जागतिक पातळीवर सर्वच लसींचे समान वाटप व्हावे व लसीकरणाचे प्रमाण वाढून आजारांचे उच्चाटन व्हावे म्हणून
GAVI (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायजेशन) ही शिखर संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न होऊन
कार्यरत असते. मागास राष्ट्रांनाही लस
मिळावी हा या संस्थेचा मुख्य व उदात्त हेतू आहे. यासाठी
" गावी " या संस्थेला बिल अँड मिलिंडा गेट्स
फाउंडेशनसारख्या अनेक बलाढ्य सेवाभावी संस्थांकडून
निधी मिळतो. नुकतेच १५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन इथे " गावी" ने आयोजित केलेल्या " वन वर्ल्ड प्रोटेक्टेड" या इव्हेंटमध्ये बऱ्याच देशांनी मुक्तहस्ताने निधीचे वाटप केले.
तरीही श्रीमंत देशांनी निधी दिला आणि गरीब राष्ट्रांना लसी मिळाल्या एवढे सोपे हे काम होत नाहीं. " गावी" तसेच निधी पुरवठा करणाऱ्या संस्था जेव्हा एखाद्या देशाला लस
निर्मितीसाठी निधी देतात तेव्हा एखाद्या कंपनीच्या लसीला झुकते माप देणे, एखाद्या विशिष्ट कंपनीच्याच लसीची खरेदी
करण्यासाठी दबाव आणणे, आणि अविकसित, मागास देशातील लसीकरण कार्यक्रम ठरवताना तो श्रीमंत व विकसित राष्ट्रांना कसा फायदेशीर ठरेल हे पाहणे असे छुपे, न दिसणारे एजेंडा पुढे ढकलतात.
भारतातील सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी " गावी " ने आगाऊ खरेदीची हमी म्हणून ३०० अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याबदल्यात सीरमने
कमी उत्पन्नाच्या ९२ देशांना जूनपर्यंत १०০ दशलक्ष डोसेस देण्याचा कायदेशीर करार " गावी " आणि गेट्स फाउंडेशन यांच्याशी केला आहे. 'गावी' व्यतिरिक्त सीरम
इन्स्टिट्यूटला भारत सरकारकडून ३ हजार कोटींचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. " गावी" च्या कराराअंतर्गत ७६ देशांना ६०.४ दशलक्ष डोसेस आजवर सीरमने दिले
आहेत. या लसी दिलेल्या देशांमध्ये सौदी अरेबियासारखे श्रीमंत आखाती देशही आहेत. आज सीरम इन्स्टिट्यूटचा एकच कारखाना पुण्यात कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीला आग लागली होती. शिवाय अमेरिकेने सीरमला कच्चा माल देण्यास नकार दिला होता. ( ही रोखलेली निर्यात आताच मागे घेण्यात आली आहे ). अशा स्थितीत सीरमला दिवस रात्र उत्पादन करावे लागत असून " गावी " बरोबर करार केल्यामुळे त्यांनाही सलाम ठोकावा लागत आहे. सीरमच्या कोविशिल्ड या लशीचा तुटवडा यामुळेच भासत आहे. आज सिरम अशा कात्रीत अडकली आहे की स्वतःच्या देश बांधवांना लशी पुरवाव्यात की ९२ देशांची मागणी पूर्ण करावी.
."सगळी श्रीमंत व गरीब राष्ट्रे मिळून एकत्रित लस खरेदी करू,"असे " गावी " म्हणत असताना अमेरिका व ब्रिटनने नोव्हेंबरमध्येच लस तयार करणाऱ्या - फायजर, मॉडर्ना व
जॉन्सन अँड जॉन्सन या तीन मुख्य कंपन्यांना अब्जावधी
डॉलर्स देऊन बहुतांश डोस "प्री बुक' केले. रशिया आणि चीनने स्वतःच्या बळावर देशी लसी बनविल्या. यामुळे आज
जगात १४ % लोकसंख्या असलेल्या देशांकडे जगातील
८५% लससाठा उपलब्ध आहे. अमेरिकेने ५०% व इंग्लंडने
६०% लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतात एक डोस मिळालेल्यांचे प्रमाण ५.२ % व दोन्ही डोस मिळालेल्यांचे प्रमाण १ % एवढे कमी आहे. ज्या देशातून जी मिळेल ती लस खरेदी करणे आणि प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर देणे आवश्यक असताना, भारतात लसीकरण केंद्रांवरून अनेक जण लसीअभावी
परतताना दिसत आहे. भारत बायोटेक या काही अंशी देशी संस्थेचा लस निर्मितीतील सहभाग आज केवळ १०% आहे. भारताने १० हजार कोटी रुपये हे अर्थसंकल्पात लसीसाठी निश्चित केले आहेत. पण यापैकी बहुतांश निधी हा खाजगी
कंपन्या व परदेशी लसी खरेदीसाठी खर्ची पडणार आहे.
हाफकिन इन्स्टिट्यूट - मुंबई, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट - कसौली, पाश्चर इन्स्टिट्यूट, कुन्नूर, किंग इन्स्टिट्यूट - चेन्नई या भारत सरकारच्या लस तयार करणाऱ्या संस्थांचा उपयोग करुन घेतला पाहिजे. असे केले तरच सर्वांचे लसीकरण होऊ शकेल अन्यथा एकशे तीस कोटी जनतेचे लसीकरण कसे आणि केंव्हा होईल त्याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो. त्यामुळेच १ मे २०२१ पासून १८ ते ४५ या वयोगटातील लोकांचे सरसकट लसीकरण करणे केवळ अशक्य आहे.
....
प्रत्येकाने आपल्या घरातील
प्रत्येकाने आपल्या घरातील high risk असलेली व्यक्ती ओळखून तिच्यावर लक्ष केंद्रित करावे.
आपल्याकडे दोनच पर्याय आहेत एकतर कोरोना घ्या किंवा लस घ्या.
लवकरात लवकर ४०% लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे,हे इस्राएल आणि इतर देशांच्या आकड्या वरून समजते.
बहुतांश लसीकरण केंद्रात टोकन पद्धत असते.ज्यात टाईम स्लॉट दिला जातो. पण लोक दिवसभर गर्दी करून थांबत आहेत.
अनु, धन्यवाद!
अनु, धन्यवाद!
अनु, धन्यवाद!
ड पो
फारच सोपी उत्तरे आहेत जटील
फारच सोपी उत्तरे आहेत जटील प्रश्नांवर. उगाच अख्खं जग माथाफोडी करत़य.
म्हाताऱ्या़चं गणित पुढे चालवून - खरं तर कोणिवरही उपचार करूच नयेत. कमी प्रतिकारशक्ती, अन्य आजार असलेले लोक आपोआप मरून जातील. धडधाकट लोक तेवढे उरतील. लोकसंख्येचा भारही कमी होईल.
हव्यात कशाला लशी बिशी ?
आणखी पुढे जाऊन - म्हातारे, अशक्त लोक पकडून त्यांच्यावर वैद्यकीय प्रयोग करावेत. याचा फायदा धडधाकट उत्पादक जनतेला होईल.
(No subject)
देशांचे राष्ट्राध्यक्ष
देशांचे राष्ट्राध्यक्ष,पंतप्रधान,मंत्री,ही सर्व म्हातारी च माणसं आहेत.
जगभरातील मोठमोठ्या उद्योग समूहाचे मालक म्हातारी च माणसं आहेत.
अतिशय हुशार असे शास्त्रज्ञ,हुशार डॉक्टर्स हे सर्व म्हातारी च लोक आहेत..
म्हाताऱ्या व्यक्ती वीणा जगाचा गाडा चालणे अशक्य आहे.
त्यांनाच जगवले पाहिजे .
नको. त्यांच्यापासूनच भार कमी
नको. त्यांच्यापासूनच भार कमी करायला सुरुवात करा.
ट्रूडो, जेसिंडा आर्डेन सारखे तरुण नेते आहेत की.
आणि तुम्ही आम्ही असे निर्णय
आणि तुम्ही आम्ही असे निर्णय घेणारे कोण म्हणा ?>> स्वतःहून निर्णय घ्यावा आणि घरातील इतरांना/ नातेवाईकांना सांगावा असच म्हटलय मी.
हा विचार चुकीचा आहे म्हणता? मग ज्यांचे उमेदीचे दिवस आहेत, काही करून दाखवायचे, शेती, व्यवसाय, संशोधन, शिक्षण, समाजसेवा, करिअर यातलं काहीही करून दाखवायचे दिवस आहेत, त्यांनी पुढची ४-५ वर्ष घरात बसून काढावी हा विचार बरोबर वाटतो का?
लसीकरण वेगाने करावे वगैरे विचार चांगले आहेत, पण ते अंमलात आणायला किती कठिण आहेत हे वरचा लेख वाचून जाणवत नाहीये का?
इतर देशांत लसीकरणाची स्थिती
इतर देशांत लसीकरणाची स्थिती काय आहे?
किती टक्के लोकांचं लसीकरण झालंय?
अमेरिकेत अनेक राज्यात ५०%
अमेरिकेत अनेक राज्यात ५०% झालेलं आहे. युरोपातही अनेक देशात ६०% च्या जवळपास आहे. त्यामुळे आत्तापर्यंत दिलेल्या लशी जर खरच effective असतील तर तिथे तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. आणि लशी effective नसतील तर पहिल्या २ लाटांमधून व्यवस्थित धडा शिकून त्या देशांनी आपल्या आरोग्यव्यवस्था बळकट करायला सुरवातही केली असेल.
याउलट काही लोकांनी आत्ताच या फोरमवर, "युरोपात तिसरी लाट आली तर आपल्याकडे ही येईल" असे मत व्यक्त केले आहे. सामान्य जनतेच्या भाबडेपणाचा हा अजून एक नमुना.
ज्यांच्यावर कुटुंबातले इतर
ज्यांच्यावर कुटुंबातले इतर लोक अवलंबून नाहीत आणि ज्यांचे बर्यापैकी आयुष्य जगून झाले आहे, आयुष्यात आता फार काही करायची/ मिळवायची उमेद राहिली नाही अश्या लोकांनी स्वतःहून hospitalization ला विरोध करावा.>>> +७८६. दाभडकर सरांची स्टोरी नेमके हेच सांगू पाहत आहे पण कुणी म्हणून लक्ष देईना. आता इतर म्हातारे सोडा पण ज्यांनी आयुष्यभर सतरंज्या उचलून संघ, भाजप वाढवला त्यांच्याच जीवावर त्यांचेच लोक उठले आहेत असेही काही कर्मदरिद्री म्हणावयास कमी करायचे नाहीत.
(No subject)
मोदीजींचे वर ७० वर आहे
मोदीजींचे वर ७० वर आहे त्यांना वाचवायचा का सोडून द्यायचे ? बाकी प्रोटोकॉल साठी हे पहा https://en.wikipedia.org/wiki/Triage
Submitted by भरत. on 29 April
Submitted by भरत. on 29 April, 2021 ->>> Couldn't agree more
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री अहोरात्र काम करताना दिसत आहेत, पण केंद्रात आरोग्यमंत्री आहेत की नाही तेच कळत नाही.
खरंय. महाराष्ट्राचे
खरंय. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासारखा आरोग्यमंत्री असल्यामुळेच कोरोना आटोक्यात येऊ शकला. इतर राज्यात काय हाहाकार उडाला आहे हे आपण पहातोच आहे.
Soha,pahila experiment tumhi
Soha,pahila experiment tumhi tumche aai vadil,saasu sasare yanchyavar Kara.
हाहाकार! एकामागोमाग 3 भाजप
हाहाकार! एकामागोमाग 3 भाजप आमदारांचा कोरोनाने मृत्यू; मुलाने योगी व मोदी सरकारला झोडपले https://globalnewsmarathi.com/wow-corona-kills-3-bjp-mlas-in-a-row-the-b...
गरज नसताना हॉस्पिटलला जाणे
गरज नसताना हॉस्पिटलला जाणे टाळणे पटकन विचार केला तर लॉजिकल वाटते. पण ते कधी? तर जेव्हा गरज निर्माण होईल तेव्हा उपचार मिळण्याची बर्यापैकी खात्री असेल तेव्हा!
सध्या महाराष्ट्र्रातील परिस्थिती अशी आहे की गरज निर्माण झाल्यावर बेड, ऑक्सिजन, हवी ती औषधे मिळवायला प्रचंड धावपळ करायला लागत आहे. हे मुंबई/ ठाण्यात. बाकी टिअर टू/ गावांत याहुन बेकार परिस्थिती असेल. लक्षणे दिसत आहेत, पण टेस्टिंग सेंटरच मिळत नाहीये. का? तर ७२ तास कोव्हिड टेस्ट करणं ठाण्यातील सगळ्या लॅबनी बंद केलय, कारण पहिल्या केलेल्या टेस्टचे रिपोर्ट अजुन प्रोसेस झाले नाहियेत. जोवर कोव्हिड रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाही तोवर कोव्हिड सेंटरला अॅडमिट होता येत नाही.
एकदा टेस्ट केली तर निगेटिव्ह आली, पण चेस्ट एक्सरे खराब आलाय. पण टेस्ट पॉझिटिव्ह नाही त्यामुळे बेड नाही. दुसरी टेस्ट करायला आणि रिझल्ट यायला वेळ आहे. तोवर नशिबाने एक नॉन कोव्हिड हॉस्पिटल अॅडमिट करायला तयार झालं. तोवर पेशंटला घेऊन वणवण. बरं पेशंट ४०'ज मधला आहे. जगवावं ना? का मरू द्यावं? अजुन २० वर्षे मोठा असता तर घरीच मरू दिलं असतं ना?
आणि अशावेळी हॉस्पिटल मध्ये जाऊन केऑस आणखी वाढेल हे समजतंय. पण म्हणून घरी हातावर हात घेऊन बसणार का? तुमच्यावर अशी वेळ न येवो!
खूप वाईट परिस्थिती आहे सध्या.
खूप वाईट परिस्थिती आहे सध्या.
व्यवस्थांवर ताण आहे. एक यशस्वी बिझनेसमन, उमदं व्यक्तीमत्व, बर्याच ठिकाणी ओळखी असलेलं एकश्रीमंत, अनुभवी आणी ज्ञानी व्यक्तीमत्व रेमिडेसीवीर वेळेत न मिळाल्याने आणि लंग स्कोअर जास्त (छिद्रं जास्त, नक्की शब्द आठवत नाहीये) झाल्याने गेलं.
आमचे डायरेक्टर, अमेरिकेत शिकलेले, २५ वर्षं एका कंपनीत काम केलेले, अनेक मॅरेथॉन धावलेले आणि हेल्दी, करोनाने गेले.
व्हायरस आहे तो कोणाला यमसदनी
व्हायरस आहे तो कोणाला यमसदनी पाठवेल ह्याची काहीच खात्री नाही.
सशक्त आहे म्हणून मरणार नाही corona मुळे असे काही नाही.
सशक्त असू नाही तर कोणी पण काहीच अंदाज लावता येणार नाही
>>दिलेल्या लशी जर खरच
>>दिलेल्या लशी जर खरच effective असतील तर तिथे तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे<<.
लशी या मूळात रिअॅक्टिव असतात, प्रोअॅक्टिव (वन साइझ फिट्स ऑल) नाहि. तिसरी लाट येणार कि नाहि ते लशींवर अवलंबुन नाहि.
>>आणि लशी effective नसतील तर पहिल्या २ लाटांमधून व्यवस्थित धडा शिकून त्या देशांनी आपल्या आरोग्यव्यवस्था बळकट करायला सुरवातही केली असेल.<<
याचं उत्तर जगभरात फ्लु वॅक्सिन कसं मॅनेज केलं जातं यात सापडेल. गोवर, कांजण्या, गालगुंड, पोलियो इ. चे जिनोम सहसा बदलत नाहित, म्हणुन त्यांची इम्युनिटि लाइफलाँग असते. याउलट, फ्लु, टेटनस, आणि आता कोविड यांच्यात सतत बदल होत असल्याने त्यांचे शॉट्स वारंवार घ्यावे लागतात...
परिस्थिती काही वाईटबिईट
परिस्थिती काही वाईटबिईट नाहीए. भारताचा कोव्हिड मृत्यू दर जगात सगळ्यात कमी आहे. भारत सगळ्यात जास्त लोकांचे लसीकरण करतो आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.
भारताची प्रतिमा जगभरात मलीन करण्याच्या कारस्थानाला बळी पडू नका.
हर्शवर्धन ला राजेश टोपेंकडे
हर्शवर्धन ला राजेश टोपेंकडे शिकवणी लावायला हवी. भारताचा मृत्युदर सर्वात कमी आहे असं हर्शवर्धनला का वाटत? यु.पी., बिहार , गुजरात मधे स्मशानं कमी पडत आहेत तरी त्यां राज्यात किरकोळ संख्येने कोविडने मेले अशा नोंदी आहेत. आकडे मॅनेज करून मृत्युदर खोटा दाखवता येऊ शकतो पण मग स्मशानं पत्र्यांनी बंदिस्त करून सत्य का लपवले जात आहे..? कोंबडा झाकला तरी सूर्य उगवायचा रहात नाही... खरी आकडेवारी जरी समोर आली नाही तरी काय परिस्थिती आहे हे तिथले लोकच सांगत आहेत. लखनऊ, नोएडा मधे पेशंटचे नातेवाईक रास्ता रोको करुन आपल्या प्रश्नांना वाचा फोडत आहेत अन मिडिया ते दाखवत नाही... खोटं कितिही झाकलं तरी ते उघडं पडणारच..!
<< महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री
<< महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री अहोरात्र काम करताना दिसत आहेत, पण केंद्रात आरोग्यमंत्री आहेत की नाही तेच कळत नाही. >>
------- Union health minister Dr Harsh Vardhan - " there is no need to run here and there and panic for oxygen as the majority of the patients can be cured at home while being in touch with a doctor.
ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्यांनी ते घ्यावे परंतु एखाद्याला अज्ञानामुळे त्याला / तिला ऑक्सिजनची आवश्यकता आहे असे वाटत असेल तर ते ठीक नाही. "
https://www.hindustantimes.com/india-news/not-saying-this-just-as-health...
मंदिरे उघडा म्हणुन आंदोलन
मंदिरे उघडा म्हणुन आंदोलन करणाऱ्यांनी राज्याला पुरेशी लस मिळावी म्हणुन प्रयत्न केले असते तर...
हर्शवर्धनच्या डॉक्टरकीच्या
हर्शवर्धनच्या डॉक्टरकीच्या डिग्र्या तरी खर्या आहेत का हे स्टिंग ऑपरेशन ने बघावं लागेल. शिक्षणाच्या खोट्या डिग्र्या दाखवणारा फेकाडा पंप्र अन तडिपार गृहमंत्री अन त्यात असं सांगणारा आयोग्यमंत्री असेल तर या देशाचे आरोग्य धोक्यात आहे असंच म्हणावं लागेल.
ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता
ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्यांनी ते घ्यावे परंतु एखाद्याला अज्ञानामुळे त्याला / तिला ऑक्सिजनची आवश्यकता आहे असे वाटत असेल तर ते ठीक नाही. ">> असे विचार असतील तर मग सगळं रामभरोसेच आहे.
डॉक्टर हर्षवर्धन यांची
डॉक्टर हर्षवर्धन यांची वक्तव्ये अत्यंद दिलासादायक, आश्वासक इ.इ आहेत.
डॉक्टर हर्षवर्धन यांची
डॉक्टर हर्षवर्धन यांची वक्तव्ये अत्यंद दिलासादायक, आश्वासक इ.इ आहेत.>> भक्तांसाठी
Pages