समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.
हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.
मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.
यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.
वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?
३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.
एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.
आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.
सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘करोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.
गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.
बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.
लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................
आज सहयाद्रीच्या बातम्यांत हे
आज सहयाद्रीच्या बातम्यांत हे ऐकले:
"केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांनी एका परिषदेचे आभासी उदघाटन केले."
'आभासी उदघाटन ' हा प्रयोग कानाला बरोबर वाटत नाही.
त्यापेक्षा आधी असे ऐकले होते:
"….. दूरदृश्यप्रणाली द्वारा उदघाटन केले"
हे अधिक बरे वाटते.
वरील दोन्हीत काही फरक असावा का ?
ख-या जगात प्रत्यक्ष न जाता
ख-या जगात प्रत्यक्ष न जाता केले म्हणुन ते आभासी.
उद्घाटनाची प्रतिकात्मक क्रिया आभासी (virtual) केली आहे. खरी नाही.
हे बरोबर वाटते.
प्रतिकात्मक हा शब्द जास्त
प्रतिकात्मक हा शब्द जास्त योग्य वाटला असता, पण आभासी चालू शकेल, हे मा वै म.
उद्घाटन खरोखरच झालं ना पण.
उद्घाटन खरोखरच झालं ना पण. म्हणजे परिषद खरोखरच सुरू झाली. भले ती ऑनलाइन असेल. परिषद आणि उद्घाटन दोन्ही आभासी नाही म्हणता येणार असं मला वाटतं.
वावे सहमत. ऑनलाईन परिषद,
वावे सहमत. ऑनलाईन परिषद, शॉपिंग यांना आभासी नाही म्हणता येणार.
आता
आता
दूरदृश्यप्रणाली द्वारा व
प्रतिकात्मक
यात काय फरक राहील ?
उद्घाटन खरेच झाले.
उद्घाटन खरेच झाले.
पण फित कापणे किंवा पडदा सरकवणे ही प्रत्यक्ष क्रिया कुठे झाली?
ती क्रिया खरोखर प्रत्येक्ष न होता आभासी झाली ना?
उद्घाटन करणाऱ्यांसाठी ते करणं
उद्घाटन करणाऱ्यांसाठी ते करणं हा आभास होता. प्रत्यक्ष उद्घाटन वेगळ्या ठिकाणी झालं. आता त्यांनी ते कुठल्यातरी प्रणालीवर 'बघितलं' म्हणजे त्याला 'प्रत्यक्ष' म्हणता येईल का?
जर परिषद प्रत्यक्ष कुठेतरी
जर परिषद प्रत्यक्ष कुठेतरी जमून होत आहे आणि यांनी मात्र तिथे न जाता व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे उद्घाटन केले असेल, तर ते आभासी म्हणता येईल.
यांनी मात्र तिथे न जाता
यांनी मात्र तिथे न जाता व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे उद्घाटन केले असेल, तर ते आभासी म्हणता येईल >> हो. मला वाटलं की असंच झालं म्हणून. वरील उदाहरणात नक्की कसं झालं उद्घाटन?
ह पा
ह पा
मी बातमी सकाळी माझे आवरताना ऐकली
सविस्तर माहिती नाही
गेले पूर्ण वर्षभर सह्याद्री
गेले पूर्ण वर्षभर सह्याद्री "दूरदृश्यप्रणाली द्वारा " असे वापरत आहे.
आज प्रथमच मी 'आभासी' ऐकले
म्हणून कुतूहल वाटले
आभासी मलाही चुकीचं वाटतं
आभासी मलाही चुकीचं वाटतं ऐकायला. त्या उद्घाटनकर्त्यांना उद्घाटन केल्याचे हॅल्युसिनेशन झाले असे काही वाटते वाचून.
साधा 'व्हिडीओ कॉल द्वारा' शब्द ओके वाटेल. (मराठी नाही पण त्यातल्या त्यात जास्त वापराचा.)
फीत कापणे किंवा पडदा सरकवणे
फीत कापणे किंवा पडदा सरकवणे या क्रिया झाल्या नसतील, पण समजा 'क्लिक ' केलं असेल. फीत कापणे हाही संकेतच आणि आता क्लिक करणे हाही संकेतच.
वृक्षारोपण कार्यक्रम असेल आणि खरोखर रोप लावलं तर ते खरं उद्घाटन. नुसतीच एक कुदळ मारली तर तोही एक संकेतच की.
उद्घाटन केल्याचे हॅल्युसिनेशन
उद्घाटन केल्याचे हॅल्युसिनेशन >>> मी-अनु, खूप हसू आले.
आभासी म्हणजे खोटं खर्यासारखे वाटणे ना. उद्घाटन तर खरे आहे. फीत कापण्याची अॅक्शन खोटी आहे (ऑनलाईन) पण म्हणून कार्यक्रम आभासी नाही. म्हणून आभासी म्हणता येणार नाही. सरळ ऑनलाईन उद्घाटन म्हटले तरी चालले असते.
"सहा केंद्रीय मंत्र्यांसह १२
"सहा केंद्रीय मंत्र्यांसह १२ मंत्र्यांना वगळण्यात आले असले…."
https://www.loksatta.com/desh-videsh-news/modi-cabinet-expansion-home-mi...
….
राज्यमंत्री सुदधा केंद्रीयच होते ना !
कॅबिनेट म्हटलं पाहिजे.
कॅबिनेट म्हटलं पाहिजे.
इंग्रजीमध्ये व्हर्चुअल हा
इंग्रजीमध्ये व्हर्चुअल हा शब्द तसा 'सत्य' परिस्थिती नाहीच दाखवत. परंतु व्हर्चुअल रिअॅलिटी ह्या संकल्पनेची इतकी सवय होऊन गेली आहे की प्रत्यक्ष न करता संगणकाच्या साहाय्याने परोक्ष केलेल्या कृती व्हर्चुअल म्हणून गणल्या जाणं अंगवळणी पडलं आहे. मराठीत हे विषय फारसे कुठे अभ्यासले/बोलले/लिहिले/वाचले न गेल्यामुळे व्हर्चुअल रिअॅलिटीला कुठला शब्द वापरायचा इथपासून सुरुवात आहे. इथे आभासी शब्द आपल्या माहिती असलेल्या अर्थाशी तंतोतंत न जुळल्यामुळे खटकतो. पण तसा जुळायलाच पाहिजे असं नाही. मूळ संकल्पना कुठून आली, ते बघायला पाहिजे. त्याच्या आनुषंगिक गोष्टींत आभासी हाच शब्द आल्यास वावडे वाटावयास नको. सध्या हा शब्द फारसा वापरात नसल्यामुळे (आणि मूळ संकल्पना मराठीत कधी चर्चेत न आल्यामुळे) वावडे वाटू शकते, त्यामुळे वरती अनेकांनी घेतलेले आक्षेप समजू शकतो.
हे एक वाचनीय आहे. व्हॉट्सअपवर
हे एक वाचनीय आहे. व्हॉट्सअपवर फिरत आहे.
अ ने
अ ने
हे कात्रण या मागच्या पानावर येऊन गेले आहे.
तो बिचारा तिथं जीवन
तो बिचारा तिथं जीवन-मृत्यूच्या सीमेवर लटकतो आहे आणि यांनी "चक्क" शब्द वापरून जसे काय जादुचे प्रयोग सुरु होते असा थम्बनेल टाकला आहे. असंवेदनशीलतेचा कळस ! (साभार :टीव्ही९ मराठी)

कार्यकारणभाव शब्दातल्या कार्य
कार्यकारणभाव शब्दातल्या कार्य आणि कारणाचे अद्वैत साधले गेले!
वावे, अशक्य भयंकर आहे हे
वावे, अशक्य भयंकर आहे हे
जिद्दु, हो ना. 'चक्क' पाण्यात अडकला म्हणजे हवेत अडकणे हा कॉमन प्रकार आणि 'काय आश्चर्य! पाण्यात अडकला' अश्या सुरात लिहीलेय.
अनु
अनु
@जिद्दु, पुढे काय झालं ? सुटला ना तो मुलगा?
लोकसत्तातल्या मी अधोरेखित केलेल्या वाक्याच्या वरचं वाक्यही असंच अर्थहीन आहे. 'दोन्ही राज्यांत रुग्ण आढळले होते' याला काय अर्थ आहे? जास्त संख्येने रुग्ण आढळले होते असं म्हटलं तर त्याला अर्थ आहे.
वावे, काही कल्पना नाही पण
वावे, काही कल्पना नाही पण सुटला असावा. ही ती बातमी -
https://youtu.be/ousL7yKHrnE
लोकसत्ताने/मटाने चक्क बातमी
लोकसत्ताने/मटाने चक्क बातमी चुकीची लिहिली - हे वाचल्यावर जसं वाटेल, तसं वाटतंय 'पुरात चक्क पाण्यात पडला' हे वाचून. 'चक्क' काय आहे त्यात!
https://www.esakal.com/blog
https://www.esakal.com/blog/know-all-about-nilu-phule-marathi-the-real-m...
इथली ही वाक्ये :
निळूभाऊ म्हणायचे, "सत्तेवर असणाऱ्या माणसावर मुजोरपणा स्वर होतो......
मला कष्ट करण्याऱ्या माणसाचे आयुष्य, त्याची गस्त रोज दिसत असे.
...
ठळक केलेल्या दोन्ही शब्दात तशी वरवरची चूक आहे पण त्यामुळे किती अर्थहानी होते.
'गस्त' या शब्दाचे सर्व अर्थ मी पाहिले. त्यांना अपेक्षित असलेला अर्थ नाही.
ते 'ग्रस्त'च अपेक्षित असावे.
ओढगस्त असा शब्द बरोबर आहे की
ओढगस्त असा शब्द बरोबर आहे की ओढग्रस्त? ओढगस्तही बरोबर असेल तर तसं म्हणायचं असेल.
'स्वर' वाचून सत्तेवर असणारा
'स्वर' वाचून सत्तेवर असणारा पण भाषण देण्याऐवजी गाणे गाणारा गायक नजरेसमोर आला व 'गस्त' वाचून येरझाऱ्या घालणाऱ्या वॉचमनकडे बघून हे वाक्य लिहिले आहे असे वाटले.
(No subject)
Pages