आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि आपण बांग्लादेशसमोर २९० मारू शकलो ते देखील रैनाच्या ३८ बॉल ५१ आणि धोनीच्या ११ बॉल २१ नाबाद या शेवटच्या थोडेफार फटकेबाजीने.
अन्यथा सचिनने पुर्ण १४७ चेंडू खर्च करून फक्त ११४ धावा मारल्या होता. असा स्ट्राईकरेट ७०-८० चेंडू खेळणार्‍याचा समजू शकतो पण दिडशे चेंडू म्हणजे निम्मे चेंडू बॅटींग पिचवर खेळून बाबा आदमच्या जमान्यातही कोणी अशी खेळी केली नसेल.

उगाच सचिन भक्तीच्या नादात गोलंदाजांवर शिंतोडे उडवू नका हे खरे तर मीच आपल्याला म्हणायला हवे Happy

दोन्ही स्कोअरबोर्ड ईथे

https://www.espncricinfo.com/series/asia-cup-2011-12-524504/bangladesh-v...

https://www.espncricinfo.com/series/asia-cup-2011-12-524504/india-vs-pak...

>>

अरे बांग्लादेशच्या ओपनर्स् ने पण सचिन/कोहलीच्या रेट नेच रन्स केल्या आहेत. शेवटी शाकिबने खुप मारलेले दिसते.
आणि प्रत्येक दिवशी पीच वेगळे असते ना. याच चेपॉक वर सचिनने आय पी एल मध्ये चेन्नै विरुद्ध ५५ बॉल्स्मधे ७० /८० मारले आहे.
आज कोण ५५ बॉल खेळु पण शकत नाही.

अरे बांग्लादेशच्या ओपनर्स् ने पण सचिन/कोहलीच्या रेट नेच रन्स केल्या आहेत. शेवटी शाकिबने खुप मारलेले दिसते.
>>>>>

एक सिंपल सांगू का?
७५ बॉल मध्ये ५० धावांची खेळी अँकर इनिंग बोलू शकतो ज्यात विकेट हातात ठेवा आणि मग मारा असा अ‍ॅप्रोच असतो.
पण तेच दुप्पट करत १५० चेंडूत १०० धावांची खेळी कोणी केली तर ती सामना घालवणारी असते.

२०-२० च्या भाषेत सांगायचे तर १८० च्या खेळपट्टीवर कोणी १० चेंडूत १० धावा मारून कोणी बाद झाला तर ती चूक असते याने सेट झाल्यावर मारले नाहीत. पण कोणी त्याच स्ट्राईकरेटने ५० चेंडूत ५० मारले तर तो अपराध असतो. त्याने स्वतःचे अर्धशतक करण्याच्या नादात मॅच घालवलेली असते. ईतरांनी मारलेलेही त्यामुळे कमी पडले असतात.

प्रत्येक दिवशी प्रत्येक तासाला पीच वेगळे असते वगैरे कितीही योग्य असले तरी हा मुद्दा त्या सामन्याला लागू नव्हता. ते तर असामी यांनी २९० म्हणजे तेव्हा खूप भारी स्कोअर असायचा असे म्हटलेय त्यांना दाखवले की २०१२ साली नॉर्मल होते हे.

जसे धोनीला आयपीएलमध्ये वयोमानानुसार मारता येत नाही तसे सचिनचेही वयोमानानुसार झालेले आणि बांग्लादेशने याचा फायदा ऊचलत त्याला छान खेळवले, त्याच्या पदरात शतक टाकले आणि सामना स्वतःच्या पदरात पाडला.

सामना आपण हरलो तरी सारे भारतीय याच आनंदात की सचिनचे शंभरावे शतक झाले . अर्थात त्याने जे आयुष्यात आनंदाचे अमाप क्षण दिले आहेत ते पाहता तो डिझर्व्हच करत होता हा विक्रम. फक्त निकष लावताना उगाच सचिनप्रेमापोटी त्याचे समर्थन करू नये की सचिन त्या पराभवाला जबाबदार नव्हता वगैरे...

याच धाग्यावर जे मागच्या पानावर धोनीला चिडवायला पोस्ट आलेल्या त्या सर्व या सचिनच्या खेळीलाही लागू आहेत.
फरक ईतकाच की धोनी आयपीएलमध्ये खेळत आहे, सचिन ते देशासाठी खेळत होता
!

आशिया कप होता तो, त्या पराभवामुळे आपण फायनलला पोहोचलो नाही. बांग्लादेश आणि पाकिस्तान फायनल झाली Sad

२९० डिफेंड न करता येणार्‍या गोलंदाजांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करायला हवा होता का ? खर तर त्यांचा दोष नाही कारण धोनी कप्तान असूनही त्याला त्याचे गोलंदाज वापरता आले नाहीत किंवा त्यांनी बॉलिंग कुठे करावी कशी करावी हे त्याला सांगता आले नाही त्यामूळे तुझ्याच आतापर्यंतच्या धोनीच कर्ता करविता ह्या अफाट लॉजिकने दोष सर्वप्रथम नि फक्त धोनीचाच असायला हवा नाही का ? Lol

भल्या माणसा, आकडेवारी बघताना असा एकमेव सामना बघायचा का ? (बर एकच सामना उचलायचा होता तर कमीत कमी ४०० वाले तरी उचलायचे.) .... २००५ पासूनचे (धोनी च्या आगमाना च्या आसपासचे वर्ष उचललेय ) तूच पाहा की नॉर्म काय होता ते .
https://stats.espncricinfo.com/ci/engine/team/6.html?class=2;filter=adva...
sub continents pitches म्हणून कंठशोष करायच्या आधी हे पाहून घे
https://stats.espncricinfo.com/ci/engine/team/6.html?class=2;continent=2...

तुला तुला आवडणारे खेळाडू (नि यात तुझे आवडते शाहरुख नि स्वप्निल पण येतात) किती ग्रेट हे दाखवण्यासाठी इतर खेळाडूंवर जाता येता अकाराण पिंका मारायची वाईत सवय आहे. दुर्दैवाने असे करून तू फक्त त्या तुझ्या आवडत्या खेळाडूंच्या कामगिरीला तुझ्या विटा लावून कमी लेखत असतोस हे तुझ्या कधी लक्षात येणार देव जाणे.

रच्याकने 'मी सचिन चा भक्त आहे' असे म्हटल्याने माझा सन्मान झाला असेच वाटेल. किंबहुना इथल्या प्रत्येक क्रिकेट प्रेमीला तसेच वाटेल.

असामी,
अहो फक्त ३००+ स्कोअरवाले सामने किती होते ते आणा म्हणजे समजेल तेव्हा ३०० नॉर्मल झालेले. २९० काही भारी स्कोअर नव्हता जसे नव्वदीच्या दशकात म्हणू शकतो. सगळे सामने दाखवून काय सिद्ध करत आहात नेमके. त्यात कैक अश्या खेळपट्टी असतील जिथे गोलंदाजांना मदत असल्याने २०० सुद्धा भारी असतील. म्हणून सचिनने फलंदाजीस पोषक खेळपट्टीवर केलेल्या संथ खेळीचे समर्थन करता येईल का? आणि त्यातही २९० झाले ते समोरून मारले गेल्याने. तिथूनही कोणी आपली इनिंग खेळत बसला असता तर आणखी २६०-२७० झाले असते.

लांब कश्याला जा.
आजच्या तारखेला २०-२० मध्ये बॅटींग पीचवर २०० धावाही होतात आणि बरेचदा पुरतही नाही. मग अश्या पिचवर एखादा के एल राहुल स्लो खेळत आपले अर्धशतक करत बसला आणि संघाचा स्कोअर १७० ला थांबला आणि त्याचा संघ तो सामना हरला तर तुम्ही असे मिक्स आकडे आणून १५० चेही कितीतरी सामने आहेत बघ म्हणून त्या खेळीचे समर्थन करणार का?

जर कोणी राहुल भक्त असेल तरच तो करेल. जो तटस्थ असेल तो त्याला फटकारेलच आणि परभवाला जबाबदारच धरेल.

बाकी सचिनभक्त म्हणवून घेणे कोणाला सन्मान वाटत असेल तर मग वादच मिटला. जर मी सचिनभक्त नाही तटस्थ आहे असा आव आणून कोणी समर्थन करत असता तरच वाद घालायला अर्थ होता Happy

बाकी हे तर वर उदाहरण म्हणून दिले त्यामुळे याच खेळीची उगाच चीरफाड होतेय. पण सचिनने आपली कारकिर्द लांबवताना अजूनही कैक खेळी केल्या आहेत ज्या पाहता त्याची संघात जागा बनत नव्हती. त्याचेही उगाच चीरफाड न करता ओवरऑल आकडे आणू शकतो जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी होईल.

पण मुळात सचिनने जे शेवटी केले ते दाखवून त्यावर टिका करण्यात मला रस नाही. कारण धोनी येण्याआधी मी दादाचा चाहता होतो आणि दादा येण्याआधी मी सचिनचा चाहता होतो. धोनीनंतर थोड्याश्या काळापुरता कोहलीचा झालो, पण मग लगेचच शर्माचा झालो आणि आज मी पंतचा चाहता आहे.
मला या सर्वांचा चाहता म्हणूनच राहायलाच आवडेल. भक्त बनायला नाही. कारण त्यामुळे मी यांचे दोषही काढू शकतो आणि कोणी काढले तर स्विकारूही शकतो.

आणि द्वेष तर कोणाबद्दलच मनात नाही. त्यामुळे टारगेट करून कोणावरही टिका करत नाही.

तरी मी सचिनच्या त्या खेळीचा उल्लेख केला तर ती पिंक झाली. आणि कोणी टोळीने भारताला ईतके मानसन्मान मिळवून देणारयाला ट्रोल करून चिडवत असेल तर तुम्ही आनंद लुटणार. कारण तुम्ही सचिन भक्त सन्मान वाले Happy

अवांतर - धाग्यात शाहरूख खान आणलाय तो आपला सुपर्रस्टार किंग खान की आयपीएल पंजाबवाला Happy

मी सचिन चा भक्त आहे' असे म्हटल्याने माझा सन्मान झाला असेच वाटेल. किंबहुना इथल्या प्रत्येक क्रिकेट प्रेमीला तसेच वाटेल.

>>>>

हे तेवढे बदला
खरा क्रिकेटप्रेमी व्यक्तीपूजक नसतो
त्याला कोणाचा भक्त असा शिक्का आवडत नाही.
जे आपल्या खेळाणे आनंद देतात, जिंकवून देतात त्यांचाच खरा क्रिकेटप्रेमी चाहता होतो.. पण चाहताच. भक्त नाही. कारण तो ज्याचा चाहता असतो त्याने आपल्या वैयक्तिक माईलस्टोन वा विक्रमासाठी संघाचे नुकसान केले यर खरा क्रिकेटप्रेमी त्याचे कधीच समर्थन करणार नाही. भक्त जरूर करतील Happy

शुभरात्री

*दव फक्त कॅमेर्‍यात दिसत होते. दोरी फिरवली की पुसले जात होते. थोडे लागलेच बॉलवर तर फडक्याने साफ होत होते.* - सर्व समालोचक तर म्हणत होतेच पण मॅच नंतर अश्विनही म्हणाला कीं नेहमीपेक्षां दंव खूपच जास्त होते. त्याच्या घरच्या मैदानाविषयी व त्याच्या संघाला दंवाचा त्रास विशेष जाणवला नसूनही जर अश्विनही तसं म्हणत असेल तर त्यात निश्चितच तथ्य असावं.

यावरुन एक किस्सा आठवला:
आमच्या सोसायटीत एक काकू रहायच्या..... त्यांचा मुलगा एकदम गुणी आणि बऱ्यापैकी अष्टपैलू होता..... सगळेजण त्याचे फार कौतुक करायचे.... पुढेपुढे त्या कौतुकाने चढून जाउन काकूंना वाटायला लागले आपला मुलगा म्हणजे एकदम "जगात भारी"..... त्यामुळे आल्यागेल्या प्रत्येकासमोर त्या आपल्या मुलाचा कौतुकसोहळा सुरु करु लागल्या.... विषय कुठलाही असो; त्या तो विषय बरोबर आपल्या मुलापाशी आणून वळवायचा आणि मूळ विषयापेक्षा आपल्या मुलाचीच चर्चा कशी जास्त होईल याकडे त्यांचा एकंदर कल असायचा.... या नादात त्या बिचाऱ्या गुणी मुलात नसणारे अनेक गुणही त्या त्याला चिकटवून द्यायच्या.... माझा मुलगा प्रेक्षकात बसून टाळ्या वाजवत होता म्हणून नाटक चालले किंवा अगदी माझा मुलगा गाण्याच्या क्लासला जायला लागला म्हणून त्याच्या गाण्याच्या सरांना अमुकतमुक पुरस्कार मिळाला असे काहीच्या काही अचाट दावे त्या करु लागल्या..... काहींनी दुर्लक्ष केले तर अर्थातच बऱ्याच लोकांच्या नजरेत त्या काकू चेष्टेचा विषय झाल्या!
काकूंचे एक जाउदे पण कळत नकळत त्या बिचाऱ्या गुणी मुलाबद्दल पण साहजिक एक नकारात्मक भावना आजूबाजूंच्यात तयार झाली.... लोक त्या मुलावरुन विनोद करु लागले.... अर्थात त्यात त्याला हिणवण्याचा किंवा कमी लेखण्याचा कोणताही हेतू नव्हता पण काकूंनी त्या मुलाची लार्जर दॅन लाईफ टाईप्स इमेज करुन ठेवली होती त्याचा हा परिपाक होता..... वरुन विनोद करणाऱ्या या लोकांबद्दल ते टोळी करुन माझ्या मुलाला बदनाम करतायत असाही समज त्या काकूंनी करु घेतला!
पण त्यांना हे नाही कळले की या सगळ्याला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत..... ज्या दिवशी अश्या काकू लोकांना ही मानसशास्त्रीय जाणीव होईल त्या दिवसापासून अनेक गुणी मुलांवर लादले गेलेले अपेक्षांचे ओझे आणि सामजिक दडपण आपोआप कमी होईल!

आयपील चा धागा आहे की धोनी... ऋन्मेऽऽष भाऊ एक वेळ होती की तुम्ही ज्या पद्धतीने वादविवाद करत ते वाचायला मजा येत होती. आजकाल माञ स्वतःच खरं करायला पाहतात. वादविवाद होतच असतात माञ खिलाडुवृत्ती हरवत चालली आहे असं वाटतं. तुमचं नाव घेतलं त्या बद्दल क्षमस्व.

क्रिकेट च्या दोन्ही धाग्यावर हेच चालु आहे. मनोरंजन म्हणून वादविवाद करा पण हा मोठा तो लहान. सचिन सारखा दुसरा नाही ना धोनी सारखा. दोघेही एकवेळ श्रेष्ठ होते नंतर वयोमानानुसार संथ होत गेले.

स्वरूप Proud

आज पंजाब अगदीच गचाळ खेळले की हैद्राबाद फारच जबरदस्त खेळले? आज दोन मॅचेस आहेत हे माहित नव्हतं. सहसा डबल हेडर्स वीकेंडला असतात. असो. पण आज विल्यमसन ला हैद्राबाद च्या टीम मधे बघून फार बरं वाटलं.

आता केकेआर वि. चेन्नई!

कळत नकळत त्या बिचाऱ्या गुणी मुलाबद्दल पण साहजिक एक नकारात्मक भावना आजूबाजूंच्यात तयार झाली.... लोक त्या मुलावरुन विनोद करु लागले....
>>>>>>>>

@ स्वरुप
ट्रोलर्सचे समर्थन करू नका.
जसे माकडाच्या हातात कोलित तसे ट्रोलर्सच्या हातात सोशलमिडीया असे झालेय.
माझ्या पाहण्यात बरेच सचिनभक्त, कोहलीभक्त येतात. मी या दोघांचा चाहता आहे. पण म्हणून मी लगेच त्यांच्या भक्तांच्या त्रासाने सचिन कोहलीवर टिका करायला घेत नाही. दोघांच्याही चांगल्या गोष्टीचे कौतुक करतो आणि दोषांचा प्रामाणिकपणे उल्लेख करतो. त्यांना चिडवणे वा टिका करणे असले प्रकार करत नाही. शेवटी आपल्यालाच ठरवायचे आहे की आपल्या खेळाडूंना आपण कसा सन्मान करायला हवे. जे आनंदाचे क्षण आणि मानसन्मान सचिन आणि धोनीने मिळवून दिलेत, ईतकेच नाही तर एक आयकॉन म्हणून त्यांचे जे स्थान आहे भारतीय क्रिकेटमध्ये त्याला तोड नाही. वैयक्तिक आवड निवड एकीकडे पण आदर हवाच, जे खरे क्रिकेटप्रेमी अश्या खेळाडूंना देतातच.

तळटीप - सचिन, कोहली, धोनी, शर्मा आणि पंत अश्या पाच खेळाडूंच्या कौतुकाचे धागे मी आजवर मायबोलीवर काढले आहेत. पण जेव्हा ते चुकले आहेत, वा जे त्यांच्यात दोष आहेत, ते ते तिथे तिथे दाखवले सुद्धा आहे. देव म्हणा, दादा म्हणा. कॅप्टन कूल म्हणा, किंग म्हणा, हिटमॅन म्हणा किंवा स्पायडरमॅन म्हणा.... आहेत हि सारी माणसेच Happy

असो, आज चेन्नईचा सामना, आनंद लुटूया Happy

तीन सामने अपयशी ठरलेला ऋतु राज गायकवाड अखेर कप्तान धोनीचा विश्वास सार्थ ठरवत आहे Happy

ऐसे मै नही भाई, कॉमेंटेटर बोल रहे है Happy

ऋतूराज गायकवाड मस्त खेळतोय ! त्याला batting कशी करायची हे ही धोनीनेच शिकवले असणार ! Wink

रच्याकने हे असं एकतर्फी अति कौतुक केल्याने खरंतर त्या खेळाडूंबद्दल किंवा कलाकारांबद्दल नकारात्मक भावना तयार होते ! पंत बद्दल तसं होऊ नये अशी फार iccha आहे!

गायकवाड चे पुल शॉट्स बघायला मजा आली . खर्‍या अर्थाने 'पुल' होते. के के आर पारच गंडलय प्लॅनिंग बाबत .

रच्याकने हे असं एकतर्फी अति कौतुक केल्याने खरंतर त्या खेळाडूंबद्दल किंवा कलाकारांबद्दल नकारात्मक भावना तयार होते ! पंत बद्दल तसं होऊ नये अशी फार iccha आहे! >> +1

अहो फक्त ३००+ स्कोअरवाले सामने किती होते ते आणा म्हणजे समजेल तेव्हा ३०० नॉर्मल झालेले. २९० काही भारी स्कोअर नव्हता जसे नव्वदीच्या दशकात म्हणू शकतो. सगळे सामने दाखवून काय सिद्ध करत आहात नेमके. >> तुला हेच कळत नसेल तर तू पुढची ढीगभर पोस्ट नि त्यापुढची पोस्ट का लिहिली ह्याचा विचार करून पाहायचा प्रयत्न करून पहा. Wink

"ट्रोलर्सचे समर्थन करू नका." - तुझ्या पोस्ट्सवर आलेली उत्तरं ही आपण ज्याचं समर्थन करतोय त्याच्यावरची टीका असल्याचा देखावा करून उगाचच गोष्टींचा बाऊ करू नकोस मित्रा. हे सगळे मेसेजेस कुणीही धोनी ला, कोहलीला, सचिन ला वगैरे पाठवत नाहीये. किंबहूना वाद घालतोय ह्या आवरणाखाली तू जे मुद्दे भरकटवतोस, स्वतःचा अजेंडा पुढे दामटवतोस त्याचा कधीतरी एकदा सिरियसली विचार करून बघ, हा माझा प्रामाणिक सल्ला आहे.

"हे असं एकतर्फी अति कौतुक केल्याने खरंतर त्या खेळाडूंबद्दल किंवा कलाकारांबद्दल नकारात्मक भावना तयार होते ! पंत बद्दल तसं होऊ नये अशी फार iccha आहे" - सहमत आहे!

असो.. ऋतुराज मस्त खेळला. त्याची बॅटींग बघायला मजा येते. धोनी ची बॅटींग बघताना (त्याला स्ट्रगल करताना बघून) त्रास होतो. तो आज सगळे बॉल्स मिड्ल करत होता. .... मिड्ल ऑफ द एज Happy

धोनी ची बॅटींग बघताना त्याचा स्ट्रगल बघून त्रास होतो. >> +१. मिडविकेटवरचा एक सिक्स वगळता बाकी सगळे स्कोरीम्ग शॉट्स एजेस होते. परत जाडेजा नि कुरन सध्या ड्रीम बॅटींग करतायेत त्यामूळे धोनीचा वर येण्याचा आग्रह अधिकच खटकतो. आजही ह्या दोघांपैकी एकही आधी येता तर उजवे डावे कॉम्बो पण राहते. गावस्कर ला त्या इनिंग मधे काय आवडले हे डोक्यावरून गेले.

"गावस्कर ला त्या इनिंग मधे काय आवडले हे डोक्यावरून गेले." - गावसकर ला - especially आयपीएल च्या कॉमेंट्री च्या वेळी - फार सिरियसली घेण्यात अर्थ नाही असं मागेच लक्षात आलंय. Happy

काय आवडले गाव्स्करला?
धोनीची इनिंग का?
मग नकाच घेऊ सिरीअसली Happy

अ‍ॅक्चुअली मलाही त्यात आंधळा पट्टाच वाटला. पण बॉल फुकट न घालवता निस्वार्थपणे फिरवत राहिला हे आवडले.

गाव्स्कर मागे म्हणालेला की धोनी हा सचिनपेक्षा मोठा आयकॉन आहे कारण तो छोट्या शहरातून आला आहे. त्यामुळे आता छोट्या शहरातील खेळाडूही धोनीपासून प्रेरणा घेत पुढे येत आहेत.
लॉजिकल आहे.
सैराटमध्येही परश्या त्यांच्या गावचा धोनीच होता Happy

तसेच विकेट कीपर..., हल्ली जो सुळसुळाट झाला आहे विकेटकीपर फलंदाजांचा त्यालाही धोनीने दिलेली प्रेरणाच जबाबदार आहे असे म्हटले तर ते चूक ठरणार नाही.

@ फेरफटका, एखाद्याला धोनीसारख्या खेळाडूचे कौतुक ऐकून त्रास होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मी का अश्यांचा विचार करू? ट्रोलर्सना ट्रोल करू दे, मी माझे प्रामाणिक मत मांडणार. हे मी ईथल्या कोणाला म्हणत नाहीये, मला माहीत आहे तुम्ही विरोधाला विरोध म्हणून मजा करत आहात, पण सोशलमिडीयावर बरेच आहेत असे सोशलमिडीयाकंटक Happy

मध्यंतरी असामी आणि हायझेनबर्ग यांच्या धोनीबद्दल चर्चेत असामी यांचे मत होते की धोनी कसोटीत पुढे आला असता तर त्याने खोर्‍याने धावा केल्या असत्या. हे खुद्द सचिनने म्हटले होते आणि हायझेनबर्ग यांचे मत सचिनच्या विरोधात होते.
मलाही पर्सनली वाटते की धोनी हा कसोटीला आदर्श फलंदाज नव्हता. तिथे तो आपली कप्तानी, विकेटकीपिंग आणि फलंदाजीत करत असलेली अ‍ॅडजस्टमेंट यामुळे आपली जागा तर नक्कीच बनवत होता, पण संगकारा वा गिलख्रिस्ट सारखा वर्ल्डक्लास नव्हता.

पण कोणी त्याच्या एकदिवसीय मधील कप्तानी, फलंदाजी, किपिंग, त्याची खेळाची जाण, त्याचे फिनिशर असणे, त्याचे एक आयकॉनिक युवांसाठी मार्गदर्शक खेळाडू असने यावर शंका घेत असेल तर तो मुद्दा मी माझ्या परीने खोडणारच Happy

जिथे आयपीएलमध्ये ईतर संघ प्लेऑफला कसे पोहोचता येईल हेच टारगेट डोक्यात ठेऊन सुरुवात करतात तिथे चेन्नई दरवर्षी जणू आपली एक सीट बूक आहे असे पकडूनच चालत असते Happy

विजयाची हॅट्रीक झाली !

"त्याचे एक आयकॉनिक युवांसाठी मार्गदर्शक खेळाडू असने" - बापरे!!! मोठे मोठे शब्द वाप्रून राह्य्ले नं बाप्पा तुम्ही तं. दांभिकपणा, स्वार्थीपणा, आर्थिक फायद्यासाठी तत्त्वांना तिलांजली देणं ह्यातली कुठली मार्गदर्शक तत्त्व युवा खेळाडूंसाठी आयकॉनिक आहेत? Happy

नागरकोटी आणि वरूण चक्रवर्ती अत्यंत बिनडोक क्रिकेट खेळले. नागरकोटी ला फक्त एक रन काढून कमिन्स ला स्ट्राईक द्यायचा होता. चक्रवर्ती ला दुसरी रन नाकारायचं कारणच नव्हतं. नागरकोटी च्या विकेटनंतर कमिन्स ला सिंगल्स घेण्यावर बंधन आलं. अर्थात ह्याची सुरूवात टॉप ऑर्डर ने केली (०, ९, ८, ७).

उद्या रॉयल वि. रॉयल्स!

>>चक्रवर्ती ला दुसरी रन नाकारायचं कारणच नव्हतं. <<
दुसरी रन तिथे अशक्यप्राय होती, अन्लेस फ्लॅश चक्रवर्तीच्या अंगात शिरला असता...

चक्रवर्तीच्या बॅटिंग रेकर्डची कल्पना नाहि पण त्याला स्ट्राइक द्यायला हवा होता. एखादा छक्का बसु शकला असता. बिचार्‍याला बॅट स्विंग करायची संधीच मिळाली नाहि. नाहितरी पुढे कमिन्सने स्ट्राइक ठेउन काय दिवे लावले?..

नाहितरी पुढे कमिन्सने स्ट्राइक ठेउन काय दिवे लावले?.. >> पण त्याने आधी दिवे लावलेले ना ? त्यामूळे त्याचे दिवे लावायचे चान्सेस अधिक होते इतरांपेक्षा. चक्रवर्ती नि नागरकोटी बाद नसते झाले तर शेवटच्या ओव्हर मधे हाराकिरी करायला उपयोगी पडू शकले असते. "दुसरी रन तिथे अशक्यप्राय होती" हे बरोबर आहे फक्त त्याचे नको म्हणणे ऑड होते कारण कमिन्स धावणार हे उघड होते नि तो धावला तर चक्रवर्तीला धावणे बंधनकारकच होते.

अर्थात ह्याची सुरूवात टॉप ऑर्डर ने केली >> बॉल स्विंग होत असेल तर चहर किती डेंजरस ठरतो हे माहित असूनही क्रिजवर रूट होऊन खेळलेत ....

>>चक्रवर्ती नि नागरकोटी बाद नसते झाले तर...<<
एक्झॅक्टली माय पॉइंट. कमीन्सने चक्रवर्तीचा बळी हकनाक दिला नसता तरीहि पुढे कमींन्सला स्ट्राइक मिळाला असता, दहा बॉल्स होते बहुतेक शिल्लक...

>>रच्याकने हे असं एकतर्फी अति कौतुक केल्याने खरंतर त्या खेळाडूंबद्दल किंवा कलाकारांबद्दल नकारात्मक भावना तयार होते ! पंत बद्दल तसं होऊ नये अशी फार iccha आहे!

तुला कळले रे..... ज्याला कळायला पाहिजे त्याला कळू दे, वळू दे म्हणजे मिळवली Happy

Pages