क्रिकेट - ६

Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05

क्रिकेटवरील पहिले पाच धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

https://www.maayboli.com/node/67443

भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.

Group content visibility: 
Use group defaults

छानच खेळताहेत !
तो साऊदी मिडल व मिडल-लेग स्टंपवरून काय अफलातून आऊटसविंग बाहेर काढतो !
!

अर्धशतकी सलामीनंतर न्यूझीलंडने दोघांना आत धाडले
मस्त होणार हा कसोटी सामना जर पावसाने किमान ३५० ओवर होऊ दिला तर

सांघिक खेळ आहे नी कसोटीत गोलंदाज़ी पाहण्यात जी मजा आहे ती फलंदाजीत नाही... >>>>> कसोटीत गोलंदाजांनी २० विकेट घेतल्याशिवाय जिंकता येत नाहीत, म्हणून तिथे परीस्थितीही गोलंदाजांना पोषक असते आणि गोलंदाजही दर्जेदारच असतात. पण म्हणून याच कारणासाठी तिथे फलंदाजीही बघायला मजा येते. जोपर्यंत ते बॅट आणि बॉलचे काँटेस्ट होत नाही तोपर्यंत कशी मजा येईल.

30 च्या आसपास आऊट होतात नेहमी. >>>>> या कंडीशन्सला मस्त बॉलिंग अटेक आहे न्यूझेडचा. ते पाहता सलामी अपयशी ठरली असे नाही म्हणता येणार. कंडीशन अश्या आहेत की तुम्ही सेट झालात आता रन्स येतील असे ईथे म्हणू शकत नाही. उलट तेव्हा गाफील न राहता टेंपरामेम्ट जास्त दाखवायची गरज असते. त्या जेमिन्सनच्या पहिल्या ५ ओवर गिल खेळला. मग शर्मा पहिलाच बॉल खेळला त्यात बाद झाला. वॅगनर आला बॉलिंगला गिल गेला.
आपला गेल्या काही वर्षातील सेना देशातील सलामीचा रेकॉर्ड पाहिला तर दारूण सापडेल. किंबहुना माझ्या जन्मापासून सेहवाग वगळता कोण आहे दुसरा सलामीवीर हे आठवावे लागेल. एक मुरली विजय मधला थोडा काळ स्थिरावलेला. न्यूझीलंड गाजवलेला गंभीरही ईंग्लंडमुळे बाहेर पडलेला. सलामीला नुसती संगीतखुर्ची चालू होते आपली परदेशात जाताच. कोणी मिडल ऑर्डर वा तिसर्‍या क्रमांकाचा फलंदाजही पुढे येऊन सलामीची जबाबदारी घेतोय असे दिसले नाही. त्यामुळे आज बाद होईपर्यंत दोघे आश्वासक खेळत होते हिच जमेची बाजू आहे. टोटल सहा कसोटी खेळायच्या आहेत ना ईंग्लंडला, सलामीवीरांची मानसिक दमछाक आहे इथे हे नक्की.

*ते पाहता सलामी अपयशी ठरली असे नाही म्हणता येणार * -+1. उलट, 60+ ची सलामीची भागीदारी आश्वासकच महणायला हवी. आज बाहेरचे चेंडू संयमपूर्वक सोडताना आपल्या फलंदाजांना पहाणं हेच दुर्मिळ दृश्य होतं !

*१९९-७ ते ३४४-८ करून सामना अनिर्णित राखला.* - खरंच कौतुकास्पद !
*दोघांचंही फूटवर्क परफेक्ट होतं.* +1. सर्वच फलंदाज या कसोटीसाठी आपल्या तंत्राबाबत खास विचार करून व स्वतःच्या शैलीशी सुसंगत पण योग्य ते बदल करूनच आले असावेत, असं जाणवतं.

217 ! सामना ' लो स्कोअरींग' होणार अशी चिन्ह॔ आहेतच. बघूं न्यूझीलंडला किती कमी स्कोअरवर रोखतात आपले गोलंदाज. दुसर्या डावात आपल्याला फिरकी गोलंदाजीचा फायदा आहे, हें लक्षात घेवूनच न्यूझीलंडला स्कोअर उभा करावा लागणार आहे.

भारताने चांगली बॉलिंग केली आणि किवी फलंदाज टिच्चून खेळले. गेम ऑफ पेशन्स आहे. भारताचा स्कोअर ३०० च्या आसपास हवा होता. उद्या कुणीतरी २-३ झटपट विकेट्स काढून किवीजवर दबाव टाकायला हवा.

*गेम ऑफ पेशन्स आहे. * +1. व दोन्ही संघ हें जाणूनच खेळ करताहेत. हा सामना कसोटी खेळाची कस लावणाराच व रंगतदार होण्याची लक्षणं तर दिसताहेत.

पावसाच्या सततच्या व्यतयामूळे तीन सामने असायला हवे होते ह्याबद्दल माझे मस्त अधिक बायस्ड झाले आहे. एक दोन इंटरर्प्शन ठीक आहेत पण इथे जरा अति झालय. दुसर्‍या दिवशी पिच ईज होण्याऐवजी अधिक सीम होत होते.

आता दोनच दिवस राहिलेत. आता एकच टीम आता जिंकू शकते, पूर्ण खेळ झाला तर . ती टीम आपली नाही दुर्दैवाने.
पण एकंदरीत जरी सामना पूर्ण दोन दिवस झाला तरी आपण अनिर्णित राखू शकू. पण नीट खेळून आडीच तीन सेशन टिकावे लागेल.
न्युझीलंडला जिंकायच असेल तर आज चहापानाला डाव घोषीत करावा लागेल. ५० - ६० ची आघाडी घेऊन.
अपुर्‍या प्रकाशामुळे पूर्ण वेळ खेळ होइल असे नाही.

एकंदरीतच चुकिच्या नियोजनामुळे खरा अंतीम सामना झालाच नाही.

जर अंतिम सामना एकच खेळवायचा होता आणि ईंग्लंडच्या पावसातच खेळवायचा होता, तर त्यासाठी ठेवलेला राखीव दिवस एकच का? दोन का नाही? तीन का नाही?
किंबहुना ९० x ५ = ४५० ओवर्स संपेपर्यंत खेळवायचे होते.

मी cricbuzz आणि ckicinfo वर मॅॅच फालो करतो आहे. बुमरा १४०+ वेगाने बॉलिंग करत होता. तेव्हा एकाच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा चेंडू स्विंग होता तर दुसऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे तो सीम होत होता.१४०+ and स्विंग ! ग्रेट!

135-5 !!
*आता एकच टीम आता जिंकू शकते, * आतां?

बुमरा १४०+ वेगाने बॉलिंग करत होता. तेव्हा एकाच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा चेंडू स्विंग होता तर दुसऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे तो सीम होत होता.१४०+ and स्विंग ! ग्रेट! >> काल डेल स्टेन चे कॉमेंट्स ऐकले ह्याबद्दल नि त्याच्या मते दोन्ही बर्‍यापैकी सब्जेक्टिव्ह टर्म्स आहेत नि इंतरचेंजेबली वापरल्या जातात कोणाशी नि जगातल्या कुठल्या भागात बोलता आहात त्याप्रमाणे. जनरली स्विंग बॉलर सीम बॉलर पेक्षा कमी पेसी असतो ज्यामूळे बॉल स्वर्व्ह व्हायला अधिक संधी मिळते. १४० पेक्षा अधिक वेग असेल तर होणार सिवंग ( रिव्हर्स नाही) स्विंग बॉलर कडून होणार्‍या स्विंग पेक्षा वेगळ्या प्रकारचा असतो - ग्रिप, ओरीएंटेशन थोडेसे वेगळे असावे लागते नि मनगटाची पोझीशन कमी मह्त्वाचे ठरते.

रोहितचे टेस्ट ओपनिंगचे दिवस आता तरी संपले असतील अशी आशा. अतिशय वाईट वेळेस अश्या वाईट प्रकारे सेट ओपनर आऊट होतो. Sad

रोहित आऊट व्हायच्या आधी २-३ ओव्हर्सपासून त्याचा फोकस निसटत चालला होता. १-२ फॉल्स शॉट्स खेळला, १-२ वेळा ऑफच्या बाहेरचा बॉल चेस केला. तेव्हाच शंकेची पाल मनात चुकचुकली होती. श्या! अगदीच चुकीच्या वेळी आऊट झाला. शेवटच्या अर्ध्या तासात न्युझिलंडकडे पारडं थोडं झुकलं. गिल ला सुद्धा टेंपरामेंट वर काम करायला हवं. बॉलच्या रेषेत येऊन सरळ बॅट ने जास्त खेळायला हवं. ऑस्ट्रेलियात सुद्धा तो लाईन च्या बाहेर खेळताना (टी-२० स्टाईल) आऊट झालाय.

आता कोहली, पुजारा, रहाणे ह्यांना उद्या आधी वेळ खेळून काढायचाय. स्कोअर फार नाहीये / होतही नाहीये. अशात आपला जर लवकर ऑल-आऊट झाला तर न्युझिलंड साठी सोपा पेपर असेल.

रोहित त्याचा नॅचरल गेम खेळू शकत नव्हता तेंव्हाच लक्षात आलेले की गड्याचे काही फारसे खरे नाही. शॉट न ऑफर करणे म्हणजे अगदीच कार्डीनल क्राईम झाला Sad

शेवटच्या अर्ध्या तासात न्युझिलंडकडे पारडं थोडं झुकलं. >>> मी तर‌ म्हणेन बरंच झुकलं. उद्याच्या ९८ ओव्हर्सच्या खेळात आपण ८ गड्यांनिशी‌ ४० ओव्हर्समध्ये N धावा काढल्या, तर N+३२ त्यांना ५८ ओव्हर्समध्ये चेस करायला दडपण यायला N २००+ असायला हवा, जे अशक्य वाटतेय. ४५ ओव्हर्समध्येही ते शक्य वाटत नाही. त्यातून उरलेल्या फक्त अर्ध्या दिवसात त्यांचे १० गडी जाण्याची शक्यता आजचा खेळ पाहून फार कमी वाटते आहे. (पिच कोरडं न पडल्याने आश्विन तथा सर चालतील का, हे माहिती नाही. चालले आणि जिंकलो तर चांगलंच आहे.) त्यामुळे न्यूझीलंडवर प्रेशर कमी आहे. विन प्रेडिक्टर ह्यामुळेच भारतीय विजयाची शक्यता ७% वगैरे दाखवतो आहे असं वाटतंय. हेच जर आपण २०चा लीड घेऊन आत्ता‌ टोटल ८०-१००चा लीड असता, तरी उद्या ४५ ओव्हर्समध्ये १३०-१५०‌चा प्रयत्न करून २२५-२५०‌ चेसला देऊन ५०+ ओव्हर्स आपल्या बॉलर्सला देऊन एक‌वेळ बघता आलं असतं. ३२चा लीड देणं, आणि नंतरचा संथ खेळ हे दोन्ही लो-स्कोरिंग गेममध्ये महागात पडलं आहे.

या सामन्यात, या खेळपट्टीवर, या पिचवर अजून भेदक भासणारया या बॉलिंग अटेकसमोर शर्माने ३४ आणि ३० धावा मारणे हा तसा चांगला परफॉर्मन्स आहे आहे.
सेट होऊन बाद व्हायचे म्हणाल तर कोणी या सामन्यात सेट होऊन मोठी खेळी केली हे शोधावे लागेल.

परदेशात गेल्या काही वर्षांत कोण ओपनर चमकलाय वा स्थिरावलाय हे आठवावे लागेल. दर दौरयात तीनचार जणांत संगीतखुर्चीच चालते.

बाकी भारतात कसोटी खेळताना शर्माचा ओपनर म्हणून रेकॉर्ड जबरदस्तच आहे. ज्या खेळपट्टीवर कोहली पुजारा रहाणेही स्पिन खेळताना कम्फर्टेबल नसायचे तिथे तो अगदी सहज खेळत होता.

पण बहुधा शर्मा हे नाव एकदिवसीय मध्ये ईतके मोठे झालेय की त्याची तुलना ईतर ओपनरशी न होता त्याच्या स्वत:च्याच एकदिवसीयमध्ये झालेल्या मोठ्या ईमेजशी होते आणि लोकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या जाताहेत.

टेस्ट मॅच खेळताना जो संयम फलंदाजांना आणि गोलंदाजांना दाखवायची गरज असते तो भारतीय क्रिकेटचाहते म्हणून आपणही दाखवणे गरजेचे आहे असे वाटते Happy

उद्या जिंकण्याचा विचार न करताच खेळावे. कारण शिल्लक वेळ पाहता जिंकणे अवघड आहे. तरी जर सुरुवातीला तासभर विकेट पडली नाही तर रहाणेच्या आधी पंतला पाठवता येईल.. जिंकायच्या हेतूने नाही तर फक्त न्यूझीलंडच्या डोक्यात किडा सोडायला की भारतही जिंकायचा विचार करतेय. कारण त्यांना जाणवले की भारताने मॅच जिंकायचा विचार सोडलाय तर त्यांचे प्रेशर जात त्यांना अजून हुरूप येईल. पंतला मात्र नॉर्मलच खेळायला सांगावे.

मी काल लिहिल्याप्रमाणे चहापानानंतर आपल्यावर फलंदाजीची वेळ आली. पहिल्या डावापेक्षा यावेळेस त्यांचा चेंडू जास्ती स्विंग होत नव्हता. वातावरण थोड चांगल होत. आजही असच राहिल तर फायद्याच होइल. निदान चहापानापर्यंत टिकून २०० धावा जमवता आल्या पाहिजेत. शक्य आहे पण पुजारा , रहाणे, पंत आणि कोहली यांची खरोखर कसोटी आहे. आज बघायला मजा येइल. आपण जरी पराभवाच्या छायेत असलो तरी जिगरीने सामना वाचवू शकू. तेवढी कुवत आपल्यात आहे.
आपण जिंकण्याची शक्यता परवाचा दिवस पूर्ण वाया गेल्यामुळे नव्हतीच. (कारण तेवढा वेळ राहिला नव्हता). आता तर अशक्य आहे. अर्थात क्रिकेटमधे काहिही घडू शकतं , न्यूझिलंडचा दोन तासात ३६ ऑल आउट होउ शकतो. Happy

पाठिच्या दुखण्यातून परत आल्यावर बुमराला विकेटस मिळेनाश्या झाल्या आहेत. कालच त्याच अपयश अनाकलनीय होत.

*...अर्थात क्रिकेटमधे काहिही घडू शकतं ,* - या पलिकडे ह्या सामन्यात बोलण्या/ पहाण्यासारखं कांहीं शिल्लक आहे असं खरंच वाटत नाहीं! आक्रमक गोलंदाजी व बचावात्मक फलंदाजीची मेजवानी, हीच या कसोटीची आठवण राहील !!

जिथे अशा वातावरणात फलंदाजीला सरावलेलया न्यूझीलंडच्या कसलेल्या फलंदाजाना स्वतःची विकेट वांचवायला शर्थ करावी लागतेय, तिथे भारतीय फलंदाजीची कामगिरी कौतुकास्पदच म्हणावी लागेल.

अर्थात क्रिकेटमधे काहिही घडू शकतं ,* - या पलिकडे ह्या सामन्यात बोलण्या/ पहाण्यासारखं कांहीं शिल्लक आहे
>>>>

हे भारतीय विजयाबाबत लागू
पण न्यूझीलंड विजयाच्या आशा अजूनही चिक्कार आहेत.
भारताला ४०-४५ ओवर मध्ये अजून शंभर सव्वाशे धावा मोजत बाद करणे हि शक्यता बरेपैकी आहे ईथे.
अर्थात ५० ओवरमध्ये १५० काही सोपे नसेल. पण ईथवर टारगेट असल्यास न्यूझीलंड विजयासाठी जाईलच.

Pages