आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विल्यमसन क्लास खेळला पण आपले मत सुचिथ ला . कसले ब्लो होते. त्याला अजून वर खेळवायला हवा. वॉर्नर ने स्वतः बरोबर बेअर स्ट्रो ला आणायला हवे होते, तो पॉवर हिटर आहे. विल्यमसन बिचारा दमलेला होता पार. मुंबै खूष - चार नंबर अबाधित राहिला म्हणून.

शॉ ने रशिद खान ला नीत खेळत होता. अजून राहता तर मजा आली असती काँटेस्ट बघायला.

What a thriller in the end!! Good for DC and Pant that he maintained his composure and saw DC across the line. Spare a thought for Williamson, as he did everything in his power to win the game for SRH. Had it not been for him, they wouldn’t have come this close to begin with.

सर xxx xxx .. सर ही काफी है !

मजा आली आज !
दुपारी धोनी जिंकला, रात्री आपला चुम्मा जिंकला Happy

गुणतक्यातही आता धोनी आणि पंत अनुक्रमे पहिल्या दुसर्‍या क्रमांकावर विराजमान आहेत.
(आणि हि ईच्छा मी पहिल्याच पानावर व्यक्त केली होती Happy )

धोनी पहिलाच सामना पंतशीच हरलेला, पण त्यानंतर एकेकाला नुसता चिरडत चालला आहे, त्यामुळे नेट रनरेट सुद्धा जबरदस्त झाला आहे चेन्नईचा.

बेअरस्ट्रोला सुपरओवरला न पाठवणे अगदीच अनाकलनीय. म्हणजे राशीदच्या जागी विजय शंकरला गोंलंदाजी दिली असती तर तितकेच अनाकलनीय.
दिल्लीकडून मात्र अक्षर गोलंदाज आणि फलंदाजीत राशीदसमोर पंतचे स्ट्राईक घेत नॉनस्ट्राईकरला धवन येणे हे सगळेच अगदी पर्रफेक्ट.
या निर्णयांनी सुपरओव्हरचा निकाल ठरवला.

अश्विनचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाइक करोनाग्रस्त झाल्याने तो सध्यातरी आय पी एल मध्ये खेळणार नाहीए. याआधी त्याने भारतातल्या करोनासंबंधी परिस्थितीबद्दल चिंता , दु:ख व्यक्त केले होते. या गोष्टींचा त्याच्या करियरवर परिणाम होऊ नये अशी आशा .

. या गोष्टींचा त्याच्या करियरवर परिणाम होऊ नये अशी आशा . >> तो आपला एस स्पिनर आहे . नाही होणार परीणाम.

राजस्थान चा टाय पण परत गेला .. अशाने अकरा प्लेयर तरी उरतील का ?

"अशाने अकरा प्लेयर तरी उरतील का ?" - आर सीबी चे रिचर्डसन आणि झंपा पण परते गेले. बहुदा दुसर्या भागात टॉस झाला की टीम पाडून खेळतील - कॉमन फिल्डींग वगैरे. Happy अशानं #मिशन_चिरडा-चिरडी ला अजून जोर येईल (खेळ आहे का एखाद्या टोळीचा हल्ला!)

बाकी जाऊ दे, पण खरंच भारतातली कोव्हिड-परिस्थिती भीषण आहे. त्या सगळ्या पेशंट्सना, त्यांच्या नातेवाईकांना, वैद्यकीय आणि इतर यंत्रणांना संपूर्ण सहानुभूती आणि पाठिंबा. पॅट कमिन्स ने $५०,००० दान केले आहेत. ह्या खेळाचा चाहता म्हणून अभिमानास्पद घटना आहे आणि अशीच भरघोस मदत आयपीएल च्या माध्यमतून ह्या जागतिक संकटकाळात व्हावी ही सदिच्छा!

पॅट कमिन्स ने $५०,००० दान केले आहेत. ह्या खेळाचा चाहता म्हणून अभिमानास्पद घटना आहे >> +१. बीसीसी आय ने ह्यातून काही तरी धडा घ्यावा.

१२३ चेस करताना दोन विकेट गेल्या लवकर तरी नारायण चौथा आला. काय लॉजिक समजले नाही. नंबर ठरवलेलाच असतो का आधी? कालचे बेअरस्ट्रोचे न ये णेही कोणाच्या पचनी पडले नाही..
असे कोण कोणत्या नंबरवर येणार, सुपरओवरला कोण खेळणार यावर स्पॉट बेटींग होते का एकदा चेक करायला हवे.

पॅट कमिन्सने अमुकतमुक रक्कम दान केली, आपले भारतरत्न काय करत आहेत?
अशी पोस्ट आज व्हॉटसपवर पाहिली..
कोणी एकाने दान केले की दुसर्‍याची दानत काढायची ही सवय आणि त्याला लाई़क करणारी हजारो करोडो लोकं हि मान्सिकता कधीच समजली नाही..

असे कोण कोणत्या नंबरवर येणार, सुपरओवरला कोण खेळणार यावर स्पॉट बेटींग होते का एकदा चेक करायला हवे.. म्हणजे काय म्हणायचे आहे? डेव्हिड वर्नर आणि कोच ने fixing केलंय? का तर beristo फलंदाजीला आला नाही म्हणून. आपला अंदाज चुकला की fixing?

डेव्हिड वर्नर आणि कोच ने fixing केलंय?
>>>>>>>
हे निर्णय कोण घेते हे आपण ईथे बसून सांगू शकत नाही.
आयपीएल मध्ये कोच आणि कर्णधार मिळून निर्णय घेतात असे ईंटरनॅशनलसारखे स्ट्रेट गणित नसते.
दहा डोकी असू शकतात, त्यामागे मास्टर डोके संघमालकाचे वा त्याने नेमलेल्या मर्जीतील माणसाचेही असू शकते. कारण शेवटी बिग बॉस संघमालकच असतो Happy

जर तर चा विचार करायचा असेल तर काहीही शक्य आहे. परंतु केवळ आपला अंदाज चुकला म्हणून fixing झाली असेल असे वाटणे योग्य वाटत नाही.

परंतु केवळ आपला अंदाज चुकला म्हणून >>> मी आयपीएलमध्ये अंदाज बांधत नाहीत. ईथे सारे खेळाडूच ड्रीम ईलेव्हन पे टीम बनाओ म्हणत जुगाराचे समर्थन करतात. त्यांना काय सिरीअसली घ्यायचे, दुर्दैवाने हि ड्रिम ईलेव्हन किड वाढत चालली आहे. बरेच युवा या विळख्यात अडकत आहेत. आमच्या क्रिकेट व्हॉटसपग्रूपव सुद्धा अर्धे अधिक हेच चालू असते Sad

कुंबळे सारखा कोच म्हणजे काय अपेक्षा ठेवायची... >>>>> खरेय, कुंबळेच्या बुद्धीमत्तेवर शंका नाही, पण निव्वळ क्रिकेटची अक्कल असणे पुरेसे नसते.. कुंबळेला खेळाडू हाताळता येत नाहीत योग्य प्रकारे.. आणि हेच जास्त महत्वाचे असते.

बाकी राहुल सुद्धा कर्णधार म्हणून अगदी यथातथाच आहे.. सुरुवातीपासून खांदे पाडून, पराभव मान्सिकतेत दिसतो.. त्यामुळे यथा राजा तथा प्रजा म्हणत सारेच खेळाडू चार्मलेस खेळतात. बोअर होते पंजाबचे सामने बघायला.

*पण निव्वळ क्रिकेटची अक्कल असणे पुरेसे नसते..* +1

उत्तम खेळाडू = उत्तम कर्णधार = उत्तम प्रशिक्षक = उत्तम समालोचक = उत्तम माणूस.. असलीं समीकरणं मांडणच चूकीचं ! प्रत्येक भुमिकेत एकच व्यक्ती उत्तम असेलच असं नाहीं !!

>>प्रत्येक भुमिकेत एकच व्यक्ती उत्तम असेलच असं नाहीं

You said it!
तसेच उत्तम खेळाडू हा सदासर्वकाळ उत्तम असेलच असे नाही.... त्याचेही चढउतार असतातच!
बाकी आपल्याला संघ जिंकतोय म्हंटल्यावर तो कर्णधार अचानक भारी वाटायला लागतो आणि संघ हारायला लागला की लगेच कर्णधाराच्या चुका काढल्या जातात!

चांगल्या विजयी संघाची भट्टी जमून यायला अनेक चांगल्या गोष्टी आणि अनेक चांगले लोक एकावेळी एकत्र यावे लागतात.... एकट्यादुकट्याच्या जोरावर एखादी मॅच, एखादी सिरीज, एखादा सीझन जिंकता येतो फार फार तर!

*त्यामागे मास्टर डोके संघमालकाचे वा त्याने नेमलेल्या मर्जीतील माणसाचेही असू शकते. कारण शेवटी बिग बॉस संघमालकच असतो * - यावरून फार पूर्वीचं माझं इथलं व्यचि. आठवलं Wink -

काय खुळ लागलंय तुला, त्याच्या विरूद्ध अपील करायला ! अरे, तुला दोन- चार लाखात घेतलंय आंणि त्याच्यासाठी कोट्यावधी मोजलेत त्याच्या मालकाने !!20190626_144731.jpg

कोणी एकाने दान केले की दुसर्‍याची दानत काढायची ही सवय आणि त्याला लाई़क करणारी हजारो करोडो लोकं हि मान्सिकता कधीच समजली नाही..>>>> +१११११११ रोहित शर्माने मागील वर्षी ८० लाख डोनेट केले होते त्याचा व्हाट्सअप स्टेटस काहीजण आता ठेवताहेत. त्यावेळी सचिन, कोहली, रैना, रहाणे यांनीही डोनेट केलं होतं. पण त्यांनी गाजावाजा नसेल केला म्हणून लोकांनां माहित नाही. हि दुनिया अशीच घाणेरडी आहे. काही केलं कि गाजावाजा करायला लागतो नाहीतर लोकं टीका करतात.

चांगल्या विजयी संघाची भट्टी जमून यायला अनेक चांगल्या गोष्टी आणि अनेक चांगले लोक एकावेळी एकत्र यावे लागतात.... एकट्यादुकट्याच्या जोरावर एखादी मॅच, एखादी सिरीज, एखादा सीझन जिंकता येतो फार फार तर! >> हे जास्त योग्य आहे. ह्याच बरोबर चांगले लोक असले तरी भट्टी जमून यायला क्लिक व्हावे लागतात. ते तसे होणे न होणे संघाची केमिस्ट्री कशी जमते आहे, एकमेकांना किती सपोर्ट करू शकतात ? किती स्टेबलिटी आहे , प्लेयर्स किती रीलॅक्स आहेत अशा बर्‍याच गोष्टींवर ठरणार. कप्तान नि कोच त्याला मदत करू शकतात पण ते जमेलच असे नाही. टीम कशी जेल होते हे शेवटी मह्त्वाचे ठरते.

बाय द वे, म्हणूनच सगळे श्रेय धोनी ला देऊ नये असे का स्वरुप ? Wink

शेवटची ओव्हर स्टोनिस ला दिल्यावर अजून काय होणार होते ? एक तर ओला बॉल त्यात एकमेव ओव्हर. खर तर १६-१७ वी ओव्हर मिश्राला देऊन चान्स घ्यायला हवा होता असे वाटले. एबिडी लेगी ला बाद होण्याचे चान्सेस मिडीयम पेसर ला बाद होण्यापेक्षा अधिक आहेत. पंत , पाँटिंग चे डावपेच चुकले.

सचिन, कोहली व इतरांच्या देणग्यांबद्दल माहिती इथे

पॅट कमिन्सचे जेश्चर चांगलेच आहे. पण नेट वरचे पब्लिक माहिती न काढता सुटतेच एकदम.

स्वरूप, असामी - तुम्ही जे सांघिक यशाबद्दल लिहीलय त्याच्याशी संपूर्ण सहमत! क्रिकेट हा शब्दशः सांघिक खेळ आहे.

"पण नेट वरचे पब्लिक माहिती न काढता सुटतेच एकदम." - 'आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकंदरीत कर्तृत्व काय ह्याचा विचार न करता मत ठोकून द्यायचं' Happy

सिराज ने शेवटची ओव्हर फारच जबरदस्त टाकली. तो एक फुलटॉस सोडला तर बाकीचे बॉल्स अतिशय डोकॅलिटी ने टाकले होते. तो फुलटॉस पण चुकून पडला होता.

चुम्माने निराश केले आज...
त्याने आपले शॉट आज अखेरपर्यंत ट्रायच केले नाहीत.
लास्ट एक दोन ओवरला मग अचानक गेअर टाकणे भारी गेले..
हे असे एकच जण करू शकतो जगात. जो लास्ट ओवरला फलंदाजीला असेल आणि १४-१५ धावा असतील तर बॉलर दबावात असतो आणि तो फेव्हरेट असतो..
पंतने तसे न करता आपल्या शैलीने खेळायला हवे होते.. पण तो गुरू सारखे खेळायला गेला..
असो, एक शिकवणारा अनुभव पदरी पडला हे ही नसे थोडके

स्वरूप, असामी - तुम्ही जे सांघिक यशाबद्दल लिहीलय त्याच्याशी संपूर्ण सहमत! क्रिकेट हा शब्दशः सांघिक खेळ आहे.
>>>>>>>

+७८६ कुठेतरी आपले सर्वांचे एकमत झाले.
नव्व्वदीच्या दशकात आधी सचिन आणि मग नंतर त्यासोबत दादा द्रविड सेहवाग वगैरे एकेक सुपर्रस्टार होते. वैयक्तिक खेळी खेळायचे. चमकायचे. पण मोठ्या स्पर्धेत आणि फायनल्सना कच खायचे. हरायचे..
पुढे धोनी आला आणि या सुपर्रस्टार खेळाडूंच्या चाहत्यांना न आवडणारे कठोर निर्णय घेतले. आणि कोण्या एकट्यादुकट्या खेळाडूला नाही तर संघाला सुपर्रस्टार बनवले.. अन्यथा दादा द्रविड सचिन तिघे एकत्र आपल्याला २०११ चा विश्वचषकही खेळताना दिसले असते. आणि मग तो आलाच नसता...

Pages