समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.
हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.
मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.
यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.
वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?
३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.
एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.
आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.
सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘करोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.
गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.
बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.
लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................
.
.
वाचल्यावर आधी कळलंच नाही,मग
वाचल्यावर आधी कळलंच नाही,मग लक्षात आलं,स्वल्पविरामाचे महत्त्व
सगळ्या बातमीचा अर्थच उलटा केला या लोकांनी.
खर्च कमी व्हावा म्हणून खूप ठिकाणी पालक अल्पवयीन मुलींची लग्ने लावून देत आहेत अशा अर्थाची बातमी आहे.
हसावे की रडावे कॅटेगरीतली
हसावे की रडावे कॅटेगरीतली अजून एक बातमी
'तज्ञ' वगैरे शब्दांकडे तर आता दुर्लक्षच करणं अपेक्षित आहे बहुतेक!
व आणि क ची अदलाबदल.
व आणि क ची अदलाबदल.

बातमी लिहिणाऱ्याला तो तो अभंग
बातमी लिहिणाऱ्याला तो तो अभंग " तो हा विठ्ठल बरं का, तो हा माधव बरं का" असा ऐकु येत असेल आणि तसेच तो ENT स्पेशालिस्ट असावा.
विठ्ठल बरं का
किठ्ठल बरं का

आणि माधक बरं का
मीअनु, चावट आहेस. प्रत्येक क
मीअनु, चावट आहेस. प्रत्येक क व व शोधावा लागला.
यक्क्क!! "मालिकेच्या नाकातून"
यक्क्क!! "मालिकेच्या नाकातून" छापलं...
त्यांचा अल्गोरिदम कळला का?
त्यांचा अल्गोरिदम कळला का? क्वोटस मधले असले तर 'व' इम्युन असतात. त्यांचे क होत नाहीत
बरोबर, काय निरीक्षण आहे!
बरोबर, काय निरीक्षण आहे!
एका क चा ही व केलाय बरं का. क चे वेटेज ०.५ आहे, व चे १.०
दोन क केले की त्याला नलिफाय करायला एक व पुरतो.
अगागा खतरनाक.
अगागा
खतरनाक.
All online plus size fashion?
All online plus size fashion?! For Mukta?
फॉर बातमी वाचक
फॉर बातमी वाचक
तो हा विठ्ठल बरं का, तो हा
तो हा विठ्ठल बरं का, तो हा माधव बरं का >>
कुमार अगदी उत्तम रीतीने
कुमार अगदी उत्तम रीतीने तुम्ही प्रकाशकांची आणि लेखकाची घोडचूक दाखवून दिली आणि ती चूक त्यांनी सुधारावी म्हणून प्रयत्नसुद्धा केले.खरच हे प्रशंसनीय आहे नाही तर बरेच वाचक कळून सुद्धा वळत नाही!
एक जागरूक वाचक हा लेखकाचा तर विशेष गुण आणि तो तुमच्याकडे आहे अभिनंदन त्याकरीता आपले!
भाषेला पायात गिरकी करुन फुशारकी मारण्याची वाईट खोड फार महाभागात दिसून येते पण त्याला बंध घालण्याचे कसब हे जागरुक वाचकांत असायला हवे.
आपले अनुभव आपण यापुढेही वाचकांसमो मांडत राहा!
पुलेशु
चंद्रमा,
चंद्रमा,
आपण आस्थेने जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनापासून आभारी आहे !
अशा प्रतिसादामुळेच या प्रकारचे काम करण्याचा हुरूप टिकून राहतो.
आजचा लोकसत्ता - यांना 'मुरूम'
आजच्या लोकसत्तामधली जाहीरात - यांना 'मुरूम' शब्द माहित नसावा
काय हे.
काय हे.
अन्य भाषीय शब्द वापरायचा आहे तर पिंपल्स वापरा थेट. धातूसाधिताची मोडतोड तरी करावी लागणार नाही.
मुहास्य तुझे मनासी मोही, जशी
मुहास्य तुझे मनासी मोही, जशी न मोही सुधा सुरां....
सीमंतिनी
सीमंतिनी
मुहास्य तुझे मनासी मोही >>
मुहास्य तुझे मनासी मोही >> अगदी हेच म्हणणार होतो. रॅदर, सनासी मोही असं म्हणणार होतो. दि टोटल नंबर ऑफ म् अँड स् शुड बी कॉन्झर्व्हड्.
बातमी खिन्न करणारी आहेच.
बातमी खिन्न करणारी आहेच.
त्यातल्या चुका अजून जास्त खिन्न करतायत.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/family-has-been-on-hunger-for-...
अनु, सहमत.
अनु, सहमत.
......
या धाग्यावर मौलिक सूचना करणाऱ्या सर्वांना आवडेल असा एक लेख आजच्या छापील सकाळ मध्ये संपादकीय पानावर आहे.
‘मराठीच्या व्रतस्थ अभ्यासक’ हा यास्मिन शेख यांच्यावरील गौरव लेख आहे.
२१ जूनला त्या वयाची ९६ वर्षे पुरी करणार आहेत. त्यांना आपल्या सर्वांतर्फे ‘शतायुषी व्हा !’ अशा शुभेच्छा देतो आणि वंदन करतो.
या लेखातील एकच वाक्य उद्धृत करतो :
“आजही कुठे मराठीतली चूक दिसली की कुणीतरी अंगावर ओरखडा काढल्यासारखे दुःख त्यांना होते”.
अंतर्नाद मासिकाने त्यांना 23 वर्षे मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून नेमले होते ही विशेष नोंद करतो.
फारच योग्य वाक्य.
फारच योग्य वाक्य.
फारच योग्य वाक्य.
फारच योग्य वाक्य.
यास्मिन शेख ह्यांच्या
यास्मिन शेख ह्यांच्या कार्याला सलाम!
बाकी ते संपादकीय पान उघडेपर्यंत बरेच ओरखडे अंगावर झेलत जावं लागलं असेल. छापील आवृत्ती असल्यामुळे जरा कमी.
मथळा वाचून माझा समज झाला की
मथळा वाचून माझा समज झाला की गाडी चारशे फूट खाली कोसळली, मग झाडाला अडकली आणि सगळे वाचले. प्रत्यक्षात चारशे फूट खोल 'कोसळली असती' अशी बातमी आहे.
हा प्रचंड अनर्थ आहे अर्थाचा
हा प्रचंड अनर्थ आहे अर्थाचा.मला पण तेच वाटलं.
पसरणी घाटात इतके अपघात होत आहेत. प्रत्येक वेळी गाड्या ४००-५०० फूट कोसळतात. इथे एक दणकट संरक्षक भिंत वगैरे बांधता येईल का?
तो दापोली अॅग्रीकल्चर स्टाफ चा अपघात इथलाच ना?
हो. फार भयंकर अपघात होता तो.
हो. फार भयंकर अपघात होता तो.
तो दापोली अॅग्रीकल्चर स्टाफ
तो दापोली अॅग्रीकल्चर स्टाफ चा अपघात इथलाच ना? > त्या प्रकरणाचे काय झाले पुढे. एकच इसम चमत्कारिकरीत्या वाचला ज्यावरच संशयाची सुई फिरत होती.
Pages