बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिरवा रंग नीट जपायचा असल्यास पालक उकडल्या उकडल्या बर्फ टाकायचा.म्हणजे रंग उडत नाही.

त्यांना नो शुगर म्युसली दह्यात भिजवून मुख्य डिश म्हणून देता येईल.होईल पण पटकन.
गोड हवे असल्यास खजूर मळून,खसखस भाजून,बदाम पूड थोडी असे वळलेले लाडू.

खरं तर स्वतःची दिवसाची कॅलरी टोटल आणि गणितं त्यांची त्यांनी करावी.आपण चालणाऱ्या पदार्थांचे एक स्प्रेड तयार ठेवू शकतो.त्यातले जे त्यांच्या गणितात बाद ते त्यांनी खाऊ नये.
(मला आईस्क्रीम आवडत नाही.पण म्हणून मी सगळीकडे "आईस्क्रीम नको हां मेनूत" असे सांगणे अति अनुचित आणि उद्धट असेल. त्यातल्या त्यात घसा दुखतो सांगून ते खायचे टाळेन इतकेच.रियाच्या उदाहरणातले पाहुणे अति आगाऊ वाटले.)

अति आगाव, अति नालायक जे काही म्हणता येईल ते म्हणलं तरी चालेल.
मुळात आपण एखाद्याच्या घरी जातो तेंव्हा कंडिशन्स ठेवू नयेत, ठेवलेच तर 6 मध्ये 1 कॉमन ठेवावं, ते ही जमलं नाही तर जे खायला मिळालं आहे त्याबद्दल चांगलं बोलावं वगैरे न कळणाऱ्या माणसांना काय म्हणायचं . असो!

मी स्वतः माझ्या घरी आशा लोकांना 'हेच आहे, हेच खा' म्हणलं असतं. ज्यांच्या डाएट मध्ये ते बसत नाही त्यांना केळी/ फळं दिली असती आणि त्याबद्दल ते कोणाकडे काय बोलतात त्याबद्दल त्यांचीच नाचक्की केली असती पण घर माझं नाही आणि पाहुणे ही माझे नाहीत म्हणून गप्प बसले

अति आगाव, अति नालायक जे काही म्हणता येईल ते म्हणलं तरी चालेल.
मुळात आपण एखाद्याच्या घरी जातो तेंव्हा कंडिशन्स ठेवू नयेत, ठेवलेच तर 6 मध्ये 1 कॉमन ठेवावं, ते ही जमलं नाही तर जे खायला मिळालं आहे त्याबद्दल चांगलं बोलावं वगैरे न कळणाऱ्या माणसांना काय म्हणायचं . असो!

मी स्वतः माझ्या घरी आशा लोकांना 'हेच आहे, हेच खा' म्हणलं असतं. ज्यांच्या डाएट मध्ये ते बसत नाही त्यांना केळी/ फळं दिली असती आणि त्याबद्दल ते कोणाकडे काय बोलतात त्याबद्दल त्यांचीच नाचक्की केली असती पण घर माझं नाही आणि पाहुणे ही माझे नाहीत म्हणून गप्प बसले

Happy त्या इतकं अगदी कॅलरी काउन्ट करून वगैरे नसतील करत डाएट.... आणि करत असतील तर बसा म्हणावं मोजत.
मी लेमन कोरियांडर सूप, मेथी पराठे, भाज्यांचे रायते, ढोकळा असे केले.
गोड म्हणून मिक्स कट फ्रूटस.

छानच रेसीप्या आलेल्या. ग्रीन स्मूथी पण एक आहे. वेल कम ड्रिंक म्हणून द्यायला. आम्ही नेहमी बनवतो.
ओटमील स्मूदी पण. हे फारच साध्या व रिफ्रेशिन्ग चवीचे पण पोटभरीचे असतात. वेगळी रेसीपी लिहिते.

गोड म्हणून ताजे कट ऍप्पल.

रिया ची युज केस वाचून हे सगळं पाळून सगळ्यांना खाऊ घालणारा 2000 लाईन्स चा अल्गोरिदम मनात लिहायलाच घेतला थेट.एक ऍप बनवून 200 रु ला विकायचा स्कोप आहे.>>> Rofl

डाएट स्पेशल मधे ईडली चटणी, स्टीम फीश (लेमन ग्रास, रेड चीली, वेज स्टॉक,लसूण- मस्त होतो), पुलाव, क्लीयर सूप, वरण भात, पातळ भाज्या(उसळी, पालक) ई. पदार्थ येतात.
मेन म्हणजे डाएट करायचा तो लोक आपापल्या घरी का नाहि करत? यजमानांवर का प्रेशर टाकायचे? फ्राईड नको, किंवा लॅक्टोज अ‍ॅलर्जी आहे वगैरे सांगणे ठीक आहे.

कसे आहात सगळे ? माझ्यासाठी काय बेत केला आहे या वेळी ? पाक कृती स्पर्धेत नक्की भाग घ्यायचा हं. मी येतोय तुम्हा सर्वांच्या भेटीला, लवकरच ...
***** मायबोली गणेशोत्सव २०२१ *****
Mi yetoy-1- with logo-final-latest.jpg

धन्यवाद मेधावि.
बाकी इतरांच्या अशा डाएटची झलक आम्हालाही बघायला मिळाली आहे... एक नातलग बाई अमुक डाएट पाळत होत्या. परिणामी दुपारी जेवायला आमच्याकडे येण्यापूर्वी पोटभर इडल्या हादडून आल्या. हे आल्या आल्या जाहीर केले आणि त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत जेवणार नाही असं सांगितलं. आम्ही तोंडदेखलं जेवायला थांबू वगैरे म्हटलं. एक सुमारास जेवायचं म्हणून आम्ही काही फार हादडलं वगैरे नव्हतं. त्यामुळे निर्लज्जपणे आम्ही जेवायला बसलो पण साबा मात्र पाहुण्यांना काय वाटेल वगैरे विचार करून जेवायला थांबल्या. पण ज्येष्ठ माणसाला तसदी नको म्हणून तरी त्या बाईंनी जेवायला आमच्यासह बसायला हवं होतं असं मला सतत वाटत राहिलं. शास्त्र म्हणून थोडं अन्न खा अगदी, असं सांगावं वाटत होतं.
अर्थात आम्ही जेवलो आधी पण एकंदरीत त्यांची जेवणं बाकी असल्याने आवरसावर राहून उगाचच काम रेंगाळलं.

सासूबाईंच्या मैत्रिणींना बोलावले आहे चहासाठी. सगळा बेत मऊसूत हवा आहे. पदार्थ सुचवा प्लीज.
अळूवडी (ज्यांना चावता येईल अशांसाठी)
ढोकळा किंवा खांडवी
पोहे / उपमा
नारळाची चटणी
गोडात रसमलाई
आणि मग चहा
असा विचार केला आहे.

आंबवलेले पदार्थ (ढोकळा, इडली) असतील तर रसमलाई(बंगाली मिठाया) नको. मैसुरपाक(साऊथ इंडीअन स्टाईल), आंबाबर्फी, काजूकतली चालेल.

इडली सांबार चटणी आणि बेताचा गोड, बेताच्या तुपातला शिरा+ लिंबू लोणचे ही करता येईल. इडली अगदी आवडीनं खातात ज्येना. पोटाला हलकं, जरा आधीही करता येईल, तुमची दमणूक कमी होईल आणि साखरेचं प्रमाणही फार नाही वाढणार ज्येनांचं.

मस्त आयडियाज. वाचूनच भूक लागली. बंगलोरात असल्याने इडली सांबार मध्ये नावीन्य नाही. पण सजेशन्स साठी खूप धन्यवाद.

मस्त आयडियाज. वाचूनच भूक लागली. बंगलोरात असल्याने इडली सांबार मध्ये नावीन्य नाही. पण सजेशन्स साठी खूप धन्यवाद.

इडली सांबार कल्पना बेस्ट आहे. कांची पूरम इडली किंवा रवा इडली पण करता येइल नाविन्य म्हणून. बारक्या इडलीचा स्टँड येतो त्यात करायच्या एक एक उचलून खाता येतात रसम इडली वडा, वरून लोणी.

आम्ब्याचा शिरा इथल्या रेसीपीने बघा तो ही जबरदस्त होतो. तुमचा मेनू पण मस्तच आहे.

नाहीतर मॅक व्हेजी, फ्राइज व कोक चेंज म्हनून. हॅपी मील्स मध्ये सध्या छान टॉय येत आहे. ज्येंना कधी असले खात नाहीत ना.

आंब्याचा शिरा येस्स… फारच उत्तम.
सगळेच ज्येना एक्परीमेंटल असतील आणि थोडीफार पाश्चात्त्य चवींची सवय असेल तर मॅक्डीची हॅपी मील्स योग्य. नाहीतर मेजर बॅकफायर व्हायचं.
हे करायचं असेल तर साबांचा सल्ला मस्ट.

बेत चांगला आहेच
रसमलाई विकतची असेल तर शक्यतो पावसाळ्यात नको(किंवा अगदी भरोसेमंद, वर्षानुवर्षे खप असलेल्या ठिकाणून.
मटार बटाटा घातलेला काजू घातलेला तुपात बनवलेला पांढरा उपमा.
(बाय द वे दुपारी उशिरा जेवून 4 ला चहा ला आल्या तर इतके खातील का?)

संध्याकाळच्या नाश्त्याला तिखटमीठाच्या पुर्यांसोबत फार कोरड्या वाटू नये म्हणून काय द्यावे? पाहुणे = ज्येना + तरूण + लहान मूल.
गोड म्हणून केळ्याचा हलवा आहे.

ध्याकाळच्या नाश्त्याला तिखटमीठाच्या पुर्यांसोबत फार कोरड्या वाटू नये म्हणून काय द्यावे?>> एक बेडमी पुरी व बरोबर आलू सब्जी असते तो बेत करून बघा.

1. टोमॅटो चटणी
(कढीपत्ता,मिरची,पाव भाग कापलेले टोमॅटो तेलात खरपूस थोडे काळे होईपर्यंत परतायचे,मग गार झाल्यावर मिक्सर ला घुर्र करून त्यात मीठ आणि अगदी बारीक केलेला दाण्याचा कूट.)
2. दही दाणेकूट तिखट
3. फुटाणे जिरे लाल मिरच्या भाजून मीठ घालून ताकात कालवून चटका
4. जेवणाच्या वेळेत खात असल्यास आंबट गोड पातळ आमटी किंवा डाळ फ्राय ची डाळ
5. अमा म्हणतात तसे ड्रायक्लीन बटाटा टिपिकल पिवळी भाजी, किंवा बटाटा रस्सा किंवा मटार रस्सा

Pages