खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोणचे, साबुदाणा खिचडी, मोदकांची आमटी, वांगं भाकरी, माशाची आमटी जबरी.

जाई : टोमॅटो बेझल पास्तासाठी २५० ग्रॅम चेरी टोमॅटो आणि मुठभर बेझल मिक्सरमधून फिरवून घेतले. तीन लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून ऑलिव्ह ऑईलवर परतल्या. त्यात तीनचार बेझलची पानं आणि (घरात होतं म्हणून) कॅफर लाईमचं एक पान हाताने तोडून टाकलं. थोडंसं परतून त्यात वरील प्युरी टाकली, आणि मंद आचेवर झाकण लावून शिजवले. १५ मिनीटांनी त्यात काळीमिरी पावडर, ड्राय ओरेगानो, दोन टी स्पून साखर टाकून १० मिनीट परत शिजवले. मीठ घालून २-३ मिनीटांनी आच बंद केली.
त्याच वेळेला रेड बेल पेपर, मश्रुम्स ग्रिल करून घेतले. स्वीट कॉर्नचे दाणे वाफवून घेतले.

भाज्या फारच ड्राय वाटत होत्या म्हणून वरील सॉसमधे मिक्स करून ठेवल्या.

पास्ता नेहमीप्रमाणे मीठ टाकून शिजवला. पास्ता सॉसमधे मिक्स करायच्या आधी सॉसमधे थोडंसं बटर घातले.

कॅफर लाईम नाही टाकलं तरी चालेल. चेरी टोमॅटो मला साध्या टोमॅटोपेक्षा आंबट वाटतात. त्यामुळे साखर घातली. तुम्ही टाळू शकता किंवा प्रमाण तुमच्या चवीनुसार बदलू शकता.

बोईट आणि चिवणी,
Submitted by आदू on 9 June, 2021 - 13:50>> जे काय आहे ते जबरदस्त दिसतय.

जे काय आहे ते जबरदस्त दिसतय.>> हो म्हाळसा,लागतं तर खूप जबरदस्त, गावठी मच्ची म्हणतात याला,पहिला पाऊस झाला की खूप येते,बऱ्याचदा गाभोळी असते,
पण ही मी नाही बनवली,सासाऱ्यांच्या हातची आहे,मी फक्त हेल्पर आहे, Happy

लुसलुशीत भाकरी वाटतेय... कांदा द्या मला थोडा सोबत Happy

बोईट आणि चिवणी, >>>> वाह मस्त. पाणी सुटले.. मासे म्हणजे नेत्रसुख Happy

केप्र (केशवलक्ष्मी प्रसाधन) नावाच्या कंपनीचा मसाला माझ्या आवडत्या चवीचा निघाला. याच्या पाकिटावर दिलेल्या सूचनांचे हुबेहुब पालन करा. १ किलो कैरी च्या फोडी(३० रु) , त्यात एक पाकिट मसाला, (सुमारे ६०-७० रुपये),२०० ग्रॅम मीठ. (१० रुपये) असे शंभर रुपयात लोणचे मला वर्षभर पुरते. >>> आरारा सोपे वाटली रेसिपी म्हणून पाहील्यान्दाच लोणचे करून पाहते आहे. तुमच्या रेसिपी प्रमाणे के प्र चे लोणचे बनवायला घेतले... १ की. कैरीचे तुकडे १०० gm मसाला आणी २००gm मीठ घालून मिक्स करून कोरड्या बरणीत सकाळी घालून ठेवले पण त्यात आता कैरीनें सोडलेले पाणी जमा झाले आहे. पॅकेट वर दिलेल्या प्रमाणे हे मिश्रण २ दिवस ठेवायचे आणी २ दिवसानंतर गरम करून थंड केलेले तेल घालायचे आहे. पण ह्या कैरीला सुटलेल्या पाण्यात तेल घातले तर लोणचे खराब तर नाही होणार?

पॅकेट वर दिलेल्या प्रमाणे हे मिश्रण २ दिवस ठेवायचे आणी २ दिवसानंतर गरम करून थंड केलेले तेल घालायचे आहे. पण ह्या कैरीला सुटलेल्या पाण्यात तेल घातले तर लोणचे खराब तर नाही होणार?
<<

ते कैरीने सोडलेले पाणीच तर खरा लोणच्याचा "खार" आहे. आत्ताची चव कशी आहे? Proud

अजिब्बात खराब होणार नाही. बिन्धास्त घाला. अन नीट मिक्स करा. (आताही जर पाणी वेगळे दिसत असेल तर मिक्स करायला हवेच आहे) पण तुम्हाला तेल हवंय कशाला त्यात? नाही घातले तरी चालते. फार भीती वाटत असेल तर फ्रीजमधे ठेवा लोणचे.

रच्याकने. लोणच्यात बोअरवेलचे / खार्‍या कुव्याचे (खारट पाण्याची विहीर) पाणी ओतायच्याही रेसिपी आहेत.

प्लेन ओट्स डोसा.
रवा+उरलेले डोश्याचे पीठ+ओट्स=डोसा
<<

उम्म..

एक बेसिक गम्मत आहे.

ते "बॅटर" असते ना? ते मिनिमली आंबलेले असते तेव्हा त्याची इडली होते. थोडे जास्त आंबले की त्याचा डोसा होतो. अजून जास्त आम्बल्यावर उत्तप्पा. अन त्यानंतर "डिब्बा रोट्टी" नावाची डिश करता येते. गूगला किंवा यूट्यूबा. त्यावर रेस्पी सापडेल डिब्बा रोट्टी ची.

करून पहा, खा, अन मग मला थ्यांक्यू म्हणा नवी डिश सांगितल्याबद्दल.

ओह! तो प्रकार खाल्ला आहे मी.
आंध्रावाली शेजारीण होती ती इडली बैटर उरलं कि बनवायची जाडीजुडी रोटी. पण त्याला डिब्बा रोटी म्हणतात हे माहीत नव्हतं.ते सांगितल्या बद्दल थँक्यु सर ! Happy

पण तुम्हाला तेल हवंय कशाला त्यात? नाही घातले तरी चालते........ लागोपाठ 2-३ वर्षे लोणचे खराब झालेय.सर्व काही काळजी घेऊनही.त्यामुळे 0 कॉन्फिडन्स - मध्ये गेलाय.लोणच्याच्या बाबतीत.मुंबईच्या दमट हवेत असे लोणचे टिकेल का?

एक किलोचे घालून पहा. सिर्फ सौ रुपये का एक लिटर पेट्रोल का सवाल है ताइ.

टिकले, तर काँग्रेसला मत द्या नेक्स्ट टाईम. Wink

(अवांतर @ मुंबईची दमट हवा. इंटर्नशिपला भोर नावाच्या गावी होतो. प्र च ण्ड पाऊस अन दमट हवा. दाराआड खिळ्याला टांगलेल्या जीनच्या पँटीवर ३ अठवड्यात कावळ्याच्या छत्र्या उगवल्या होत्या. तेव्हा, नो`१००% ग्यारंटी, पण तरी, काँग्रेसला मत द्याच बर्का. फक्त १ लिटर पेट्रोल :-)ं)

लोणचे कॅन्सल.

आता मीच तोपर्यंत टिकले तर मतदानाचे पाहेन.शेवटी गुप्त मतदान.(हा आला तर ह्याला हो हो.तो आला त्याला हो हो)

लोणचे कॅन्सल.>>>>>>>>>
लोणचे पहिल्यांदा बनवायची फार इच्छा होती पण तो केप्र मसाला इकडे मिळणार नाही आता ऊन पण गेलं..आयतं लोणचं अजिबात आवडत नाही म्हणून आणतच नाही.
आता पुढच्या वर्षी बघू..

काहिहि भाजी पाव किलो आणणे
तुकडे करुन हळद हिण्ग तिख्ट मीठ साखर आणि लोण्चे मसाला घालणे
तेल किण्वा फोडणि देणे

४ दिव्साचे लोणचे तयार

हिंग कोणते वापरावे त्यात, बंधानी (Compounded) की शुद्ध खडा हिंग? (आजकाल compounded सुद्धा खड्यांच्या रुपात मिळतो).
आईने लोणचे घातले त्यात बंधानी नको शुद्ध खडे हिंगच हवे असे सांगितले. त्यासाठी मी कितीतरी दुकाने पालथी घातली, बंधानी खडे हिंग मिळत होता ऑन शुद्ध हिंग मिळाला नाही.
काही वर्षांपूर्वी आणलेल्या दुकानातही नव्हता. मग ऑनलाइन मागवला.

बंधानी हिंगा मध्ये २५-३०% हिंग आणि बाकी तांदूळाचे पीठ / मैदा असते. हिंगाचा उग्रपणा कमी करायला (गंधक प्रमाण कमी करायला) असे करतात. रोजचा स्वयंपाक, काही आठवडा टिकणारे पदार्थ या करता ठीक आहे.
लोणचे जे अनेक महिने वापरायचे आहे त्यात हा हिंग घातला तर तेवढे टिकत नाही, वास लागतो - इति आई.
हे त्यातील तांदळाचे पीठ/मैद्यामुळे - इति आई.
म्हणून लोणच्यात घालायला शुद्ध हिंग हवा तिला. अर्थात हा बंधानी हिंग जेवढा घातला असता त्याच्या २५%च घालावा लागेल. उग्रपणामुळे जरा जपून हाताळावा लागतो.

आयतं लोणचं अजिबात आवडत नाही>> मृणाली आम्ही पण प्रवीण किंवा कुठलंच लोणचं विकत आणत नाही.
त्यात विनेगार अजून काय काय असतं त्यामुळे खाल्लं की माझं आणि नवऱ्याचा घसाच खवखवायला लागला. त्यानंतर कधीच आणलं नाही.
खरंतर माझी आई मला लोणचं करून द्यायची कैरीच, लिंबाच हिवाळ्यात आवळ्याच. पण माझे वडील २०२० साली गेले.
त्यानंतर ती थोडी कोलम डलीच आहे. आणि तिचं वय आणि तिचे आजार बघता आता ती वर्षभराच लोणचं घालण्याचा घाट घालू शकतं नाही.
म्हणून मीच ४ कैऱ्यांचे लोणचे घरच्या घरी घातले. तसे ती ह्या वर्षीही म्हणत होती घालून देऊ का पण मीच नको म्हंटल आणि४ कैऱ्यांच घालू न टाकलं.
थोडक्यात काय तर बाहेरचे लोणचे नको वाटते.

रूचा Happy
मी सासू किंवा जावेकडून आणते नेहमी.मागच्या वर्षी आणलेले संपले.

बंधानी हिंगा मध्ये २५-३०% हिंग आणि बाकी तांदूळाचे पीठ / मैदा असते. हिंगाचा उग्रपणा कमी करायला (गंधक प्रमाण कमी करायला) असे करतात. रोजचा स्वयंपाक, काही आठवडा टिकणारे पदार्थ या करता ठीक आहे.
लोणचे जे अनेक महिने वापरायचे आहे त्यात हा हिंग घातला तर तेवढे टिकत नाही, वास लागतो - इति आई.
हे त्यातील तांदळाचे पीठ/मैद्यामुळे - इति आई.
म्हणून लोणच्यात घालायला शुद्ध हिंग हवा तिला. अर्थात हा बंधानी हिंग जेवढा घातला असता त्याच्या २५%च घालावा लागेल. उग्रपणामुळे जरा जपून हाताळावा लागतो.
>>
Ajibat mahit navhate.
Interesting. Happy

शुद्ध हिंग सहजी मिळतही नाही अन आपल्याला खाववणारही नाही. सुईच्या टोकाने कोरून खडा वापरावा लागतो.

"असा-फेटिडा" अर्थात घाण वास येणारा ट्री सॅप उर्फ डिंक, तो हिंग.

20210613_222939.jpgहिंगामध्ये गव्हाचे पीठ असते हे माहीतच नव्हते.. म्हणून माझ्याकडे असलेल्या वनदेवी हिंगाची डबी काढून बघितली..

Pages