जागतिक पातळीवर सर्वच लसींचे समान वाटप व्हावे व लसीकरणाचे प्रमाण वाढून आजारांचे उच्चाटन व्हावे म्हणून
GAVI (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायजेशन) ही शिखर संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न होऊन
कार्यरत असते. मागास राष्ट्रांनाही लस
मिळावी हा या संस्थेचा मुख्य व उदात्त हेतू आहे. यासाठी
" गावी " या संस्थेला बिल अँड मिलिंडा गेट्स
फाउंडेशनसारख्या अनेक बलाढ्य सेवाभावी संस्थांकडून
निधी मिळतो. नुकतेच १५ एप्रिल रोजी वॉशिंग्टन इथे " गावी" ने आयोजित केलेल्या " वन वर्ल्ड प्रोटेक्टेड" या इव्हेंटमध्ये बऱ्याच देशांनी मुक्तहस्ताने निधीचे वाटप केले.
तरीही श्रीमंत देशांनी निधी दिला आणि गरीब राष्ट्रांना लसी मिळाल्या एवढे सोपे हे काम होत नाहीं. " गावी" तसेच निधी पुरवठा करणाऱ्या संस्था जेव्हा एखाद्या देशाला लस
निर्मितीसाठी निधी देतात तेव्हा एखाद्या कंपनीच्या लसीला झुकते माप देणे, एखाद्या विशिष्ट कंपनीच्याच लसीची खरेदी
करण्यासाठी दबाव आणणे, आणि अविकसित, मागास देशातील लसीकरण कार्यक्रम ठरवताना तो श्रीमंत व विकसित राष्ट्रांना कसा फायदेशीर ठरेल हे पाहणे असे छुपे, न दिसणारे एजेंडा पुढे ढकलतात.
भारतातील सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या उत्पादनासाठी " गावी " ने आगाऊ खरेदीची हमी म्हणून ३०० अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याबदल्यात सीरमने
कमी उत्पन्नाच्या ९२ देशांना जूनपर्यंत १०০ दशलक्ष डोसेस देण्याचा कायदेशीर करार " गावी " आणि गेट्स फाउंडेशन यांच्याशी केला आहे. 'गावी' व्यतिरिक्त सीरम
इन्स्टिट्यूटला भारत सरकारकडून ३ हजार कोटींचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. " गावी" च्या कराराअंतर्गत ७६ देशांना ६०.४ दशलक्ष डोसेस आजवर सीरमने दिले
आहेत. या लसी दिलेल्या देशांमध्ये सौदी अरेबियासारखे श्रीमंत आखाती देशही आहेत. आज सीरम इन्स्टिट्यूटचा एकच कारखाना पुण्यात कार्यरत आहे. काही दिवसापूर्वी नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीला आग लागली होती. शिवाय अमेरिकेने सीरमला कच्चा माल देण्यास नकार दिला होता. ( ही रोखलेली निर्यात आताच मागे घेण्यात आली आहे ). अशा स्थितीत सीरमला दिवस रात्र उत्पादन करावे लागत असून " गावी " बरोबर करार केल्यामुळे त्यांनाही सलाम ठोकावा लागत आहे. सीरमच्या कोविशिल्ड या लशीचा तुटवडा यामुळेच भासत आहे. आज सिरम अशा कात्रीत अडकली आहे की स्वतःच्या देश बांधवांना लशी पुरवाव्यात की ९२ देशांची मागणी पूर्ण करावी.
."सगळी श्रीमंत व गरीब राष्ट्रे मिळून एकत्रित लस खरेदी करू,"असे " गावी " म्हणत असताना अमेरिका व ब्रिटनने नोव्हेंबरमध्येच लस तयार करणाऱ्या - फायजर, मॉडर्ना व
जॉन्सन अँड जॉन्सन या तीन मुख्य कंपन्यांना अब्जावधी
डॉलर्स देऊन बहुतांश डोस "प्री बुक' केले. रशिया आणि चीनने स्वतःच्या बळावर देशी लसी बनविल्या. यामुळे आज
जगात १४ % लोकसंख्या असलेल्या देशांकडे जगातील
८५% लससाठा उपलब्ध आहे. अमेरिकेने ५०% व इंग्लंडने
६०% लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतात एक डोस मिळालेल्यांचे प्रमाण ५.२ % व दोन्ही डोस मिळालेल्यांचे प्रमाण १ % एवढे कमी आहे. ज्या देशातून जी मिळेल ती लस खरेदी करणे आणि प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर देणे आवश्यक असताना, भारतात लसीकरण केंद्रांवरून अनेक जण लसीअभावी
परतताना दिसत आहे. भारत बायोटेक या काही अंशी देशी संस्थेचा लस निर्मितीतील सहभाग आज केवळ १०% आहे. भारताने १० हजार कोटी रुपये हे अर्थसंकल्पात लसीसाठी निश्चित केले आहेत. पण यापैकी बहुतांश निधी हा खाजगी
कंपन्या व परदेशी लसी खरेदीसाठी खर्ची पडणार आहे.
हाफकिन इन्स्टिट्यूट - मुंबई, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट - कसौली, पाश्चर इन्स्टिट्यूट, कुन्नूर, किंग इन्स्टिट्यूट - चेन्नई या भारत सरकारच्या लस तयार करणाऱ्या संस्थांचा उपयोग करुन घेतला पाहिजे. असे केले तरच सर्वांचे लसीकरण होऊ शकेल अन्यथा एकशे तीस कोटी जनतेचे लसीकरण कसे आणि केंव्हा होईल त्याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो. त्यामुळेच १ मे २०२१ पासून १८ ते ४५ या वयोगटातील लोकांचे सरसकट लसीकरण करणे केवळ अशक्य आहे.
....
पूनावाला लंडनवाला झाले त्याची
पूनावाला लंडनवाला झाले त्याची गोष्ट
उद्य खरं आहे हे
उदय खरं आहे हे
माझा पहिला डोस (कोविशिल्ड) झाला, त्याच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो आहे
का??? माहिती नाही
मी खाजगी रुग्णालयात, पैसे देऊन डोस घेतला तरीही
सगळीकडे फोटोची हौस दुसरं काय?
आता दुसरा डोस मिळायची मात्र पंचाईत करून ठेवलीय
ब्लॅक कॅट, सुखदा बरोब्बर लिहिलेत
माझे दोन डोस झालेत.
माझे दोन डोस झालेत. सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो आहे.
माझे दोन डोस झालेत.
माझे दोन डोस झालेत. सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो आहे.
भारतात येते काही महिने
भारतात येते काही महिने लसटंचाई असेल - पूनावाला
भारत बायोटेकची निर्मिती क्षमता नक्की किती आहे?
१८-४५ वयोगटासाठी राज्य सरकार
१८-४५ वयोगटासाठी राज्य सरकार लस खरेदी करणार आहे. या लोकांना मिळणार्या सर्टिफिकेटवर त्या त्या मुख्यमंत्र्यांचा फोटो असेल का?
बड्या हॉस्पिटल चेन्समध्ये १८-४५ साठी लस उपलब्ध झाली आहे. अर्थात किंमत अधिक.
एका मंदीरा साठी मागितलेल्या
भिकांचा पैसा आता मागतकरी लशींसाठी वापरतील. है काय अन नै काय... स्वतःच्या पोटाला चिमटा थोडीच बसणारै..? निर्लज्जपणे ४० पैशात भाटगिरी करण्यासाठी सदैव तत्पर..!!
डीजे, कृपया भलते मुद्दे इथे
डीजे, कृपया भलते मुद्दे इथे आणू नका. कोव्हिडबद्दलचे दोन धागे आधीच उडाले आहेत. हा तरी चालू द्या.
मी माझाही प्रतिसाद संपादित केला आहे.
भरत. योग्य तोह बदल केला आहे.
भरत. योग्य तोह बदल केला आहे.
बड्या हॉस्पिटल चेन्समध्ये १८
बड्या हॉस्पिटल चेन्समध्ये १८-४५ साठी लस उपलब्ध झाली आहे. अर्थात किंमत अधिक. >>
याचे बुकींग सुद्धा कोविन ऍप थ्रू होते किंवा कसे?
आमच्याकडे तर १८-४५, किंवा ४५+ कुठलेच बुकिंग कोवीन ऍपवर मिळत नाहीय. मिळाले तरी उपयोग नाही, केंद्रावर एक तर लस त्या दिवशी उपलब्ध नसतेच अथवा असली तरी ते कोविन प्रमाणे नाही जात, हाजीर सो वजीर - सकाळी रांगेत सगळे टोकन्स देऊन टाकतात.
मुंबै मनपाने २८ पासून ४५+
मुंबै मनपाने २८ पासून ४५+ साठी लसीकरण बंद केले आहे. १ पासून ५ केंद्रांवर प्रत्येकी ५०० डोस फक्त १८-४५ साठी उपलब्ध असतात. काल कोव्हिन अॅपवर किती वाजता स्लॉट ओपन होतील ते त्यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्यानुसार फास्टेस्ट फिंगर + लक वाल्या लोकांचे स्लॉट बुक झाले.
केंद्राने मार्चनंतर लशींची नवी ऑर्डर दिलेली नाही. आधीच्या ऑर्डरची डिलिव्हरी १५ मे पर्यंत पूर्ण होईल असं आताच वाचलं.
४५+ ची पूर्ण जबाबदारी तरी केंद्र पूर्ण करतंय का त्यांनाच ठाउक.
२८ आधीचे काही दिवस ४५+ लोक दुसर्या डोससाठी तासतास रांगेत उभे राहत होते. त्यामुळे पुरेसा साठा येईतो मुंबै मनपाने त्यांचे लसीकरण थांबवले आहे.
मी 18-45 घेतली ती फ्री होती
मी 18-45 घेतली ती फ्री होती
अर्थात स्लॉट प्रचंड वेगाने भरतात आणि अगदी कमी असतात.1 जागा आहे पाहून क्लिक करेपर्यंत भरते.
मला वाटते जून मध्ये हे थोडं सोपं होईल
पुण्यात 45 अधिक वाल्यांचे फ्री आणि पे खूप स्लॉट आहेत
इंदापूर ला काल 200 उपलब्ध फ्री जागा दिसल्या.(इंदापूर चे 45-6० लोक वेगवेगळ्या जागी गेले असावे नोकरी साठी.)
आमचा घरच्यांसाठी 18-45 स्लॉट शोधण्याचा खेळ चालू आहेच.
अगदी खुप खटपट करून न मिळाल्यास कंपनी कडून काही योजना येईपर्यंत थांबावे लागेल.
थोडे दिवस थांबणॅ श्रेयस्कर
थोडे दिवस थांबणॅ श्रेयस्कर आहे. आता कोरोना एकदम टिपेवर आहे. असल्या भयंकर काळात कुटुंबियांना जीव धोक्यात घालून लशीकरण करवणे महागात पडू शकते. जून-जुलै मधे लस घेतली म्हणुन काही फरक पडणार नाही. जी काळजी आपण मागील वर्षापासून घेत आहोत तीच अजुन २-३ महिने घेतली तर आपणाला काहीही होणार नाही यावर विश्वास ठेवला पाहिजे पण आताच्या लशींच्या गोंधळत आपला जीव धोक्यात घालता कामा नये..!
राज्य सरकार फ्रीच देतं आहे.
राज्य सरकार फ्रीच देतं आहे. पण सिरमवाले केंद्रापेक्षा राज्याला अधिक पैसे लावताहेत. प्रायव्हेट हॉस्पिटल्सना त्यापेक्षा जास्त.
18-45 तरी सोशल डिस्टन्स पाळून
18-45 तरी सोशल डिस्टन्स पाळून नीट चालू होते काल.हे सर्व केंद्रांवर नीट चालेल का ते मात्र माहीत नाही.
60 अधिक ला सिनियर सिटीझन्स च्या वेळी प्रचंड गोंधळ होता.रजिस्ट्रेशन आणि वॉक इन दोन्ही प्रकारचे लोक होते.बराच आरडाओरडा, 2-3 हुशार लोकांनी शिस्त लावणे हे केल्यावर त्यांच्या 2 लस झाल्या.
हेच कोव्हीशिल्ड हाफकिन कडून
हेच कोव्हीशिल्ड हाफकिन कडून करवून घेतलं असतं तर कमी खर्चात तयार झालं असतं अन फुकटात मिळालं असतं. भाजप्यांचे खासदार-आमदार-नगरसेवक यांचं सीरम आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्स सोबत नक्कीच साटंलोटं असणार.
थोडे तरी नियोजन करा रे....
थोडे तरी नियोजन करा रे....
१८+ साठी वॅक्सिन जाहिर करण्याअगोदर.... आहेत का तेव्हढे वॅक्सिन उपलब्द ?
नसतील तर गर्दी नाही का होणार? नसेल कुठे झाला कोरोना तर त्या गर्दित / अनेक तास रांगेत उभे राहिल्याने होणार.
टप्या टप्प्याने वय कमी करा ना ?
जे दवाखन्यात / फ्रन्ट वर काम करत आहेत त्यांना प्राधान्य. मग वयानुसार आधी ८० +, नंतर चार दिवसांनी ७५+... ४० . शेवटी १८+.
लसीकरणाचे राजकारण खेळत खेळत १०० कोटी लोकांना ( १८+ च्या वर असणार्यांचा एक ठोबळ आकडा किती आहे ? मला माहित नाहे !) सर्वांना लसी द्यायला अनेक महिन्यांचा कालावधी लागेल.
भारतात तयार होणार्या लसींना काही काळ तर लागेल - सर्वांना लसी पुरवण्यासलसी/ मिळवल्यावर त्याचे वितरण करण्यासाठी अनेक महिन्यांन चा मौलिक काळ वाया जाईल त्यापेक्षा जगाच्या बाजारातून उपलब्द आहेत त्या सर्व लसी मागवा, विकत घ्या.
हे असे करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे.... उगाचच Thank you Thank you... करत बसू नका.
१८-४५ मध्ये ज्यांना स्लॉट
१८-४५ मध्ये ज्यांना स्लॉट मिळालाय तेच येतील तसंच हे स्लॉट बहुतेक अधिक स्पेसिफिक आहेत. दुपार आधी, दुपारनंतर असे नाहीत. त्यामुळे एका वेळी जास्त लोक येणार नाहीत. तसंच यांना सोबत कोणी असायची गरज नाही. ६०+ लोक एकटे येऊ शकत नाहीत. त्यामुळे अधिक गर्दी.
<< १८-४५ मध्ये ज्यांना स्लॉट
<< १८-४५ मध्ये ज्यांना स्लॉट मिळालाय तेच येतील तसंच हे स्लॉट बहुतेक अधिक स्पेसिफिक आहेत. >>
---- हे छान आहे.
कुठेतरी सांगायचे म्हणून इथे..
कुठेतरी सांगायचे म्हणून इथे...
https://indianexpress.com/article/cities/delhi/coronavirus-batra-hospita...
या सिलेंडरसना (वाहतूकीच्या दरम्यान) कॅप असणे गरजेचे आहे. (अ) बहुतेक वेळा त्या लावलेल्या दिसतच नाही. (ब) अत्यंत हलगर्जी पणे हे सिलेंडर्स हाताळले जात आहेत. गाड्यां मधून जमिनीवर ढकलणे/ भिरकावणे, रस्त्याने ढकलत (पायाने मारायचे) नेणे.... regulator जिथे लागणार आहे तो भाग निकामी झाला तर गळती ची शक्यता नाही का?
मोठी रक्कम दिली आणि सिलेंडर मिळाले / मिळविले पण पुढे लिक झाले तर ज्या कामासाठी जिवाचे रान केले, मेहनत घेतली ते सर्व वाया जाणार. आपल्या पेशंटला/ गरजू व्यक्तीला ऑक्सिजन द्यायचा आहे, हवेत सोडायचा नाही आहे.
(शक्य असल्यास ) कॅपचा आग्रह धरणे - मिळाल्यास ने - आण करतांना जरुर लावा. कार्ट /ट्रॉली मिळाल्यास उत्तम, नाही तर किमान दोन लोकां नी हाताच्या साखळी करुन न्या.
ही कोविनची व्यवस्था इतकी
ही कोविनची व्यवस्था इतकी मूर्खासारखी डिझाईन केली आहे की त्या माणसाला ignobel prize मिळायला हरकत नाही. Everything about it is flawed. जेव्हा नेते हुशार आणि दुष्ट (evil) असतात तेव्हा ते सिस्टीम दुबळी आणि मूर्ख करून ठेवतात. कोविन हे एक परफेक्ट उदाहरण आहे.
जेव्हा नेते हुशार आणि दुष्ट
जेव्हा नेते हुशार आणि दुष्ट (evil) असतात.>>>..>
How so appropriate !!!!!
Online registration ची सोय
Online registration ची सोय केंद्रा वर गर्दी होऊ नये म्हणून केले आहे. पण त्याचा काही उपयोग नाही. कारण बूकिन्ग केल्यावर लस उपलब्ध नाही म्हणून परत पाठवतात. आणी नंतर परत लस आल्यावर 3 4 दिवसाची बूकिन्ग केलेली लोक एकत्र. जर लस नाही च आहे तर cowin वर बूकिन्ग available कशाला केले आहे? इकडे 1 मे च्या बूकिन्ग लोकाना लस नाही म्हणून परत पाठवतात. आणी cowin वर 8 मे पर्यंत चे बूकिन्ग फुल आहे . मूर्ख पणा चालु आहे सगळा.
पहिला डोस घेतलेल्या ना दुसरा डोस मिळत नहिये.
आता केंद्रा वर किती म्हातारी लोक येउन परत जात होती. काही लोकां कडे वाहनाची सोय नव्हती कसे बसे आले होते.
याउलट 18-44 ला बूकिन्ग केल्यावर लगेच दुसरे दिवशी लस मिळत आहे.
म्हणुनच सांगतोय घरी बसा...
म्हणुनच सांगतोय घरी बसा... ह्या भाजप्यांकडे अशा लोकोपयोगी योजना राबवण्याचा कसलाही अनुभव नाही ते नाहीच परंतु सर्वसामान्यांच्या हिताचं काहीतरी करण्याची विचारधारा देखिल नाही. त्यांची नसलेली बुद्धी फक्त हिंदु-मुस्लिम, ३७०, राम मंदीर, पाकिस्तानी-बांग्लादेशी यांतच खर्च होते.
केंद्राने लशींसाठी कोणतीही उपाय योजना केलेली नाही. लशी उपलब्धच नाहीत. कोरोनाच्या कहर काळात लस घ्यायला केंद्रांवर जाउ नये हाच एकमेव उपाय आपल्या समोर आहे.
Govt thought Covid is under
Govt thought Covid is under control and did not place enough orders. So, the SII didn't anticipate it has to produce more than a billion doses a year and hence didn't increase the production capacity. Vaccine shortage to continue till July: Adar Poonawalla
mi_anu , तुम्ही पुण्यात लस
mi_anu , तुम्ही पुण्यात लस घेतली हे वाचले.स्लॉट कधी ओपन होतात हे कसे कळले ? सतत अॅप बघत राहणं शक्य नाहिये.
कधीही पाहिलं की स्लॉट भरलेलेच दिसत आहेत.
मुंबई मधे ट्वीटर वर स्लॉट ओपन झालेले कळते म्हणे. तशी काही सोय पुण्यात आहे का ?
भारत बायोटेकला याच्या पाव
भारत बायोटेकला याच्या पाव पटीत ऑर्डर दिली असेल तर किती लोकांचं संपूर्ण लसीकरण होईल?
स्मिता,
स्मिता,
सध्या 45 प्लस ला भरपूर स्लॉट आहे
18-44 चे शास्त्र मला कळलेले नाहीय
पण ते कधीही अपडेट होतात.प्रत्येक हॉस्पिटलमध्ये उद्याचा स्टोक बघून वेगवेगळे अपडेट होतात
त्यामुळे 6 नंतर एक माणूस रिफ्रेश आणि चेक करायला बसवा ☺️
आमच्याकडे घरातल्या लहान मुलांनी हे काम आनंदाने अंगावर घेतले आहे.
यातही काही मेथड इन मॅडनेस असेल, पण मला अजून मिळालेली नाही.
45 प्लस ला फक्त स्लॉट आहेत
45 प्लस ला फक्त स्लॉट आहेत पण प्रत्यक्ष केंद्रावर गेल्यावर तिथे लस उपलब्ध नाही म्हणून परत पाठवतात. याउलट 18-44 ला कमी आहे स्लॉट पण त्यानां लगेच लस मिळते केंद्रावर गेल्यावर.
माझ्या एका मैत्रिणी ने पहाटे 4 वाजता 18-44 बुक केले आणी पहिल्या दिवशी नंबर लावला.
नेट चा स्पीड चांगला पाहिजे.
Dj, फक्त २८-४५ चं लसीकरण
Dj, फक्त २८-४५ चं लसीकरण सध्या मुंबैत चाललंय. ते मु़बै मनपा ठरवते.
त्यांनी आताच जाहीर केल़य की उद्या ४५+ साठी दुसऱ्या डोस साठी walk in असेल. सेंटर्स ची यादी जाहीर व्हायची आहे.
एका खाजगी इस्पितळाने कळवल़ंय की तूर्तास त्यांना लशींचा साठा मिळणार नाहीए. सरकार त्यांनी भरलेले पैसेही परत करते आहे
Pages