लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by हेमंतकुमार on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही चांगल्याची दखल घेतो.

बाळाच्या रडण्यासंबंधी ‘ट्याहां’ हा शब्द बातम्यांमध्ये अचूक लिहिला जावा यासाठी एका जनसंपर्क अधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्या संबंधी एक रोचक लेख :

https://www.aksharnama.com/client/article_detail/5313

IMG-20210717-WA0009.jpg

प्रति १००० लिहून शिवाय टक्के का? टक्के म्हणजे प्रतिशत.
प्रति १००० जर १.१७ असेल तर ते ०.११७ टक्के होतील.
(खरे आकडे बघितले तर ते प्रति १००० च आहेत, टक्के नाहीत)

Screenshot_20210717-185405_Chrome.jpg

शीर्षक वाचून आपल्याला वाटतं की आता बँका सलग पाच दिवस बंद रहाणार. मग त्या खाली वाचलं की आपल्याला वाटतं, की देशभर नाही पण काही राज्यांमध्ये बँका सलग पाच दिवस बंद असणार. बरोबर?
मग त्या बातमी मध्ये आधी इकडचे तिकडचे पाल्हाळ लावल्यावर खाली दिलेली माहिती वाचून कळतं की कुठेच सलग पाच दिवस बँका बंद नाहीत, काही ठिकाणी सलग फक्त दोन दिवसच बंद आहेत.

Screenshot_20210717-185425_Chrome.jpg

मानव
बरोबर मागच्या वर्षी अशीच गोंधळात टाकणारी बँकांची बातमी आलेली होती.
बहुतेक मी ती धाग्यावर दिली होती.
दरवर्षी तेच.....

InkedFirefox_Screenshot_2021-07-17T13-38-14.743Z_LI
स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर लगेच ज्या घोषणा विधानसभेत केल्या गेल्या त्यात बोर्डाच्या सदस्यांची रिक्तपदे जुलै अखेर भरण्याची घोषणा केली गेली. सगळ्या चॅनेल आणि वाहिन्यांनी तेच फिरवले फक्त सदस्यांच्या जागा जुलै अखेर भरणार असून भरतीच्या जागा नाही हे सांगायला बहुतेक सोयीस्करपणे विसरले. इकडं पोरं सगळी दोन बोटं जमिनीच्यावर हवेत चालायला सुरु झालती Lol

डॉ कुमार, तुम्ही दिलेल्या बातमीत या महिन्यात बँक अमुक दिवस बंद असे होते. आणि मग लक्षात येते की त्यात शनिवार रविवार धरले आहेत, काही राष्ट्रीय सुट्या आहेत तर काही फक्त थोड्याच राज्यात सुट्या आहेत. ती ही दिशाभूलच होती.

पण या बातमी मध्ये "सलग पाच दिवस बंद" असे स्पष्ट शीर्षक दिलेय.

+११ Bw
...
रच्याकने...
एक जुलै २०२१ ला या धाग्याला एक वर्षे पूर्ण झाल्याचे आत्ताच लक्षात आले .
धागा वर्षभर सलग चालू ठेवल्याबद्दल सर्व सहभागी सभासदांचे मनापासून आभार !

माझे वडिल बँक ऑफ महाराष्ट्र मधून निवृत्त झाले आहेत . ते नेहमी सांगतात की वृत्तपत्रात बँकांच्या चुकीच्या सुट्ट्यांच्या बातम्या छापल्यामुळे बँकेत विनाकारण गर्दी होते आणि ज्येष्ठ नागरिक त्यात खूप संख्येने असतात.
वृत्तपत्रातील छापील बातमीवर अजुनही बर्याच ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास असतो. पण प्रत्येक ग्राहकाला उत्तर द्यावेच लागते. बँकेत काम करणारी लोक किती सुट्ट्या घेतात ही बोलणी पण खावी लागतात.

सध्याच्या बहुचर्चित खास विषयावर चित्रमय बातमी तर जोरदार केली आहे. पण महत्त्वाचे शब्द बघा कसे टंकलेत :

• पतीने आपल्याला भेट म्हणून दोन साइट छोट्या आकाराची ब्रा गिफ्ट केल्याने आपल्याला घटस्फोट हवा
• असा अरोप या महिलेने केला.

https://www.loksatta.com/photos/trending-gallery/2534255/beau-gifted-lin...

IMG_20210719_220720.jpg

नक्की काय--जेवायचं,acting करायची की विसवास करायचा(ठेवायचा नाही हा विसवास करायचा)???

आपल्या शरीरातून वीस प्रकारचे वास येत असतात.
सतत उपास केला अजिबात काहीही न खाता फक्त पाणी पिऊन तर वीस दिवसात हे सगळे वास निघून जातात.
तेव्हा जेवायचं आणि वीसही वास येताहेत अशी ऍक्टिंग करायची मग काही तासातच ते खरंच परत येतात.

कळलं?

काल लोकसत्ता मध्ये मुंबई पावसाचे वृत्त होते त्यात सायन्स स्टेश न ट्रॅक पाण्या खाली आसे लिहिले होते.

आजच्या 'हिंदू' मध्ये राज कुंद्रा अटकेची बातमी देताना 'पर्सनल असिस्टंट उमेश कामत' ऐवजी चक्क 'ॲक्टर' उमेश कामत म्हटलंय Uhoh

IMG-20210721-WA0000.jpg

फेसबुकावर 'उसंडु आणि मुरावि' नावाचा समूह आहे. (उपसंपादकांच्या डुलक्या आणि मुद्राराक्षसाचा विनोद). त्यात आढळलेली काही निवडक रत्ने -
१. 'राधानगरी'च्या सर्व्हीस गेटचे ऑटोमायझेशन (शेवटच्या शब्दाचा अर्थ - पदार्थाच्या द्रव अवस्थेपासून त्याला मुक्त वायुरूप अणूच्या अवस्थेत बदलणे - कदाचित अभियांत्रिकी केलेल्यांना माहीत असावा.) - सकाळ, कोल्हापूर, १८/७/२१
२. देवीच्या मंदिरात स्त्री जातीचे अभ्रक आढळल्याने खळबळ - (वृत्तपत्र माहीत नाही) - ९/७/२१
३. व्हॉट्सअ‍ॅपवरील 'मधाळ जाळे' घातक (लोकसत्ता, ७/७/२१)
४. लोकमतच्या एका बातमीमध्ये शीर्षक आहे दत्तमंदिराच्या १२३व्या स्थापनादिनाबद्दल आणि बातमीत शेवटच्या ओळीत 'या वेळी खासदार अ‍ॅड वंदना चव्हाण, ....... (भली मोठी नावांची यादी आहे) ..... यांनी अंत्यसंस्कार केले' असं छापलं आहे.

Pages