आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिराज ने शेवटची ओव्हर फारच जबरदस्त टाकली. >> सिराजची एकूनच ह्या सीजन मधली बॉलिंग जबरदस्त आहे. पेस पण वाढलाय, लआईन लेंग्थ मस्त बदलतोय, चुकांमधून शिकतोय ते दिसतेय.

पंत ला फास्ट बॉलर्स ला लॉग ऑन किंवा लॉग ऑफ वरून सिक्स मारताना बघितल्याचे पटकन आठवत नाही सध्या. काही तरी बदललेले आहे त्याच्या स्टाईलमधे असे वआटते पण काय ते लक्षात येत नाही चटकन.

+७८६ कुठेतरी आपले सर्वांचे एकमत झाले. >>>>> फेरफटका, ऋन्मेऽऽषच्या पोस्टमध्ये ह्या वाक्याच्या वर जे लिहिले आहे आणि खाली जे लिहिले आहे ते सारखं आहे का ? खाली जे लिहिलं आहे ते तुला म्हणायाचं होतं का (ह्या चर्चेत) ??

पंत ला फास्ट बॉलर्स ला लॉग ऑन किंवा लॉग ऑफ वरून सिक्स मारताना बघितल्याचे पटकन आठवत नाही सध्या.
>>>>>>>>
त्याला ऑफ स्टंपबाहेर यॉर्कर लेंथ टाकून रोखायचे प्लान सर्वच टीम बनवतात. अर्थात हा प्लान हल्ली कॉमन झालाय तरी त्यासमोर आणखी वर्क होतो. तो जीव काढून मारतो आणि त्याला रिस्क फ्री सिंगल मिळत राहतात, पण त्याच्या लौकिकाला साजेशी मारझोड त्याला करता येत नाही.

२०१९ सालच्या आयपीएलला पंत जबरा फॉर्मला होता. एलिमिनेटरमध्ये हैदराबादला एकहाती हरवून सेमीला पोहोचला होता. तिथे चेन्नई समोर होती. तेव्हा दिल्लीच्या लवकर विकेट गेल्यावर पंतच पुन्हा धावून आलेला. शेवटी फटकेबाजी करून त्याने सामना खेचत फायटींग टोटल पर्यंत पोहोचवले असते.. मी तेव्हाही त्याचा चाहता असल्याने याच अपेक्षेत होतो. पण तेव्हा धोनीने त्याला ऑफस्टंपच्या बाहेर बांधून टाकला आणि त्याला गेअर बदलता आला नाही. बरेपैकी मारले पण जी गरज होती आणि त्याची क्षमता होती तशी खेळी झाली नाही. पंधरा धावा कमी झाल्या आणि त्या निर्णायक ठरल्या. आणि मग गेल्या आयपीएलमध्ये मग हे दर मॅचला दिसायला लागले.

पण तेव्हा धोनीने त्याला ऑफस्टंपच्या बाहेर बांधून टाकला >>>> ओह. धोनीने बॉलींग टाकली तेव्हा ? मी नाही पाहिली मॅच ती.

गूड वन हं !
अजून एक,
मी माझ्या मित्राला म्हणालो हा डॅम मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी बांधला आहे.
तो म्हणाला, अच्छा दगड वीटा त्यांनी स्वत:च्या डोक्यावरून उचलून नेल्या Wink

बांधणे आणि बांधून टाकणे ही दोन वेगळी क्रियापदे आहेत ना ?

दगड वीटा उचलण्याचं क्रेडीट मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांना देणार नाही ना ? मग प्रत्यक्ष बॉल टाकण्याचं क्रेडीट बॉलरना द्या ना. असो सगळी चर्चा झालीच आहे आधी. पण मुद्दे खोडले नाहीत म्हणजे ते पचले असं वाटायला नको म्हणून पोस्ट फक्त.

यावरून आठवले,
याच धाग्यावरची एक गंमतीशीर पोस्ट बघा. धोनीसारखा फिनिशर मिळाला म्हणून चेस करून जिंकू लागलो त्याचे श्रेय द्रविडला कसे दिले जात आहे बघा Happy

>>>>>>>>>>
द्रविड च्या कॅप्टन्सीखाली आपण टॉस जिंकून चेस करायला - एक स्ट्रॅटेजी म्हणून - सुरूवात केली. सलग १६ यशस्वी चेस चा विक्रम होता आपल्या टीम चा. त्याच काळात युवराज-धोनी जोडगोळी ला फिनीशर म्हणून रोल दिला गेला

पराग, एकमत झाले सांगून मग आपले पत्ते हळूच सरकवले आहेत त्याने, सचिन द्रविड बद्दल काड्या घालून. प्रॉपर क्रिकेट बद्दल बोलताना तो व्यवस्थित बोलतो. मग मधेच काड्या घालतो.

ऋन्मेष शी बोलताना दीवार सारखे "जब एक क्रिकेट फॅन बोलेगा, एक फॅन माबोकर सुनेगा. जब एक धोनी/शाखा फॅन बोलेगा एक माबोकर इग्नोर मारेगा" असे आधीच सांगायला हवे Happy

मग प्रत्यक्ष बॉल टाकण्याचं क्रेडीट बॉलरना द्या ना
>>>>
कोणी नाकारले आहे. Happy
पण गोलंदाजांनो तुम्हाला चेंडू असे टाकायचे आहेत आणि मी त्यानुसार तुम्हाला फिल्डींग देतो हे कप्तानाचे काम असते आणि त्याचे श्रेय त्याला मिळायला हवे असे मला वाटते. म्हणजे मी तरी देतो Happy

धोनी/शाखा फॅन बोलेगा एक माबोकर इग्नोर मारेगा"
>>>

हे आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्ध ईतर संघ अशी एक चाहत्यांची दुश्ननी सुरू झाल्याने धोनी हळू हळू शाहरूखच्या पंक्तीत बसला आहे. म्हणजे यू कॅन हेट धोनी यूह कॅन लव्ह धोनी बट कॅन नॉट ईग्नोर धोनी Happy
यूह म्हणजे एकूणच सोशलमिडीयावर ॲक्टीव्ह असणारे क्रिकेटप्रेमी...

चला शुभरात्री Happy

पण गोलंदाजांनो तुम्हाला चेंडू असे टाकायचे आहेत आणि मी त्यानुसार तुम्हाला फिल्डींग देतो हे कप्तानाचे काम असते आणि त्याचे श्रेय त्याला मिळायला हवे असे मला वाटते. म्हणजे मी तरी देतो >> कमालच आहे, मला वाटायचे की बॉलर्स, कोच ईत्यादींना ह्यात काही तरी से असतो. पण हे सगळे कप्तान ठरवतो होय. इतकी वर्षे आपण उगाच मुरली, वॉर्न, मार्शल, हॅडली इत्यादी लोकांना कसले जबरदस्त बॉलर्स असे श्रेय देत होते. ते तर नुसते सांगकामे हमाल होते - खरे सूत्रधार रणतुंगा, जयवर्धने, वॉ, टेलर, पाँटिंग, रिचर्ड्स, लॉईड, थोरला क्रो वगैरे होते. ते सांगत की " गोलंदाजांनो तुम्हाला चेंडू असे टाकायचे आहेत आणि मी त्यानुसार तुम्हाला फिल्डींग देतो". त्यामूळे ह्यांना खोर्‍याने विकेट्स काढल्या . बरे झाले हे पण कळले.

>>पण गोलंदाजांनो तुम्हाला चेंडू असे टाकायचे आहेत आणि मी त्यानुसार तुम्हाला फिल्डींग देतो हे कप्तानाचे काम असते आणि त्याचे श्रेय त्याला मिळायला हवे असे मला वाटते. म्हणजे मी तरी देतो<<
श्रेय द्यायचांच प्रश्न असेल तर ते शेवटि कर्णधारालाच मिळतं. यु लाइक इट ऑर नॉट, ए टीम कॅप्टन लिफ्ट्स द ट्रॉफि फर्स्ट... Wink

बाय्दवे, वरचा परागचा शब्दच्छल हा एखादा सुप्त किडा संधी सापडल्यावर बाहेर येणं याचं उत्तम उदाहरण आहे... Proud

असो. आज पृथ्वी सारखा क्लास बॅट्समन, आउटसाइड द ऑफस्टंप बॉलला - झिरो फुटवर्क, बॉलच्या लाइन्मधे न येता टॅप करतो हे बघताना वाईट वाटलं. पेशंस माइट बी द मोस्ट एक्स्पेंसिव कमाडिटी इन टी२०...

Catch आऊट चे क्रेडिट बॉलर ला देने चुकीचे वाटते... आता बॉलर ने बॉल टाकला, बॅट्समन ने सिक्स भिरकावून द्यायचा प्रयत्न केला, बाऊंडरी वर फिल्डर ने catch पकडला...
बॉलर चे काय कौतुक यात?

बाकी द्रविड बद्धल सहमत.. प्रचंड ओव्हररेटेड क्रिकेटर.. आजच्या जमान्यात प्लेइंग 11 मध्ये कधीच नसता...

पराग, अरे ऋन्मेष ने माझ्याशी सहमत होणं हा माझा बहूमान झाला. त्याच्याशी सहमत होण्याइतपत आपली उंची नाही बाबा. Happy

आता मैदानावरच्या स्ट्रॅटेजीजचं श्रेय कॅप्टनला द्यायचं का फक्त आपल्या आवडत्या कॅप्टनला द्यायचं हा मुद्दा महत्वाचा आहे. अगदी टॉस हारलो तरच किंवा अगदी अपवादात्मक परिस्थितीत टॉस जिंकून बॉलिंग घेणारी टीम एक स्ट्रॅटेजी म्हणून टॉस जिंकून बॉलिंग घ्यायला लागली, एक स्फोटक फलंदाज म्हणून अप्पर मिडल ऑर्डरवर खेळून नावारूपाला येऊ लागणार्या एका नवोदित खेळाडूला एक स्पेसिफिक रोल दिला गेला (जो त्याने अतिशय उत्तमरित्या निभावला) तरिही त्या व्यूहरचनेचं श्रेय कॅप्टनला न देता, परत आपण ज्याची पाठराखण करतो अशा खेळाडूलाच द्यायचं - ए साहेब, यह ठीक नही|

च्रप्स Rofl विनोदी कल्पनाविलास लिहायचं मनावर न घेता सुद्धा इतकी विनोदनिर्मिती कशी करू शकता, कुणास ठाऊक! टेस्ट्स आणि वनडे मधे १०,०००+ रन्स चा पल्ला गाठलेल्या जगातल्या मोजक्या खेळाडूंमधे ज्या खेळाडूची गणना होते, ज्याने इंग्लंड, वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया मधे टेस्ट्स जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला तो खेळाडू केवळ महान आहे.

आपण आपापली मतं मांडताना /इतरांची खोडताना काही फार मोठ्या खेळाडूंविषयी विनाकारण अनुल्लेखानं लिहितोय. ते थांबवून आयपीएलविषयी बोलू या असं माझं सजेशन आहे.

*बाकी द्रविड बद्धल सहमत.. प्रचंड ओव्हररेटेड क्रिकेटर.. आजच्या जमान्यात प्लेइंग 11 मध्ये कधीच नसता..* -
तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक , पण
राऊळाच्या कळसाला
लोटा कधीं म्हणूं नये II

*आज पृथ्वी सारखा क्लास बॅट्समन, आउटसाइड द ऑफस्टंप बॉलला - झिरो फुटवर्क, बॉलच्या लाइन्मधे न येता टॅप करतो हे बघताना वाईट वाटलं. * - +1 . मध्यतरीचया त्याच्या ' बॅड पॅच'चं हेंच कारण होतं हें उमजूनही त्याला त्याच चूका करतांना पहाणं त्रासदायक वाटतं. तो प्रतिभावान आहे, शैलीदार आहे व होतकरू आहे पण सलामीचा
फलंदाज आहे, म्हणून तर ह्या तंत्रातील मूलभूत त्रुटी दूर होत नाहींत याचं अधिकच वाईट वाटतं व काळजीही वाटते; तीव्र स्पर्धेत अशाने तो आपली कारकिर्दच खराब करून घेईल याची !

पराग, अरे ऋन्मेष ने माझ्याशी सहमत होणं हा माझा बहूमान झाला. त्याच्याशी सहमत होण्याइतपत आपली उंची नाही बाबा >>> फेफ Lol

अगदी अपवादात्मक परिस्थितीत टॉस जिंकून बॉलिंग घेणारी टीम एक स्ट्रॅटेजी म्हणून टॉस जिंकून बॉलिंग घ्यायला लागली, >>> टेस्ट क्रिकेट मधे कोणाचेतरी वाक्य आहे. When you win the toss, half the time you bat first. The other half, you think, and then bat first.

* इंग्लिश क्रिकेटर असणार, कारण बाकीच्यांनी त्यांच्या भारी लोकांच्या भारी वाक्यांचे इतके दस्तऐवजीकरण केलेले नाही. त्यामुळे साध्यासुध्या इंग्लिश क्रिकेटर्सना व त्यांच्या कोट्सना किंमत आली. आता इंग्रजांना पुन्हा क्रिकेट मधे व्हॅल्यू आली. पण मधल्या दुष्काळी काळात सुद्धा भारतात तरीही नेव्हिल कार्डस वगैंचे सिलेंडर्स वापरून अलंकारिक वाक्ये लिहीणारे अनेक जण त्यांची तळी उचलत. तेव्हा एकदा "एक दिवसांच्या क्रिकेटचे बादशहा लँकेशायर" असे भारतातील कोणीतरी लिहीले होते. तेव्हा जागतिक क्रिकेट मधे आख्ख्या इंग्लंडला सुद्धा कोणी विचारत नव्हते.

फेफ.. Lol

कोणी नाकारले आहे >>>> दिले तरी कुठे आहे ? (जसं धोनीला दिले आहे..)

एखादा सुप्त किडा संधी सापडल्यावर बाहेर येणं याचं उत्तम उदाहरण आहे... >>>>> संधी जवळजवळ नेहमी असतेच. वेळ (आणि इच्छा) असणं महत्त्वाचं. Wink वर लिहिलं तसं कोणी काही बोललं नाही म्हणजे आपले मुद्दे पचले असा गोगै व्हायला नको म्हणून लिहिलं.

>>बाय द वे, म्हणूनच सगळे श्रेय धोनी ला देऊ नये असे का स्वरुप ? Wink

धोनीला काय किंवा कोहली, द्रवीड, गांगुलीला काय, कुणालाच सगळे श्रेय, अपश्रेय वगैरे देवू नये!
धोनी आवडता खेळाडू आहेच; अगदी त्याने माझ्या आवडत्या खेळाडूंविषयी जे केले ( म्हणजे असे म्हंटले जाते) त्यानंतरही त्या खेळाडूंना धोनीविषयी अगदी जेन्युअनली खुप चांगले बोलताना ऐकलेय!
मग आपण कोण ग्रजेस धरुन राहणारे?

>>बांधणे आणि बांधून टाकणे ही दोन वेगळी क्रियापदे आहेत ना ?
पराग, dont fall in to trap Wink

>>ऋन्मेष शी बोलताना दीवार सारखे "जब एक क्रिकेट फॅन बोलेगा, एक फॅन माबोकर सुनेगा. जब एक धोनी/शाखा फॅन बोलेगा एक माबोकर इग्नोर मारेगा" असे आधीच सांगायला हवे Happy
Lol

>>आपण आपापली मतं मांडताना /इतरांची खोडताना काही फार मोठ्या खेळाडूंविषयी विनाकारण अनुल्लेखानं लिहितोय.
ते अनुल्लेखाने आणि कसे लिहतात म्हणे? तुला तुच्छतेने म्हणायचे आहे का? Wink

आता कालच्या मॅचबद्दल:
हॅटमायर चालला एकदाचा.... मला प्रश्न पडला होता की याला इतके हाईप का करुन ठेवलेय.... पण काल चांगला खेळला!
आता स्मिथ चे काय करायचे?
पंतने पडझड होत असताना मॅच्युरिटी दाखवली पण हर्षल, सिराज वगैरे ज्या फॉर्ममध्ये आहेत ते बघता जरा आधीच गेअर बदलायला सुरुवात करायला पाहिजे होती.
सिराज बुमराहचा वारसदार होण्याच्या मार्गावर आहे.... कसले अचूक यॉर्कर होते त्याचे!
much improved version
पंतचे वाईट वाटले.... so close till so far.... just one run short!
पण शिकेल हळूहळू Happy

ABD का ABD आहे हे त्याने काल परत एकदा सिद्ध केले..... त्यातून शेवटची ओव्हर स्टॉयनिसला देण्याचा दिल्लीचा अनाकलनीय निर्णय RCB साठी फायद्याचा ठरला!
RCB ने त्यांच्या दोन मुख्य लंगड्या बाजूंवर यंदा चांगले काम केलेय.... लोअर मिडल ऑर्डर आणि शेवटच्या चार ओव्हर्समधली बॉलिंग.... मुख्य म्हणजे त्यांनी केलेले बदल क्लिक होतायत!

जी गोष्ट धोनी आपले कप्तानी दिमाग वापरून करतो त्यात धोनीला कप्तान म्हणून श्रेय दिले की ओढून ताणून मी फक्त आणि फक्त धोनीलाच श्रेय देतोय असे चित्र उभे करायचा अट्टाहास का Happy

बाकी द्रविड बद्धल सहमत.. प्रचंड ओव्हररेटेड क्रिकेटर.. आजच्या जमान्यात प्लेइंग 11 मध्ये कधीच नसता...
Submitted by च्रप्स on 28 April, 2021 - 05:36
>>>>>>>>

ईथे लिमिटे फॉर्मेटमध्ये असे मेंशन करायला हवे च्रप्स
कसोटीत आजवर आपल्याला दुसरा द्रविड सापडला नाहीये.

अर्थात काही वेळा असेही होते की द्रविड वा पुजारासारखे फलंदाज ईतके बचावात्मक खेळतात की समोरील गोलंदाजांना विनाकारण डोईजड करून ठेवतात. हे लोकं आपला क्लास वापरून यातूत तरतात. पण ईतरांना खेळणे अवघड करून ठेवतात. हे कधी आकड्यात दिसत नाही. किंबहुना आकड्यात हेच किती भारी खेळले हे दिसते. पण प्रत्यक्षात त्यांनी आपाल्याला बॅकफूटवर ढकललेले असते. अर्थात कट्टर चाहते हे कधीच मान्य करणार नाहीत. कारण सहसा आपल्याकडे एकाच दिशेने विचार केला जातो.

पण अर्थात हे ठराविक परीस्थितींबद्दल लिहितोय. जिथे खरेच नांगर टाकून उभे राहायची गरज असते, जी परिस्थिती जास्त वेळा असते, तिथे अश्यांना तोड नाही. म्हणून हे द्रविड कलिस पुजारा चंदरपॉल जातकुळीतला फलंदाज संघात एक हवाच.

फलंदाज ईतके बचावात्मक खेळतात की समोरील गोलंदाजांना विनाकारण डोईजड करून ठेवतात. हे लोकं आपला क्लास वापरून यातूत तरतात. पण ईतरांना खेळणे अवघड करून ठेवतात. हे कधी आकड्यात दिसत नाही. किंबहुना आकड्यात हेच किती भारी खेळले हे दिसते. पण प्रत्यक्षात त्यांनी आपाल्याला बॅकफूटवर ढकललेले असते. अर्थात कट्टर चाहते हे कधीच मान्य करणार नाहीत. कारण सहसा आपल्याकडे एकाच दिशेने विचार केला जातो.>>> धोनीची सध्याची फलंदाजी पाहता हे जे काही लिहिलं आहेस ते तुझ्याबाबतीतच लागू होतंय. अर्थात तू पण कट्टर समर्थक असल्याने ही गोष्ट मान्य करणार नाही हे ओघाने आलंच.

धोनीची सध्याची फलंदाजी पाहता हे जे काही लिहिलं आहेस ते तुझ्याबाबतीतच लागू होतंय. अर्थात तू पण कट्टर समर्थक असल्याने ही गोष्ट मान्य करणार नाही हे ओघाने आलंच.
>>>>>>>

माझ्या सुरुवातीच्यच पोस्ट वाचल्या तर मी ते केव्हाच केलेय हे लक्षात येईल.
धोनी सध्या वय, निवृत्ती, नो मॅच प्रॅक्टीस, यामुळे एक फलंदाज म्हणून संपला आहे. जे आहे ते आहे, त्यात लाजायचे काय Happy
आपली बॅटींग चाचपायला एक दोन सामने पुढे आला. नाही जमतेय हे बघून आता जडेजाला पुढे पाठवून मागेच राहतो. मध्ये एकदा आलेला तेवहही आंधळा पट्टा फिरवून काही रन्स जमवले, पण मोमेंटम जाणार नाही याची काळजी घेतली.
पण तो आहे कारण किपिंग आजही त्याची चित्यापेक्षा चपळ आहे, आणि कप्तानी दिमाग ते तर तौबा तौबा... ९९ टक्के पगार तो त्याचाच घेतो Happy

वॉर्नर ला एव्हढा चाचपडताना क्वचितच पाहिलाय. आज शॉट्स बसले तरी फिल्डरच्या हातातच जात होते. ( कोपर्‍यातला आवाज : धोनी ने फिल्डींगच तशी लावलेली ) पांडे आज स्टेटमेंट करायचेच अश्या स्टाईल मधे खेळेल असे वाटले होते पण नेहमीसारखाच फक्त थोडासा फास्ट खेळतोय. नथिंग ग्रेट.

खेळवला आज वॉर्नरला. पांडे त्याच्या नेहमीच्या शैलीत. १६० च्या आतच थांबतील असे वाटलेले. शेवटी दोन ओवरमध्ये विल्यमसन आणि जाधव यांनी थोडेसे लढायला दिले काहीतरी...
पण चेन्नईची सुरुवात पाहता आज पुन्हा चेन्नई समोरच्या संघाला चिरडूनच जिंकणार !

तात्पर्य - शेर अगर बूढा भी हो शिकार करना नही छोडता Happy

जिंकला आज पुन्हा Happy
विजयाचे पंचक झाले !

एक्स्ट्रा इनिंगमध्ये आज आकाश चोप्रा आणि ईरफान पठाण मिळून वॉर्नरच्या कप्तानीची खेचत आहेत आणि धोनीच्या कप्तानीची तारीफ करत आहेत.
टॉसला वॉर्नर बहुधा पहिली फलंदाजी घेताना म्हणालेला की आतापर्यंत चेस करून झाले आता पहिली फलंदाजी करून बघूया.
याऊलट धोनी म्हणालेला की मला ईथे चेसच करायचा होता.
वॉर्नरने पहिली फलंदाजी तर घेतली पण काय करायचे याचा प्लान रेडी नसल्यासारखे खेळले.
याऊलट धोनीला नेमके ठाऊक होते काय करायचेय. आताचेच नाही तर आधीही वानखेडेलाही त्याने पिचचे अंदाज अचूक बांधून निर्णय घेतले. उगाच नाही तो सर्वोत्तम कर्णधार आहे....

अरे हो, हे मी नाही तर यातला श्ब्दन शब्द आकाश चोप्रा आणि ईरफान पठाण मिळून बोलत होते
ऋन्मेष तो खाली पिली बदनाम है, धोनी को तो सारी दुनिया मानती है Happy

स्वरूप, खरंय बाबा तुझं. नुसता पालथाच नाही तर अगदी hermetically sealed घडा आहे Happy

हैद्राबाद फारच कणाहीन खेळले आज दुसर्या इनिंगमधे. बॅटींग करताना काहीतरी प्लॅन असल्यासारखे खेळत होते. पण ऋतुराज आणि फाफ ने केलेल्या प्रतिकारानंतर अगदीच दिशाहीन झाले होते. एक रशीद सोडून, भुवनेश च्या अनुपस्थितीत त्यांची बॉलिंग अगदीच दुबळी आहे. स्विंग मिळाला तर संदीप शर्मा चालेलही, पण दिल्लीत स्विंग ची अपेक्षा फारशी नाही. मनिश पांडे ला गवसलेला सूर हीच काय ती जमेची बाब.

उद्या मुंबई ला तुलनेनं सोपी प्रश्नपत्रिका आहे. बटलर जर मागच्या मॅचमधल्या बाऊन्सर च्या इंज्युरीतून सावरला नसेल, तर राजस्थान चा पाय अजूनच खोलात जाईल.

Pages