खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोदकाची कढी म्हणजे काय?
मला फक्त गणपतीचा नैवेद्यवाले मोदक माहित आहेत.

आणि भातावर काय आहे, कुठली मच्छी कढी की सांबार?

मोदकं हे छोटे चकचकीत मासे असतात. चवीला जाम भारी. कालवण करा किंवा सुके करा. मस्तच.
IMG_20210606_202538.jpg
रा फोटोपण माबोवरचाच आहे. जागुच्या रेसिपिमधला आहे बहुतेक. गुगलवर मिळाला.

अच्छा म्हणजे भातावरचीच मोदकाची कढी आहे तर. मला वाटलं छोट्या वाटीतली आहे.
जबरीच मेन्यु साक्षीटी.

photo_2021-06-06_22-29-09.jpg

साक्षीटी,
तुम्ही टाकलेली मोदकाची आमटी, तिला हा माझा शुद्ध शाकाहारी झब्बू.

तुमची मोदकं म्हणजे मांदेली आहेत ना?

***

असो. माझी मोदकाची आमटी आहे, खानदेशी स्टाईल. खोबरं-खस्खस-कांदा-गरम मसाला वाटण (कच्चे नाही. तेलात भाजलेले) भरून बेसनाचे (उकडून पारी करून) मोदक, त्याच मसाल्याच्या उकळत्या आमटीत (कढीगोळे स्टाईल) सोडून शिजवतात. अत्यंत भारी आयटम आहे. आमटी पाटवड्या करतात त्याचा थोडा अ‍ॅडव्हान्स्ड प्रकार.

अन हो, की काकूंची कारागिरी आहे. माझ्यासारख्या खांडकर्‍याला जमण्यासारखा प्रकार नाही. Wink

वॉव मोदकं.. मस्तच. सार खुप अप्रतिम लागतं. हे आणि पेडवे सार दोन्ही असली आणि गरम भात.
मांदेली ती वेगळी... पचपचीत चवीची.

ती मोदकाची आमटी आहाहा.. ईथे सध्या घरात माझे फेव्हरेट अंड्याचे कालवण बनतेय, त्याचा वास सुटलाय. बहुधा अंडी फोडून कालवणात टाकली आहेत नुकतीच. गरम गरम भातासोबत ओरपायला हवे आता. नशीब ती आहेत सोबतीला, नाहीतर ती वरची झणझणीत आमटी बघून दुसरे काही मिळमिळीत चवीचे खायला झाले नसते आता Happy

आरारा.. कसलं भारी दिसतंय लोणचं. एव्हढ्या कमी तेलात केलंय...रेसिपी द्या ना टिप्स सहित.
Submitted by निल्सन on 4 June, 2021 - 23:26

रेसिपी द्या ना टिप्स सहित.>>>>>>> + 1000
Submitted by mrunali.samad on 4 June, 2021 - 23:28

<<

टिप एकदम सोप्पी आहे. हे लोणचं करायला खूप्पच कमी वेळ लागतो, कारण मसाला रेडीमेड आहे.

केप्र (केशवलक्ष्मी प्रसाधन) नावाच्या कंपनीचा मसाला माझ्या आवडत्या चवीचा निघाला. याच्या पाकिटावर दिलेल्या सूचनांचे हुबेहुब पालन करा. १ किलो कैरी च्या फोडी(३० रु) , त्यात एक पाकिट मसाला, (सुमारे ६०-७० रुपये),२०० ग्रॅम मीठ. (१० रुपये) असे शंभर रुपयात लोणचे मला वर्षभर पुरते.

अनुभवी हौशी लोकांनी यात थोडी मोहोरीची डाळ, मिरे, लवंग, लाल मिरच्या वगैरे अत्यंत माफक प्रमाणात ( १ किलोच्या लोणच्यात १५-२० मिरे/लवंग, ७-८ सुक्या लाल मिरच्या, २ चहाचे चमचे मोहोरीची डाळ घाला, चव अजून छान लागते. मुरलेली लाल मिरची अस्ली झक्कास लागते ना..) हे अ‍ॅडिशनल प्रकार घातले, तर थोडा हिंग घालायला विसरू नका. हिंग तुमच्या चवीनुसार अन हिंगाच्या प्रकार्/कॉन्सन्ट्रेशन नुसार. पण वरतून मसाले न घातले तरी फारच सुंदर चव तयार होते.

सगळ्यात महत्वाचे आहे ते मीठ.

मीठ टाकण्यात कंजूसी केली, तर कितीही लोणचे तेलात बुडवले, फ्रीजमधे ठेवले किंवा चिनीमातीची बरणी अन वर फडकी वगैरे बांधली, तरी ते नासणारच. फोडी अवठळणार, कुबट वास येणार वगैरे.

मीठ योग्य प्रमाणात टाकले तर आणि तरच लोणचे टिकते. तेल ऑप्शनल आहे. तिळाचे किंवा मोहोरीचे धूर निघेपर्यंत तापवून पूर्ण थंड केलेले तेल घाला. तेल नसले तरीही लोणचे आरामात फ्रीजबाहेर टिकेल.

ता.क. १.
डाक्टर, इतकं मीठ!! वाल्या लोकांसाठी. बीपी असेल तर लोणचे टोटल अमाऊंट कमी खा. लोणच्यात मीठ कमी टाकणे हा इलाज नाही.

ता.क.२.
हात तिच्या. रेडिमेड मसाला आणूनच लोणचं टाकायचं तर .. वाल्या लोकांसाठी.
रेडिमेड लोणच्यात व्हिनेगर घालतात, चव मजा देत नाही. बाजारू अननोन तेल तर असतेच असते. दुसरे, माझ्या लिष्टीतला मसाला फ्रॉम द स्क्रॅच बनवला तरी हीच चव तयार होईल. माझ्या फ्रॉम द स्क्रॅच मसाला वाल्या आलं/मिरची लोणचे, लसूण लोणचे रेस्पी 'इतरत्र' आहेत.

Submitted by म्हाळसा on 6 June, 2021 - 23:08
<<
परेफेक्ट!
म्हाळसाक्का, माझी रेस्पी बरोबर आहे ना? चवीत काय व्हेरिएशन तुमच्याकडे? तुमचे मोदक फारच जास्त सुबक आहेत. झक्कास!

धन्यवाद..फोटोसाठी फक्त सुबकच मोदक निवडले होते Happy पण चवीत फार फरक नसावा.. आमच्याकडे मासवडी नावाचा (ज्यात कोणतही मांस नसतं) एक प्रकार बनवतात..त्याचच हे वेरिएशन आहे..त्याचीही चव अफाट असते..
हा मोदक रस्सा रेसिपिचा धागा
https://www.maayboli.com/node/76236

आरारा, लोणचे एकदम मस्त. पण वेगळा धागा काढून लिहिले तर पुढच्या वेळेला आम्हाला रेसिपी शोधत बसायला नको.
म्हाळसा यांचे मोदक जबरदस्त दिसतायेत.

म्हाळसा काय सुंदर आहेत मोदक! एवढे सुबक मेरे बस की बात नहीं!

आजच मिळाली...

Screenshot_20210607-135033.jpg

गरम गरम वरणफळे
Screenshot_20210607-135103.jpg

साबुदाणा खिचडी
Screenshot_20210607-135115.jpg

माझ्या रेसिपी निघतायत इथे हे पाहुन खुप आनंद झाला. मला फोटो डाउनलोड करायला जमत नाही इथे. पहिला पिकासा वरुन व्हायचे. ते बंद झाले आता. मायबोलीवरुन टाकायला आ‌ॅप्शन आहे ते फोटो जास्त झाले की जुने जातात. म्हणुन नकोस वाटत टाकायला. फोटो टाकता आले की पुन्हा रेसिपी चालू करेन.

चिन्मयी सध्या छान फळं मिळत आहेत पुण्यात. लिची, प्लम बरोबरच आपली देशी अंजीर, जांभूळ, काळी मैना. बाकी पपई, चिकू हे नेहमीचे कलाकार आहेत च.

..उचलून लगेच खावं असं वाटतं....जबरी..
नवीन Submitted by केया on 7 June, 2021 - 09:51
<<
उचलून जर तो मोदक नुसता खाल्ला, तर अर्धा तास हाय हाय अन ३ ताम्बे भरून पाणी किमान असा कार्यक्रम असतो. Rofl
आमटीत कुस्करून, पोळीला लावून खा.

खांडकरी म्हणजे?
<<
माळकरी अन खांडकरी असा व्हर्नाक्युलर शब्दप्रयोग आहे.

तुळशी ची माळ गळ्यात घालून वारकरी संप्रदायाचे लोक मद्यमांस वर्ज्य करतात. त्यांना माळकरी म्हणतात. खांडकरी हे मस्तपैकी बोकड्/कोंबडीची खांडं शिजवून वरपतात Wink

ओह्....थॅन्कयु डाॅक्टरसाहेब.

(अवांतर - केवळ कुतुहल म्हणून)
सर्जरी शिकणं किंवा एकंदरीतच सर्जन होणं हे मांसाहारींना सोपं जातं का?

Pages