचर स्टाइलने हात पसरुन सन्जनालाही कवेत घेतल अस दाखवल तरी आश्च्र्य वाटायला नको .अनिरुद्ध लग्नातुन पळुन जातो तेव्हाही हिच जबरदस्तिने लग्न लावुन देते, तेव्हापासुनच जे इलॉजिकल सिक्वेन्सची चेन चालू आहे ती काही थान्बत नाहीये, अरुला महान दाखवायच्या नादात बावळट दाखवतायत.

शुभ प्रभातः
आज आरती चालू आहे बॅक ग्राउंडमध्ये. व संजनाला सर्व काही एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये दिसते. मेहता जे म्हणला त्यावर ती विचा र करते.
अन्या भडकतो व अवीला बरोबर घेउन मेह ताला बुकलून येउ कंप्लेंट करू म्हणतो. आजी जरा दमानं घ्या म्हणते.
यश म्हणतो सर्व पेपर मध्ये छापून आणू.

मग सु अरू पुढे सरसावते आता # सेक्सुअल हॅरेस मेंट अ‍ॅट वर्क प्लेस वॉर तिच्या सेनापतीत्वा खाली उसासे टाकत सुरू केले आहे. घाणेरडी नजर टाकणार्‍या पुरु शाला शिक्षा झाली च पाहिजे. तुला कोणी तुझ्या मनाविरुद्ध काहीच करायला लावू शकत नाहीस. तू एका पुरुषाला का
घाबरतेस. संजना म्हणते सिस्टिम खूप पावरफुल आहे मला कंप्लेंट केली तर दुसरी कडे कुठेही जॉब मिळणार नाही. संजना म्हणते कॉर्प्रेट मध्ये हे असेच अस्ते. अरू म्हणते मग जा प्रवाहात वाहत.
तुझ्या हुद्द्याला काय किं मत आहे तू हिंमत धैर्य आत्मविश्वास मिळवलेला नाहीस. लढ तुझा लढा. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. अशी ग्वाही अरू देते. अरू चे मोठे पैसा वसूल संवाद आहेत. एकदम मांजराची वाघीण झालेली आहे.
व सवतीस सपोर्ट देते आहे. जय स्त्रीवाद. ( पहिले अन्याला चपलेने बड वून काढा!!) इथ परेन्त खंग्री म्युझिक आहे.

मग अरू हात पुढे करते व घरातले सर्व एकत्र येतात व आपापले हात अ‍ॅड करतात. व संजना नाट्यमय रीतीने त्यावर हात आपला ठेवते अन्या बघत आहे. आता लै भारी एक गाणे आहे जे कायम अरूचे मेजर सीन्स अस्ले की तिची भूमि का समजावून सांगते ते आहे. इथे भाग संपला असे वाटले पण इथे गणपती विसर्जन होते.

मग मुले त्यांच्या रूम मध्ये हॉट डिस्कशन करत आहेत. अभी म्हणतो दोघे हाय पेयिन्ग जॉब मध्ये होते. यश लगेच इशूला केअर्फुल राहायचे वळसे देतो. साहिल बद्द्ल बोलतो. दहा पैकी नौ जणे ह्यासाठीच ओळख वाढवतात. वगैरे अजून डिस्कशन होते. मुले संजना काय डिसिजन
घेते म्हणून वाट बघणे मोड मध्ये जातात.
कट टू भारतीय संगीत संजना खोलीत रड त बसलेली आहे. आजी दार उघडून येते व तिला समजावते. संजनाचे कार नामे उलगडून परत एकदा सांगते. कोणी तुझ्याकडे वाइट नजरेने बघितलेले मला चालणार नाही. असे आजी नेहमी प्रमाणे ठासून सांगते. अन्याचे प्रकरण रेगुलराइज झालेले आहे.

प्रोमो: अरू संजना व फॅमिली मिळून मेहताचा गेम करतात. आता बहुतेक तो घाबरून संजनाला जॉब देउन स्वतःच सोडून सन्यास घेउन हिमालयात जाईल.
सर्व घरची कंपनी हपिसात जाउन राडा करते. !!! खंग्री मॅन इन्क्लुडेड.

अमा.... Happy
अन्याचे प्रकरण रेगुलराइज झालेले आहे.
...हे वाचून निराशा वाटली.
सर्व घरची कंपनी हपिसात जाउन राडा करते. !!! खंग्री मॅन इन्क्लुडेड......
Happy
खंग्री मॅन.....!!
असं कुणी वाद्य घेऊन या लोकांच्या पाठोपाठ जात नसतं..ते नंतर add करतात ना compilation मध्ये....?!
पण तुमच्या लिखाणामुळे खरंच एक मॅन बिगुल - तुताऱ्या सांभाळत जात आहे असे वाटते...

मी तर बघण्याचे कष्टच घेत नाही किती ते illogical दाखवायचं.इतका चांगुलपणा दाखवून काय मेसेज द्यायचे असतात या सिरीयलवाल्यांना. परत घरी बोलताही येत नाही नाहीतर लगेच म्हणणार कोणी सांगितलंय बघायला.
अमा धन्यवाद तुमच्यामुळे अपडेट वाचायला मिळतात. सिरीयल बघण्याची आणि इथे लिहिण्याची इच्छा देव अशीच बरक्रार ठेवो. तुमच्या अपडेटमुळे सिरीयलचा एक viewer कमी झाला आणि माझा उगाचा बघून होणारा संतापही.

अन्याचे प्रकरण रेगुलराइज झालेले आहे>>> यापेक्षा जास्त निराशा तर अरु तिथे च्च कशी काय राहू शकते हे बघून होते. आणि वरून आता हे अ आणि अ वागणे तर फारच डोक्यात गेलेय. सगळे आता नांदा सौख्यभरे आहेत तर बंद करा म्हणावं आता तरी हा मूर्खपणा (शिरेल).

काहि दिवसानी अरुने तिच्या सिग्नेचर स्टाइलने हात पसरुन सन्जनालाही कवेत घेतल अस दाखवल तरी आश्च्र्य वाटायला नको>>>> अगदी अगदी. तोही दिवस फार दूर नसावा.

तिच्या मागे सगळे उभे राहणे वेगळे आणि संजनाच्या मागे उभे राहणे वेगळे...तिने खरंच आधी बारा वर्षे अन्यासोबत flirting च तर केलं...>> नाहीतर काय.

अरु ची जुनी "रजनी" किन्वा दामिनी होत चाललि आहे का. मेहेता बोलतो त्यात अनिरुद्ध आणि संजना च्या आधीच्या वागण्याचे अनालिसिस बरोबर असते खरेतर. जरा बरी म्हणता सिरियल परत आवरा स्टेज ला चाललेलि दिस्ते.

हो लॉकडाऊन मध्ये मेहता बदलला. अरु आता मोह माया असलेली माणूस वाटतच नाही, संत पदाला पोचली ती आता, सवत, सवतीचा मुलगा, सवतीचा नवरा या सगळ्याच्या पलीकडे गेली ती आता. आता ती फक्त प्रेम वाटते, दुरजनांना वठनिवर आणते, अन्नदान करते आणि दोहे म्हणते. गाण्याच्या क्लासचे पैसे तरी कशाला घेते, तेही फुकटच शिकवायचे. नाहीतरी ती तिच्या ऑफिसला आश्रम म्हणते, मग आश्रमात विनामोबदला सेवा करायची. अविला त्रास देणाऱ्या गुंडानाही प्रवचन दिले असते तर तेही पैसे न घेता अरुच्या नावाचा जप करत गेले असते, हे कसे नाही सुचले तिला.

असं कुणी वाद्य घेऊन या लोकांच्या पाठोपाठ जात नसतं..ते नंतर add करतात ना compilation मध्ये....>> एडिटिन्ग मध्ये करतात. मजा म्हणून लिहिले आहे. अरु व संजना च्या पाठी पुढे बेंड बाजा.

अरू संजना व फॅमिली मिळून मेहताचा गेम करतात. आता बहुतेक तो घाबरून संजनाला जॉब देउन स्वतःच सोडून सन्यास घेउन हिमालयात जाईल.
सर्व घरची कंपनी हपिसात जाउन राडा करते. !!! खंग्री मॅन इन्क्लुडेड. >>>>>>>> ते सन्जनाला घरी सगळयान्नी सपोर्ट करण्यापर्यन्त ठिक होत. ऑफिसमध्ये सगळया फॅमिलीने मोर्चा घेऊन जाण्याची गरज नव्हती. खरतर सन्जनाने एकटीनेच मेहताचा काटा काढायला हवा होता.

यश लगेच इशूला केअर्फुल राहायचे वळसे देतो. साहिल बद्द्ल बोलतो. दहा पैकी नौ जणे ह्यासाठीच ओळख वाढवतात. वगैरे अजून डिस्कशन होते. >>>>>>>>>> आधी देशमुखान्च्या युवा पिढीने दुसर्यान्च्या मुलीन्शी नीट वागले तर बर होईल.

अरु व संजना च्या पाठी पुढे बेंड बाजा. >>>>>>>>>> मै हु ना आठवला.

शुभ प्रभातः
आजी व संजनाचा त्यांच्या बेडरूम मध्ये संवाद पक्षी आजीचा एक तर्फी ओरडा आरडा चालू आहे. संजना एकद म रडक्या आवाजात तिची बाजू सांगत आहे. आजी सांगते परक्या माणसांची आम्हाल सवय नाही. त्यामुळे कधीच अ सुरक्षित वाटले नाही पण बाप्याची वाइट नजर समज त नाही का?! ह्या आजी ने कधी बोरिवली ते चर्चगेट ट्रेन ने प्रवास केला आहे का?!

संजना रडते: अनिरुद्ध चा फायदा मी घेतला आहे असे मेहता म्हण तो. माझे अनिरुद्ध वर खूप प्रेम आहे. पण हे मेह ता ला कळत नाही. माणूस म्हणून बाई कडे बघतच नाही. आजी भरीला घालून तिला सांगते इतके छान काम कर की तुझे वर्चस्व स्थापित कर. लोकांनी तुला आदराने बघितले पाहिजे. मोठा डायलॉग!!! ते अवघ ड आहे प्रत्य क्षात. तू का खचतेस असे आजी म्हणते.
आ कोरस वाली बाई एकदम जागृत होते आहे. वेगळेच खंग्री प्लस इंडिअन संगीत दिले आहे बासरी पण आहे कारण इथे फार नाट्य पूर्ण भावनात्मक पद्धतीने संजना आजीच्या पायाशी बसते व पायांना मिठी मारून रड ते. आजी का कू करत तिच्या डोक्यावरऊन आपला सालं कृत हात फिरवते व तिला एक स्त्री म्हणून आपला आधार देते. ह्याच सुमारास सु अरू पण आली आहे व उसासे टाकायचे विसरून डायरेक्ट डोळे अश्रु आलं कृत करत आहे. काय तो त्रिवे णी संगम काय ते सिस्टर हूड आ हा आहा. एकदम प्रेक्षणीय सीन आहे.
आजी संज नाच्या डोक्या वरून हात फिरवत तिला धीर देते व अरू सारखे बन असे सांगते. आधी अरूला सगळे टाकून बोलत पण आता ती कशी झाली आहे बघ. लढा देते आहे तोच तू पण दे. असे म्हणते.

आता अरू पुढे सरसावते. संजना खाली जेवायला आली नाही म्हणोन तिने तिच्या साठी एक ग्लास दूध आणले आहे ते देते व बसून पी असे म्हणते. तिला बघून संजना एकदम चक्रावली आहे. पण सावरते. नेहमीच्चा सवती मत्सर मोड इथे डिसेबल केला आहे.

आता बहुतेक अरू मोठ्या समजुत दार सवतीच्या मोड मध्ये( बहीण आक्का मोड मध्ये जाउन) काही उसासे युक्त ज्ञान देइल.
तिला बघून अरूला इशाची आठवण झाली( प्वाटाशी घेतले गं सवतीला पदर डोळ्याला - दीज क्ष्क्ष्क्ष वर्शिपर्स!!!) सहन केलेस तर एकटीने करशील पण लढलीस तर आम्ही आहोत मागे. असा बंडाचा ़ झेंडा फडकावते. संजनाला झोपवून दोघी बाहेर पडतात. ती त्यांना कधी नव्हे ते
ठेंकू म्हणते.

आता आजी व अरूचा घरातील बोळकंडीत संवाद आहे. अरू उसासे टाकत म्हण ते बायका लाजे खातर गप्प बसतात. त्याचा फायदा हे पुरुष घेतात( लाइक युअर हब्बी डीअर!!) मुलींनी कसे वागावे हे सांगते एकटी बाई सहज साध्य हे सर्व बाप्यांना वाट्ते( ( लाइक युअर हब्बी डिएअर ) आजी एकमत होउन मुलींना स्वतः ला कसे सुरक्षित करायचे ते शिकवले पाहिजे
अरू एकदम अश्या मुलींना कसे वागावे ते ज्ञान देते व आजी म्हणते अश्या पुरुषांना थोबडावा यला हवे( लाइक युअर सन डिअर)

अरू ला अनिरुद्ध धन्यवाद देतो. अन्या त्याची बाजू सांगतो. मी कायम संजनाला नीट कपडे कर नीट वागणे हे सांगत आलो. म्हणतो म्हणून बायकांनी घरीच राहावे बाहेर च्या जगात वखवखले पुरुष खूप असतात( लाइक युअर सेल्फ!!)

लगेच अरू इशाने पन घरी राहायचे असे म्हणते. पण संजनाला धीर द्या. बायकांचे खच्ची करण करणे बंद करा. तुमची नजर बदला हे सांगते.
( हे नक्की मायबोलीवरूनच घेतले आहे)

कट टू मेहता व संजना मीटिन्गः ती जर उतरल्या सारखी दिसत आहे व गया वया करत आहे नोकरी टिकवायला. ऑफिसात इतरही लोक्स आहेत. मेहता तिला रडू नकोस इतर लोक्स आहेत ते गैर समज करून घेतील. लेट मी प्लॅन अवर फर्स्ट टूर आज डिनर ला जाउ.
संजना ओके म्हणते व रडणे बंद करते. व लगेच ट्रान्सफर सीन. तिने हे सर्व फोन वर रेकॉर्ड केले आहे. फुल टू खंग्री संगीत. क्या डाव खेला है वा वा

मग मागे एकदम अन्या अनघा यश व इतर मंड ळ अवतरते. मेजर कंफ्रटेशन मोड. दहा मिनि टे राडा. अरू एक दम स्त्रीवादी # मी टू संवाद टाकते.
ऑफसतल्या इतर दोघी पण आहेत. अरू च्या स्त्रीवादी संवादावर भाग संपतो.
प्रोमो मध्ये मेहता अरू वर हात टाकणार असतो तर संजन function at() { [native code] } तो हात थांबवते व पुढे जाउन त्याला दोन तीन थोबाडीत मारते. व अरू च्या मागे सर्व पलटन बाहेर पडते. संजना चा निळा सिल्क ड्रेस व ओढणी छानच आहे. एकूण अन्याला काहीच दोष न देता पाठीशी घालोन अरू व संजना आपापले कुंकुबळ सुरक्षित करतात. त्यामुळे अन्याच्या चेहर्या वर एक कुत्सित हास्य आहे.

चला # मी टू वि षय ऐरणी वर येउन गेला. आता इशा ग्रेटा थन बर्ग चे रूप धारण करेल व अनघा अरू मिळून पर्यावर्णा साठी रॅली काढतील. अजून मुलींच्या बलात्काराचा व्हिडीओ घेउन व्हायरल करायचा सध्याचा गंभीर विषय आहेच. मग कोकणा तील वादळ ग्रस्तांना मदत मध्येच घरातील नवरात्रः घरच्या देव्यां ची पूजा कशी महत्वाची आहे ते भा षण. आजी अरू संजना अनघा इशा गौरी विमल विशाखा मिनू
इत क्या देव्यांची पूजा घालणे. व नं तर दिवाळी फराळ व दिवाळी पाडव्याला अरूने कोपर्‍यात जाउन अश्रू पुसणे व ताम्हण तयार करून संजनाच्या हातात देणे होईल.

आता पहिले अविच्या कर्जाचे मार्गी लावायला हवे. व मग अन्या संजना अरू शरम परि हारार्थ फुकेत ला जाणार आहेत. शॉपिन्ग चा खर्च नाही.

अमा, काय धमाल लिहिता! आज सकाळी नवीन पोस्ट नोट केले होते, आता ब्रेक मध्ये चवीचवीने वाचले. सिरीयल बघत नाही पण तुमचे अपडेट नियमित वाचते .

Pages