आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण घरी गणपती बनवायचाच कशाला? सरळ विकत आणावा..छोटासाच आणावा फार तर.
मग कसा गरीब मूर्तीकारांना रोजगार मिळेल हे सांगायला सू अरु मोकळी.

मग आता संजना पण गणपति बनवणार.
नोकरी टिकली असती तर अरू ने केलेल्या गणपतीपेक्षा मोठी मूर्ति विकत घेऊन आली असती.

.तुम्हीदेखील अनुभवातूनच लिहिता असे वाटते...>> आता मी धावते समालोचन व एक्स्पर्ट कमेंट करत असते. नि वृत्त पर्सन.

आत्ताच लोकसत्त्यावर वाचले की सु अरू आपल्याला पिडायचे प्रत्येक भागाचे २५००० रु घेते. अन्या लफड्याचे २०००० प्रत्येक भागाचे. व संजना
१७००० घेते म्हणजे बाकीची फटावळ त्याहून कमी पैशात पर डे आहे. संगीत कारांचे काही दिलेले नाही. हे वाचून मीच उसासा टाकला. ७८ लाख प्री टॅक्स इनकम झाले की तिचे. त्यासाठी उसासे टाकायला काय अवघड नाय.

कान्चनला तर कुणाच्याच कामाची किम्मत नाही. ना अरु च्या कामाची, ना सन्जनाच्या कामाची आणि ना विमलच्या कामाची. काय तर म्हणे सन्ज नाने लायकी बघून स्वप्ने बघावीत. स्वतः कॉर्पोरेटमध्ये काम केल असत तर कळल असत तिला.

स्वतः कॉर्पोरेटमध्ये काम केल असत तर कळल असत तिला.>> गालावरच्या खळ्यात अप्पा अडकले नं.

शुभप्रभातः
आनंदी संतूर बासरी म्युझिक आहे. आजी विमल अरू चे कामाबद्दल संवाद कॅरी फॉरवर्ड होतो आहे. सु अरू आजीला विचारते तुम्ही हरिताळिके ची पूजा करणार ना. मी घरात पूजा होते आहे त्यातच आनंदी आहे. मी विचारच करत नाही गळ्यात काळा मणी आहे कि नाही. आजी पण खूष आहे.

तेच संगीत कंटिनू. यश व गौरीचा प्रेमळ संवाद आहे. गौरी म्हणते मी अमेरिकेत पण गणपतीची तयारी टीम मध्ये होते व करत असे. गणपतीच्या आगमनाची तयरी चालू आहे. व यश तिच्या कडून आईला असेच कायम समजून घेण्याचे व सपोर्ट करायचे प्रॉमिस करतो. मी यश ला घरी घेउन येते म्हणते. संजनाचा जॉब गेल्याचे डिस्कशन होते. ती घरी आई घरी आजी सुद्धा काय प्रसंग येतील म्हणून गौरी विचारात पडली. यश तिला
म्हणतो फार विचार करू नकोस आता गणपतीची तयारी करू.

उगीच दु;खी सस्पेन्स चे संगीत मध्ये दिले आहे.

आता अवी व अप्पा आजी ह्यांचे संवाद आहेत. गण पतीला आला आहे. पँ डे मिक मुळे फारच त्रासेस आहेत बिझनेस स्टार्ट करायचा तर. आजी इथे बोलवते पन अवी म्हणतो आता घरातले डायनामिक्स बदलले आहेत. आम्ही वाशीलाच बरे. अरू सामान घेउन येते. व पंधरावीस उसासे टाकते. अवि मग आत आणतो. व तिला पाणी ऑफर करतो.

अप्पा तुझे नोकरी पाणी कसे चालू आहे विचारतात तर तो कसनुसा होतो व ठीक आहे म्हणतो. इशाची चिरकत चीत्कारत एंट्री. नीलिमा नेहमी
माहेरी जाते म्हणून आजी करवादते.

अवी इशाला हम सब के लिये कॉफी बनाके लावो म्हणून कामाला लावतो व ती चिरकत जात असते तर संजना वर धडकते. आता पुढे
खंग्री मॅन चा उदय होतो. संजना इशा आपटल्या बद्दल नाराजी व्यक्त करतात.

अवि आला म्हणून संजना तोंड सुरू करते. हे घर तुमचे नाही कधी ही येणार काय. पण हे घर तुमचे ही नाही म्हणून अवी मला तुमच्याशी बोलायची वाद घालायची इच्छा नाही म्हणतो. संजना गुड म्हणते. अन्या तिला जरा कंट्रोल करतो. मग अवि अन्या मध्ये पंचखाद्य व पंचामृत वरून लाडिक वाद होतो.

संजना बेडरूम साठी सामान घ्यायला अन्या बरोबर बाहेर जाते आहे. ( १) नवा मजबूत फ्रेमचा बेड, दोन साइड टेबले. एक भला मोठा वॉर्ड्रोब तिच्या सामाना साठी) अन्या तिला विचारतो काय काय घ्ययचे आहे. ड्रेसिन्ग टेबल व नवे कर्टनस भिन्ती वरच्या सर्व फ्रेम्स बदलायच्या आहेत.
तिथे शेंगदाण्याचा मोठा दात पडका फोटो व स्वतःचा सोनेरी केसातला फोटो लावायचा आहे. अन्या म्हणतो फार महाग आहे फर्निचर आपला विजू कार्पेंटर पन्नास हजारात सर्व करून देइल आपल्याला आता घरासाठी थोडा खर्च करायला लागेल. ( अन्या म्हणतो हा खर्च उगीचच आहे) तर ती म्हणते मी करेन तू नको करू. मग मालाडला जायचे ठरते कारण तिथे फर्निचरची दुकाने आहेत म्हणून.

अवि आपल्याला गुंडांकडून थ्रेट येत आहेत कारण निलीमाचे खर्च भागवायला त्याने कर्ज घेतले आहे. ते फेडायचे प्रॉब्लेम आहेत. बेंक लोन
घेतले तर कसं पण अवी म्हणतो माझे होम लोन पर्सनल लोन कार लोन चालू आहे. जास्त व्याजाने पैसे घेतले आहे. अरू म्हण ते मला कळत नाही फारसे तुम्ही अप्पाला विचाराल का?! खंग्री मॅन वीज पडायचे धाड धुडुम असे संगीत देत आहे.
अवि पैसे गोळा करायचा प्रयत्न करत आहे. अरू केदार विशाखा देविका पर्याय सुचवते. अवी घर विकून कर्ज भागवायचे तिला सांगतो व आम्ही घर भाड्याने घेउन राहू म्हणतो. इथे निलिमा नको म्हणतो. हे संभाषण गुप्तच ठेव म्हणतो. सु अरू म्हणते बाप्पावर श्रद्धा ठेवा व समजुत दार उसासे पट्टी सोडते एक.

इथे भाग संपला.

आता प्रोमो मध्ये असे आहे कि अवि बाहेर पडतो व गौरी कडे मखर बघायला जात असतो तर गुंड तिथे बाहेरच त्याला पकडून मारहाण करतो
व यश ला पण मार बसतो.
अरू बघून घाबरते व चक्कर आल्याचे अ‍ॅक्टिन्ग करते. चांगल्या घरातील प्रोटेक्टेड सून असल्याने तिला असल्या बाबींचा अनुभव नाही.

आजी चा संवाद ऐका ती एका ठिकाणी मी मुले लहान असताना बरणी भर पंचखाद्य व घमेले भर पंचामृत बनवत असे व सासू बाई लाडाने मुलांना हवे तितके देत. वाटून झाले की मुले पंचामृत पिउन टाकत असे म्हण ते. ते पंचामृत बरणीत व पंचखाद्य मोठया तसराळ्यात असे हवे खरेतर कारण पंचखाद्य कोरडा पदार्थ आहे व पंचामृ त लिक्विडी ते बरणीत हवे.( आणि म्हणे ही निगुतीने संसार करते!!!)

छान लिहिलंय अमा!

एवढी पोरं हाताशी असून अरुच जाते का बाहेर सामान आणायला?
अवि याच घरात, तेही न मिळवता असं दाखवायला म्हणून हा कर्ज ट्रॅक आणला आहे असं वाटतंय
म्हणजे फक्त अरुच एकटी कमावती असं दाखवता येईल

पंचखाद्य उरले तर त्याच बरणीत ठेवत असेल आज्जी कारण ते नाशवंत नाही,पण घमेले रिकामे करून लगेच विमल ला घासायला देत असेल

अमा...किती बारकाईन बघता तुम्ही सीरियल....पंचखाद्य आणि पंचामृत... Happy
बरोबर आहे.
आजकालची मुलं वेगन आणि डाएट conscious असतात...ती नाही खाणार असं... चमचाभर प्रसाद म्हणून ठीके..

बघून घाबरते व चक्कर आल्याचे अ‍ॅक्टिन्ग करते. चांगल्या घरातील प्रोटेक्टेड सून असल्याने तिला असल्या बाबींचा अनुभव नाही.. Lol बरोबर..

स्वतः कॉर्पोरेटमध्ये काम केल असत तर कळल असत तिला.>> गालावरच्या खळ्यात अप्पा अडकले नं. >>>>>> _+++++++११११११११

मी यश ला घरी घेउन येते म्हणते. >>>>>>>>> इथे निखिलला घरी घेउन येते असे हवे होते.

इथे निलिमा नको म्हणतो. >>>>>>> अरु नको म्हणते असे हवे ना?

मग अवि अन्या मध्ये पंचखाद्य व पंचामृत वरून लाडिक वाद होतो. >>>>>>>> अन्या ने माबो वाचल वाटत. आजकाल सगळन्याशी हसून बोलत असतो. एरवी मख्ख असायचा.

अरू बघून घाबरते व चक्कर आल्याचे अ‍ॅक्टिन्ग करते. चांगल्या घरातील प्रोटेक्टेड सून असल्याने तिला असल्या बाबींचा अनुभव नाही. >>>>>>>>अस कस अस कस. अभिला मारहाण झाली हॉस्पिटलमध्ये तेव्हा ती होती ना?

इथे निलिमा नको म्हणतो. >>>>>>> अरु नको म्हणते असे हवे ना?>> नाही अवी म्हण्तो नीलिमा तिथेच बरी इथे यायला नको. आम्ही भाड्याचे घर घेउन राहतो. वाशीचे घर विकून देणी भागवतो असा प्लॅन आहे.

हो हो तिथे निखिल हवे.

अनुपमा मधे ती अनुपामा स्वतःच्या कारखान्याचं कर्जं वाचवायला तिच्या हिस्स्याचं घर कोणाला न सांगता गहाण ठेवते, तसं यात आता बहुदा आरुही अविनाश भाऊजींचं कर्जं वाचवायला घर गहाण ठेवणार असं दिसतय Uhoh

शुभ प्रभातः

आज लेक सकाळीच वीकेंडला दिल्लीला रवाना झाली. मुलांचे हे बरे आहे फार काही करावे लागत नाही. फक्त साडॅपाचला उठवले. कॅब बुक केलेलीच होती ती वेळेवर आली पॅकिन्ग करा हे ते घेतलेस का विचारले इतकेच. पूर्वी तिचे बाबा कामाच्या निमित्ताने सारखे आडनिड्या वेळी जायचे यायचे तेव्हा आधी आपण उठा चहा खाणे बनवून हातात द्या. बूट पॉलिश करा. पॅकिन्ग ला मदत करा अशी सू अरू मोड मध्ये कामे केली आहेत. आता फक्त खोड कर पण निरुपद्र वी पालकाचा रोल करायचा. मज्जानु लाइफ.

तर आता चहा पाव घेउन एपिसोड बघायला बसले आहे तर इथे नवे महाभारत चालू झाले आहे.

अवि अप्पा जेवण उरकून गप्पा मारत आहेत व सु अरू सु सुपारी त्यांच्या हातात एक एक चमचा देते. यश काकाला बोलवतो मखर बघायला
अवि बाहेर गेल्यावर गुंडाचा अ‍ॅटॅक होतो. त्याला सोडवून अवी यश अरू आत येतात. अरू यश ला सर्व सांगते. ती भावजींना मदत करायची
इच्छा व्यक्त करते बँकेतून कर्ज घ्यायची इच्छा व्यक्त करते. पन ते तुला जमेल असे वाट्त नाही असे यश समजावून सांगतो. तिचे पेपर्स पण नीट नाहीत ह्यांनी सांगितले तिथे सही केली टाइप स्त्री आहे.

वाशीचे घर विकून काही होणार नाही असे यश म्हणतो. शेखरशी बोलू असे पण म्हण तो. यश व उसासे क्वीनचा संवाद आहे.

कट टू संजना व अन्या इन बेडरूम. संजना नोकरी शोधत आहे. अन्याचा मित्र आहे तो स्टार्टप सुरू केली आहे. त्यात त्याला जॉइन हो म्हणतो.
अजून दहा वर्शात मी रिटा यर होईन त्यात जमेल तितके पैसे वाचवायचे मोड मध्ये अन्या आहे.

दारावर थाप पडते आजी वैतागून आत येते व ड्रामा चालू झाला आहे. उद्या गणेश चतूर्थी. आज हर ताळिका व्रत आहे तर निर्जळी उपास व पूजा करावे लागेल. अशी गेम आजी टाकते. आता अंघोळ करून खाली ये पूजा करायला असे आजी सांगते. अन्या हसत अजून एक उपास म्हणतो.
संजना चॅलेंज घेउन करणार म्हणते. जिद्दीने.

अरू ची मूर्ती तयार झाली आहे व सुकली आहे. आता तिला झाकून ठेवले आहे. निखिल ने उंदीर केला आहे. व शिवलिंग बनवले आहे.
शेंगदाणा व सिनीअर शेंगदाणा टणा टणा उडत आहेत. इशा साहिल ला बोलवू का विचारते. गौरी पक्षी ज्यु अरू कॉफी आणते व निखिल ला दूध
आणते. अप्पा व मुले जिन्यात बसून समजुत दार गप्पा करत आहेत.

सु अरू ला अभीची काळजी आहे. कारण तो संवेदनशील आहे. आता सु अरू हरितालिकेच्या पूजेच्या तयारीला जाते.

कट टू आजी विमल किचन संवाद. उकडीच्या मोदकांची तयारी आहे. परत तिला चिडवते व कामावरून काढून टाकायची धमकी देते. गौरी ने पण उपास धरला आहे बहुतेक. कढीची चव घ्यायला नकार देते. मग आजी चव बघते. मीठ कमी आहे.

कट टू अरू डुइन्ग लगबग पूजेची तयारी. प्रसादाचा शिरा तयार आहे. अंगण निसरडे झाले आहे. असे अरू म्हणते. ( इथे पुढे कोणी तरी पडेल बहुतेक)

अप्पा यश जनरल गणे शोत्सवावर चर्चा करत आहेत. म्हातारा फार पीळ मारतो.

इथे संपले

प्रोमो मध्ये गणपती घरी येतात व अरू ताम्हन घेउन स्वागताला येते तर लगेच संजना आडवी जाउन आता मी सून आता मी करणे हा मान माझा आहे वगैरे सेम पट्टी व अरू स्मजूत दार पणे ताम्ह न तिच्या हातात देते. घरातली गर्दी आजू बाजूला दंगा करत आहे.

आता हा एक सीन दर वेळी दर पूजेला दर वेळी रिपीट होतो आहे. त्यात काय नवीन. वी नो दॅट. संज ना व अरूचे गणपतीच्या पूजेवेळचे
साडी नेसून नटलेले फोटो लोकसत्ता ने टाकले होते त्यात संजना छान दिसते अरू ची हेअर स्टाइल विचित्रच आहे. सोशीक सुनेचा मेक ओव्हर म्हणजे तिचे केस फुगवून विचित्र करायचे अशी काहीतरी टेंप्लेट असेल.

सोशीक सुनेचा मेक ओव्हर म्हणजे तिचे केस फुगवून विचित्र करायचे अशी काहीतरी टेंप्लेट असेल.>>> राधिका स्टाईल आहे ती. मानबा वाली.

Lol राधिकाचा काय भयाण मेक ओव्हर केला होता....! नशीब, त्यांना वेळीच लक्षात आले..व त्यांनी तो पुढे चालविला नाही..... !!
सु अरु मोड.....! Happy

नाही अवी म्हण्तो नीलिमा तिथेच बरी इथे यायला नको. आम्ही भाड्याचे घर घेउन राहतो. वाशीचे घर विकून देणी भागवतो असा प्लॅन आहे. >>>>>>>>>> ओहो अच्छा. धन्स अमा

शेंगदाणा व सिनीअर शेंगदाणा टणा टणा उडत आहेत >>>>>> तो शेंगदाणा सारख सारख 'आय एम बेस्ट, मी कित्ती हुशार आहे" म्हणत होता आज. पोरगा आईवरच गेला आहे.

अंगण निसरडे झाले आहे. असे अरू म्हणते. ( इथे पुढे कोणी तरी पडेल बहुतेक) >>>>>>> अनघा घसरुन अभिच्या मिठीत पडेल नाही तर अरु घसरेल अन्याच्या मिठीत. टिपिकल रोमॅन्टिक सिन ठरलेलाच असतो असा सगळया सिरियल्समध्ये.

अप्पा यश जनरल गणे शोत्सवावर चर्चा करत आहेत. म्हातारा फार पीळ मारतो. >>>>>>>> नैतर काय. बिच्चारा यश

प्रोमो मध्ये गणपती घरी येतात व अरू ताम्हन घेउन स्वागताला येते >>>>>> अन्याच तिला बोलावतो.

अरू ची हेअर स्टाइल विचित्रच आहे. सोशीक सुनेचा मेक ओव्हर म्हणजे तिचे केस फुगवून विचित्र करायचे अशी काहीतरी टेंप्लेट असेल. >>>>>>> कुठला मेकओवर? स्टार प्रवाहवर मागच्या रविवारी गणेशोत्सव स्पेशल शो झाला होता त्यातला फोटो असेल हा.

राधिकाचा काय भयाण मेक ओव्हर केला होता....! नशीब, त्यांना वेळीच लक्षात आले..व त्यांनी तो पुढे चालविला नाही..... ! >>>>>>>> अगदी अगदी. पण तिचा शेवटचा मेकओवर चान्गला केला होता. सौमित्रशी लग्न होण्याआधीचा. त्यावेळी स्टायलिस्ट बदलला वाटत.

शुभप्रभातः

गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला:

दोन भाग आहेत १९ ला पन एक भाग झालेला आणि आज रिलीज झालेला एक. आज हपीसला पण साडे आठला पोहोचायचे आहे.

भाग १९ सप्टेंबर:

अन्या गरम गरम जिलेबी प्रसादाचे पेढे घेउन आला आहे. अप्पा आजीची नजर चुकवून जिलेबीवर हात मारतात. न ज्युनि अर अरू उपास करोन
भाव खात आहे व इन जनरल पुजेची तयारी उत्साहाने चालू आहे अवी मार्केट मधून मस्त पैकी फुले आण्तो. अन्या अवीला जिलेबी भरवतो.
टार आवाज आला आहे म्हणजे तर्री आली किवा काहीतरी क्रैसीस.
अन्या त्याला विचारतो कपाळाला काय लागले. जखम झालेली आहे. अवी थापा मारतो. व तयार होउन स्वयंपाकाला लागतो. गौरी यश उपासामध्ये शायनिन्ग करत आहेत. ते बघून सु अरूच लाजत आहे.

कट टू आजी पूजा करीन्ग हरिताळकेची. मग गौरीचा नंबर व संजना पण पूजा करायला येते. पण माहीत नाही. आता पाच मिनिटे त्याची कथा माहिती सू अरू आपल्याला देते. प्रवचनच आहे. संजनाचा हिरवा ब्लाउज छान आहे. प्रवचन ऐकून संजना हे सर्व बायकांनी का करायचे असा
सुडो स्त्री वादी विचार मांडते.

सू अरू आजी परत सुरू होतात. त्यात बायकांनी व्रते केली की घरातले वातावरण चांगले राहते असे आजी सांगते. संजना पाट ओढून बसते.
सु अरू सांगेल तशी पूजा करते. झिपर्‍या गळ्यात घेउनच पूजेला बसली आहे. आता हिने व गौरीने एकत्र केली तर काय वाइट पण नाही.
फोकस सं वर आहे. तिचे झाल्यावर गौरी बसते. गौरी व गैरी Wink आजी अप्पांची पॅट्रार्की ड्रिव्हन वचवच चालू आहे पक्षी बुड्ढ्यांचे शायनिन्ग
ती समजूतदार नाही तिला समजूतदार कर असे आप्पा थट्टेने म्हण तात. अरू तिला बघून अनघाला याद करते. ( मागे एटीएम संगीत आहे)

इशा ला मात्र पूजा घालत नाहीत. मग नमस्कार करायचे नाटक. आजी संजनाला उचकावते . ती उचकून बडबड करून निघून जाते व अन्या तिच्या मागे.

अरू यश ला उद्याचे ब्रीफिन्ग देते. मूर्ती उचलायला अभीला मदत कर अन्याला वाकून काही करताना पाठ दुखते अशी काळजी करते( ......... तरी बरे वर नवे मॉडेल फलकारे मारत फिरते आहे बेड्रुमात नवा बेड घ्यायची वेळ आली आहे. हे हिला माहीत नाही...)

यश अवी साठी पैशाची सोय करायला काही तरी तार ण लागेल असे सांगतो अरू विचारात पडलेली आहे. ( बहुतेक घराचा भाग तारण ठेवतो.) शेंगदाणा खाली येउन टणाटणा उडतो आहे. फालतू असंस्कारी शंका विचारतो आहे. गण पती आगमन तयारी चालू आहे. पुरण पोळ्यांची ऑर्डार दिली आहे व गौरी ला आवडते म्हणून कटाची आम टी पण येणार आहे.

अन्या संजना अजून झोपलेले आहेत आजी शेंगदाण्याला त्यांना उठवायला पिटा ळते तो दारावर आग लागल्या प्रमाणे बोंबलत वाजवतो आहे.
व आल्यवर लगेच हिरोइनला उठवतो. तिला रात्रभर उलट्या होत होत्या( अ‍ॅसिडीटी ? का अजून काही.) अन्या संजना एकत्र तयार होउन मग खाली येणार म्हणून शेंगदाण्याला पिटा ळ तो. संजना त्याला डोके चेपायला सांगते( काय हे दुसरीचे लाड!!!)
एक पीळ संवाद आहे संजना ला अन्या पुढचे दोन दिवस नीट वाग तोंड बंद ठेव म्हण तो. अप्पा करणार पूजा असे अन्या क्लीअर करतो.
आता अ प्पा आजी संवाद आहे.

गणपती आल्याचा सीन आहे तो मी फॉरवर्ड केला. मग संजना मध्ये आडवी जाउन खंग्री संगीता सोबत आता मी सून आहे मी गजान नाचे स्वागत कर्नार हा मान आता माझा आहे असे जाहीत करते. फुग्याच्या बाह्यांचा ब्लाउज घातला आहे. म्हणजे तयारी तर होती मग न यायचे नाटक कश्याला.

मग अरू बाजूला उभी राहून तिला आगमन कसे करायचे ते सांगते.

आजोबा अविला पूजेला बस म्हणून सांगतात व तो मान देतात. गुरुजी सु अरूला कामे सांगत आहेत. पण संजना पुढे येउन तिथे ही
अन्या कडून नमस्कार करवून घेते . जोड्याने. पण गुरुजी अरूलाच कामे सांगतात. अन्या व संजना रिसेप्शन ला बसल्या सारखे कोचावर बसले आहेत.

अभ्या व अनघा आले आहेत. मूर्तीचे कौतूक चालू आहे. आजी आडून आडून कौतूक करत आहे. व यश गाण्याचे पण कौतूक करते. आजी परत खट्टे टाकून संजनाला उचकवत आहे. जरा वयानुरूप मॅचुरिटी नाही. संजना खाली शेग डी पेटवत आहेत कायम .
अन्या संजनाला पण आत जाउन मदत कर म्हणतो. पण ती जात नाही
अरू किचन मध्ये फुल ऑन मोड मध्ये आहे नैवेद्य तयार होतो आहे.

अनघा आल्याचे अरू कौतूक करते.

एटीएम संगीत आले आहे एकदम. अरू उसासे टाकत आई बाबांची चौकशी करते अनघाच्या . अनघा पण एक रंगी चांगली मुलगी हे आपले पात्र वैशिष्ट्य सार्थ करत गोड गोड संवाद बोलत आहे.

गौरी आगावू पणा करत काही एक अपेक्षित प्रश्न विचारत आहे. असे अवघ्ड पर्सनल प्रशन ऐन घाईत विचारायचे नाहीत हे कळत नाही का?

प्रोमो: अरू नै वेद्य कसा वाढायचा ते सांगत आहे . संजना म्ह णते फोटो काढते. कारण पाच वर्शांनी परत करायचेच आहे तेव्हा तू नसशील
गणपती गेल्यावर जाशील ना तू? असा प्रश्न विचारते.

ती इमरती होती.
शेंगदाणा खरंच आग लागल्यासारखा दार ठोकत होता.
गणपती आणताना अभि- अनघा डान्स.
अरुंधतीच्या गुणांचं अनिरुद्धला कौतुक नाही असं कांचनने म्हणताच अप्पा तिलाही ते आताच उमगले आहेत असा टोमणा मारतात.

संजनाखाली शेगडी Lol

अरुंधतीला अपॉइंटमेंट लेटर कधीचं मिळालंय. ऑफिस जॉइन करायचं दूर बघून आल्याचाही उल्लेख नाही. आईला तर विसरलीच.

अर्ध्या मालकीचं घर तारण ठेवता येईल का? अविनाशचं वाशीचं घरही अजुन कर्जमुक्त नसावं. साहिलकडून उधार घ्यायचे पैसे.

शुभ प्रभातः

२०थ सप्टेंबर भागः

गौरी अनघा प्रेमळ संवाद दिल से दिलकी बात चालू आहे. तसा स्त्री चा आलाप मागे आहे. ही पण एक समजुतदार लेव्हल १० आहे.
गौरी लगेच तू अभीदादाला अजून एक संधी देशील का विचारते तो खूपच गिल्टी फील करतो आहे असे सांगते. अभीदादाची घुसमट व्यक्त करते. ( हे त्याचे त्याला सोटम्याला बोलता येत नाही का?! संधी द्यायची ती पण अनघाच नेच. चांगले मित्र मैत्रीण व्हा नॉर्‍मल राहा असे प्रेशर कमी करायचे वळसे देते. ( भाई प्रेशर तो रहेगा ना?!) एवढे बोलून वर सॉरी पण म्हणते.

लहान तोंडी मोठा घास. सु अरू पण आत येउन हे ऐकत आहे बहुतेक. आता अनघा पण रड त रडत मन मोकळे करत आहे. अरू आता बोलायचे सोडून नुसतेच अश्रू मिश्रीत उसासे सोडत आहे. किती गोड ना बायका किचन मध्ये डोळे पुसत पुसत मन मोकळे करत आहेत.
तिकडे नैवेद्य गार होतो त्याचे काय?! अभी गार पड्तो त्याचे च कौतूक चालू आहे.

आजी अनघाला बोलवते. व हे संवेदनशील रडारड संपते एकदाची. एकदम आनंदी बासरी संगीत आहे.
आता गौरीचे चित्कारणे व ती तीन दा आई आई आई करते ते नक्की ऐका. एकदम कुत्रे केकाटते तसे आहे. अजून एका साखरपुड्या लग्नाची सोय झाली आहे. व गण रायाची कृपा वगैरे नक्कीच. गौरी व अरू च्या चेहर्‍यावर हसू बघून यश चक्रावतो. गौरी पंचामृत बारक्याच भांड्यात व वर बशी झाकण असे ठेवले आहे ते घेउन जाते.

आता आरती.

अवी पूजेची आरती द्यायला एय्तो तर अरू नव स्वप्नात हरवलेली आहे. ( पोस्ट ऑर्गॅस्मिक समाधान असेच हे एक्स्प्रेशन आहे. शब्दाबद्दल सॉरी बरंका तायांनो. माफी असावी. ) एकदा बघा म्हंजे कळेल.

शेंगदाणा मोदक खायला मागतो तर अरू त्यावर तूप घालून देते. आजी काहीतरी करवादते अवी लगेच मुलं देव घरंची फुले असा सुविचार टाकतो.

आता किचन मध्ये नैवेद्याचे पान घालायचे राजकारण चालू आहे. फलकारे क्वीन ला सू अरू सर्व समजावते आहे. फलकारे ला गूगल यु ट्युब किंवा आपली मायबोली बघून सुद्धा सम जले असते की नैवेद्याचे. पण मेहनत कोण करेल. फुग्याचा ब्लाउज एकदम भारी आहे. तेच कापड
मागे पाठीला लावले असते तर बरे झाले असते.

संजना आता गणपतीनं त र जाशीलच ना तू म्हणते. ( खंग्री संगीत आहे) परत मी काही चुकीचे बोलले का विचारते वरून. आता अनघाकडे मोर्चा वळते. तशी ही तू दुसरी अरुंधतीच आहेस म्हणते. हे वेगळेच प्रकरण आहे त्यामुळे तुम्ही ताईची रिप्लेस मेंट होउ शकत नाही आपण वेळेला तिची मदत घेउ असे क्लीअर करते. ह्या ब द्दल संजना आनंद व्यक्त करते. एक इं टेन्स युद्ध निर्माण होते आहे पण सु अरू मध्ये पडते.

संजना आपल्या डोक्या ने नैवेद्य वाढते. मोदकाची जेव णे झालेली आहेत. अभी अनघा संध्याकाल साठी लाडू चिवडा लागेल तो आणा यला गेले आहेत.
सु अरू असल्याने धाकल्या सवतीने मदत केली असे सांगते. आजी परत उकरून काढते काही वाद. हिला मुद्दामून टोचून बोलायची सवय आहे.
एक भांडण परत सुरू होते. फुटकळ स्कर्मिश.
अप्पा आजीला व अन्या संजनाला हात धरून मागे ओढतात. ( सेन्सिबल पॅट्रार्की मेसेज. - बायका वाहावत जातात व बाप्ये त्यांना जाग्यावर ठेवतात.)

प्रोमो मध्ये: अभी अनघा वेडिन्ग प्रपोजल परत एकदा शिळ्याच कढीला उत. अरे उरका एकदाचे.
इथे ही एक आणि तिथे मुक्ता उका एक धड अरे राहु या एकमेकांबरोबर असे तोंडा तून काढत नाहीत शब्द!!! किती तो भावभिजले पणा.

आता मला ऑफिसच्या मेल्स बघून, कुत्र्याला औषध देउन, कपडे धुवून वाळत टाकून, भांडी करून डबा बनवून पावसाचे नौ च्या आत ऑफिस गाठायचे आहे. तेव्हा हॉफिसातुन भेटू. ( माझं मेलीच कोणी कौतूकच करत न्हाई भ्याआआआआ Happy )

अमा.... तुमचे कौतुकच आहे हो...!! Happy नाही असे का म्हणता...?

छान लिहीलं आहे... इतक्या घाईत तर फारच छान! पुरण-पोळ्या आणि लाडू-चिवडा सगळं बाहेरुन का? सु अरु असताना?

तुमचे कौतुकच आहे हो...!!>> अगं तुम्ही नाही . घरातच कोणी नाहीताना. अरू ला कसं अरे वा पहिली नोकरी अरेवा पहिला पगार असे हपा कौतूक व आधार मिळतो तसा नाही मिळत प्रत्यक्षात. तुम्ही तर लहान मुली मीच तुमचे कौतूक करायचे.

Happy हो , हे बरोबर, आहे. ..!! घरी इतकं कुणी पावला पावलाला कौतुकही करत नाही आणि अपमानही करीत नाही...!!

आजी नसती तर आता ही सिरियल डब्यात गेली असती. अरु आणि त्या २ मिनी अरु बयंकर बोर करतात. शेखर ला का गायब केला? तो पण जरा बरे मनोरंजन करतो.

Actually , अरु ची पोझिशन सध्या बेस्ट आहे. मस्त मुलं आहेत, सासू सासरे दीर सगळे आहेत प्रेम करायला, घरात मान आहे. माया आणि लाड करायला शेंगदाणा ही आहे. प्लस नवऱ्याची कटकट अजिबात नाही. करायचाय काय तो नवरा ह्या स्टेज ला ! फुकटची वादावादीच नुसती:P Proud Proud Proud

मनीमोहोर अन्याचे तरी काय वेगळेय. सगळे कुटुंब आहे सोबत प्रेम करायला, अरु चवीचे खायला घालतीये, संजना मिठ्या मारतीये . Proud Proud

Pages