खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

रीया हो..शेंगदाण्याची चटणी...
या आमच्या कडे वीकली इडली-डोसे असतातच...एखादा आठवडा नाही केले कि मुलं विचारतात.. पण मला काहीही चालते..चहा चपाती पण Happy
मी पुण्याची...सध्या मुक्काम पोस्ट तामिळनाडू Happy

तरीच इरकं आलं Lol
अवांतर - थोडक्यात तू बहुभाषिक आहेस तर (हेवा हेवा)

सिंगल असताना आणि एकटं रहात असताना माझ्याकडे पण पूर्वी दर आठवड्याला इडली डोसे असायचे (गेले ते दिवस)
उद्या टाकतेच भिजायला!

मला app वरून फोटो टाकता येत नाहीत आणि तेवढ्यासाठी वेब वर लॉगिन करायचा कंटाळा येतो म्हणून तर कित्येक फोटो टाकत नाही मी.

रविवारी मुलाचं बोरन्हाण कारणार आहे तेंव्हा इडली करायचा प्लॅन आहे

जमतंय थोडं थोडं तामिळ >> जेव्हा तामिळ नव्हे तर तमिळ असे लिहायला/म्हणायला लागाल तेव्हा समजू, जमतंय तुम्हाला.

या तांदळाच्या पदार्थाचे नाव माहीत नाही. गरम गरम खायला छान लागतो. थंड नको. आईने पण प्रशस्तीपत्र देऊन टाकलेय. Happy
IMG_20210205_081051~2.jpgIMG_20210205_081054~2.jpg

लिंक देऊ का?
Thank you लावण्या. अहो जाहो नको प्लीज Happy

थँक्स रानभुली..
उन्हाळा सुरू झाला कि रोज दही लावते ताजं ताजं..काल छोट्या मडक्यात लावलं होतं..मस्त गोड बनलं दही Happy

भारी फोटो सगळे.
गेल्या आठवड्यातले ...

20210205_143455.jpg
तवा पिझ्झा. हल्ली मुलाला हे नवीन आवडायला लागलंय.. म्हणून कणकेचा केला.

20210205_143522.jpg
होममेड.. (हेल्दी वगैरे काही नाही.. मोर्डे बार ची आहेत..पण आवड आणि मुलांसाठी असे दोन हेतू Happy )

20210205_143602.jpg
वांगी, पिठलं, मेथी आणि ज्वारी भाकरी.

आणि हा मागच्या महिन्यात केलेला केक.. मुलीच्या वाढदिवशी..
आधी पोस्ट केलाय का आठवत नाही.. नसावा..
20210205_143711.jpg
चाँकलेट केक , चॉकलेट हेझलनट गनाश फीलिंग आणि क्रीम फ्रॉस्टिंग.

मडक्यात दही.. looking awesome!! कसं लावायच आणि मडकं कसं सिलेक्ट करायच.. माझे २ ३ प्रयत्न फसले आहेत..

पिकू कण केच्या तव्या पिझ्झाची रेसिपी द्याल का?
किंवा तुम्ही जर यू ट्यूब बघून केली असेल तर यू ट्यूब चॅनेल ची लिंक मिळेल का?

रूचा..लिंक नाही, असचं केला.
कणिक नेहमीसारखी मळून घेतली. आणि थोडी जाड आणि मोठी पोळी लाटली. दोन्ही बाजूने थोडे शेकून ठेवली. (२ ३ तासानंतर पण वापरू शकता)
दोन्ही बाजूला बटर लावून.. एक बाजू भाजली (कमी भाजायची) यावर आता २ ३ सॉस मिक्स करून लावले . वरून चीज + भाज्या+ स्पाईसेस + चीज असं टाकून चाळणीने झाकले. खालची बाजू मस्त भाजली की ५ मिं.त तयार..
चीज साधंच..अमूलचं. सॉस - टोमॅटो+ पिझ्झा सॉस+ विबा चा चिली गार्लिक स्प्रे ड. थोडा.

Pages