क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

रहाणेला घेतलं तर त्याने थेट जो रूटचा चेहरा हातात पकडून त्याच्या तोंडावर खोकावं कारण बाकी काही काँट्रिब्युशन तो करणार नाही. तेव्हढाच जाता जाता भारतीयांची मनं जिंकेल.

E C B ने सामना रद्द झाल्याची घोषणा केली भारतीय खेळाडूमुळे पुढे केसेस वाढ नये ह्या भीतीने. मालिकेचा निकाल काय ते नाही कळले..

रिलॅक्स गाईज. आपण जिंकलो 2-1 ने. तसही आयपीएलसाठी जर bcci ने लास्ट टेस्ट रद्द केली असेल तर ते चांगलंच आहे. पाच दिवसाच्या कंटाळवाण्या टेस्टपेक्षा चार तासांची आयपीएल केव्हाही चांगलीच. आयपीएलमध्ये वेगवेगळ्या देशातील खेळाडू एकाच संघातून खेळत असल्याने जगभरात प्रेमाचा संदेश पोहचवला जातो.

रद्द झालेली 5वी कसोटी दोन्ही बोर्डांच्या सोईने नंतर कधीतरी खेळवायची बीसीसीआयची इसीबी ला ऑफर ! चांगली घटना !

रद्द झालेली 5वी कसोटी दोन्ही बोर्डांच्या सोईने नंतर कधीतरी खेळवायची बीसीसीआयची इसीबी ला ऑफर ! चांगली घटना ! >> मूळात पाच सामन्यांचा दौराच अती वाटतो हल्ली. पुढच्या वर्षीच्या इंग्लंड च्या लिमिटेड सामन्यांच्या दौर्‍यामधे एक कसोटी किंवा अजून काही लिमिटेड सामने सहज टाकता येतील.

आयपील आवडॉ न आवडॉ, हा सेगमेंट अतिशय मह्त्वाचा आहे.
१. आयपीळ नि व्र्ल्ड कप एकाच जागी खेळला जाणार असल्यामूळे आपोआप सराव होईल.
२. पिचेस अधिक सिप्नर फ्रेंडली होतील.
३. प्लेयर टेस्ट मोड मधून फास्ट क्रिकेट मोड मधे जातील.
- दुखापती नि मेंटल फटीज मॅनेज केला जईल अशी अपेक्षा.

फाइव्ह कोर्स मीलमधलं शेवटाचं डेझर्ट खायला पुन्हा कधीतरी या .
भारतीय खेळाडूंनी मैदानावर उतरायची तयारी न दाखवल्याने किंवा बोर्डाला ते नको असल्याने सामना रद्द होत असेल तर तो इग्लंडंने जिंकला असं जाहीर केलं जावं.

एकदम सहमत भरत. शास्त्री बुवांच्या आणि कोहलीच्या आगाऊपणामुळे जर हा सामना रद्द करावा लागला असेल तर हा सामना इंग्लंडला बहाल करणे योग्य आहे.
कोण वाचणार आहे ते शास्त्रीचे पुस्तक? कोविड बायोबाबल न पाळणे हा निव्वळ मूर्खपणाचा होता.

* चांगली घटना * - अशासाठीं कीं गेल्या टेस्ट चॅपियनशिपमधे रद्द झालेल्या सामन्यांमुळे कांहीं चांगल्या सघाना फटका बसला अशी भावना निर्माण झाली होती. रद्द झालेला सामना परत खेळवला , तर तें टाळतां येईल..

माझ्या माहितीप्रमाणे, 5वी कसोटी दोन्ही बोर्डांच्या सहमतीने रद्द झाली आहे. तसं असेलच तर भारताला मालीकेचा 2-1 विजेता ठरवणं योग्यच आहे.

*कोविड बायोबाबल न पाळणे हा निव्वळ मूर्खपणाचा होता.* खरंय. पण भरगच्च सटेडियममधे मास्क न लावतां बसलेले प्रेक्षक व खेळाडू कक्षातही अपवादात्मक दिसणारा मास्क बघून, 'बायोबबल'' पाळणे म्हणजे अर्धीचड्डी व
बिकीनीने गजबजलेलया बीचवर नखशिखांत झांकलेलया व बुरखा घेतलेलया पेहरावात फिरणयासारखंच !! Wink

एवढे सातत्याने क्रिकेट खेळत आहेत काही खेळाडू आणि त्यांच्यासोबत फिरणारा सपोर्ट स्टाफ. भले कितीही प्रोफेशनलिझमच आव आणला तरी आहेत ती माणसेच. किती आणि कुठवर निर्बंध पाळायच्या अपेक्षा धरणार त्यांच्याकडून. अति झाल्यास मानसिक स्वास्थावर परीणाम होईल त्यांच्या. या काळात जमेल तेवढे खेळताहेत, आपले मनोरंजन करताहेत ते छानच असे वाटते.

आता फक्त हा सामना रद्द वा बहाल न करता पुढे कधीतरी खेळवून त्यावर या मालिकेचा निकाल आणि WTC पॉईंटस ठरवण्यात यावे. हे दोन्हीकडच्या खेळाडूंसाठी न्याय्य ठरेल. या कोरोना निर्बंधाच्या काळात शक्य तितके सर्वांनी हाच समजूतदारपणाचा पर्याय पहिला विचारात घ्यावा.

Ipl च्या दुसऱ्या पार्ट ची तारीख फिक्स झाल्यावर ५ वी कसोटी रद्द करण्या बद्दल चर्चा चालू होती आणि आता बरोबर खेळाडू ऐवजी सपोर्ट स्टाफ पोसिटीव येऊन रद्द झाली
सोबत असणारा आणि ipl खेळणारा एकही खेळाडू पोसिटीव नाही
निव्वळ योगायोग दुसर काय

एवढे सातत्याने क्रिकेट खेळत आहेत काही खेळाडू आणि त्यांच्यासोबत फिरणारा सपोर्ट स्टाफ. भले कितीही प्रोफेशनलिझमच आव आणला तरी आहेत ती माणसेच. किती आणि कुठवर निर्बंध पाळायच्या अपेक्षा धरणार त्यांच्याकडून>>>>>>>>> हे सगळे खरे असले तरी जर लगेच 5 दिवसांनी IPL नसती तर हा सामना नक्की झाला असता असे वाटते

*जर लगेच 5 दिवसांनी IPL नसती तर हा सामना नक्की झाला असता असे वाटते* -
निर्णय दोन्ही क्रिकेट बोर्डांचा होता. मालिका बरोबरीत संपवण्याची संधी इंग्लंडने केवळ बीसीसीआयच्या दबावाखाली येवून सोडली असती ? नाहीं पटत!

बीसीसीआयची आर्थिक ताकद व त्यामुळे आलेली कांहीशी दंडेलशाही वृत्ती याची जाणीव असुनही, बीसीसीआय वर टीका करतांना इतर देशांचे क्रिकेट बोर्ड अगदींच स्वाभिमानशून्य व लाचार असल्याचं गृहीत धरण॔साफ चूकीचं आहे, असं मला वाटतं.

हे सगळे खरे असले तरी जर लगेच 5 दिवसांनी IPL नसती तर हा सामना नक्की झाला असता असे वाटते >> साहजिक आहे ते. पुढे भरपूर मोकळा कालावधीअ सता तर झालाच असता. शेवटी प्लेयर्स पण माणसेच आहेत हे लक्षात ठेवणे जरुरी आहे.

करतांना इतर देशांचे क्रिकेट बोर्ड अगदींच स्वाभिमानशून्य व लाचार असल्याचं गृहीत धरण॔साफ चूकीचं आहे, >> +१. उलट इंग्लंड बोर्ड बर्‍यापैकी ठाम असते अशा बाबतीमधे हे आजवर दिसत आले आहे.

ताजी खबर - येत्या टी-20 विश्वचषकानंतर सफेत चेंडू स्पर्धेतलं भारतीय संघाचं कर्णधारपद रोहितकडे सोंपवणयाचा विराटचा मानस ! बॅटींगवर लक्ष केंद्रित करण्यावर विराटचा भर.

भारतीय संघाचं कर्णधारपद रोहितकडे सोंपवणयाचा विराटचा मानस !>>>

विराट कसे काय ठरविणार कर्णधार कोण ते? तो कर्णधारपद नको म्हणू शकतो. निवडसमितीला जर कृणाल पंड्याला कर्णधार कारायचे असेल तर त्याना ठरवू दे. का विराटच निवड समितीचा प्रमुख आहे?

रोहीत आहे म्हणूनच विराटच्या कर्णधारपद सोडण्याला अर्थ आहे. अन्यथा मग विराटच चालेल.
मला उत्सुकता आहे की मग उपकर्णधार कोणाला करणार? कोणाला रोहीतनंतर भविष्यातला कर्णधार म्हणून सध्या बघत आहेत? राहुल, पंत, की आणखी कोणी?

अरे भोळ्या मायबोलीकरांनो मी उगीचच तुम्हाला माहेरच्या साडी पिक्चरची अलका कुबल नाही बोलत. मला सांगा विराट कशाला कॅप्टनशीप सोडेल?(भले तो सोडेल पण त्याचे फॅन्स त्याला सोडून देतील का? Wink असो) Bcci ने स्पष्ट केलंय असं काहीही होणार नाही. मला हे प्रकरण कोहलीने सोडलेले पिल्लू वाटतंय. म्हणजे त्याला माहित आहे की रोहित हा प्रमुख फलंदाज आहे त्याला टेंशन फ्री, खुश केलं की तो खोऱ्याने धावा काढेल आणि रोहित चालला की वर्ल्ड कप आपलाच. एकदा वर्ल्ड कप जिंकलो की सगळे कोहलीला डोक्यावर घेणार मग कोण विचारेल रोहितला. आणि जरी वर्ल्ड कप हारलो तरी आता हा रोहितला कॅप्टनशीप देईल या आशेवर पब्लिक कोहलीला काही बोलणार नाही. मग प्रकरण थंड झाले की कोहली पुन्हा कॅप्टन. कोहलीची चेक मेट चाल आहे ही.

*विराट कसे काय ठरविणार कर्णधार कोण ते? * - बरोबर. पण विराटने टेस्ट व्यतिरिक्त स्वतःकडे कर्णधारपद न ठेवण्याचा आपला मानस व रोहीत हा उत्तम पर्याय असल्याचं मत व्यक्त करणं यांत कांहीं गैर नसावं. मीं जी बातमी वाचली त्यानुसार , हा विषय सर्व संबंधितांशी गेले काही महिने चर्चिला जात आहे व त्याच अनुरोधाने विराटने असं म्हटलं असावं व तें बव्हशी सर्वमान्यही असावं.
या संदर्भात, विराटने बॅटींगवर लक्ष केंद्रित करण्यावर दिलेला भर मला अर्थपूर्ण वाटतो. बरॅडमनपासून आजतागायत अनेक यशस्वी कर्णधार झाले पण वाडेकर, लाॅईड व धोनी असे तुरळक अपवाद वगळता, त्यांची क्रिकेट मधली खरी ओळख त्यांची खेळाडू म्हणून असलेली कामगिरीच ठरते , असं मला वाटतं . विराटला क्रिकेटच्या इतिहासातल्या सर्वोत्तम फलंदाजांच्या पंक्तित मानाचं स्थान मिळवण्याची दुर्मिळ संधी कर्णधारपदापेक्षा मोलाची वाटणं स्वाभाविक व योग्यही आहे.

बाॅयकाॅट त्याच्या गंभीर आजारातून बरा होवून आल्यावर त्याला त्याच्या प्रदीर्घ करिअरचं सिहावलोकन केल्यावर काय वटतं असं विचारल्यावर, त्याचं उत्तर मला स्पष्ट आठवतं-
' मला यॉर्कशायर संघाचं कर्णधारपद नाकारलं गेलं हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून मीं 2-3 वर्ष खूप मनसताप भोगला. तो एक माझा प्रचंड मूर्खपणा होता हें मला आतां जाणवतं. कारण, इतिहासात माझी नोंद घेतली गेलीच , तर ती यॉर्कशायरचा किंवा इंग्लंडचाही कर्णधार महणून नाहीं, तर एक खंदा फलंदाज म्हणूनच घेतली जाईल व ती तशीच घेतली जावी अशीच माझी इच्छा आहे !
(सध्या सामने सुरूं नसल्याने, थोडं पाल्हाळीक लिहीणं क्षम्य असावं . Wink )

ह्या बातमीमधे तथ्य नसल्याचे आज बीसीसीआय ने जाहीर केले आहे. सोडायचेच असेल तर आत्ता ह्या क्षणी सोडले तर बरे असे मला वाटते. " विराटला क्रिकेटच्या इतिहासातल्या सर्वोत्तम फलंदाजांच्या पंक्तित मानाचं स्थान मिळवण्याची दुर्मिळ संधी कर्णधारपदापेक्षा मोलाची वाटणं स्वाभाविक व योग्यही आहे. " विराटचा एकंदर सगळीकडे १००% द्यायचा स्वभाव पाहता त्याला दोन्ही मधे सर्वोत्तम स्थान मिळवण्यामधे अधिक उत्साह असेल.

म्हणजे त्याला माहित आहे की रोहित हा प्रमुख फलंदाज आहे त्याला टेंशन फ्री, खुश केलं की तो खोऱ्याने धावा काढेल आणि रोहित चालला की वर्ल्ड कप आपलाच. >> गावस्करांनी ८५ मधे असच केल होत. ८३चा वर्ल्डकप जिंकल्यावर वेस्ट इंडिजने भारतात येउन त्याच सिझन मधे आपल्याला ५-० धुतल होत. मग १९८५ चँपियन्स ट्रॉफीला परत गावस्कर कप्तान. ती सुरू व्हायच्या आधीच त्यांनी मी नंतर कर्णधार नसेल अस सांगितल होत. ती ट्रॉफी आपाण जिंकली मग १९८७ ला पुनः कपिलदेव कर्णधार झाले.गावस्करांची एकुलती एक सेंचुरी त्याच वर्ल्डकपला ८५ बॉल मधे झाली. त्यावेळेस आपल्याला रन रेट वाढवण्यासाठी त्या मॅच मधे ७ च्या रेटनी रन्स हव्या होत्या. (आताचे इक्विवॅलंट > १० - १२). Happy

Pages