युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

प्रज्ञा सही ! Proud पण आमच्याकडे रताळ्याचे गोड काप करतात ते पण उरतात, त्याचे काय करायचे? Proud

माझी मुलगी साबु वड्यांना कंटाळलेली असल्याने संध्याकाळी थालिपीठे लावावी लागतील. बटाट्याचा किस माझे डोके खातो, कारण वाफवायला तासभर जातो. Uhoh

तेपण द्यायचे ढकलून थालिपीठ करताना Wink
किंवा मग स्वीट डिश म्हणून दुधात मिसळून एक उकळी काढायची नि वेलचीपूड वगैरे घालून द्यायचे सगळ्यांना. असे हेतेढकलचबाढबीचे पदार्थ हातघाईवर येऊन मूळ पदार्थांपेक्षा लवकर संपतात. एकादशीचं पुण्य पदरात पडतं.

स्वयंपाक करायला नवीन मावशी यायला लागल्यात.त्यांना मेथीची पीठ लावुन पळीवाढी भाजी करायला सांगितली तर त्यांनी मेथी न चिरता भाजी फोडणी ला घातली आणि वरुन छान लसुण फोडणी बिडणी घालुन भाजी केली. भाजी चवीला छान झाली आहे पण अखंड पानं तोंडात येत आहेत त्याची सवय नाही त्यामुळे भाजी आज जास्त संपली नाही. अजुन जवळ जवळ २ वाट्या भाजी शिल्लक आहे. त्याचं आता काय करावं सुचवा प्लीज.
आजच सकाळी नाष्ट्यात थालिपीठ करुन खाल्लं त्यामुळे तो पर्याय बाद आहे.
प्लीज दुसरे काही पर्याय असले तर सुचवाल का ?
धन्यवाद

थोडे तेलकट खायची तयारी असेल तर बेसन,खसखस घालून मसाले घालून मुठीया बनवून तळता येतील.आपण खसखस तीळ घालून कोथिंबीर वडी करतो तसं.जर तळायचे नसेल तर रोल तयार करून उकडून पातळ वड्या करून तव्यावर परतता येतील.
कणिक भर घालून पराठे करता येतील.पराठ्यात आख्खी मेथी विशेष खटकणार नाही.
मेथी मटर मलई चा रेडी मिक्स मसाला वापरून मेथी मटर मलई करता येईल(अर्थात लसूण फोडणी खूप घातली नसेल तर)

घरात मक्याचे पीठ आहे (पिवळ्या रंगाचे )
त्याचे काय करता येईल?

Corn flour (हे पांढरे असते आणि ह्या दोघांमध्ये काय फरक आहे मला माहिती नाही ) समजून आणलेले चुकून.

करता येईल कदाचीत. थोडेसे पीठ ट्राय करुन बघ. त्यातच लसुण-मिर्ची वाटुन घाल आणी कोथिंबीर. पाहीजे तर थोडा बारीक रवा घालुन १० मिनीटे भिजवुन ठेव. किंवा मग थोडे तांदळाचे पीठ घाल रव्या ऐवजी. एक डाव भर कर, म्हणजे बाकी वाया जाणार नाही.

https://www.maayboli.com/node/29349

इथे कणसाची धिरडी आहेत, थोड्या पिठावर प्रयोग करून बघ. साबांनी एकदा भाकरी केली होती, मला काही फार आवडली नाही.

सोपं काहीतरी करायचं आहे
डोसे मी एक दोन घातले तर बाकीचे नवरा करु शकतो, कारण सध्या energy राहत नाही जास्त वेळ

थालीपीठ होतात.
सरसोका साग आणि मकैकी रोटी करायची म्हणून आणलेले मक्याचे पीठ,थालीपीठ करून वापरले.मात्र त्यात बरेच काही काही घालून केले.फारसे चांगले नाही लागत.पण संपवले.

मक्याचे पिवळे पीठ मी फक्त सरसो साग मधे वापरते, थिकनेस साठी.
बाकी चव खास नसते त्यामुळे कशात च घालत नाहि.

किल्ले, सिरीयसली. ढोकळेच कर त्याचे. आले -लसुण मिर्ची त वास चव खपुन जाईल त्याची. परदेशात तर आपल्या सारखा पांढरा रवा सगळीकडेच मिळत नाही. मी मक्याच्या रव्याचा कित्येक वेळा शिरा करुन खाल्लाय. काही फरक नाही. चवीकरता म्हणून बदाबदा केशर, वेलची जायफळ घातले होते.

राजस्थानात खट्टा ढोकला म्हणून करतात बहूतेक मक्याच्या पिठाचे ढोकळे. मी माझ्या कामवाली कडून ऐकलं होते.
हवे तर तिला उद्या विचारते रेसिपी.

माझ्या सासरी भाकरी करतात साध्या किंवा मग भाज्या घातलेल्या धपाट्या सारख्या. मक्याच्या पिठात मेथी/ पालक/किसलेला मुळा/ मुळ्याची पाने/ शेपू यातलं जे असेल ते आणि हिरवी मिरची, अद्रक मीठ कोथिंबीर... सगळं बारीक चिरून पिठात मिक्स करून पिठ मळायचे आणि प्लास्टिक वर भाकऱ्या थापून पराठा सारख्या तुपावर भाजायच्या. .. छान लागतात. सोबत लोण्याचा गोळा मस्ट.

लोलाने कुठल्यातरी गणेशोत्सवात आव्हाकाडो आणि मक्याचे पीठ घालून थालिपीठाची रेसिपी लिहिली होती. छान होतात . आव्हाकाडो नसेल तरी थोडं दही, एखादी पाले भाजी बारीक चिरून घालून थालिपीठ करता येईल.

घरात जवळ जवळ १ किलो पालक उरला आहे, लवकरच खराब व्हायला सुरवात होईल, काही युक्ती / सूचना असतील तर सुचवा जेणेकरून पालक टिकवता येईल , धन्यवाद ..

पालक पराठे, पालक पनीर, पालकाच्या पुर्‍या ( अर्धी जुडी पुरेशी होईल, उरलेला पचडी )

जर परतुन बेसन घालुन भाजी केली तर लवकर संपेल, कारण चिरलेली पालेभाजी परतुन २ माणसांपुरतीच होते.

पालकाची प्युरी फ्रिज मध्ये किती दिवस टिकते हे मात्र माहीत नाही. पालक ब्लांच करुन प्युरी होईल.

किंवा पालक + दुधी + टॉमेटो असे सूप करता येईल.

पालक सूप मस्त होते.बराच पालक वापरला जातो.पालक, एखादा कांदा, मिरची हे सर्व शिजवायचे(मायक्रोव्हेव किंवा कुकर) आणि मग मिक्सरमध्ये बर्फ़ाच्या खड्या बरोबर नीट बारीक करून(पेशन्स..पेशन्स.पालक गरम असेल तर वाफेने झाकण उडून आजूबाजूला सर्व भिंतीवर हिरवे स्प्रे पेंट होते.फुल पंख्याखाली पालक हाताने भांडे उचलता येईल इतका गार करून मग बर्फ़ाच्या खड्याबरोबर मिक्सरमध्ये वाटण.) 1 चमचा बटर/तुपावर परतून एक उकळी किंवा नुसतेच गरम.

अनु , पालक बर्फाच्या खड्या बरोबर मिक्सरमध्ये फिरवायचे काही विशेष कारण ? दाट पणाला अजून काही घालायचे नाही का ? घरी अनायसे पालक आहे . करून बघेन . आणि याला टिपिकल पालकाचा वास येत नाही ना ?

Pages