मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. 
चला हे S चं कोडंही उलगडल्ं हे
चला हे S चं कोडंही उलगडल्ं हे फार उत्तम.
(No subject)
पेरू म्हणजे जाम हे मीही ऐकले
पेरू म्हणजे जाम हे मीही ऐकले आहे.
मग श्रद्धालाच कसं माहीत>>>
मग श्रद्धालाच कसं माहीत>>> त्यांना सगळं माहीत असतं<<<<<
'त्यांना' नको.... आठवत असलेली गाणी विसरायला होतील.
पेरू म्हणजे जाम हे वाचलंय/ऐकलंय आधी. नाहीतर बिचारी कोड्यातली म्हातारी भर रात्री बसस्टँडवर काय हिंदीतले एरवी पॉप्युलर असणारे वेगळे जाम विकायला आली असती?
पेरू म्हणजे जाम हे मला माहित
पेरू म्हणजे जाम हे मला माहित असले तरी गाणं नसतंच आलं.
७/१८9 सोपे
७/१८9 सोपे
ऍडम आणि इव्ह कपल असतात...इव्ह ला गाणे गायची आवड असते.. एकदा अखिल भारतीय टॅलेंट हंट स्पर्धा आयोजित केली जाते... इव्ह नाव नोंदणी करते आणि ऍडम ला देखील जबरदस्ती नाव नोंदवायला लावते...
स्पर्धा होते आणि आश्चर्य म्हणजे टॉप टू हेच दोघे होतात, आणि ऍडम पहिले बक्षीस जिंकतो .. एक मोठासा ग्लोब.. इव्ह फार जळते, तिला वाटते की हे तिला मिळायला हवे होता...
ती म्हणते की हे बक्षीस मला दे तसेही तुला कशाला हवे... मी तुला पप्पी देते ...
त्यावर ऍडम काय म्हणेल?
च्रप्स, आकडा कोपीपेस्टएडिट
च्रप्स, आकडा कोपीपेस्टएडिट केलेला कळतोय.
मैं दुनिया भुला दुँगा तेरी
मैं दुनिया भुला दुँगा तेरी चाहत में
च्रप्स, आकडा कोपीपेस्टएडिट
च्रप्स, आकडा कोपीपेस्टएडिट केलेला कळतोय
जुन्या कोड्याचा नंबर कॉपी करून त्यात एक ऍड केलाय...
>> हो
हरचंद नाही.. पण आता तुम्हाला
हरचंद नाही.. पण आता तुम्हाला पुढच्या अटेम्प्ट मध्ये जमेल बहुतेक...
हिंट - त्याला ते बक्षीस तिला
हिंट - त्याला ते बक्षीस तिला द्यायचे नाहीय...
एक तू ना मिला
एक तू ना मिला
सारी दुनिया मिली
छोड़ दे सारी दुनिया "किसी" के
छोड़ दे सारी दुनिया "किसी" के लिए
ये मुनासिब नहीं आदमी के लिए
किसी= किस चा बालकाळ
वॉव! मानव मस्त. कोडं भारी
वॉव! मानव मस्त. कोडं भारी होतं च्रप्स.
किसी म्हणजे किस करणारी स्त्री
किसी म्हणजे किस करणारी स्त्री असंही होईल.
किस चा बाल काळ!!
किस चा बाल काळ!!
एक सोप्पं कोडं
एक सोप्पं कोडं
७/१९०-
मेघनाने नुकताच इंटिरिअर डेकोरेशनचा कोर्स केला होता. त्यामुळे घरात तिचे नेहमी वेगवेगळे प्रयोग चालू असत. तिचा नवरा , तिला नाराज करायला नको म्हणून काही बोलत नसे.
एकदा मात्र, त्याची महत्त्वाची मीटिंग होती आणि तो तयारी करत होता. मेघना नेमकीच त्याच खोलीत खिडकी आणि पडद्यांचा लुक बदलण्याची खटपट करण होती. तिच्या त्या खडबड- खडबड आवाजाने, तिच्या नवऱ्याला त्रास होत होता. तेव्हा तिला थांबवण्यासाठी, तो कोणतं गाणं म्हणेल?
ये जो चिल्मन है
ये जो चिल्मन है
दुश्मन है हमारे
नाही मामी
नाही मामी
परदे में रहने दो पर्दा ना
परदे में रहने दो पर्दा ना उठाओ
परदे को रहने दो, परदा ना
.
होssssss, मेघा रे मेघा रे..
होssssss, मेघा रे मेघा रे..
मस्त कोडं माऊमैया.
मत परदे सजा रे...
बिंगो श्रद्धा
७/१९०-
७/१९०-
मेघनाने नुकताच इंटिरिअर डेकोरेशनचा कोर्स केला होता. त्यामुळे घरात तिचे नेहमी वेगवेगळे प्रयोग चालू असत. तिचा नवरा , तिला नाराज करायला नको म्हणून काही बोलत नसे.
एकदा मात्र, त्याची महत्त्वाची मीटिंग होती आणि तो तयारी करत होता. मेघना नेमकीच त्याच खोलीत खिडकी आणि पडद्यांचा लुक बदलण्याची खटपट करत होती. तिच्या त्या खडबड- खडबड आवाजाने, तिच्या नवऱ्याला त्रास होत होता. तेव्हा तिला थांबवण्यासाठी, तो कोणतं गाणं म्हणेल?
उत्तर : (श्रद्धा)
होssssss, मेघा रे मेघा रे..
मत परदे सजा रे...
७/१८9 सोपे
७/१८9 सोपे
ऍडम आणि इव्ह कपल असतात...इव्ह ला गाणे गायची आवड असते.. एकदा अखिल भारतीय टॅलेंट हंट स्पर्धा आयोजित केली जाते... इव्ह नाव नोंदणी करते आणि ऍडम ला देखील जबरदस्ती नाव नोंदवायला लावते...
स्पर्धा होते आणि आश्चर्य म्हणजे टॉप टू हेच दोघे होतात, आणि ऍडम पहिले बक्षीस जिंकतो .. एक मोठासा ग्लोब.. इव्ह फार जळते, तिला वाटते की हे तिला मिळायला हवे होता...
ती म्हणते की हे बक्षीस मला दे तसेही तुला कशाला हवे... मी तुला पप्पी देते ...
त्यावर ऍडम काय म्हणेल?
>>>
उत्तर -( मानव )
छोड दे सारी दुनिया(ग्लोब) "किस्सी" के लिये
ये मुनासीब नही आदमी के लिये...
छान कोडं आणि उत्तर, माऊमैया -
छान कोडं आणि उत्तर, माऊमैया - श्रद्धा.
होssssss, मेघा रे मेघा रे..
होssssss, मेघा रे मेघा रे..
मत परदे सजा रे... >> लै भारी माऊमैया आणि श्र
मस्त होतं हे!
मस्त होतं हे!
छान कोडं आणि उत्तर, माऊमैया -
छान कोडं आणि उत्तर, माऊमैया - श्रद्धा. >>>>>>>
खरंतर हे कोडं तयार झाल्यापासून, डोक्यात " परदे सजा रे " असंच येतंय गाणं. "परदेस जा रे" येतंच नाही तोंडात.
मस्त कोडे डिकोड माऊमैय्या,
मस्त कोडे डिकोड माऊमैय्या, श्र.
७/१९१
पिया ला पण छान पडदे बनवून घर सजवायची फार हौस असते.
पिया आणि परागच्या लग्नाच्या बड्डे पार्टीसाठी पिया छान छान पडदे शिवायला देते.पण नेमके पार्टीच्या दोन दिवसाधी काहीही तयारी झालेली नसताना तीला ऑफिस कामानिमित्त बाहेरगावी जावे लागणार असते.पराग तीला आठवण करून देतो.गावी गेल्यावर सजावटीचं काम बाकी आहे हे विसरू नकोस..
गाण्यात कसं सांगेल पराग हे??
Pages