मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. 
परदे सजारे आणि किसी दोन्ही
परदे सजारे आणि किसी दोन्ही मस्त.
परदेस जा के परदे सिया ,भूल न
परदेस जा के परदे सिया ,भूल न जाना पिया.
परदेश जागे परदे सिया,भूल न
परदेश जाके परदे सिया,भूल न जाना पिया
१९१ -
१९१ -
परदेस जाके परदेसिया..
भूल न जाना पिया..
:D, मानव
काय टायमिंग आहे उत्तरांचं.
काय टायमिंग आहे उत्तरांचं.
हो ना
हो ना
मानव,आदु,श्रद्धा सगळेच बरोबर.. काजुकतली बक्षीस.
जरा वेळ, मी तर परदेस च टाइप
जरा वेळ, मी तर परदेस च टाइप केलं होतं, स चा श कसा झाला याचा विचार करत होतो. मग लक्षात आलं ही तर दुसरी पोस्ट आहे.
७/१९१
७/१९१
पिया ला पण छान पडदे बनवून घर सजवायची फार हौस असते.
पिया आणि परागच्या लग्नाच्या बड्डे पार्टीसाठी पिया छान छान पडदे शिवायला देते.पण नेमके पार्टीच्या दोन दिवसाधी काहीही तयारी झालेली नसताना तीला ऑफिस कामानिमित्त बाहेरगावी जावे लागणार असते.पराग तीला आठवण करून देतो.गावी गेल्यावर सजावटीचं काम बाकी आहे हे विसरू नकोस..
गाण्यात कसं सांगेल पराग हे??
उत्तर (मानव,आदु,श्रध्दा)
परदेस जा के परदे सिया
भूल ना जाना पिया
मलाही कोडं वाचून लगेच आलं
मलाही कोडं वाचून लगेच आलं उत्तर. पण अर्थात आधीच दिलं होतं मानव, आदु आणि श्र नं.
या धाग्यावर २०० कोडी पूर्ण
या धाग्यावर २०० कोडी पूर्ण झाली की हा धागा थांबवूयात. मी नवा धागा काढून ठेवते.
मला अवघड कोडी घालताच येत
मला अवघड कोडी घालताच येत नाहीत बै..लग्गेच सगळे उत्तर सांगतात..
माझी एखादं ऑन म्युझिक स्टेशन
माझी एखादं ऑनलाईन म्युझिक स्टेशन तयार कर. ज्यात नॉन स्टॉप गाण्यांचे मुखडे (सुरवातीच्या दोन-चार ओळी म्हणजे मुखडाच ना?) ऐकु येतील फक्त, एक मुखडा झाला की पुढल्या गाण्याचा मुखडा.
ते ऐकून लोकांना कोडी सुचतील आणि देतील इथे.
प्रत्येकाला वेगवेगळ्या रँडम क्रमाने ऐकू यायला हवे मात्र.
हा हा मानव.
हा हा मानव.
हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/
ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year
मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.
७/१९२
७/१९२
करोनात टाळेबंदी लागली आणि तीत बंडूची नववी आणि दहावी कधी आली आणि गेली काही पत्ताच लागला नाही. होता होता अकरावी आली. अकरावी... अहाहा! कुणाच्याही जीवनात अकरावीतले पदार्पण म्हणजे खास खास खास असते. कॉलेज, कँटीन, कट्टा, बंकींग, प्रॅक्टिकल्स, जर्नल्स, .. या परवलीच्या शंब्दांच्या लडींनी नटलेल्या जादुई कॉलेजजीवनाची आस असलेली प्रचंड उत्सुकता ( उफ्फ!.. जरा जास्तच झालं का
). पण आता या करोनाने अगदी पायात बेड्या टाकलेल्या होत्या जणू! तरीही अकरावीच्या नुसत्या कल्पनेनेच बंडूच्या उरात शिरशिरी उठे! कारण अर्थातच बंडू आता - ऑनलाईन असला म्हणून काय झाले? - कॉलेजकुमार झाला होता. कुमारभारती जाऊन आता हातात युवाभारती आले होते. असो! ऑनलाईन कॉलेजजीवन सुरू होते आणि त्याबरोबर बंड्याचेही मंतरलेले दिवस सुरू होतात. बंड्या ते दिवस मनमुराद जगतोय. असे होता होता एक दिवस अपेक्षेप्रमाणे बंड्याच्या .. बंड्याच्या ... बंड्याच्या .... जीवनात आली ही स्वप्नसुंदरी! आणि अर्थातच त्यामुळे बंड्याचे होश उडाले! समोर कुणाशीही बोलता बोलता बंड्या अचानक ट्रान्स मध्ये गेल्यासारखं कराया लागलं. पोरगं असं अचानक आपल्यातच हरवाया लागलंय ह्यं त्याच्या बेरकी आयच्या नजरेतून सुटतं तर ती बंड्याची आय कसली! या ऑनलाईनच्या दुनियेत ह्यं यडं नेमकं कशानं झपाटलंय याचा छडा लावल्याशिवाय तिला झोप आली नसती! तिनं आपली सगळी गुप्तहेर सुत्रं बाहेर काढली आणि बंड्याच्या प्रत्येक नाक्यावर पद्धतशीरपणे आपली सेटींग लावली. अन् आता ह्य बंडूलं कुठं पळतंय बघू? म्हणून मनात खुदुखुदु हसू लागली. अपेक्षेप्रमाणे हा अवखळ ससा त्या अनुभवी माऊलीच्या फायरवॉलमध्ये अलगद येऊन पडला. हे उलगडताच सैरभैर झालेल्या बंड्याला काय बोलावे सुचेना. शेवटी त्याने आईला सगळे स्पष्ट सांगितले. माँ मुझे एक प्यार हो गया है! बंडू की माँ अर्थातच ये सब जान के हैरां हो गयी. उस ने तरह तरह से अपने बेटे को समझाने की कोशीश की कि बच्चा, अब्बी पढाई पे ध्यान दे! पण बंडूला अर्थात ते सगळे पटत नव्हते. मेरी माँ!!! तू का अशी करतेस? माझं एकच आणि पहिलंच प्रेम आहे! तुला का नको आहे हे?
गजाभाऊ, क्रमशः कादंबरी
गजाभाऊ, क्रमशः कादंबरी लिहिताय जणु!
(No subject)
थोडीशी हिंट द्या ना.
थोडीशी हिंट द्या ना.
कोडं गोष्ट भारी लिहिलीय
कोडं गोष्ट भारी लिहिलीय
माँ मुझे 'एक' प्यार हो गया है
माँ मुझे 'एक' प्यार हो गया है.. हे भारी आहे.
हिंट : आई नकारावर अडून बसली
हिंट : आई नकारावर अडून बसली आहे. आणि बंड्या गाण्यातून तिला कारण विचारतोय.
एक प्यार का नगं मां? हैय?
उत्तर : एक प्यार का नगं मां? हैय?
हे हैय म्हणजे आपण प्रश्न विचारल्यावर बोलतो ते प्रश्नार्थी 'हं?' - अमिताभच्या स्टाईलमध्ये.
कोडं हिंदी मराठीत आहे म्हणून उत्तर देखिल हिंदी मराठीत.
मामी, बरोब्बर!
मामी, बरोब्बर!
७/१९२
करोनात टाळेबंदी लागली आणि तीत बंडूची नववी आणि दहावी कधी आली आणि गेली काही पत्ताच लागला नाही. होता होता अकरावी आली. अकरावी... अहाहा! कुणाच्याही जीवनात अकरावीतले पदार्पण म्हणजे खास खास खास असते. कॉलेज, कँटीन, कट्टा, बंकींग, प्रॅक्टिकल्स, जर्नल्स, .. या परवलीच्या शंब्दांच्या लडींनी नटलेल्या जादुई कॉलेजजीवनाची आस असलेली प्रचंड उत्सुकता ( उफ्फ!.. जरा जास्तच झालं का
). पण आता या करोनाने अगदी पायात बेड्या टाकलेल्या होत्या जणू! तरीही अकरावीच्या नुसत्या कल्पनेनेच बंडूच्या उरात शिरशिरी उठे! कारण अर्थातच बंडू आता - ऑनलाईन असला म्हणून काय झाले? - कॉलेजकुमार झाला होता. कुमारभारती जाऊन आता हातात युवाभारती आले होते. असो! ऑनलाईन कॉलेजजीवन सुरू होते आणि त्याबरोबर बंड्याचेही मंतरलेले दिवस सुरू होतात. बंड्या ते दिवस मनमुराद जगतोय. असे होता होता एक दिवस अपेक्षेप्रमाणे बंड्याच्या .. बंड्याच्या ... बंड्याच्या .... जीवनात आली ही स्वप्नसुंदरी! आणि अर्थातच त्यामुळे बंड्याचे होश उडाले! समोर कुणाशीही बोलता बोलता बंड्या अचानक ट्रान्स मध्ये गेल्यासारखं कराया लागलं. पोरगं असं अचानक आपल्यातच हरवाया लागलंय ह्यं त्याच्या बेरकी आयच्या नजरेतून सुटतं तर ती बंड्याची आय कसली! या ऑनलाईनच्या दुनियेत ह्यं यडं नेमकं कशानं झपाटलंय याचा छडा लावल्याशिवाय तिला झोप आली नसती! तिनं आपली सगळी गुप्तहेर सुत्रं बाहेर काढली आणि बंड्याच्या प्रत्येक नाक्यावर पद्धतशीरपणे आपली सेटींग लावली. अन् आता ह्य बंडूलं कुठं पळतंय बघू? म्हणून मनात खुदुखुदु हसू लागली. अपेक्षेप्रमाणे हा अवखळ ससा त्या अनुभवी माऊलीच्या फायरवॉलमध्ये अलगद येऊन पडला. हे उलगडताच सैरभैर झालेल्या बंड्याला काय बोलावे सुचेना. शेवटी त्याने आईला सगळे स्पष्ट सांगितले. माँ मुझे एक प्यार हो गया है! बंडू की माँ अर्थातच ये सब जान के हैरां हो गयी. उस ने तरह तरह से अपने बेटे को समझाने की कोशीश की कि बच्चा, अब्बी पढाई पे ध्यान दे! पण बंडूला अर्थात ते सगळे पटत नव्हते. मेरी माँ!!! तू का अशी करतेस? माझं एकच आणि पहिलंच प्रेम आहे! तुला का नको आहे हे?
उत्तर : (मामी) : एक प्यार का नगं मा? हैय?
एक प्यार का नग़मा है
मौजो की रवानी है
माँ मुझे 'एक' प्यार हो गया है
माँ मुझे 'एक' प्यार हो गया है.. हे भारी आहे. >> माझंही लक्ष त्या एक प्यार वर गेलं. म्हटलं यावरून उत्तर असणार. त्यामुळे लगेच जिंजर.
7/193
7/193
मंजीतसिंग नावाचा एक देखणा हुशार तरूण होता. त्याच्या आईला त्याचा प्रचंड अभिमान होता. मंजीत लग्नाळू होता आणि त्याला शोभेल अशी मुलगी या पृथ्वीतलावर असेल की नाही अशी आईला काळजी होती.. तोच मंजीत आईसमोर तिची सून म्हणुन एकीला घेऊन आला, तेही रजिस्टर लग्न करूनच!! ती मुलगी आईच्या नजरेने अर्थातच मंजीतपेक्षा फारच डावी होती, हिच्यात माझ्या पोराने काय पाहिलं असावं असा प्रश्न तिला छळत होता.. त्याच्या या वेडपटपणाबद्दल तिला फार चीड येत होती.. नव्या सुनेचा अपमान करायची खुमखुमी येत होती.. पण मंजीतच्या लाडक्या बायकोला काही बोलायची सोय नव्हती.. मग तिला टोमणे मारून जरा मन हलकं व्हावं म्हणून ती आई सतत हे गाणं सुनेसमोर गुणगुणत असायची..
मेरा मन क्यूं तुम्हे चाहे
मेरा मन क्यूं तुम्हे चाहे
मेरा मन
???
माझी एखादं ऑनलाईन म्युझिक
माझी एखादं ऑनलाईन म्युझिक स्टेशन तयार कर >> मानव, "माँझी, नैय्या" वगैरे गाणी एकून मामीलाही माझी करून टाकले काय?
आता लक्षात आलं ते.
7/193
7/193
मंजीतसिंग नावाचा एक देखणा हुशार तरूण होता. त्याच्या आईला त्याचा प्रचंड अभिमान होता. मंजीत लग्नाळू होता आणि त्याला शोभेल अशी मुलगी या पृथ्वीतलावर असेल की नाही अशी आईला काळजी होती.. तोच मंजीत आईसमोर तिची सून म्हणुन एकीला घेऊन आला, तेही रजिस्टर लग्न करूनच!! ती मुलगी आईच्या नजरेने अर्थातच मंजीतपेक्षा फारच डावी होती, हिच्यात माझ्या पोराने काय पाहिलं असावं असा प्रश्न तिला छळत होता.. त्याच्या या वेडपटपणाबद्दल तिला फार चीड येत होती.. नव्या सुनेचा अपमान करायची खुमखुमी येत होती.. पण मंजीतच्या लाडक्या बायकोला काही बोलायची सोय नव्हती.. मग तिला टोमणे मारून जरा मन हलकं व्हावं म्हणून ती आई सतत हे गाणं सुनेसमोर गुणगुणत असायची..
उत्तर : (झिलमिल)
मेरा मन क्यू तुम्हे चाहे, मेरा मन
ना जाने जुड गया कैसे ये बंधन
कैसी ये दीवानगी, कैसा ये दीवानापन?!
७/१९४
७/१९४
'सुपर्ब मॅन' नावाची कंपनी पुरुषांचे विविध प्रकारचे कपडे बनवून विकायची. त्यासाठी विविध विभागाप्रमाणे, विक्री करण्यासाठी सेल्समन नेमले होते. एकदा मॅनेजरच्या लक्षात आले की, टाय, सॉक्स, रुमाल विभागाची विक्री अपेक्षेपेक्षा खूपच कमी होतेय. त्यासाठी सर्वांची मीटिंग घेतल्यानंतर, मॅनेजरच्या लक्षात आले की, काही सेल्समनचं विक्री कौशल्य कमी पडतंय.
मग त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली गेली. सेल्समनचे A आणि B असे २ गट तयार करण्यात आले. एका गजबजलेल्या रस्त्यावर विक्री करण्यासाठी दोन्ही गटांना सोडण्यात आलं. डाव्या बाजूला A आणि उजव्या बाजूला B गट. ३तासात ज्या गटाची विक्री जास्त होईल, त्यांना विशेष बक्षीस मिळणार होतं.
२ तासांनी , A गट जिंकतोय, असं दिसू लागले. B गटाचे सेल्समन विक्री वाढवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू लागले. त्यासाठी एक सेल्समन एका मोठ्या कारजवळ जाऊन विनंती करू लागला, " हाय, काहीतरी विकत घ्या ओ. समोरची टीम जिंकायला लागलीय."
हे तो कोणत्या गाण्यातून सांगेल?
Pages