आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालची मॅच फारश्यी बघितली नाही त्यामुळे नो कॉमेंट्स!

>>फार तर व्होरा च्या जागी जैस्वाल आणि मुस्तफिझूर ऐवजी टाय एव्हढेच ऑप्शन्स आहेत
व्होराला बसवायलाच पाहिजे..... मुस्तफिझुर बरी करतोय की बॉलींग.
ट्रॅक रेकॉर्ड बघता आज संजूची मॅचविनींग खेळी असेल असे वाटतेय.... इथे एखाद दोन मॅच सलग जिंकतील आर आर आणि मग परत त्यांच्या फॅन्सना आशा लावून जातील Wink

व्होरा च्या जागी जैस्वाल आला. जरा सुरूवातीला गडबड झाली होती (कॅच सुटला, एक रन-आऊट ची संधी दवडली), पण त्या नरिनच्या कॅचने त्याला आत्मविश्वास दिला असावा. अजून एक गुणी युवा खेळाडू आहे जैस्वाल ज्याला ‘यशस्वी’ झालेलं पहायला आवडेल.

त्रिपाठी चांगला खेळलाय, पण दुसर्या बाजूने त्याला साथ मिळत नाहीये. नरिन ला चौथ्या क्रमांकावर पाठवणं हे स्ट्रॅटेजिक ब्लंडर वाटतं. ओपनिंग - किंवा अगदीच पहिली विकेट पहिल्या दोन ओव्हर्स मधे पडल्यास तिसर्या क्रमांकावर तो आला आणि स्लॉग केलं तर समजू शकतं. पण मॉर्गन, कार्थिक आणि रसेल ला मागे सारून, ७-८व्या ओव्हरला नरिन ने चौथ्या क्रमांकावर येण्यात फारसं तथ्य नाही वाटत.

केकेआर 98-5 ( 16 षटकं ) - कार्तिक- रसेल जोडीची आतां खरी कसोटी, जरा बरीशी धांवसंख्या बोर्डावर लावण्याची! हे सकारियासारखे नवोदित कुठून आणतात इतका आत्मविश्वास !

चला, जिंकले आरआर !
*अजून एक गुणी युवा खेळाडू आहे जैस्वाल ज्याला ‘यशस्वी’ झालेलं पहायला आवडेल. * छान खेळला जयसवाल !
*इथे एखाद दोन मॅच सलग जिंकतील आर आर आणि मग परत त्यांच्या फॅन्सना आशा लावून जातील* - हाच प्लॅन बहुधा कार्यान्वित करतंय आरआर ! पण आज खूप जबाबदारीपूर्वक खेळला सॅमसन, हेही खरं !

"मुस्तफिझुर बरी करतोय की बॉलींग." - अरे हो.. तो चांगलीच करतोय बॉलिंग. मला म्हणायचं होतं की लाईक फॉर लाईक ऑप्शन्स फार कमी आहेत राजस्थान कडे.

"परत त्यांच्या फॅन्सना आशा लावून जातील" - flatter to deceive ही संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल ची टॅगलाईन असावी Happy

"पण आज खूप जबाबदारीपूर्वक खेळला सॅमसन, हेही खरं " - +१.. ज्यांना गरज पडेल तेव्हा मनाजोगते गियर्स बदलता येतात अशा प्लेयर्सकडे मॅच्युरिटी असली तर ते फार मोठे इंपॅक्ट प्लेयर्स होऊ शकतात.

उद्या डबल हेडरः पहिल्या क्रमांकासाठी चेन्नई वि. बंगळूरू आणि दिल्ली वि. लय सापडलीय असं वाटणारे हैद्राबाद!!

जसं जसं हें आयपीएल पुढे सरकतंय, तसं तसं लेग स्पीनरसचं अस्तित्व अधिकाधिक प्रभावी होत चाललंय असं नाहीं वाटत ? ..चाहर, मिश्रा, बिशनोई... पण चहल मात्र अपेक्षाभंगच करतोय !
रशिद अधिकाधिक भेदक होतोय तर नरैनची घसरण त्याच्या ॲकशन बद्दलच्या आक्षेपापासून अजूनही सुरूच आहे.

भाऊ, ह्या यादीत श्रेयस गोपाल चं नाव पहायला पण आवडलं असतं. पण गेल्या दोन सीझन्स मधे त्याचा फॉर्म पार हरपलाय.

>>flatter to deceive ही संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल ची टॅगलाईन असावी Happy

अगदीच!
काल इतक्या छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना पण चार विकेट्स पडाव्यात आणि मॅच १९व्या ओव्हरपर्यंत जावी ही गोष्ट राजस्थानच्या बॅटींग लाईनअप बद्दल बरेच काही सांगते. काल मॅच आवाक्यात आल्यावर जरा जरा आक्रमक खेळून NRR वाढवायला हरकत नव्हती.
काल मिलरही सुरुवातीला खुप चाचपडत होता!
राजस्थानची बॉलिंग मात्र काल चांगली झाली.... बंगलोरविरुध्दच्या मॅचनंतर बॉलर्ससाठी हा कमबॅक महत्वाचा होता. शिवम दुबेला अजुन थोडी बॉलिंग देवून बघितले पाहिजे.... त्यागीला उनाडकटऐवजी एखाद्या मॅचला ट्राय करायलाही हरकत नाही!
सकारियाने घेतलेला दिनेश कार्तिकचा कॅच मस्त होता.... रियान परागने कमिन्सचा झेल पकडल्यावर तिवेटियाबरोबर घेतलेला खोटाखोटा सेल्फी पण मस्त Wink

गिल ला काय झालेय? राणा, त्रिपाठी वगैरे लोक चालले नाहीत की केकेआरची मिडल ऑर्डर गडबडतेय!
मॉर्गंनने बॅट्समन म्हणून आणि कॅप्टन म्हणूनही फारसा प्रभाव पाडलेला नाही!

>>जसं जसं हें आयपीएल पुढे सरकतंय, तसं तसं लेग स्पीनरसचं अस्तित्व अधिकाधिक प्रभावी होत चाललंय

आयपीएल मध्ये नेहमीच ऑफ स्पिनर्स पेक्षा लेग स्पिनर्स चमकत आलेत!

चेन्नई विरुध्द बंगलोर एकदम तुल्यबळ लढत आहे!
बंगलोरचे in form बॅट्समन दीपक चहरसमोर कसा टिकाव धरतायत आणि बंगलोरच्या पेसर्सला चेन्नईची मिडल ऑर्डर कशी खेळून काढतेय यावर बरेच काही अवलंबून आहे.
बंगलोरचे पारडे जड आहे पण चेन्नई जिंकावी (कारण कोहलीपेक्षा धोंनी आवडतो)

*त्यागीला उनाडकटऐवजी एखाद्या मॅचला ट्राय करायलाही हरकत नाही!* - मलाही त्या त्यागीकडून खूप अपेक्षा आहेत. एकंदरीतच त्याचा रन-अप, डिलीव्हरी, त्याची उंची व देहबोली खूप आश्वासक वाटतात. शुभेच्छा.
*आयपीएल मध्ये नेहमीच ऑफ स्पिनर्स पेक्षा लेग स्पिनर्स चमकत आलेत!* - अगदीं अपवादात्मक ऑफ स्पिनर्स सोडले तर टी-20 मधे तरी मिडविकेट ते लाॅगऑन या भागात षटकार किंवा झेलबाद हे स्वत:च्या/फलंदाजा च्या नशीबावर सोडूनच ऑफ स्पिनर्स गोलंदाजी करत आसावेत. डाव्या हाताने खेळणारे फलंदाजच कदाचित ऑफ स्पिनर्सना स्वत:चं कसब दाखवायला टी-20मधे कांहींसे उपयुक्त ठरत असावेत. Wink

एक कारण असे की लेग स्पिन खेळायला खेळाडूचे पदलालित्य जास्त चांगले असावे लागते कारण (उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्यांसाठी) बाहेर जाणाऱ्या बॉलच्या जवळ जावे लागते चांगला शॉट मारायला.... याउलट ऑफ स्पिनरचा बॉल आत वळत असल्याने बरेच लोक खडे खडेही खेळू शकतात!

हर्षल पटेलची वाटच लावली. मुंबईसोबत पहिल्या सामन्यात शेवटची ओव्हर चुकून चांगली काय पडली तेव्हापासून खूपच हवेत होता. कोहलीचा चेहरा पाहण्यासारखा होता. नवीन बुमराच याला भेटलाय अशा आवेशात शेवटची ओव्हर त्यासाठी राखून ठेवायचा. शेवटच्या बॉलला पण सिक्स पाहिजे होता. मजा आली असती. Lol

कमाल खेळला जड्डू..... अर्थात फुल्ल टॉस पण मिळाले!
चांगल्या सुरुवातीनंतर मस्त रोखले होते चेन्नईला (त्यात अर्थात हर्षलच्या दोन विकेटवाल्या १४ व्या ओव्हरचा मोठा हात होता) पण शेवटच्या ओव्हरमध्ये सगळे चित्र बदलले Happy

अरे आज आरसीबी वि. रविन्द्र जडेजा असा गेम सुरु आहे Happy सॉल्लिड ! बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सगळेच तोच एकटा करतोय किंवा मग मैदानावर ३ -४ जडेजा आहेत असे वाटतेय Lol

हेच चित्र आज विरुद्ध असते तर कोहलीने मैदानावर इतका माज केला असता ना!
म्हणून डोक्यात जातो तो.... बाकी बॅट्समन म्हणून त्याच्याबद्दल काही वाद नाही!

*ऋतुराज कडक ड्राइव्हज मारतोय!* - खरंच काय नेटकी, सहजसुंदर फटकेबाजी करतात ही नवीन पोरं - ऋतुराज, पंत, शाॅ ,पडक्कल , सूर्यकुमार.... ! छान वाटतं पहायला व अभिमान पण !
आज जडेजाला ' सर जडेजा'च म्हणायला हवं ! ग्रेट!!
*कोहलीचा चेहरा पाहण्यासारखा होता.* पण शेवटीं सिराजची फटकेबाजी बघून हंसत होता, दुर्मिळ क्षण ! अति झालं व हंसू आलं, असं असावं ! Wink
शाॅचं अर्धशतक ! धवन तर निवडसमितीला धमकावतोच आहे, ' बघूं मला कसे वगळतां तें! ' Wink

स्टीव्ह स्मिथ/ हॅटमायरचा चा काही उपयोग नाही.... त्याच्या ऐवजी रिपल पटेल किंवा ललित यादवला खेळवावे आणि अश्विनच्या ऐवजी क्रिस व्होकस किंवा नॉर्कियाला खेळवावे

शॉ आणि पंत आश्चर्यकारकरित्या वाईट पळतात (रनिंग बिटवीन द विकेट्स). दोघांपैकी एक रन-आऊट होणं अगदीच स्वाभाविक वाटावं अशी दुर्दैवी घटना होती. विकेट स्लो आहे. वॉर्नरपेक्षा विल्यमसन ची जास्त गरज आहे हैद्राबादला.

रबाडा आणि आवेश सारखे विकेट टेकींग बॉलर असताना ते सोडून बाकीच्यांना पॉवरप्लेमध्ये खेळवण्यात काय पॉइंट आहे?

विल्यमसन असेपर्यन्त हैद्राबादची मॅच आहे. आणि तो काही वेडेपणा करेल असं वाटत नाही.

Pages