आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या यशला लाजाबिजा आहे की नाही? सगळयान्समोर हा गौरीला तोण्डाने जिलबी भरवायचा प्रयन्त करतो. तेच जर साहिल ने इशाबरोबर केले असते तर सु अरु ने तिच्यावरच डोळे वटारलेच असते.

गणपती आणताना अभि- अनघा डान्स. >>>>>>>> अगदी अगदी. गपपतीच कौतुक कमी, ह्या दोघान्च कौतुक जास्त चालल होत.

प्रवचन ऐकून संजना हे सर्व बायकांनी का करायचे असा
सुडो स्त्री वादी विचार मांडते. >>>>>>>>>> आजीने दिलेल कारण अगदीच फुटकळ होत.

शेंगदाणा मोदक खायला मागतो तर अरू त्यावर तूप घालून देते. आजी काहीतरी करवादते >>>>>>>>>> ' हल्लीच्या मुलान्ना जराही धीर नाही. नैवेद्य खायला कित्ती ती घाई' असे म्हणते. हेच ती यश आणि ईशाला का नाही ऐकवत? जेव्हा बघाव तेव्हा ' आई मला कॉफी, आई मला कोको' करत असतात. शेन्गदाणा बरा दिसतो हिला कट कट करायला.

गौरी आगावू पणा करत काही एक अपेक्षित प्रश्न विचारत आहे. असे अवघ्ड पर्सनल प्रशन ऐन घाईत विचारायचे नाहीत हे कळत नाही का? >>>>>>> शेवटी ती सन्जनाचीच भाची.

आजी परत उकरून काढते काही वाद. हिला मुद्दामून टोचून बोलायची सवय आहे. >>>>>>>>>> अगदी अगदी. सन्जना बरोबर म्हणाली, " हिने कितीही चान्गल केल, चान्गल वागायचा प्रयन्त केला तरीही टोमणे हे ठरलेलेच! मग कुठून उत्साह येईल काही करायचा?" हिला तरी अरु बनायची हौस का आहे?

संजनाचा हिरवा ब्लाउज छान आहे. >>>>>>>> सहमत. हरतालिका पुजेच्या वेळची हिरवी साडी छान होती.

तेच जर साहिल ने इशाबरोबर केले असते तर सु अरु ने तिच्यावरच डोळे वटारलेच असते.>> कारण पूर्ण सिरीअल च मेसेज पुरु ष प्रधान संस्कृतीची
आरती गाणे व स्त्री हा एक माणूस व्यक्ती आहे हे विसरोन जावे संसारात मिसळून जावे लोकांना जीवन अर्पण करावे असाच आहे. नो म्याटर व्हॉट.

मामी याचसाठी मला या सिरियल चा राग येतो. मी जर अरुच्या जागी असते तर अन्याचं थोबाड पण पाहिलं नसतं त्याच्या अफेअर च कळल्यावर. मुलं लग्नाची झाली तरी आईला चिकटलेली, बाई स्वतंत्र राहून तीच आयुष्य मस्त जगते असं दाखवा जरा, काय ते संसार संसार खेळ दाखवतात नुसताच

ते तोंडने जिलेबी भरवायचे मी बघितलेच नाही काल गडबडीत. तो जरा जास्तच उत्साहात आहे ह्य बाबतीत. गौरीचा प्रोब्लेम आहे नाहीतर त्यांचे लवकर लगन करून दिलेले बरे अशीच परिस्थिती आहे. ( सिरीअल च्या नजरिया तून)

आजचा भाग कालच्या भांड णातून सुरू होतो. व पुढे जातो. संजना नोटेबली पाणी पिते व तो ग्लास अरू किचन मध्ये नेउन ठेवते.
अवि मुले आई अप्पा संजना अरू असे आहेत तर अवी जुन्या आठव णी काढतो. त्यात ललिता नावाची अन्याची पहिले प्रेम आहे असे बाहेर येते.
त्यावर संजना डोळे वटारून बघत बसते. तिला( ललिता आता अमेरिकेतून भारतात आलेली आहे) गणपतील बोलवायचे ठरते. जनरल कल्ला चालू आहे.

कट टू गौरी घर. अनघा व अभी पेपर प्ले ट्स सोडायच्या बहाण्याने येतात व इकडे तिकडे करतात. आता त्यांच्या प्रेमाच्या इजहारचा मोठा सीन आहे. लेडीज कोरस संतूर बासरी. अनघा रडारड करून मला जवळ घेउन वचन दे मला सोडून जाणार नाही असे रड्क्या सुरात म्हणते.
ती खरेच फार हर्ट झालेली आहे. ह्यांचे लग्न झाले तर आपण सुटलो. को रस वाल्या बाईचा सूर एकदम हवेत बासरी बरोबर इकडे तिकडे फिरत आहे, मिठी घडल्यावर लगेच प्लेट शोधायला आलेला यश ते बघतो व खूष होतो. आशिक मिजाज आदमी आहे.

अरू ची साडी ब्लाउज यश चा शर्ट अनघा चा ड्रेस व अभ्याचा कुर्ता हे सर्व एका न एका लाइट डार्क ऑरेंज शेड मध्ये आहे. कपडे छान आहेत सर्वांचे. ते ह्यांना बघतात व जोडी कॉन्श स होउन दूर होतात व काहीतरी लेम डक एक्स्पलनेशान देतात. पण साधारण इनकी तो निकल पडी. अरू म्हणते विचार करून निर्णय घ्या. मग मागे फिरायचे नाही.

अभी सारखा निर्म ळ मनाचा मुलगा ह्याव अन त्याव अनघा देशमुखांची सून हो ण्याची अभीबरोबर संसार क्रायची स्वप्ने बघू लागली आहे त्यात अरू सारखी सासू हा एक वळसा आहेच.

आता मधूनच फनी म्युझिक आहे. अरू अभ्याचे कान पिळते. एक फॅमिली फोटो पण होतो. हे लग्न लवकरच करून द्यावे असे ठरते. अप्पा बोलवतात. उसासे क्वीन संधी सोडत नाही उसासे देत देत अनघाला थेंक्यू म्हणते. इथे भाग संपला.

प्रोमो: अवी ला काही टेन्शन आहे का असे अप्पा विचारतात ते ही अरू ला. इथे खंग्री ने एक पीस टाकला आहे. किस्सा खतम आज के लिये
बाय बाय
जय हिंद जय महा राष्ट्र.

वा, किती बारीकसारीक तपशील लिहिलेत अमा...>> खरंच प्ले झंट आहेत. अरू चे ब्लाउज जे नॉर्मल मुंबईत मार्केटात मिळते तसे सोनेरी बुट् ट्यांचे आहे साडी साधारण कसाटा आइसक्रीम मध्ये एक लाइट ऑरेंज पीच च्या मधली शेड आहे. व सोनेरी काठ आहेत काठात बारके डिझाइन आहे. हिने साडी नीट पिन अप केलेली आहे तर संजनाने फलकारे सोडले आहेत हा एक फरक.

यश चा शर्ट आहे तसे अगदी एक डिझाइन मी परवाच कलर केले म्हणून लक्षात आले. छान आहे पीच लाइट बॅक ग्राउं ड वर लालसर बेरीज आहेत. हिरवी पाने आहेत. गणपती उत्सव इथला संपला की मी ते इथे टाकेन. अगदी बायकी दिसत नाही पण क्युट आहे.

अभीचा कुर्ता डार्क ऑरेज व जरीचे भरत काम गोटा नक्षी असे आहे. छान वेगळा कलर आहे जेंट्स ना.

अनघा चा सूट सर्वात डार्क वर सोनेरी मोठ्या बुट्ट्यांचे डिझाइन. सिएना / बर्न्ट सीएना टाइप कलर आहे.

संवाद फार प्रेडिक्टेबल होते मग कपडेच बघितले.

अमा... ते खंग्री म्युझिक आता फार ओळखीचे झाले...... लगेच तुमची आठवण येते.... Happy
गवरीचा प्रॉब्लेम आहे ते बरेच आहे एका अर्थी..यश ची घाई पाहता....!! Lol

अनघा , अरू ला ताई म्हणते °?? का?>> अनघा पार्क मधे योगा शिकवत असते तिथे यथावकाश ( अन्याच अफेअर कळल्यावर स्वतत्र वाटचालीची सुरवात म्हणून) सुअरु पोहोचते आणी दोघीची मैत्री होते..

अरुची साडी छान आहे , एकदर कपडेपट छान आहे, कधीकधी अगदी खडकी दापोडी असतो.
अनघा-अभिच्या रोमॅटिक सिन मधे यश आणी अरु कशाला, सग़ळिकडे भोचकपणा असतो यान्चा!
अन्या-सन्जनाच जस झटपट उरकल तस यान्चही लग्न उरका आता, अभि कायम तळ्यात मळ्यातच असतो

त्यात ललिता नावाची अन्याची पहिले प्रेम आहे असे बाहेर येते.
त्यावर संजना डोळे वटारून बघत बसते. तिला( ललिता आता अमेरिकेतून भारतात आलेली आहे) गणपतील बोलवायचे ठरते. जनरल कल्ला चालू आहे >>>>>>>> आता काय अन्याच तिसर लग्न लावून दयायचा विचार आहे की काय ? ह्यान्चा काही नेम नाही, लावूनही देतील.

आजीचा अन्याला टोमणा- " म्हणजे अरुला सगळ माहीत होत का आधीपासून? तु तेव्हा अरुशी खर बोलायचा का?" नन्तर सासू मोड ऑन- आधीच जर हे माहीत असत तर आम्हीच तिच्याशी तुझ लग्न लावून दिल असत ( अरुच्या आधी). तुझ्या पसन्तीच्या मुलीशीच लग्न करायच होत. ना मग. " आजी सुनेच्या तेलमालिशचे उपकार विसरली अन्याची पहिली लवस्टोरी ऐकून.

अनघा रडारड करून मला जवळ घेउन वचन दे मला सोडून जाणार नाही असे रड्क्या सुरात म्हणते.
ती खरेच फार हर्ट झालेली आहे. >>>>>>>> मला तर अभीपेक्षा तीच डेस्परेट वाटली लग्नासाठी तेव्हा.

हिच ठिक आहे पण हिच्या आईवडिलाची सम्मती आहे का लग्नाला? हिची आई म्हणाली सुद्दा की ' देशमुखान्कडे जास्त गुन्तू नकोस." आधीचा भयाण अनुभव बघता आधी हिच्या आईवडिलान्ना पटवाव लागेल लग्नासाठी.

अभीचा कुर्ता डार्क ऑरेज व जरीचे भरत काम गोटा नक्षी असे आहे. छान वेगळा कलर आहे जेंट्स ना. >>>>>>>>>> सहमत

पण अरुचा ब्लाउज नीट शिवलेला नव्हता म्हणून तिने कम्बरेला साडी पिनअप केली होती.

ते तोंडने जिलेबी भरवायचे मी बघितलेच नाही काल गडबडीत. >>>>>>> काही नाही अमा. ओझरता सिन होता तो.

शुभप्रभात.
पहिले पाच मिनिटे अरू कौतूक. मोदक सुरेख. गणपतीची मूर्ती इको फ्रेंडली. अरू मुलांना पर्यावर्णाची जाणीव करून देत वगैरे.
आई त्याला घरातच राहायचा आग्रह करते आहे. एकदम हुकमी डोळ्यात पा णी. इमोशनल ब्लॅक मेल चालू आहे. अरू इथे राहील की नाही हे चाचपणी चर्चा चालू आहे. ती इथून जाईल ह्यावर म्हातार्‍यांचे खरेतर एकमत झाले आहे आता तिने अनघाचा ब्लॉक भाड्याने घेउन तिथे राहावे व करीअर करावे. आजी म्हणते पूर्वी अन्या बोलायचा पण संजनाने अगदी गुंडाळून ठेवले आहे. कायम खोलीतच असते. ( नया नया काम है म्हातारे नजर लावू नको. )

भारतीय संतूर बासरी आनंदी धुनेवर अरु चे आगमन होते व ती गण रायाला नमस्कार करतो. अ आ अवि तिला आनंदाचे कारण विचारतात तर तिचा डंब शराड चा प्र योग आहे. सरळ बोलायचे नाही हाच सर्वांचा गुण असल्याने नमनाला घडा भर पाणी. आजी अप्पा लटके भांडण. सो क्युट
मग अरू अनघा अभी गुड न्युज सांगते व हसत आहे. अवि नकळत माझे पण विघ्न दूर व्हावे असे बोलून जातो व अप्पांना शंका येते पण तो मारून नेतो.

आता कट टू अभि स्वप्न रंजन अनघाचे रड के स्वर परत ऐकावे लागतात. डेस्परेट वुमन इन्डीड. मग यश इशा असा एक चिडविण्याचा सीन आहे. इशाचा ड्रेस पण हलक्या ओ सी एच आर इ शेड चा आहे. चांगली दिसते. अप्पा व अवी चींएट्री मग गाणी म्हणणॅ टीपी. ह्याचे ह्यांना पैसे मिळतात पर डे?! शेम ऑन यू पीपल. आता ह्या आवाजाचा नक्की अन्या संजना ला त्रास होउन ती भांडायला येइल

अप्पां चा कुर्ता पण पिस्ता कलरचा आहे. व अविचा लाइट पर्पल अप्पांच्या कुर्त्याला कॉलर व बटन पट् टी ला भरत काम आहे. चांगले दिसते.
अरू च्या साडीला खांद्या पाशी पक्षांची जोडी आहे ती शोभून दिसते.
आता अप्पा प्रेमाच ज्ञान सोडतात. ते अनघाच्या आईबापांना लगेच बोलावून घेणार आहेत.

कट टू संजना महेता शी फोन वर बोलत आहे तिचा जॉब जाण्यात आहे. पण तो तिला भेटायला बोलवत आहे. फोन वर काम होणार नाही.
ताई ने पण जॉब बदलला आहे. तिला आता अन्या व ताईचे बॅकिन्ग नाही. ती निखिलच्या दुधावरून आजी बोलली ते सांगून अन्याचे कान भरते. त्यांना दोघांना जॉब हवा आहे. अजून साडी ब्लाउज कालचेच आहे. ती साडीच आठ दहा हजाराची असेल. अन्याला तसाही .. गडा केला बहुतेक.

अप्पा दुर्वा मोजून जुड्या करत आहेत अरू ला अविला काही टेन्शन आहे का विचा रतात. ती देवाला प्रार्थना करते की सॉरी म्हातार्‍याला खोटे सांगावे लागत आहे. इथे भाग संपला.

प्रोमो मध्ये गौरी व अरू भजने गायला बसले आहेत. तर संजना बाहेरून तड तडत येते. अन्या पण टाळ वाजवत आहे व सुखी दिसतो. ते तिला बघवत नाही व आता खूप झाले म्हणून काही तरी बड बड होणार बहुतेक नेक्स्ट भागात.
खंग्री भजन फ्युजन.
जय हिंद जय महा रा ष्ट्र.

आता आय पी एल हाय लाइट बघते.

ललि दाखवली नाही का?
आणि सारखं त्या पंचखाद्याचं काय कौतुक? घमेलं भर करायच्या म्हणे.......!!

<<बाई स्वतंत्र राहून तीच आयुष्य मस्त जगते असं दाखवा जरा>>
बरोबर. मसाल्याचा धंदा केला तर ३०० कोटी रुपये मिळतात, वर्षभराच्या आत. मग संजना नि अन्या यांना जिथे नोकरी लागली असेल त्या कंपन्या विकत घेऊन ती त्यांची बॉस बनेल.
असे पूर्वीहि एका सिरियलमधे झाले होते नि ती खूप चालली, तेंव्हा हा फॉर्म्युला बरा आहे की!

सुअरू शिकवण्या घेते. यावर मिळणाऱ्या पैशात ती विमलचा पगार देते, माहेरी पैसे देते(असे म्हटलेले तिने मागे) आणि बचत करून थोडे पैसेही तिने जमवले आहेत. पण प्रत्येकवेळी कामाचे पैसे मिळाले कि का/कशाला असे भाव दाखवते.
आपल्या वाट्याची मालमत्ता घेऊन आधीच वेगळा झालेल्या दिराचे कर्जही ती फेडणार आहे म्हणे. जी जाऊ अतिशय कामचुकार/कपटी आहे. तिच्या चैनीसाठी कर्ज काढून सगळे पैसे यांनी उडवले त्यांच्यासाठी काय वाईट वाटायचे? त्यापेक्षा तिकडे आई एकटी, आजारी आहे, घरी बोलावते आहे तिला मदत करावी. तिचे काही नाही.
लेखकाने अन्या आणि संजनालाही घरी बसविले आहे. अभि आणि यश यांना कधी पगार मिळाला आणि त्यांनी घरखर्चाला हातभार लावला असेही कधी दाखविले नाही. त्यामुळे अरू एकटीच सगळ्यांना सांभाळणार असे दाखवतील.

मग यश इशा असा एक चिडविण्याचा सीन आहे. इशाचा ड्रेस पण हलक्या ओ सी एच आर इ शेड चा आहे. चांगली दिसते. अप्पा व अवी चींएट्री मग गाणी म्हणणॅ टीपी. >>>>>>>>>> सगळे बॉलिवूडचा आजपर्यन्तचा रोमॅण्टिक गाण्यान्चा प्रवास ऐकवत होते गाण्यान्तून. अरु ने रोमॅण्टिक गाण म्हणून 'घरगुती छाप' गाण म्हटल ( माईन माई). यशच फिल्मी नॉलेज कच्च आहे. आजच्या काळातल गाण म्हणायला सान्गितल तर येडयाने हतिक रोशनच २००१ सालच गाण म्हटल ( यु आर माय सोनिया). अर्जित सिन्ग माहित नाही का त्याला? मग कसला आलाय हा म्युझिशियन?

बाकी यश ईशाच बरोबर आहे की अभि अनघा १८५७ च्या वेळचा रोमान्स करतात. माबो वाचल वाटत ह्यानी.

अन्या पण टाळ वाजवत आहे व सुखी दिसतो. ते तिला बघवत नाही व आता खूप झाले म्हणून काही तरी बड बड होणार बहुतेक नेक्स्ट भागात. >>>>>>>> अजूनही अन्याच्या मनात अरु आहे अस म्हणत होती ती.

शुभ प्रभातः

अप्पा परत अरू ला विचारतात अवि चा काही प्रॉब्लेम आहे का? यश आला आहे व संध्याकाळची पूजेची तयारी चालू आहे. आजी व इशाची बड ब बड चालू आहे. इशा देजा व्हू समजावून सांगते. आजी अनि रुद्ध संजना चे भांडण झाले आहे असे तुला दिसते का विचा रते. हे गण पती समोर चालू आहे. इशा समईतील तेल सारखे करत आहे. तर शेंगदाणा इशाला येउन धड कतो इशा करवादते. संजना लगेच येउन निखिलला काही बोलायचे नाही म्हणून वाद सुरू करते. आजी लगेच वाद पुढे नेते. निखिल माझा मुलगा आहे तो माझ्या बरोबर राहील असे संजना म्हणते आजी त्यांना हाकलायचेच म्हणते. संजना लगेच माझ्या नवर्‍याची जागा आहे आम्ही इथे च राहणार. शेंगदाण्याला बाव्ळट का म्हण ते ह्या वरून वाद चालू आहे.

सू अरू घरात गणपती आहे तर ओरडा करू नये इतके कळत नाही का म्हणते. संजना परत वाद चालू करते अनि समोर कांगावा करू नका म्हणते. संजनाच इशू करते आहे असे इशा म्हणते. खरं इतकेच कारण आहे त्या वरून घरात वाद विवाद का बरे. लगेच संजना तू तुझ्या मुलीला नीट बोलायला शिक व मी कोणाचे ऐकून घेणार नाही.

संजना: आईला माझे व अन्याचे लग्न कधीच मोड णार नाही स्वपन बघणे बंद करा. सगळे बोलणे चोरून ऐकत होती. आता अन्या पण मैदानात उतरतो. मी मूर्ख नाही लगेच लग्न मोडायला. म्हणतो लग्न स्वीकार ते मोडेल वगैरे काही अपेक्षा करू नकोस म्हणते सर्वांना जुळ्वून घ्यावेच लागेल म्हणतो. तिला पण समजाव असे आजी म्हणते. अन्या तिची बाजू घेउन बोलतो आहे.

तुम्ही तिच्याशी नीट वागत नाही आहात. इशाला पण संजनाशी रिस्पेक्ट फुली बोलायला शीक. सारखे भांडू नका म्हणतो. आजी लगेच घर सगळ्यांचे असते त्या साठी काही करावे लागते. अजून तुला अप्पांनी घरातून काढले नाही कारण तू केल्याची आम्हाला जाणीव आहे.
अरू पण जाणीवेतूनच इथे राहात आहे. अन्या म्हणतो अरु ला की इशाला समजाव.

रात्रीची वेळ : आजी त्याच मोड मध्ये आहे. गौरी सतरंजी घालत आहे. ( जन्माच्या कर्माने तेच करील जीवन भर )
संजना येउन आता हे काय चालू करते. परत कार्यक्रम की काय. तुमच्या घरात इतकी निगेटिव्हि टी का आहे. भजनी मंडळाचा कार्यक्रम आहे.
पण मला इंट्रे स्ट नाही म्हणते संजना व उद्या बॉस कडे लवकर जायचे आहे. म्हणून वर जाते लवकर आटपा कार्यक्रम म्हणते. नव्या बायकोची
सर्व सर्व घरावर हुकूमत गाजत आहे. खरे तर हे सहन होण् या सारखे नाही.

बायका आल्यावर पण संजना पुढाकार घेते व मी अनिरुद्धची दुसरी बायको म्हणते. अरू ला कॉफी आणायला पिटाळते. बायका अरूचीच चौकशी करतात. आजी संजना ला वर पाठवतात व कार्यक्रमाची तयारी सुरू करवायला लावून अरू आता कायमच इथे राह् णार आहे असे म्हणतात.

आता भजनी मंड ळाचा कार्यक्रम चालू आहे. पेटी झांजा मृदुन्ग व गायन चालू आहे.

वर खोलीत संजनाला आवाजाचा त्रास होतो आहे. तर अन्या तल्लीन होउन भजनाला ताल देउन ऐंकत आहे. संजनाचे दुसरेच काही करत आहे. मुले काम कधी करतात? घरात शांतताच नसते असे स्वतः टिपेच्या आवाजात ओरडून सांगते. तिल झोप लागत नाही आहे. उद्या ऑफिसला जायचे आहे. म्हणून करवादत असते. साधे आपल्याला नको आहे तर शावर घेउन गाउन घालून कानात कापूस घालून झोपून जाता येत नाही का? ही अ‍ॅ डल्ट एका मुलाची आई आहे ना? पण कधीच कुठेच अ‍ॅडजस्ट करून पुढे जाता येत नाही. फारच उथळ स्वभावाची आहे.

( मी जेव्हा सेल्स मध्ये होते तेव्हा कधी कधी रात्री कुत्रे जागे होउन दोन अडीच तास खेळायचे मग लगेच उठून तयार होउन लव करची फ्लाइट घेउन मुंबईला यायचे तयार होउन दिवस भर मीटिन्गा वगैरे केले आहे. कुठे तक्रार करायला जागाच नव्हती. तसा सुद्धा स्वभाव नाही. मुलीला मेड वर सोडून बाहेर हिंडायचे.हिल) हिला व अरूला को णालाच आपल्या प्रिव्हिलेज ची जाणीव नाही. आजी ला सुद्धा. हीच मेजॉरिटी असते

प्रोमो: तेच कालचे. कीर्तनात राडा होणार. हे नक्की.
देखते रहिये:

जय हिंद जय महारा ष्ट्र.

अमा, छान लिहिलंय
आता दिवाळी पर्यंत, प्रत्येक सण आणि रोज तेच वाद..बहुतेक!

बॉलिवूडचा आजपर्यन्तचा रोमॅण्टिक गाण्यान्चा प्रवास ऐकवत होते गाण्यान्तून >>> कंटाळवाणा सीन.
ती अनघा छान नाचत होती, स्टार प्रवाह गणेशोत्सव मधे आई कांचन सोबत.

सन्जनाचे काही मुद्दे पटले. ह्याच्न्याकडे जेव्हा बघाव तेव्हा नाचगाणी सुरु असतात. मुले कधी काम करताना दिसत नाही. सजन्नाने माबो वाचला वाटत.

साधे आपल्याला नको आहे तर शावर घेउन गाउन घालून कानात कापूस घालून झोपून जाता येत नाही का >>>>>>>> अगदी अगदी. आवाजाचा इतका त्रास होतोय तर गौरीच्या घरी जाऊन झोपायचे ना. हिला कशाचाही त्रास होतो. मुलान्चा आरडाओरडा हिला चालत नाही. स्वतःचा मुलगा मात्र घरी कुठेही उडया मारा, पण माझ्या मुलाला बोलायचे नाही. आज तो शेन्गदाणाच ईशाला धडकला होता.

भजनी मंडळाचा कार्यक्रम लवकर आटपा म्हणते आणि स्वतः मात्र त्या बायका आल्यावर पुढे पुढे करते.

आजी लगेच घर सगळ्यांचे असते त्या साठी काही करावे लागते >>>>>>>>>>>> रिअली? फार लवकर कळले. एरवी त्याच माझ घर माझ घर करायच्या.

अन्या अचानक टाळ घेऊन हजर होणार आहे पुढच्या भागात. इतका खुश का आहे हा? ललि येणारे वाट्टत!

शुभ प्रभातः कालचेच कीर्तन व बेडरूम मधील तमाशा पुढे चालू आहे.
संजना वैतागलेली आहे आवाजाने. अन्या तिला गौरीच्या घरी झोपायला जा असे सुचवते तर ती तू पण चल असे सुचवते. हिचे म्हणजे नव्या लग्न झालेल्या जोडप्या सारखे सगळे जोडीने करायचे पण हा जुना आहे ना लग्नाचा. त्यामु ळे तू जा व मी तुला सक्काळी उठवायला येतो असे प्रोमिस करतो.

पुढे अवी ला म्हणतो संजनाने मला ऐकू दिले नसते म्हणून तिला पाठवून दिले असे म्हणून दोघे भाउ मजेत घरचाच भजनांचा प्रोग्राम ऐकायला खाली येतात.

बायकांच्या आग्रहावरून अरू व सोबतीला गौरी पण भक्तिगीत म्हणतात. ते छान गायले आहे व समयोचित आहे. अवि व अन्या दोघे टाळ वाजत आहेत घरातले सर्व जेनुइ नली रंगले आहेत गायनात. छान ताना आलाप आहेत एंजॉय करा आधी भरपूर रिहर्स केले असेल सासू सुनेने.

पण आनंदात मिठीचा खडा आपले मिठा चा खडा आला. तर्री बाई व खंग्री मॅन ह्या सर्व भारतीय कौटु बिक श्रीखंडात मस्टरड सॉस घालतात.
असे आपल्याला वाट्ते पण संजना फक्त रागाने बघ त राहते. प्रोमोत दाखवले तो संवाद होत नाही. बाकी सर्वांनी आनंदात डोळे मिटले आहेत
अप्पा बघतात व आता काय होईल म्हणून साशंक आहेत पण काही घड् त नाही.

कट टू नेक्स्ट डे. अवी फोन वर अजून थोडा वेळ मागतो आहे. त्याच्या देणेदाराचा फोन आहे. वाइट परिस्थिती आहे. उसासे क्वीन हे बघते तो
रड्तो आहे. सु अरू उसासे टाकत. व ( मला ह्यात फारसे काही कळ त नाही हे पालु पद चालू आहेत.) त्याला विचारते पन अजूनही खरी रक्कम किती आहे ते सांगत नाही. केदार विशाखा पन त्यांना कसे मागू म्हणून तो संकोचत आहे. इतका संवाद होतो पण एक रक्कम काही कोणी
बोलत नाही सु अरू बाप्पाच्या आशिर्वादाने वगैरे पट्टी सुरू ठेवते. हा पूर्ण ट्रॅक बाप्पाच्या आशीर्वादा साठीच बनवलेला आहे असे दिसते आहे.

कट टू आजी च्या सुपरव्हिजन खाली शेंगदाण्याचा संस्कृती क्लास चालू आहे. सू अरू वळ्से देत आहेत. शेंगदाणा स्टुपि ड प्रश्न विचारत आहे. ते नक्की इथले वाचतात वाट तं अरू इशाला नारळ दूध शेवया आणायला सांगते चक्क.

संजना नोकरीसाठी बॉसला बोलायला बाहेर पडते पण विसर्जनाला येइन असे दाण्याला प्रोमिस करते. सु अरू फारच चांगली असल्याने आपल्या मनात सदिच्छाच असेल ना आपल्याला बरे वाटेल ते करावे वगैरे बोलून संजनाला पण बेस्ट लक देते. आजी करवादते संजनाला
नुसते मिरवायला हवे. जबाबदारी नको आजी तिला विचरते अविनाशच्या नोकरीचे काही प्रॉब्लेम आहे. काही तरी गडबड आहे हे बोलून दाखवते. सु अरू खोटी सारवा सारव करते. इथे चुकले( आधी व खरे बोलायला पाहिजे. ) कशाला महत्व द्यायचे ते समजले पाहिजे असे ज्ञान सोडते आजी . व अवीचे सर्व चांगले चालले आहे ह्या भ्रमात आहेत. आता खरे बाहेर येइल तेव्हा ह्यांना नक्कीच धक्का बसणे आजार्री पडणे होईल की नाही . अवीच्या वतीने अरूच कानकोंडी होत आहे. आईबाप सुनांना दुय्याम समजतात पण काही घरी आई मुलांच्या सेपरेट बैठकी
होतात व क्रिटिकल इशूज डिस्कस होतात ते इथे नाही का होत.

इथे संपले.

प्रोमो: गणपती विसर्जनाची वेळ आहे. संजना रडत रडत नेते व लोकांच्या नजरेत मी एक नीच बाई आहे मेहताने तिच्या शी संबंध ठेवायची इच्छा व्यक्त केली आहे नोकरी कायम ठेवायला. त्यामुळे ती हताश होउन नोकरी सोडायच्या बेतात आहे. पन सु अरू हा विषय पाट्यावर घेउन मेहताचे ..... चिर डून टाक ण्याचा लढा लढायला तिला उद्युक्त करते. व घरातील उपलब्ध सर्व जण उलट्या हाताचे प्रोमिस घेउन तिच्या आधारा साठी उभे राहतात. ( पाठी मागे लिहवत नाही )

आता # मी टू चळवळ व बाप्पाच्या आशीर्वादाने अरूला एक्सॅक्ट अवीच्या लोन अमाउंटचे काँत्रॅक्ट मिळून अ‍ॅडव्हान्स पण मिळेल. असा ट्रॅक असावा.

इशा जी नारळ दूध शेवया आणायला शेंगदाण्या बरोबर गेलेली आहे ती साहिलचे शत्रू किडनॅप करेल व सु अरू रॉयल एनफिल् ड वरून पाठलाग करून दोघांना सोडवून आणेल.

मोअर फन ऑन द कार्ड्स पीपल . आता आयपीएल हायलाइट्स बघते. रोहित शर्मा येउन पण मुंबई इंडिअन्स हरले आता सर्वात पॉवरफुल भाबी खवळेल की. इतकी फौज पाळून काय उपवेग.
गौरी खान भांगडा नाचत असेल.

ही आई कांचन म्हणजे रूढ अर्थाने जीवनात नवृया ला बुलींग करण्या पलिकडे काहीही केले नाही पन प्रत्येक विषयावर ठाम मते व तीच बरोबर अशी व्हॉट्सेप आंटी आहे. व जरा जरी डिसकंफर्ट व विरोध किंवा वेगळी विचार सरणी समोर आली किंवा स्वतः ची जीवन शैली विस्कटा यचा संषय जरी आला तरी जीव वरखाली होउन क्रायसिस सिचुएशन तयार करते. समजा अप्पा वारला व हिला घराबाहेर मुलांनी हाकलून दिले तर अनघाच्या आश्रमात कर्जतला जाउन राहवे लागेल. तेव्हा अश्या बायका काय करतील? का तिथे पण दादागिरी. सद्य परिस्थितीची जाणेव म्हणून नाही.

अश्यांच्या पायाखाली अरू सारख्या सुना. टाकली तरी तिथेच चिकटून राहून आपले सेवा मूल्य वापरून थोडीशी जागा बनवून राहणार्या.
स्वाभिमान, व्यक्तिस्वातं त्र्य ह्या साठी किंमत मोजावी लागते त्याची तयारी नाही. पॅन कार्ड लाइफ इन्सुअरन्स हेल्थ इन्सुअर न्स नसेलच. आणि ह्या सुरक्षित. हे मृगजळ आहे.

अमा तुम्ही बरोबर लिहिले आहे. या गोष्टी उघडपणे कुणि बोलत नाहीत पण सर्व काही चालले आहे त्याला हीच कारणे आहेत.
ज्यांना अश्या परिस्थितीची कल्पना नसते त्यांना प्रश्न पडतो असे का?

अमा, नेहमी प्रमाणेच उत्तम निरीक्षण! या आजीच्या व्यक्तीरेखेतल्या दोषांना कधीही अधोरेखित न करता केवळ वयाने मोठ्या असल्याने सर्वकाळ मानाने मिरवताना दाखवणे हे अशा प्रकारच्या व्यक्तीचे validation नव्हे काय? किती चुकीचे संदेश जात आहेत या गोष्टी दाखवल्याने.

नाही सु अरूच. मानसिक बंध तुटलेले नाहीत नं!!!! >>>>>>>> अगदी अगदी

अन्या तिला गौरीच्या घरी झोपायला जा असे सुचवते तर ती तू पण चल असे सुचवते. पुढे अवी ला म्हणतो संजनाने मला ऐकू दिले नसते म्हणून तिला पाठवून दिले >>>>>> अच्छा! इतकी वर्ष अरुला असच फसवल असेल त्याने.

ही आई कांचन म्हणजे रूढ अर्थाने जीवनात नवृया ला बुलींग करण्या पलिकडे काहीही केले नाही पन प्रत्येक विषयावर ठाम मते व तीच बरोबर अशी व्हॉट्सेप आंटी आहे >>>>>>>> अगदी अगदी. तिच्या मते सन्जनाची नोकरी कचरा आणि अविनाशची नोकरी मह्त्त्वाची. उद्या मात्र ती सन्जाच्या पाठीमागे मी टू चळवळीत नाटकीपणे उभी राहणार.

या आजीच्या व्यक्तीरेखेतल्या दोषांना कधीही अधोरेखित न करता केवळ वयाने मोठ्या असल्याने सर्वकाळ मानाने मिरवताना दाखवणे हे अशा प्रकारच्या व्यक्तीचे validation नव्हे काय? >>>>>>>> सहमत. सन्जना त्यान्च्या चुका दाखवते म्हणून ती वाईट्ट!

शुभ प्रभातः

आजची सुरुवात अनघा अभी चहा चिवडा डिस्कशन चालू आहे. अनघाचे वडील जरा नाराज आहेत त्यांना बोलवून लगेच बोलणी करायची आहेत. अभी जरा कचकतो पण मग पुढे लग्नाचे गाडे ढकलतो आहे. अंकिताशी लग्न रजि स्टर झाले आहे का काही पेपर पेंडिन्ग आहेत का विचार असे अनघा सांगते. अभी केदारच्या ओळखीच्या वकिलाला भेटून शंका निरसन करेन असे म्हणतो. दोघांचे कप डे मस्त आहेत.

मेहता संजना इंडीसेंट प्रोपोजल सीन आहे. ती तिची बाजू मांडते. तुला अनिरूध ने बरेच वेळा साम्भाळून घेतले आहे ते आम्ही बघितले आहे असे मेहता म्हणतो. अनिरूध च्या मदतीनेच तुझा करीअर ग्राफ लवकर वर गेला असे मेहता म्हणतो व तू चुकलीस अजून विचार करायला हवा होतास अजून वरच्या पोस्ट वर पण माण से होती की.( त्याला का धरलेस) असे म्हणतो

कट टू घरचा सीन विसर्जनाची तयारी: शेंगदाणा वेडे वाकडे गण पतीतील सीड्स मधून ट्रीज येणार हे ते बोलत आहे. सू अरू लगेच संधी साधून उसासेत्म क पर्यावरण माहिती देते. चेह र्‍यावर पूर्ण जगाच्या पर्यावरणाची जबाबदारी आहे. पिंपात विसर्जन . गौरी इशा ओठ मुडपून हसतात . त्यांचे नेहमीचेच.

अभी अनघा येतात . अनघा पण ओढणी फलकारे लाजते पुढे सरते फिरते मोड मध्ये आहे. अरू ने नैवेद्याला मदत् करायला कोण येते विचारल्यवर दोनी भावी सुना जातात काय वैभव आहे. अरू फाजील पणा करू नका म्हणोन डांटते

कट टू संजना मीटिन्ग. बॉस कटिंग प्रश्न विचारतो आहे. ती व तू दोघी एकाच घरात अनिरूधची मजा आहे हे टिपिकल मेल पर्स्पेक्टिव्ह बोलून दाख वतो. मेहता त्याचे प्रपोजल पुढे ठेवतो. मला पण आरामाची टेन्शन रिलीफ ची गरज आहे. अन्या ने तुला प्रायव्हेट प्रॉपर्टी सारखे ठेवले होते व बाहेर तुझ्या बद्दल फार रिस्पेक्ट फुली बोलत नसे तर तू आता तेच माझ्या बरोबर कर. ही लगेच उसळून बोट दाखवे मोड मध्ये मी कंप्लेंट करीन म्हणते.

तुझे व अनिरूद्धचे चाळे आम्ही बघितले आहेत म्हणतो मेहता. तुला तेच हवे आहे ना. कॉन्फरन्स च्या नावावर दोन ऐवजी चार दिवस फैव स्टार मध्ये राहणे हे ते आम्हाला माहीत आहे. संजनाचे सर्व कर्म बाहेर काढतो.
शेंगदाणा कट कट करतो आहे. ती जरा बधिर झाली आहे. अरू समजून तिला पाणी ऑफर करते.

आरती चालू आहे शेंगदाणा खू श आहे हे सर्व पारंपारिक चित्र बघून तिला अजूनच कायतरी फील होते. पण ती फॉर अ चेंज गप्प आहे. मोमेंट ऑफ रेकनिन्ग खंग्री मॅन पण गावी गेला आहे गणपतीला बहुतेक.

आरती होते

प्रोमो: तेच कालचे दळण.

Pages