Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पहिल्या दिवशी शर्मा-राहूल
पहिल्या दिवशी शर्मा-राहूल भागीदारीच्या पार्श्वभुमीवर ब्रॉडने ट्वीट केलं होतं कि दुसर्या आणि तिसर्या दिवशी ह्या पीचवर भरपूर रन्स निघतील. ज्या पद्ध्तीनं रूट खेळतोय ते बघता इंग्लंड ने जर भारताला शंभर-एक रन्स चा लीड दिला तर मधल्या फळीच्या फॉर्ममुळे भारताची परिस्थिती बिकट होऊ शकते.
भारत पराभवाकडे वाटचाल करत आहे
भारत पराभवाकडे वाटचाल करत आहे ऑलरेडी ..
ओपनर खेळले म्हणून मिडल ऑर्डरचे अपयश पराभवात रुपांतरीत झाले नाही. दुसऱ्या डावात ओपनर खेळतील किंवा न खेळतील. पण मिडल ऑर्डर पुन्हा हमखास अपयशी ठरेलच अशी स्थिती आहे. मग पंत जडेजा फक्त पराभव लांबवू शकतील. ते जाताच शेपूट औपचारीकता पुर्ण करेल.
थोडक्यात आता सामना वाचवणे टोटली शर्मा आणि राहुलच्या हातात आहे.
इंग्लंडला 30च्या आंतच आघाडी
इंग्लंडला 30च्या आंतच आघाडी मिळालीय. आपली फलंदाजी कोलमडणारच हा निराशाजनक सूर कां लावला जातोय ? प्रत्येक सामना, सामन्याचा प्रत्येक दिवस, सत्र नवीन शक्यता घेवूनच येतात व त्या सर्व आपल्या विरूद्धच असतील असं कां समजावं. ऑस्ट्रेलियात आत्ता आत्ताच अनुभवलंय ना आपण हें, सगळीं नकारात्मक भाकीतं धूळीला मिळालेलीं ! हरो, जिंको पण तें मैदानावरच व्हावं , आधीच नाहीं!
सॅम करनचा गोल्डन डक हा
सॅम करनचा गोल्डन डक हा टर्निंग पाँईट होता. त्याची रूटसोबत ६०-७० ची पार्टनरशिप मी हमखास पकडली होती. लीड १०० चा ३० केला एका बॉलने
बाकी पुजारा आणि रहाणे सध्या एकमेकांशी स्पर्धा करत आहेत असेच वाटते. जो कमी अपयशी ठरेल त्याला एक्स्ट्रा चान्स मिळेल असे वाटत असावे त्यांना..
आणि निराशाजनक नाही चिंतेचा सूर आहे..
शंका त्यांच्या क्षमतेवर नाही तर सध्याच्या फॉर्मवर आहे.
*बाकी पुजारा आणि रहाणे सध्या
*बाकी पुजारा आणि रहाणे सध्या एकमेकांशी स्पर्धा करत आहेत असेच वाटते. जो कमी अपयशी ठरेल...* - असल्या उपरोधातून 'चिंता ' प्रकट होते असं मला वाटलं नाहीं !
करन व रूटची 60 धांवांची भागीदारी भाकीतात ' पकडायची' व आपली 'मिडल ऑर्डर पुन्हा हमखास अपयशी ठरेलच अशी स्थिती आहे' म्हणायचं , हें देखील मलां 'चिंता ' न वाटतां , निराशाजनकच वाटलं. तसं नसेल तर उत्तमच.
भाऊ, सपोर्ट स्टाफ ने लक्ष
भाऊ, सपोर्ट स्टाफ ने लक्ष घालावं अशी आणखी एक गोष्ट म्हणजे बॉलर्सचे नो-बॉल्स. भारतीय गोलंदाजांनी दिलेल्या ३३ अतिरिक्त धावांमधे १७ नो-बॉल्स आहेत. हे नक्कीच बॉलिंग कोचची काळजी वाढवणारं असेल.
उरलेल्या ६ सेशन्सपैकी ज्या संघाला जास्त सेशन्स खेळता येतील (खेळायला मिळतील) त्या संघाची जिंकण्याची संधी जास्त आहे.
जोपर्यंत चुम्मा बाद होत नाही
मी संघहिताचा विचार करतो. कोण अपयशी होते की नाही हे दुय्यम आहे. आवडीचा प्लेअर अपयशी ठरत असेल तर त्याला ब्रेक मिळणे उत्तम.
बाकी जोपर्यंत चुम्मा बाद होत नाही तोपर्यंत निराशा माझ्या आसपासही फिरकू शकत नाही. माझी तर ईच्छा आहे की रहाणे पुजारा फ्लॉप जावेत पण भारत हरू नये म्हणजे एखादा बदल घडेल. उगाच तीसचाळीस धावा करून पुढचा सामना बूक करायचे आणि तेव्हा पुन्हा जोडीने फ्लॉप जायचे आणि त्या मॅचची बॅंड वाजवायचे असे नको व्हायला. मयंक शॉ सुर्या तीन जण रांगेत उभे आहेत. आपल्याला हि मालिका जिंकायची आहे. यंदा चान्स आहे जे गेल्यावेळी जमले नाही. त्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे...
पुजारा आणि रहाणेला काढून
पुजारा आणि रहाणेला काढून सूर्या आणि मयांकला चान्स देतील. मी जर कोच असतो त्यांना बोललो असतो ब्यागा भरा आणि ब्यागा घेऊनच मैदानात खेळायला जा. त्या ब्यागा अंपायर कडे द्यायच्या की स्टंपच्या मागे ठेवायच्या ते तुमचं तुम्ही बघा. जर अपयशी ठरलात तर तिकडूनच घरी जा तोंड दाखवायला येऊ नका.
उनाडकट हा आता अमेरिकेत आला
उनाडकट हा आता अमेरिकेत आला आहे. अमेरिकेत क्रिकेट लोकप्रिय करण्यासाठी. अर्थात अजून इथे फक्त भारतीय, व वेस्ट इंडीजहून आलेलेच लोक जास्त असतात - इंग्लिश, ऑस्ट्रेलियन एकहि पाहिला नाही.
लोकहो, निराश होऊ नका. दुसर्
लोकहो, निराश होऊ नका. दुसर्या आणि तिसर्या दिवशी खेळपट्टी भारतीय पाटा होती असे पनवती म्हणत होता. शिवाय चांगले उन पडले होते. पहिल्या दिवशी तसे नसूनही आपल्या सलामीवीरांनी चांगली फलंदाजी केली. आपली मंडळी चांगली बॅटींग करतील. (पुजारा आणि रहाणेच्या अपयशामागे संघ व्यवस्थापनाचा असलेला अविश्वास कारणीभूत आहे असे माझे मत आहे.) पण नेहमीप्रमाणे अगदी गळ्याशी आल्यावर खेळायला पर्याय नाही. तसे दोघेही करतील. विकेट अजूनही चांगली आहे. वातावरण फार ढगाळ नसण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आपली मंडळी खेळतील. पण इंग्लंडला पुनः आउट करायला आपल्याला वेळ मिळणारची शक्यता दिसत नाही.
बुमराने काहितरी बदल केला असावा पहिल्या सामन्यात तो इंग्रजांनी हेरलेला दिसतोय.
भाउ तुमचे कार्टून भारी.
रोहीत शर्मा अपयशी ठरेल असे भाकित जाणकार कसे करू शकतात याचे आश्चर्य वाटते.
ऋन्मेऽऽष यांचे म्हणणे बरोबर
ऋन्मेऽऽष यांचे म्हणणे बरोबर आहे, Series जिंकायला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. पुजारा आणि रहाणे माणूस म्हणून चांगले आहेत, ते यशस्वी व्हावे अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे हे मान्य आहे, पण दोघेही struggle करतात आहे हे धडधडीत दिसतेय, नाहीतर 2011 सारखे व्हायचं
* जिंकायला काही कठोर निर्णय
* जिंकायला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील *. - नुसतेच कठोर नाहीं ते खरंच परिणामकारक, शहाणपणाचे व न्याय्य असावेत इतकंच ! मतभेद त्यावर आहे.
*माझी तर ईच्छा आहे की रहाणे पुजारा फ्लॉप जावेत पण भारत हरू नये* - त्यांत ही देखील भर टाकायला काय हरकत आहे, ' आणि, पंतने रूटपेक्षाही मोठं शतक झळकावं व इतरांनी जिंकणयापुरता थोडा हातभार लावावा ' !
२७ वर दोन्ही ओपनर्स तंबूत.
२७ वर दोन्ही ओपनर्स तंबूत.
म्हणजे ०/२ वर पुजारा अन् कोहलीने डावाची सुरवात करण्या सारखं आहे.
ओवरमध्ये एक पुलची सिक्स आलेली असताना, अन् तीन फिल्डर्स कॅचिंग पोजीशनमध्ये असताना शर्मा नी हुक मारायला का जावं???
रा रो दोघांची फलंदाजी रोरावली
रा रो दोघांची फलंदाजी रोरावली नाही..
आता संपूर्ण जबाबदारी आतापर्यंत अपयशी ठरलेल्या (कोहलीसहित) मधल्या फळीवर.
पुजारा रहाणे कोहली,
पुजारा रहाणे कोहली, तिघांमध्येही या लेव्हलला हि गोलंदाजी खेळायची क्षमता आहे जे त्यांनी याआधी कित्येक वेळा दाखवले आहे. ऊलट आज सलामीवीर न खेळल्याने त्यांना संधी निर्माण झाली आहे पुन्हा आपली क्षमता सिद्द करायची. आज आपली मिडल ऑर्डर खेळते तर पुन्हा फॉर्ममध्ये येण्याचा हा एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो.
ऊलट आज सलामीवीर न खेळल्याने
ऊलट आज सलामीवीर न खेळल्याने त्यांना संधी निर्माण झाली आहे पुन्हा आपली क्षमता सिद्द करायची>>>>
त्यापैकी कोहलीने संधी संपविली....
३-५५
पिच आणि कंडिशन्स काही कठीण
पिच आणि कंडिशन्स काही कठीण नाहीत तरी अशी परिस्थिती होत असेल तर series आपल्याला कठीण जाणार
रोहित शर्माला कॅप्टन करायला
रोहित शर्माला कॅप्टन करायला पाहिजे.
इफेक्टिव्हली २९/३ आहोत आपण
इफेक्टिव्हली २९/३ आहोत आपण आता. आत्तापर्यंत तरी परवा व्यक्त केलेली भीती खरी व्हायच्या मार्गावर आहे. रहाणे आणि पुजाराने पुढचा सेशन खेळून काढला पाहिजे. विकेट्स न देणे महत्त्वाचे आहे. पंत हिरोइक्सची आशा करावी का माहिती नाही. स्वतः कोहलीच्या धावांची बोंब असताना तो दुस-यांना कितपत बसवेल माहिती नाही, पण ह्या दोघांनाही आत्ता प्रेशरबरोबर खरं तर संधीही आहे. दोन्ही हातांनी ती ओढून घेतली तर चँपियन्स स्टफ!
Since Mohammad Azharuddin's
Since Mohammad Azharuddin's 121 in 1990, no Indian captain has reached 50 at Lord's, and they have averaged 15.
1996 Azharuddin 16
2002 Ganguly 5 & 0
2007 Dravid 2 & 9
2011 Dhoni 28 & 16
2014 Dhoni 1 & 19
2018 Kohli 23 & 17
2021 Kohli 42 & 20
ओवरमध्ये एक पुलची सिक्स आलेली
ओवरमध्ये एक पुलची सिक्स आलेली असताना, अन् तीन फिल्डर्स कॅचिंग पोजीशनमध्ये असताना शर्मा नी हुक मारायला का जावं??? >> पहिल्या टेस्ट मधे तो असाच बाद झाल्यावर त्याने ह्याबद्दल प्रेस काँफरन्स मधे काय म्हटले होते हे शोधून बघ.
आज पुजारा - रहाणेची खरी
आज पुजारा - रहाणेची खरी ‘टेस्ट’ आहे. दोघं दबावाखाली कोलमडतात कि सगळा दबाव पचवून त्याच्यावर स्वार होतात हे बघणं औत्सुक्याचं ठरेल.
दोघंही खूप ठामपणे खेळतायत हे कौतुकास्पद आहे. रहाणे ची देहबोली मेलबर्नसारखी वाटतीय. तो स्वतःशी बोलतोय. स्टान्स थोडा ओपन आहे, बॅट सरळ खाली येतेय.आत्मविश्वासानं शॉट्स खेळतोय, बचाव करताना उशीरा आणि शरिराच्या जवळ खेळतोय. पुजारा स्पिनविरुद्ध पायांचा वापर करतोय. हे सगळं यशस्वी व्हावं अशा भरघोस शुभेच्छा!
हे सत्र व्यवस्थित खेळून काढलं
हे सत्र व्यवस्थित खेळून काढलं. पहिली पायरी पार. आता इफेक्टिव्ह ७८/३ दिवसाच्या शेवटापर्यंत जरा जास्त थकलेल्या बॉलर्सचा फायदा घेऊन १६०-१७० पर्यंत ० किंवा फार तर १ गडी गमावून नेता आले, तर उद्या लंचपर्यंत २५० पर्यंत नेऊन ६० ओव्हर्स + अर्धा तास जास्तच्या ८ ह्यात इंग्लंडला चॅलेंज देऊन उडवायचं एम ठेवता येऊ शकतं. पंतने किंवा जडेजाने धमाका केल्यास सोने पे सुहागा. बघूया काय होतंय. लगे रहो! विकेट राखून ठेवण्याची जबाबदारी अजूनही महत्त्वाची.
नवीन बॉल फार महत्वाचा आहे. या
नवीन बॉल फार महत्वाचा आहे. या पेसने खेळताना ८० ओवर झाल्यावर आपले फार रन्स झाले नसणार. तिथूनही बरेच खेळणे शिल्लक असणार. त्यामुळे नवीन बॉलला शेपूट एक्स्पोज न होणे गरजेचे.
नवीन बॉल येईपर्यंतच्या १०
नवीन बॉल येईपर्यंतच्या १० ओव्हरमध्ये ३० झाल्या तर आपण १५० च्या लीडला पोहोचतो. त्यापुढे सांभाळून खेळत १०मध्ये २०-३० काढल्या आणि विकेट गेली नाही, तर भारत उद्यासाठी चांगल्या परिस्थितीत असेल. उद्या जड्डूला स्पिन मिळाला तर मज्जा येईल. पिच उद्या धमाल आणेल.
गेला राहणे देखिल नेमके नवीन
गेला राहणे देखिल नेमके नवीन चेंडूच्या वेळी शेपूट उघडे ..
वेल, विकेट तर गेल्या आहेत, पण
वेल, विकेट तर गेल्या आहेत, पण अपुर्या प्रकाशामुळे खेळही थांबला. आता उद्याच्या सकाळच्या सत्रात पंतकडे लक्ष. आणि होपफुली जडेजालाही भरपूर स्पिन मिळून आपण त्यांची दाणादाण उडवू शकू. भारतीय फलंदाजांना स्पिनविरुद्ध अडखळताना पाहणं कठीण आहे.
जे रहाणे आणि पुजारा दिवसभर
जे रहाणे आणि पुजारा दिवसभर खेळतील म्हणून आस लावून होते त्यांचं हसू येतंय.
लक्ष्मणचंही मत हे आहे की
लक्ष्मणचंही मत हे आहे की २२५च्या आसपास भारत पोहोचतो की नाही, ह्यावर मॅच ठरेल. उद्या ते ७० मिळतील अशी आशा. पावसाची शक्यता जवळजवळ नाहीच. वूड आणि अली उद्या सकाळी त्याला हटवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. तो त्यांच्यावर यशस्वी प्रतिहल्ला करेल का? टेलएन्डर्स?
शेवटचे ५ फलंदाज म्हणजे असे
शेवटचे ५ फलंदाज म्हणजे असे शेपूट आहे क्वचित माकडाचे नाही तर कायम बकरीचे... त्यामुळे पाच बाद नंतर आपल्या धावा ह्या आपल्याला प्रतिस्पर्धी संघाने कीव आली म्हणून दिलेल्या समजाव्या.
मुळे हा इन्ग्रजांच्या फलंदाजीचे मूळ आहे आता पर्यन्त झालेल्या तीनही डावात इन्ग्रजांच्या धावा केवळ त्याच्यामुळे झाल्या. आता ह्या मुळावर कसा घाव घालायचा ह्याची आखणी शास्त्रीबुवा आणि कप्तान कवळी ह्यांनी केली असावी.
कप्तान कवळी सातत्याने उजच्या यष्टीबाहेर चेंडूला डिवचून बाद होतोय..
तिथी समालोचनाला गेलेल्या गावस्करांसारख्या फलंदाजाला काही विचारायची परवानगी नसते का संघ व्यवस्थापनाला? की गावस्कर टीप द्यायचे पैसे मागतील ह्याची भिती वाटते?
बघुया आज शेपूट कितपत टिकते ते? दोन तास काढून ६०-७० धावा केल्या तरच इंग्रजांवर दडपण आणता येईल. अर्थात मुळे आल्या आल्या नविन चेंडू घेऊन अॅण्डरसन आणि रॉबिनसन ह्या दोन सनांना आपल्या गोलंदाजांवर उसळता मारा करायला लावणार हे तिकडे सामना सुरु असताना क्वचित पडणार्या सुर्यप्रकाशा इतके सत्य.
Pages