Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
*रोहित ... कौतुक करायला हवे.
*रोहित ... कौतुक करायला हवे... माझे मत मी फक्त दोन सिरीज वरून ठरवणार नाही .. अशीच पाचेक वर्षे काढली तरी प्रश्ना निकालात निघेल.* -
तूं आवडतेस म्हणून आपलं विचारलं. पण तुझ्या होकारासाठी 5 वर्षं थांबायला मात्र मीं तुझ्यासाठीच इतका आसुसलेला नाहीं, किंवा तूं विश्वसुंदरीही नाहींस !!!
भाऊ
भाऊ
रहाणेने पुन्हा निराश केले!
रहाणेने पुन्हा निराश केले!
रॉबिन्सन आणि अॅण्डरसन ह्या दोन सनांची फक्त गोलंदाजी भेदक बाकीचे ह्या दोघांना विश्रांती देण्यासाठी अधून मधून वाटले काल!
आजच्या पहिल्या सत्रात २६
आजच्या पहिल्या सत्रात २६ षटकात ४ बळी आणि ७० धावा!
*रॉबिन्सन आणि अॅण्डरसन ह्या
*रॉबिन्सन आणि अॅण्डरसन ह्या दोन सनांची फक्त गोलंदाजी भेदक * -
रॉबिन्सन व वुड मधूनच चेंडू टाकण्यापूर्वीची उडी क्रिजच्या टोकाला टाकतात व चेंडूची लाईनच अचानक बदलतात पण चेंडूवरचं नियंत्रण मात्र पक्कं असतं. इंग्लंडचा पेस अटॅक खरंच भेदक आहे व हया हवामानात त्याना सामोरे जात केलेल्या धांवा कौतुकास्पदच !
तिकडचे सन्स म्हणजे आपल्याकडचे
तिकडचे सन्स म्हणजे आपल्याकडचे कुमार.
वुड मधूनच चेंडू
वुड मधूनच चेंडू टाकण्यापूर्वीची उडी क्रिजच्या टोकाला टाकतात>>
वुड तसा भेदक आहे वेगही चांगला आहे पण ह्या डावात भेदकता जाणवली नाही!
कोण म्हणतं पुजारा ला टीम
कोण म्हणतं पुजारा ला टीम मॅनेजमेंट चा पाठिंबा नाही? खुद्द उप-कर्णधारानं सिद्ध केलं की पुजार्या त्याच्यापेक्षाही जास्त धावा करणारा फलंदाज आहे.
रहाणे ने पंत- जडेजा ला इंग्रजी गोलंदाजांपासून काल संध्याकाळी वाचवून, नाईट वॉचमन म्हणूनही आपली जवाबदारी सार्थ पार पाडली.
मला तर मुंबई क्रिकेट चे रणजी क्रिकेटमधले सोनियाचे दिवस परत येताना स्पष्ट दिसतायत. रणजी फायनल ची मॅच - मुंअबी वि. सौराष्ट्र. मुंबईकडून ओपनिंग ला शॉ, वन डाऊन रहाणे. तर सौराष्ट्राकडून पुजारा आणि भेदक गोलंदाज उनाडकट.
ओके.. आता सगळा उपरोध बाजूला: पण भारताने जडेजा ला सहाव्या क्रमांकावर फलंदाज म्हणून खेळवण्याचा नक्की विचार करावा. (ओके.. आता शेवटचं ... रहाणे च्या जागी अश्विन संघात येऊ शकतो.
)
बुमराह ने निराशा केली
बुमराह ने निराशा केली फलंदाजीत
मेलबर्न २००३. भारत २७८/१
मेलबर्न २००३. भारत २७८/१ असताना द्रविडने स्टीव्ह वॉच्या गोलंदाजीला विकेट टाकली आणि पुढे भारत ३६६ ऑलआऊट झाला. त्याचं देजा वू फिलींग आलं. अर्थात आता आपली गोलंदाजी जास्त चांगली आहे, आणि पाँटिंग-हेडनसारखी जोडगोळी नाही. पण आकाश निरभ्र असताना इंग्लंड उद्या ३८०पर्यंत पोचले आणि ढगाळ डे ४ला भारत कसोटी वाचवण्यासाठी झगडायला लागावं लागण्याच्या परिस्थितीत आला, असं व्हायला नको. आज विकेट्स हव्यात लवकर. (पहिल्या दिवशीच्या खेळानंतर असं होणं अकल्पित आहे, पण टेस्ट क्रिकेट ..)
*आज विकेट्स हव्यात लवकर.*-
*आज विकेट्स हव्यात लवकर.*- दोन तर मिळाल्यात !
रॉबिन्सन व वुड मधूनच चेंडू
रॉबिन्सन व वुड मधूनच चेंडू टाकण्यापूर्वीची उडी क्रिजच्या टोकाला टाकतात व चेंडूची लाईनच अचानक बदलतात पण चेंडूवरचं नियंत्रण मात्र पक्कं असतं. इंग्लंडचा पेस अटॅक खरंच भेदक आहे व हया हवामानात >> व नंतरचे दोन शब्द आधी पण हवे होते. अँडरसन नि मधे मधे सटकणारा ब्रॉड वगळता (आरचार फारच नवा आहे) दर दोन वर्षांनी बाकीचे रीसाय्कल होतात इंग्लंडबाहेर खेळले की हो.
बुमराह ने निराशा केली फलंदाजीत >> हो अगदीच. शमी ला इशांत च्या आधी का पाठवतात ? शमी टेस्ट मधे कधी कधी एव्हढा रीलायेबल खेळला आहे ?
. (पहिल्या दिवशीच्या खेळानंतर असं होणं अकल्पित आहे, पण टेस्ट क्रिकेट ..) > >इंग्लंडचे सो कॉल्ड हवामान नेहमी आपल्या विरुद्ध असते लेकाचे.
तिसराही गेला. शमीचा अप्रतिम
तिसराही गेला. शमीचा अप्रतिम बॉल!
कोहलीचे reviews आणि काही
कोहलीचे reviews आणि काही बॉलिंग changes अनाकलनीय होते
"शमी टेस्ट मधे कधी कधी एव्हढा
"शमी टेस्ट मधे कधी कधी एव्हढा रीलायेबल खेळला आहे ?" - फक्त ह्या प्रश्नाचं उत्तर देतो: २०११ वर द्रविड आणि खाली भुवनेश - शामी इतकीच बॅटींग होती आपली.
अरे पण मधे दहा वर्षे गेली
अरे पण मधे दहा वर्षे गेली आहेत ना ? शमी 'मला यंदा कर्तव्य नाही' ह्या थाटात बॅटीम्ग करतो असे नाही वाटत तुला त्याचा पवित्रा बघून ? त्यापेक्षा मनिंदर किंवा दोशी सुद्धा सिरीयस वाटायचे रे. कमीत कमी प्रयत्न केला अस तरी वाटले पाहिजे ना. मान्य की बॉलिंग हा त्याचा मुख्य धंदा आहे पण तरीही यार .....
"अरे पण मधे दहा वर्षे गेली
"अरे पण मधे दहा वर्षे गेली आहेत ना ?" - इतक्या सिरियसली उत्तर दिलं नव्हतं रे.. आजची आपली बॅटींग (कोलॅप्स?) पाहून सकळापासून 'शि. म. परांजपे' (a.k.a वक्रोक्ती) मोड ऑन झालाय. तुझं म्हणणं बरोबर आहे. सगळ्याच टेल-एंडर्स ने बॅटींगची जमेल तितकी जवाबदारी घ्यायलाच पाहिजे. तसं काही प्रमुख बॅट्समेन ने सुद्धा अधून-मधून हात फिरवायला (बॉलिंग करायला) काही हरकत नाहीये.
२०११ वर द्रविड आणि खाली
२०११ वर द्रविड आणि खाली भुवनेश - शामी इतकीच बॅटींग होती आपली.
>>>>
द्रविड २०११ - एकट्याची तीन शतके.. तरीही व्हाईटवॉश ..
पण शमी भुवनेश्वर २०१४ .. त्यात शमीची एखादी इनिंग असेल, आता आठवत नाही. पण तुम्ही आठवणीने नाव घेतले म्हणजे एखादी असेलच. पण भुवी येस्स, तो कन्सिस्टंटली योगदान देत होता तेव्हा. फलंदाज म्हणून सध्याच्या चौकडीत ऊजवा होता तो.
'शि. म. परांजपे' >>
'शि. म. परांजपे' >> केव्हढ्या वर्षांनी ऐकले हे नाव रे ! "तसं काही प्रमुख बॅट्समेन ने सुद्धा अधून-मधून हात फिरवायला (बॉलिंग करायला) काही हरकत नाहीये." तेव्ह्ढेच काय त्यांनी अधून मधून बॅटिंग वर पण हात फिरवायला हरकत नाही असे म्हणायची वेळ आली आहे
घे मी पण अलंकारात शिरतो.
पण खरच, राहुल नि रोहित , जाडेजा (नि पंतचे ३-४० रन्स )नाही खेळले तर काय होईल त्या इनिंगचे ते सांगता येत नाही आज. राहणे फेल गेल्यामूळे बहुतेक पुढच्या कसोटि मधे तो किंवा पुजारा एकच जण असणार हे उघड आहे.
*'शि. म. परांजपे' >>
*'शि. म. परांजपे' >> केव्हढ्या वर्षांनी ऐकले हे नाव रे !* - खरंय. एकदम वेगळ्याच काळात व जगात गेलो !! आपण आतां ' कडक', 'चाबूक' हे शब्द चांगल्या फटकेबाजीला वापरतो, ते शि.मं.च्या लेखांना चपखल बसतात !!
रहाणे व पुजारा यांच्यावर होणार्या टीकेविरूद्ध गावसकर पोटतिडीकेने बोलतोय. मलाही पटतंय. त्या दोघांचा स्कोअर होत नाहीय पण टाकाऊ म्हणून त्यांच्यावर काट मारायला धावणं, ..... नाहीं रूचत !!
शि. मं. चा रेफरन्स कळणारे,
शि. मं. चा रेफरन्स कळणारे, त्यांचं लेखन वाचलेले मायबोलीकर भेटले ह्याचं मला खरंच अप्रूप वाटलं.
पुजारा, रहाणे वर काट मारण्याचा अथवा न मारण्याचा प्रश्न नाहीये पण विशेषतः रहाणेचा जो एक पॅटर्न होतोय - अगदी प्रतिकूल परिस्थितीत एखादी महत्वाची खेळी खेळून नंतर अनेक संधी दवडायच्या - तो त्याच्या करियरसाठी घातक आहे. पहिल्या मॅचमध्ये तो ज्या प्रकारे रन-आऊट झाला ते आत्मविश्वासाचा अभाव दाखवतं. पुजाराला खूप वेळ घेऊन इनिंग बिल्ड करण्याच्या त्याच्या क्षमतेला न्याय देण्यासाठी मोठ्या खेळी उभारण्याची गरज आहे.
*त्याच्या करियरसाठी घातक आहे*
*त्याच्या करियरसाठी घातक आहे* - फेफजी, त्यांच्या सध्याच्या कामगिरीवर टीका होणं यात काहीच गैर नाही व माझा रोख खरःच त्यावर नाही. फक्त त्यांत हेटाळणी, उपहास यापेक्षा सहानुभूति व प्रोत्साहन असावं इतकंच. ( जो आपलाही उद्देश आहे , याची जाणीव मला आहे ) .
पुजारा (२३ डाव), कोहली (१६)
पुजारा (२३ डाव), कोहली (१६) अन रहाणे (२२) या तिघांची जानेवारी २०२० नंतरची अॅवरेज २५ च्या आसपास आहेत. कोहलीचं सर्वात कमी.
(जॉनी बेअरस्टो ही याच गटात आहे, पण त्याच्या विषयी अशी चर्चा इंग्लंडच्या मदरटंग वर होऊदे)
केवळ कप्तान असल्यानी (अन् वागणं अग्रेसिव असल्यानी) कोहलीला वेगळा न्याय अन् पुजारा - रहाणेला वेगळा असं होऊ नये इतकंच वाटतं. पण स्ट्रेट ट्रीज आर चॉप्ड फर्स्ट याचाच प्रत्यय येण्याची शक्यता जास्ती दिसते.
तसं झाल्यास, पुजारा - रहाणेनी द्रविडला एक लाँग कॉल करावा अन् स्पेसिफिक टिप्स घेऊन शक्य तेवढी नेट प्रॅक्टीस करावी.
आणि जर तिसऱ्या टेस्ट ला हे दोघे बाहेर बसले तर नंबर ३ वर विहारी अन् ५ वर स्काय ला ट्राय करावं... (स्पिनिंग ट्रॅक असला तर ३ : कोहली, ४ : पंत, ५ : सर, ६ : विहारी, ७ : आश्विन असं काही पण बघता येईल)
आपल्याकडे चांगले पर्याय
आपल्याकडे चांगले पर्याय उपलब्ध असणं ही खूपच आश्वासक बाब असली , तरीही केवळ त्यामुळे बदल करण्याकडे कल जाणंही घातक ठरूं शकतः. एखाद्या चांगल्या फलंदाजाची निराशाजनक कामगिरी 1) बॅड पॅच किंवा 2) गोलंदाजानी हेरलेली त्याच्या खेळातील एखादी तांत्रिक कमतरता, यामुळे असूं शकते. गावस्करच्या मतें, रहाणे व पुजाराच्या कारण (2) महत्वाचं आहे व तें दूर करणं ही खेळाडूंइतकीच कोच व सपोरटींग स्टाफची जबाबदारी आहे.
थोडक्यात, या दोन फलंदाजाच्या बाबतीत संघ निवड करणारयांच्या जाणकारीचा कस लागणार आहे.
मला मात्र या दोघांनाही किमान अजून एक कसोटी तरी बदलू नये असं वाटतः.
काल आपले कसे पहिल्य ७ चेंडूत
काल आपले कसे पहिल्या ७ चेंडूत दोघे गेले खेळणारे तसे आता इन्ग्रजांचे बाद करून दाखवायला हवे आपल्या गोलंदाजांनी!
कोहलीने फलंदाज स्थिरावरतील ह्याची काळजी घेतली..
भाऊ,
भाऊ,
पुजारा - रहाणे यांच्या बाबतीत कारण नं. २ आहे हे मान्य, आणि त्यासाठी सपोर्ट स्टाफ अन् कोचनी मदत करायची गरज आहे हे ही मान्य.
पण या संघासोबत असलेल्या कोच अन् सपोर्ट स्टाफ मंडळींच्या एकूण क्षमतेबाबत मला मोठ्ठा संदेह आहे.
शास्त्रीबुवा मानसिक सपोर्ट देऊ शकतील, पण टेक्निकल फ्लॉ दूर करायला त्यांचा किंवा विक्रम राठोर चा फार उपयोग होईल असं वाटंत नाही. म्हणूनच मी द्रविडला लाँग कॉल करण्याविषयी बोललो.
पुढच्या मॅच ला संघात बदल होणार की नाही ते सर्वस्वी या टेस्टच्या निकालावर ठरेल.
आपण जिंकलो किंवा ड्रॉ झाली, तर किमान एकाला आणखी एक संधी मिळू शकते. पण जर हरलोच तर मात्र बदल दिसतीलच.
जॅकी- बव्हशी सहमत..
जॅकी- बव्हशी सहमत..
ज्या पद्धतीने गोलंदाजी ठिसूळ
ज्या पद्धतीने गोलंदाजी ठिसूळ वाटतेय आपली ते पाहता ५०० धाव केल्यास इंग्रज जिंकू शकतात शेवटच्या दिवशी ढगाळ हवा निर्माण करून...
* इंग्रज जिंकू शकतात
* इंग्रज जिंकू शकतात शेवटच्या दिवशी ढगाळ हवा निर्माण करून...* - इंग्रज 15 ऑगस्टला नांगी टाकण्याचीही जबरदस्त शक्यता आहेच !!!!
* इंग्रज जिंकू शकतात
* इंग्रज जिंकू शकतात शेवटच्या दिवशी ढगाळ हवा निर्माण करून...* - उलट, इंग्रज 15 ऑगस्टला नांगी टाकण्याचीही जबरदस्त शक्यता आहेच !!!!
Pages