समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.
हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.
मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.
यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.
वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?
३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.
एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.
आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.
सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘करोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.
गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.
बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.
लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................
म्हणजे b नुसार, अक्षम्य
म्हणजे b नुसार, अक्षम्य चुकीला माफी नाही, निष्काळजीपणाला आहे. c सिद्ध होणं अवघड आहे.
निष्काळजीपणाही अक्षम्य असू
निष्काळजीपणाही अक्षम्य असू शकतो की पण.
जिथे एखाद्या चुकीमुळे मृताचा
जिथे एखाद्या चुकीमुळे मृताचा अवमान होतो त्या चुकांबद्दल नक्कीच तक्रार करावी
(एका बातमीत बसचे चाक बाईम्च्या अंगावरुन गेले ऐवजी बसचे चालक बाईंच्या अंगावरुन गेले लिहीलं होतं.फेकत नाहीये.३ वर्षापूर्वीची बातमी होती चिंचवड च्या अपघाताची.)
+११
+११
थोडक्यात,
वृत्तपत्राचा निव्वळ (त्रयस्थ) ग्राहक म्हणून एखाद्या चुकीबद्दल दाद मागून फारसे काही हाती लागेल असे वाटत नाही.
परंतु, त्या चुकीमुळे थेट एखाद्याचे नुकसान झालेले सिद्ध करता येण्यासारखे असल्यास संबंधिताने तक्रार करावी.
त्यातून काहीतरी निष्पन्न होऊ शकेल.
नवीन आजाराचा शोध!
नवीन आजाराचा शोध!
ऑनलाईन आवृत्तीत जितक्या चुका
ऑनलाईन आवृत्तीत जितक्या चुका असतात तितक्या छापील वृत्तपत्रात नसतात. पैसे देऊन पेपर विकत घेणाऱ्या ग्राहकांचा विचार नक्कीच होत असणार. नेटवर वाचणाऱ्या फुकट्यांची फार पर्वा करण्याची आवश्यकता नाही अशी कदाचित त्यांची समजूत असेल. त्यांच्यासाठी हे तीन मुद्देः
१) हल्ली ऑनलाईन वाचून खूप लोकं मराठी शिकतात. त्यांना जर वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेले शब्द दिसले तर त्यांच्या शिकण्याच्या सवयीवर वाईट परिणाम होऊ शकतो. उदा. "नागरिक" आणि "नागरीक" असे दोन्ही पद्धतीने लिहिलेले शब्द जर आपण सतत वाचत राहिलो तर नक्की कोणता बरोबर हे सांगता येणार नाही. शब्द कसाही लिहिला तरी अर्थबोध होत आहे हे बरोबर पण त्यामुळे वाचनाची लय बिघडते. आणि आवड कमी झाली तर लोकांचे वाचन जवळपास थांबेल.
२) गुगलसारख्या मोठ्या कंपन्या हेच लेखन वापरून त्यांची मशिन लर्निंगची मॉडेल्स बनवतात. गुगल ट्रान्स्लेट, टेक्स्ट टू स्पिच असे इंग्रजीत ठीकठाक चालणारे तंत्रज्ञान इकडे आले की गंडते याचे कारण भाषेची क्लिष्टता यापेक्षा प्रमाण लेखनाची अनास्था हे आहे.
३) भाषेच्या बाबतीत "चलता है” अशी वृत्ती झाली की ती स्वभावात शिरण्याची शक्यता वाढते. नियमांचा आग्रह धरणाऱ्यांना आधी हसून मग दुर्लक्षित करता येते. "हम जहां खडे होते है लाईन वहां से शुरू होती है" असे काहीसे वाक्य हिंदी चित्रपटात आहे. त्या धर्तीवर "आम्ही बोलतो, लिहितो तीच मराठी. तिचा नीट अभ्यास करून तुमचे काय ते नियम बनवा.” अशी नम्र विनंती करता येते. भाषेचा संस्कृतीशी जवळचा संबंध आहे. भाषेच्या बाबतीत आम्ही गंभीर आहोत असे निदान दाखवता तरी आले पाहिजे.
छापील आवृत्तीचंही अर्थकारण
छापील आवृत्तीचंही अर्थकारण जाहिरातींवर जास्त अवलंबून असावं. आणि ग्राहक जितके जास्त तितक्या जाहिराती जास्त हे गणित ऑनलाइन आवृत्तीलाही लागू होईलच की!
शंतनु,
शंतनु,
+११११११
भाषेच्या बाबतीत "चलता है” अशी वृत्ती झाली की ती स्वभावात शिरण्याची शक्यता वाढते
>> अगदी !
शंतनु, सहमत आहे. फक्त आपली
शंतनु, सहमत आहे. फक्त आपली "चलता है" वृत्ती उपजतच असून तिचाच आविष्कार आपल्याला सर्वत्र पहायला मिळतो असे मला वाटते.
शंतनु, अगदीच परफेक्ट.
शंतनु, अगदीच परफेक्ट.
यावर काय करता येईल?
शुद्धलेखनाबाबत लिहीलेली मेल्स हे लोक इग्नोर करतात.
>>>वृत्तपत्राचा निव्वळ
>>>वृत्तपत्राचा निव्वळ (त्रयस्थ) ग्राहक म्हणून एखाद्या चुकीबद्दल दाद मागून फारसे काही हाती लागेल असे वाटत नाही.
>>> +११
म्हणजे प्रबोधनाने होत नाही आणि कायद्याने काही होण्याची शक्यता नाही,
असा हा प्रकार आहे.
अलीकडे त्र हे जोडाक्षर अस्त
अलीकडे त्र हे जोडाक्षर अस्त पावू लागलेले दिसते. त्र ऐवजी यं (मला ते अक्षर लिहिता येत नाहीय) वापरतात अनेक लोक.
ञ ना? या अक्षराला अचानक
ञ ना? या अक्षराला अचानक चांगले दिवस आले.
आधी फक्त नञ तत्पुरुष वगैरे लिहायला वापरलं जायचं.
हो अगदी! सुरुवातीला फार त्रास
हो अगदी! सुरुवातीला फार त्रास व्हायचा वाचताना. अनेकांना सांगून थकलो. पण हा त्र ऐवजी ञ लिहिण्याचा प्रकार वर्तमानपत्रातही चालू झाला आहे का?
वावे, नञ् ना?
वर्तमानपत्रात मी नाही वाचलेलं
वर्तमानपत्रात मी नाही वाचलेलं कधी त्र ऐवजी ञ. (अजून तरी)
नञ् असतं का? मला वाटलं नञ.
ते आता बघून बघून डोळे मेले
ते आता बघून बघून डोळे मेले आहेत
नञन मेले आहेत
नञन मेले आहेत
यञ तञ तेच दिसल्यावर आणि काय
यञ तञ तेच दिसल्यावर आणि काय होणार
हे पहा एबीपी माझा
हे पहा एबीपी माझा. चौदा तास गेल्यावरही यांना दुरुस्ती करायला वेळ नाही.

हे अक्षर कसे उमटवायचे ? टाईप
हे अक्षर कसे उमटवायचे ? टाईप कसे करायचे?
+१ मलाही जाणून घ्यायचे आहे ते
+१
मलाही जाणून घ्यायचे आहे ते
हे अक्षर कसे उमटवायचे ? टाईप
हे अक्षर कसे उमटवायचे ? टाईप कसे करायचे? > ????
चित्रावरून फुटनोट मध्ये
चित्रावरून फुटनोट मध्ये येईपर्यंत घोटाळ्यात 15 हजार-15 कोटींचा ,फरक पडला
ञ गुगल इंडीक की कीबोर्ड
ञ गुगल इंडीक कीबोर्ड मध्ये दुसऱ्या पानावर जायचे, तिथे सगळ्यात खालच्या ओळीत, मध्यभागी आहेत हे महाराज.
त्र आणि ञ दोन्ही आहेत गुगल
त्र आणि ञ दोन्ही आहेत गुगल इंडीक कीबोर्ड मध्ये. एकाच पानावर एकाच रांगेत एकाच ओळीत. दोघांच्या मध्ये चार अक्षरे आहेत.
प्रिंकाया चोप्रा आणि बरेच
प्रिंकाया चोप्रा आणि बरेच काही..
https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2517774/priyanka-c...
प्रिंकाया नाही, प्रिकांया
प्रिंकाया नाही, प्रिकांया
प्रिकांया हे उच्चारावं कसं?
प्रिकांया हे उच्चारावं कसं? (नारायण धारप स्टाईल मध्ये: "सामान्य मानवी जिभा तो भयंकर उच्चार करण्यासाठी बनलेल्या नव्हत्या")
वृत्तमाध्यमातील बेफिकिरीबद्दल
वृत्तमाध्यमातील बेफिकिरीबद्दल आतापर्यंत बरेच काही लिहून झाले आहे. एकंदरीत जालावरील देवनागरी लिखाणाबाबतच्या बेफिकिरीचे अजून एक उदाहरण देतो.
माझा एक छंद आहे. गाजलेली जुनी हिंदी गाणी मी अशाप्रकारे ऐकतो:
एका विंडोत मी LyricsIndia.net या संस्थळावरून त्याचे हिंदीतील शब्द समोर ठेवतो आणि दुसऱ्या विंडोत पार्श्वभूमीला तेच गाणे युट्युब वरून लावतो. शब्द समोर असल्याने ते गुणगुणायला खूप आनंद वाटतो. देवनागरीतून गाणी लिहिलेली पाहून सुरुवातीला मी या संस्थळावर खूश झालो.
पण अलीकडे दोन गाण्यांबाबत मात्र कटू अनुभव आला. गाण्यातील एखादा शब्द पूर्ण बदलणे, चुकीचा देणे वा शब्दांचा क्रम बदलणे असे काही प्रकार तिथे दिसून आले.
त्याने निश्चितच रसभंग होतो.
ञ
ञ
ञ ञा ञि ञी सापडलं.
गुगल इंडिक व र् ला ह जोडला की 'र्ह' होतं. कुर्हाड लिहिण्यासाठी मी Axe in marathi Google करते व ती कुर्हाड चिकटवते. लाकुडतोड्यापेक्षाही बेकार. तीच गत र्हस्व व र्हासची पण होते. आधी कुर्हाड शोधून ते 'कुर्हाड' करून ते 'र्ह' वापरून मग 'र्हास' करता येतो. शिवाय गुगल इंडिक वर' ँँ' चंद्र आहे, बिनटिंबांचा चंद्र नाही त्यामुळे उगाच 'बँटरी' होते.
सुपारीच्या बातमीवर मी विश्वास ठेवला असता, असेल बाबा हजारोकोटींचा व्यवहार आपल्याला काय माहिती असे समजून.
शंतनू ओक , प्रतिसाद आवडले.
स्वतःपुरते प्रयत्न असतात तरीही कधीतरी चुकते, चूक दुरुस्त करून व लक्षात ठेवून पुढे जाते.
Pages