भारतात कोविडच्या लसीला होणारी दिरंगाई.

Submitted by बाख on 28 April, 2021 - 08:38

जागतिक पातळीवर सर्वच लसींचे समान वाटप व्हावे व लसीकरणाचे प्रमाण वाढून आजारांचे उच्चाटन व्हावे म्हणून
GAVI (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायजेशन) ही शिखर संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न होऊन
कार्यरत असते. मागास राष्ट्रांनाही लस
मिळावी हा या संस्थेचा मुख्य व उदात्त हेतू आहे. यासाठी
" गावी " या संस्थेला बिल अँड मिलिंडा गेट्स
फाउंडेशनसारख्या अनेक बलाढ्य सेवाभावी संस्थांकडून
निधी मिळतो. नुकतेच १५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन इथे " गावी" ने आयोजित केलेल्या " वन वर्ल्ड प्रोटेक्टेड" या इव्हेंटमध्ये बऱ्याच देशांनी मुक्तहस्ताने निधीचे वाटप केले.

तरीही श्रीमंत देशांनी निधी दिला आणि गरीब राष्ट्रांना लसी मिळाल्या एवढे सोपे हे काम होत नाहीं. " गावी" तसेच निधी पुरवठा करणाऱ्या संस्था जेव्हा एखाद्या देशाला लस
निर्मितीसाठी निधी देतात तेव्हा एखाद्या कंपनीच्या लसीला झुकते माप देणे, एखाद्या विशिष्ट कंपनीच्याच लसीची खरेदी
करण्यासाठी दबाव आणणे, आणि अविकसित, मागास देशातील लसीकरण कार्यक्रम ठरवताना तो श्रीमंत व विकसित राष्ट्रांना कसा फायदेशीर ठरेल हे पाहणे असे छुपे, न दिसणारे एजेंडा पुढे ढकलतात.

भारतातील सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी " गावी " ने आगाऊ खरेदीची हमी म्हणून ३०० अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याबदल्यात सीरमने
कमी उत्पन्नाच्या ९२ देशांना जूनपर्यंत १०০ दशलक्ष डोसेस देण्याचा कायदेशीर करार " गावी " आणि गेट्स फाउंडेशन यांच्याशी केला आहे. 'गावी' व्यतिरिक्त सीरम
इन्स्टिट्यूटला भारत सरकारकडून ३ हजार कोटींचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. " गावी" च्या कराराअंतर्गत ७६ देशांना ६०.४ दशलक्ष डोसेस आजवर सीरमने दिले
आहेत. या लसी दिलेल्या देशांमध्ये सौदी अरेबियासारखे श्रीमंत आखाती देशही आहेत. आज सीरम इन्स्टिट्यूटचा एकच कारखाना पुण्यात कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीला आग लागली होती. शिवाय अमेरिकेने सीरमला कच्चा माल देण्यास नकार दिला होता. ( ही रोखलेली निर्यात आताच मागे घेण्यात आली आहे ). अशा स्थितीत सीरमला दिवस रात्र उत्पादन करावे लागत असून " गावी " बरोबर करार केल्यामुळे त्यांनाही सलाम ठोकावा लागत आहे. सीरमच्या कोविशिल्ड या लशीचा तुटवडा यामुळेच भासत आहे. आज सिरम अशा कात्रीत अडकली आहे की स्वतःच्या देश बांधवांना लशी पुरवाव्यात की ९२ देशांची मागणी पूर्ण करावी.

."सगळी श्रीमंत व गरीब राष्ट्रे मिळून एकत्रित लस खरेदी करू,"असे " गावी " म्हणत असताना अमेरिका व ब्रिटनने नोव्हेंबरमध्येच लस तयार करणाऱ्या - फायजर, मॉडर्ना व
जॉन्सन अँड जॉन्सन या तीन मुख्य कंपन्यांना अब्जावधी
डॉलर्स देऊन बहुतांश डोस "प्री बुक' केले. रशिया आणि चीनने स्वतःच्या बळावर देशी लसी बनविल्या. यामुळे आज
जगात १४ % लोकसंख्या असलेल्या देशांकडे जगातील
८५% लससाठा उपलब्ध आहे. अमेरिकेने ५०% व इंग्लंडने
६०% लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे.

या पार्श्वभूमीवर भारतात एक डोस मिळालेल्यांचे प्रमाण ५.२ % व दोन्ही डोस मिळालेल्यांचे प्रमाण १ % एवढे कमी आहे. ज्या देशातून जी मिळेल ती लस खरेदी करणे आणि प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर देणे आवश्यक असताना, भारतात लसीकरण केंद्रांवरून अनेक जण लसीअभावी
परतताना दिसत आहे. भारत बायोटेक या काही अंशी देशी संस्थेचा लस निर्मितीतील सहभाग आज केवळ १०% आहे. भारताने १० हजार कोटी रुपये हे अर्थसंकल्पात लसीसाठी निश्चित केले आहेत. पण यापैकी बहुतांश निधी हा खाजगी
कंपन्या व परदेशी लसी खरेदीसाठी खर्ची पडणार आहे.
हाफकिन इन्स्टिट्यूट - मुंबई, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट - कसौली, पाश्चर इन्स्टिट्यूट, कुन्नूर, किंग इन्स्टिट्यूट - चेन्नई या भारत सरकारच्या लस तयार करणाऱ्या संस्थांचा उपयोग करुन घेतला पाहिजे. असे केले तरच सर्वांचे लसीकरण होऊ शकेल अन्यथा एकशे तीस कोटी जनतेचे लसीकरण कसे आणि केंव्हा होईल त्याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो. त्यामुळेच १ मे २०२१ पासून १८ ते ४५ या वयोगटातील लोकांचे सरसकट लसीकरण करणे केवळ अशक्य आहे.

....

Group content visibility: 
Use group defaults

४५ पेक्षा जास्त वयाचे फक्त १% लोकांनी २ लशी घेतल्या आहेत. त्याही महाराष्ट्रातील लोकांनीच जास्त घेतल्या आहेत. आहे त्या ४५ वर्षांवरील लोकांसाठी केंद्राने लशी पुरवल्या नाहीत. आता अचानक १८ च्या वरच्या लोकांसाठी राज्यांनीच लशी द्या म्हणुन केंद्र हात झटकून मोकळे झाले. तयारीला वेळ जाणारच. शहाण्या माणासांनी आता गर्दीत घुसुन लसीकरण करू नये.. बाधित होण्याचाच धोका अधिक.

१८ च्या वरच्या लोकांसाठी राज्यांनीच लशी द्या म्हणुन केंद्र हात झटकून मोकळे झाले.>>>>
निर्णय घेऊन झाला होता. मिटिंग संपली. टाळ्यांचा कडकडात झाला.
ते उठले . बेेसीन कडे गेले. त्यांनी आपली दाढी कुरवाळली. कुणीतरी हातावर पाणी टाकले. साबण दिला. हात स्वच्छ धुतले. सध्या हात सारखे धुवावे लागतात.
मग शांतपणे झोपी गेलेे

<< ओ, युपीबद्दल काही बोलू नका. प्रॉपर्टी जप्त होईल>> आता बोललं तरी चालेल. सुप्रीम कोर्टाने कान उपटलेत केंद्र सरकारचे >>

------ आशावाद दांडगा आहे. हे असे अधूनमधून दरडावल्या सारखे करायचे असते. केंद्राकडे जनतेचा मोठा रोष येत असेल तर (आता तर शिव्यांची लाखोली मिळते आहे) तो कमी करण्यासाठी असे " मारल्या" सारखे केले तर रोष कमी होतो... मग मिळालेल्या अवधीचा आय टी सेल चांगला वापर करते.

शेतकरी आंदोलनाच्या वेळी पण असेच आशावादी विधान सर्वोच्च न्यायालयाने केले होते. पण त्यात सातत्यता नसते... वरकरणी जनहिताचे वाटतात...

कमाल कामराचे ट्विट बघा. किती तत्परता दाखवली.

आधी रंजन गोगाय सर्वोच्च न्यायाधिश पदावर होते. केलेल्या मदतीबद्दल त्यांना खासदारकी बक्षिसी मिळाली. आता बोबडे महाशय फळाची अपेक्षेने वाट पहात आहेत. आशेने पहात आहेत, केंद्रात मंत्रीपद / किमान खासदारकी हवीच. त्यांनी "बार " होता त्यापेक्षा खाली नेला आहे.

मुख्यमंत्री फेब्रुवारीपासून दुसर्‍या लाटेबद्दल बोलताहेत.
त्यावेळी भाजप त्यांच्या अधिवेशनात मोदींची आरती ओवाळत होते
The party commended the government’s Covid-19 response, and in the resolution said while the world was “speculating over how India with its vast population and limited health care infrastructure” would face the challenge, it can be “said with pride that India not only defeated Covid under the able, sensitive, committed and visionary leadership of Prime Minister Shri Narendra Modi, but also infused in all its citizens the confidence to build an ‘Atmanirbhar Bharat’.”

Repeat - able, sensitive, committed and visionary

दुसरी लाट घोंगावतेय मुख्यमंत्र्यांना चिंता मात्र तिसऱ्या चौथ्या लाटेची >>
(व्हिडिओ पाहिला नाही). यात चुकीचं वाटत नाही. दुसऱ्या लाटेबद्दल सगळे गाफील राहिले त्यातुलनेत हे योग्यच आहे.
निवडणूक, प्रचार याच्या चिंतेपेक्षा ही चिंता अधिक महत्वाची.

आमच्या यूएस ऑफिसतील कलीगने आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग बघून काळजीने विचारपूस केली. हे जे आपल्याकडे चालू आहे ते त्यांनी वर्षभरापूर्वी अनुभवलेलं . प्लिज टेक vaccine अस कळकळीने सांगितलं . मी मनात म्हटलं हे आमच्या नेत्यांना आधी कळायला हवं होतं तेव्हा सो कॉल्ड vaccine diplomacy करायला गेले . इथे लस तुटवडा आणि बाहेर विश्वगुरू बनायचे धंदे ..
आताही कुठे गंभीरता आहे ? तो केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर आहे की जोकर ? कसल गांभीर्य नाही की काही चिंता नाही . त्यामानाने राजेश टोपे तरी छान काम करतात.

यूपी बंगाल , गुजरातमध्ये परिस्थिती भयानक आहे . बंगालमध्ये दर दोन व्यक्तिमागे एक व्यक्ती पॉझिटिव्ह आहेत असा रिपोर्ट येतोय, निवडणूक आयोग खुनी आहे खरंच.
यूपीत तर ऑक्सिजनची कमतरता , तिथल्या प्रसाशनच्या बातम्या ऐकून आपण तिथे नाही याचं समाधान वाटलं . ऑक्सिजन मिळत नाही असे लिहिल्यावर तुरुंगात टाकायची धमकी Angry अरे माणसं आहेत की हैवान ??
गुजरातमध्येही फार वेगळी परिस्थिती नाही.
गेल्या आठवड्यात तीन ते चार परिचित व्यक्तीचा मृत्यू झाला. कधी संपणार हे सगळं Sad

<< दुसरी लाट घोंगावतेय मुख्यमंत्र्यांना चिंता मात्र तिसऱ्या चौथ्या लाटेची >.

---- असा दुरदर्शीपणा पंतप्रधान मोदी यांच्या कडे असता तर ? पण नाही. आज आता कोरोनाचा मेगा सुपरस्प्रेडर अशी त्यांची इमेज जगांत तयार झालेली आहे. निवडणूकांसाठीच्या जंगी प्रचार मोहिमा, रॅलीज, आणि लाखो लोकांना एकत्र करुन कुंभमेळा सारखे मेगा स्प्रेडर event आदी टाळणे शक्य होते.

देशातच तयार होणार्‍या लसीं मिळविण्यासाठीचा करार जानेवारी २०२१ पर्यंत नाही. आज लोक ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून तडफडून मरत आहेत... मग काय उपयोग आहे जनतेच्या कोट्यावधीच्या निधीवर अनेक महिने बसून.

वेळिच उपाययोजना केली असती तर दुसर्‍या लाटेची दाहकता कमी झाली असती. कोरोनाची दुसरी लाट भले टाळता नसती आली... पण त्याच्याशी सामनना करण्यासाठीची उपाययोजना तर आखता आली असती?

<< ऑक्सिजन मिळत नाही असे लिहिल्यावर तुरुंगात टाकायची धमकी Angry अरे माणसं आहेत की हैवान ? >>

------- लाख मोलाचा प्रश्न.... " योगी " तरी कसे म्हणवले जाते.

https://m.lokmat.com/national/coronavirus-news-police-snatched-oxygen-cy...

आग्रा शहरातील दुःखद घटना. एका मुलांकडून पोलिसांनी सिलेंडर हिसकावून व्हीआयपी सदस्यास दिला.

गावाची आणि रेल्वे स्टेशनची नावे बदलली तरी रामराज्य आलेच नाही

<< आग्रा शहरातील दुःखद घटना. एका मुलांकडून पोलिसांनी सिलेंडर हिसकावून व्हीआयपी सदस्यास दिला. >.

------- तो व्हिडिओ बघितला... हृदयदावक घटना आहे. आईसाठी ऑक्सिजन नेत होता बिचारा. घटना सत्य असेल तर त्याच्या आईचा खून झाला आहे.... आणि तो गणवेशातील पोलिसांनी केला आहे. राक्षसी राज्य आहे.

राज्य सरकारांना द्यायला विकायला लस कंपन्यांकडे डोस नाहीत. पण बड्या खासगी इस्पितळांत आजपासून १८-४५ वयोग टासाठी लस उपलब्ध झाली आहे. म्हणजे जिथे फायदा जास्त त्यांना लस आधी विकू.

काल पर्यंत 18 + साठी बूकिन्ग ही नव्हते cowin sight वर. आणी आता अचानक 18+ booked असे लाल मार्क मध्ये दिसत आहे. कधी आणी कोणी बुक केले ते. आज सकाळी पण मी चेक केले होते काही च नव्हते. आता cooper nair आणी मुंबईत ले आणी 2 3 gov 18+ साठी booked दिसत आहे. कधी आले आणी कधी बुक झाले.

आम्ही 18-44 ला सेंटर मिळालं म्हणून एकमेकांना सांगेपर्यंत सर्व बुकिंग 3 हॉस्पिटलमध्ये सर्व स्लॉट ला भरली
आता पून्हा मोठ्या प्रमाणात डोस येतील तेव्हा बघू
मी सकाळपासून आरोग्य सेतू डोळ्यांची निरांजने करून बघत होते.

<< राज्य सरकारांना द्यायला विकायला लस कंपन्यांकडे डोस नाहीत. पण बड्या खासगी इस्पितळांत आजपासून १८-४५ वयोग टासाठी लस उपलब्ध झाली आहे. म्हणजे जिथे फायदा जास्त त्यांना लस आधी विकू. >>

----- हेच ते अच्छे दिन आहेत.

सामान्य जनतेच्या जिवाला काहीच किंमत नाही. विविध देशांतून मदतीचा ओघ येत आहे, पुढे पण येत रहाणार आहे- १४० कोटी लोकांसाठी खूप नसणार आहे. पण मिळालेली मदत खरोखरच गरजूंपर्यंत पोहोचेल का? त्यात काळाबाजार करतील ?
रॅमडेसिव्हर आणि काही औषधांच्या किंमती १०-१०० पटींनी काळ्याबाजारांत वाढवल्या आहेत म्हणून वरिल प्रश्न.

हे म्हंजे नोटबंदी सारखं झालं. व्हीआयपींच्या तिजोरीत कोऱ्याकरकरीत नव्या नोटा आणि बाकीचे रांगांमध्ये ढकलाढकली करताहेत.
जिवंतपणी रांगा पण मेल्यावरही रांगाच.
यालाच अच्छे दिन म्हणायचे का?

तो तोरसेकर दात घासणे, अंघोळ करणे या बेसिक गोष्टी तरी करतो की नाही कुणास ठाऊक? मामींनी अजून एकाचा व्हिडिओ शेअर केलेला तोही तसाच वाटला. अशा घाणेरड्या लोकांचे विचारही घाणेरडे त्यात नवल काय. पण मामी तुम्ही करीत रहा असे व्हिडिओ शेअर. कुणी ना कुणी तरी पाहतेच हो.

आम्ही 18-44 ला सेंटर मिळालं म्हणून एकमेकांना सांगेपर्यंत सर्व बुकिंग 3 हॉस्पिटलमध्ये सर्व स्लॉट ला भरली>> काल pcmc twitter handle योगायोगानं पाहिलं तर 3 हास्पिटलांची नावे होती , अगदी 5 व्या मिनिटाला हे ट्विट पाहिलं होतं लगेच कोविन साईट वर संबंधित पिन कोड टाकून पाहिले तेंव्हा सुद्धा काही उपलब्ध नव्हतं. तेंव्हा खरंच काही लसीकरण होणार आहे का आज ह्याबाबतीत शंका आहे.
बाकी हर्षवर्धन मेडिकल वाले डॉकटर आहेत की त्यांनी भक्ती पंथामध्ये पी एच डी मिळवली आहे आणि डॉकटर बिरुद लावलंय? हे रामदेव बाबांबरोबर कोरोनील साठी बसले होते ना? हे तेच ना? ते काय आणि त्या अर्थव्यवस्थेचं प्रत्येक उन्हाळयात लोणचं घालणाऱ्या बाई काय सगळे पूर्ण वाट लावूनच शांत बसणारेत.

फाईल सर्च सुरू केला तर कसे सुरवातीला "No file found" असे डिफॉल्ट स्टेटस असते तसे

18+ booked आणि 45+ booked हे डिफॉल्ट स्टेटस असावे. लस उपलब्ध नाही तरी हे स्टेटस. उपलब्ध होऊन स्लॉट्स उघडतील तेव्हा अमुक अव्हेलेबल असे दाखवतील, आणि पूर्ण स्लॉट्स बुक झाले की परत booked असे.

एवढ्या लसीच उपलब्ध नाहीयत, आणि एवढी उत्पादन क्षमताही नाहीय सध्या.

जून-जुलै पर्यंत गप्प घरात बसलेलं बरं. दुसऱ्या लाटेचा कहर उतरला की मग निवांत लसीकरण करून घ्यावं हे उत्तम.

Pages