मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या.
ए जी, ओ जी, लो जी, सुनो जी
ए जी, ओ जी, लो जी, सुनो जी (हे नसणार उत्तर, पण जुळतंय)
बो लो बो लो, कुछ तो बो लो
Bow लो bow लो, कुछ तो bow लो
सामने वाले ले गये बाजी
हैय ना bow लो bow लो
हैय ना bow लो bow लो
बरोबर मानव.
बरोबर मानव.
७/१९४
७/१९४
'सुपर्ब मॅन' नावाची कंपनी पुरुषांचे विविध प्रकारचे कपडे बनवून विकायची. त्यासाठी विविध विभागाप्रमाणे, विक्री करण्यासाठी सेल्समन नेमले होते. एकदा मॅनेजरच्या लक्षात आले की, टाय, सॉक्स, रुमाल विभागाची विक्री अपेक्षेपेक्षा खूपच कमी होतेय. त्यासाठी सर्वांची मीटिंग घेतल्यानंतर, मॅनेजरच्या लक्षात आले की, काही सेल्समनचं विक्री कौशल्य कमी पडतंय.
मग त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली गेली. सेल्समनचे A आणि B असे २ गट तयार करण्यात आले. एका गजबजलेल्या रस्त्यावर विक्री करण्यासाठी दोन्ही गटांना सोडण्यात आलं. डाव्या बाजूला A आणि उजव्या बाजूला B गट. ३तासात ज्या गटाची विक्री जास्त होईल, त्यांना विशेष बक्षीस मिळणार होतं.
२ तासांनी , A गट जिंकतोय, असं दिसू लागले. B गटाचे सेल्समन विक्री वाढवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू लागले. त्यासाठी एक सेल्समन एका मोठ्या कारजवळ जाऊन विनंती करू लागला, " हाय, काहीतरी विकत घ्या ओ. समोरची टीम जिंकायला लागलीय."
हे तो कोणत्या गाण्यातून सांगेल?
उत्तर :- ( मानव )
Bow लो bow लो, कुछ तो bow लो
सामने वाले ले गये बाजी
(No subject)
महासोपं
महासोपं
७/१९५
नियमित गिर्यारोहण करणारा तो कंपू आज राजमाचीवर आला होता. उदेवाडीत त्यांनी मुक्काम केला आणि दोन टीम करून एका टीमनं श्रीवर्धन आणि दुसर्या टीमनं मनरंजन वर जावं असं ठरलं. जिथे मुक्काम केला होता तिथल्या एका मांजराशीही त्यांची दोस्ती झाली. त्याला त्यांनी 'लाडका' म्हणायला सुरुवात केली. घरातले सगळे हसले अन म्हणाले 'अहो ती भाटी आहे, बोका नव्हे.' पण पोरांनी ऑलरेडी बारसं केलं होतं त्यामुळे त्यांनी तेच नाव ठेवलं. तर ते असो.
दोन बालेकिल्ल्यात जाणार्या टीम ठरवण्यासाठी त्यांनी चक्क चिठ्ठ्या टाकल्या. A लिहिलेली चिठ्ठी आली तर श्रीवर्धन आणि B वाल्यांनी मनरंजनवर जायचं ठरलं. मांजरालाही घेऊन जायचं ठरलं. श्रीवर्धनची टीम बालेकिल्ल्यात पोहचल्यावर त्यांच्यातल्या एकानं दुसर्या भिडूला विचारलं अरे पण आपलं मांजर कुठे गेलं. हा भिडू हिंदीभाषिक होता, त्यानं एक गाणं गाऊन उत्तर दिलं......
"मादा" लाडका "बी" गड गया
"मादा" लाडला "बी" गड गया

उत्तर : (मानव)
"मादा" "लाडला" "B" गड गया
७/१९६
७/१९६
तो तिला महागडीच गिफ्ट देतो.
ती बघितल्यावर ती रागाने तिला बाजूला सारते.
मग ती गिफ्टच तिला स्वतःचे महत्व सांगू लागते, महागड्या धातूशी तुलना करत.
(ल चा ळ करावा लागेल)
ये दुनिया पित्तल दि,बेबी डॉल
ये दुनिया पित्तल दि,बेबी डॉल मै सोने दी
बिंगो मृणाली:
बिंगो मृणाली:
७/१९६
तो तिला महागडीच गिफ्ट देतो.
ती बघितल्यावर ती रागाने तिला बाजूला सारते.
मग ती गिफ्टच तिला स्वतःचे महत्व सांगू लागते, महागड्या धातूशी तुलना करत.
(ल चा ळ करावा लागेल)
उत्तर: बेबी डाळ (डॉल) मैं सोणे दी..
आय कान्ट बीलीव.. मला कित्ती
आय कान्ट बीलीव.. मला कित्ती दिवसांनी पटकन उत्तर आलंय..

हैया हैया बो लो बो लो कुछ तो
७/१९७
७/१९७
पूर्वीच्या काळची गोष्ट आहे, एक तरूण होतकरू मुलगा होता .बेताची परिस्थिती. त्याच्या लग्नाचं बघत होते. त्याच्या फार अपेक्षा नव्हत्या. मुलगा व्हर्नाक्युलर फायनल झाला होता, त्याला मुलगी पण तेवढीच शिकलेली हवी होती.
मुलगी कशी हवी हे सांगायला तो कुठचं हिंदी गाणं म्हणेल?
तेरे प्यार का आसरा चाहता हूं
तेरे प्यार का आसरा चाहता हूं
वफा (व्ह. फा.) कर रहा हू, वफा चाहता हूं
बिंगो मामी !

उत्तर : (मामी)
तेरे प्यार का आसरा चाहता हूं
वफा (व्ह. फा.) कर रहा हू, वफा चाहता हूं
वफा (व्ह. फा.) कर रहा हू, वफा
वफा (व्ह. फा.) कर रहा हू, वफा चाहता हूं >>>
हे सही आहे.
हे व्ह फा म्हणजे काय?
हे व्ह फा म्हणजे काय?
तेव्हाची मॅट्रिक सारखी
व्हर्नाक्युलर फायनल( व्ह फा ) तेव्हाची मॅट्रिक सारखी परीक्षा
धागा पुढे न्यायला एक सोपे.
धागा पुढे न्यायला एक सोपे.
७/१९८
पाण्यात टाकल्यावर साडीची घडी मोडू नये अशी आशा करणारी व्यक्ती कोणते मराठी गाणे म्हणेल?
जीवनात हि घडी अशीच राहू दे..
जीवनात हि घडी अशीच राहू दे..
जीवनात हि घडी अशीच राहू दे <<
जीवनात हि घडी अशीच राहू दे <<<
परफेक्ट
परफेक्ट
"श्र" ने सुरू होणारा आयडी घ्यायला पाहिजे. म्हणजे उत्तरे सुचतील पटकन अशी 
७/१९८
पाण्यात टाकल्यावर साडीची घडी मोडू नये अशी आशा करणारी व्यक्ती कोणते मराठी गाणे म्हणेल?
उत्तर (श्रवू)
जीवनात हि घडी अशीच राहू दे..
7/199
7/199
जान्हवी एकदा आपल्या नवऱ्याला एका लांब केस वाल्या तरूणी सोबत बघते. त्याच दिवशी नवरा घरी आल्यावर त्याच्या शर्टावर लिपस्टिकचे डाग तिला दिसतात. ती कोणतं गाणं म्हणेल?
ओ हसीना ज़ुल्फ़ों वाली जान-ए
ओ हसीना ज़ुल्फ़ों वाली जान-ए-जहां
ढूँढती हैं काफ़िर आँखें किसका निशां
बरोब्बर झिलमिल!
बरोब्बर झिलमिल!
7/199
जान्हवी एकदा आपल्या नवऱ्याला एका लांब केस वाल्या तरूणी सोबत बघते. त्याच दिवशी नवरा घरी आल्यावर त्याच्या शर्टावर लिपस्टिकचे डाग तिला दिसतात. ती कोणतं गाणं म्हणेल?
उत्तर: (झिलमिल)
ओ (अहो!) हसीना ज़ुल्फ़ों वाली जाने जहां (जान्हवी)
ढूँढती हैं काफ़िर आँखें 'किस' का निशां
७/२००
७/२००
भामिनीताई गावाकडल्या असल्या तरी पक्क्या खमक्या होत्या. मुंबईत येऊन त्यांनी एका साडीच्या दुकानात विक्रेतीचं काम धरलं. एकदा दुकानाच्या मालकानं त्यांना दुकान झाडून काढायला सांगितलं तेव्हा आपला मान-अपमान समजून असणार्या भामिनी ताईंनी आपल्या गावच्या बोलीत त्याला चक्क एक मराठी गाणं गाऊन ठाम उत्तर दिलं.....
ओ (अहो!) हसीना ज़ुल्फ़ों वाली
ओ (अहो!) हसीना ज़ुल्फ़ों वाली जाने जहां (जान्हवी)
मस्त आहे हे. कोडं आणि डिकोड दोन्ही छान सपा आणि झिलमिल.
ढूँढती हैं काफ़िर आँखें 'किस' का निशां >>>
मराठी गाणं तर लिहिलंच आहे पण
क्ल्यु १ : मराठी गाणं आहे हे तर लिहिलंच आहे पण त्याव्यतिरिक्त २ ढळढळीत क्ल्यु आहेत कोड्यात. ते लक्षात आले की लगेच उत्तर येईल.
क्ल्यु २ : भामिनीताई खेड्यातील असल्यानं इंग्रजी शब्द नीट बोलता येत नाही त्यांना. इतकंच काय मराठी शब्दाचाही प्रमाण उच्चार नाही करत त्या.
क्ल्यु ३ : गाण्याच्या पहिल्या किंवा दुसर्या (लिहिलेलं पाहिलं तर दुसर्या. गाताना पहिल्या.) ओळीतील केवळ ४ शब्द. आणि हे गाणं केवळ चार ओळींचं आहे.
क्ल्यु ४ : धैर्य धरून प्रयत्न केलात तर लगेच सुटेल.
Pages