Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सिलिका आणि सायट्रिक ऍसिड हे
सिलिका आणि सायट्रिक ऍसिड हे त्यातले मुख्य घटक आहेत.
>>
वाळु अन लिंबू?
त्या विस्।नुजी रसोईवाल्यांना झैरातीचे पैसे मिळत अस्तील नक्कीच.
गुड जाॅब मेधा तैं. मटारची
गुड जाॅब मेधा तैं. मटारची आमची गरज इतकी मोठी आहे की उन्हाळ्यात सगळे मटार खाल्ले तरी आता परत लावले पण ते स्नेल्सनी (मोठ्यागोगलगायूी) खाल्ले मग शेवटी होलसे ल मधून मोठी झीपर बॅगवाल्या दोन डिलीव्हरीज मागवल्या
डॉ. वर्षा जोशींनी माझ्या
डॉ. वर्षा जोशींनी माझ्या इमेलला उत्तर दिलंय.
त्यांनी इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती वाचली आणि त्यांना असं दिसलं की apparantly या पावडरमुळे पदार्थातलं पाणी आणि गरम तेल यांच्यातली रासायनिक अभिक्रिया (ज्यामुळे एरवी हानिकारक घटक निर्माण होतात) टाळली जाते.
पण त्यांच्याही मते, घरगुती वापरायला या पावडरची काही गरज नाही. बाहेर रेस्टॉरंट्समध्ये खूप वेळ तेल तापत राहणार असतं त्यामुळे ठीक आहे.
माहीती बद्दल धन्यवाद वावे
माहीती बद्दल धन्यवाद वावे
माझे prawns 7..8 min
माझे prawns 7..8 min शिजल्यावर पण अतिशय रबर सारखे chiwat होतात prawns माऊ शिजायला काही युक्ति आहे काय?
7..8 min शिजल्यावर पण अतिशय
7..8 min शिजल्यावर पण अतिशय रबर सारखे chiwat होतात......
एवढा वेळ शिजवत नाहीत.3_४ मिनिटात कोलंबी शिजते.तुम्ही कोलंबीची आमटी करता tyaveli रंग बदलला ki kolambi शिजली हे लक्षात ठेवा.मात्र फ्राय करताना कुरकुरीत होण्यासाठी जास्त वेळ ठेवायची.
धन्यवाद देवकी. लिप्त करते
धन्यवाद देवकी. लिप्त करते त्यावेळी असा प्रश्न येतो एरवी stir फ्राय चांगलेच होते.
मसाला चांगला भाजल्यावर तेल
मसाला चांगला भाजल्यावर तेल सुटते मगच कोळंबी टाकायची. 3-4 मिनिटे मसाल्यात परतली की लगेच शिजते आकार पण कमी होतो कोळंबीचा. त्यावरुन समजावे भाजी तयार झाली.
thank you Siyona
thank you Siyona
मी कधीच कोळंबी केली नाहीये,
मी कधीच कोळंबी केली नाहीये, मला आवडत नाही म्हणून पण मुलाला आणि नवर्याला आवडते.. तर आता करून पाहायचे ठरवलं...कोळंबी घेताना मासेवाले साफ करून देतात तितके पुरेसे असतं कि आपण पुन्हा विशेष साफ करावं लागतं...बीगीनर्स साठी काही टिप्स असतील तर सांगा....
मृणाली युट्यूब वर खूप विडियो
मृणाली युट्यूब वर खूप विडियो आहेत कोळंबी साफ कशी करावी.
साफ करून देतात तितके पुरेसे
साफ करून देतात तितके पुरेसे असतं कि आपण पुन्हा विशेष साफ करावं लागतं.>>>> कोलंबीच्या पाठीला चीर देऊन एक काळा धागा असतो,तो काढावा लागतो.काढायला आला नाही तरी चालेल.पण खातेवेळी काढला तरी येतो.
घरी आणल्यावर साफ करावीच लागते
कोलंबीच्या पाठीला चीर देऊन एक काळा धागा असतो,तो काढावा लागतो>>>>>>>>
हा हे करताना पाहिले आहे सासू बाईंना... खूप वेळखाऊ काम आहे...अवघड वाटतंय मला..
अवघड काही नाही मृणाल. एक
अवघड काही नाही मृणाल. एक लहान टोकदार सूरी घेऊन तो काळा धागा काढता येतो. तो काढावाच नाहीतर पोट खराब होते असे नवर्याने सांगीतले. मी व्हेज आहे पण नवरा खातो. तो आणतो आणी हे करतो. आणी कोळंबी फ्राय करायची असेल तर जास्त वेळ फ्राय करु नये नाहीतर चिवट होते. इती नवरा. जागुचे धागे वाच.
https://www.maayboli.com/user/379/created?page=2>>>>> कोळंबी शोधत बस यात.
ओके ओके बघते...सेम हियर मी पण
ओके ओके बघते...सेम हियर मी पण खात नाही.. आणि नवर्यासाठी कधी बनवावे असे मनावर पण घेतले नाही
पण मुलाला आवडते म्हणून म्हटलं ट्राय करावे... शोधाशोध करून बनवेन
धन्यवाद!!
जागूताईंचे धागे छान असतात.
जागूताईंचे धागे छान असतात. आता का बरं लिहीत नाहीत त्या ?
कर दिया ना कंफुझ.
कर दिया ना कंफुझ.
इथे वाचुन कुठे मनाशी ठरवत होते की ह्या वर्षी मटार स्टोर करुन ठेवुया. पाच सहा महिने टिकतील असे.
मानवनी दिलेली निशामधुची लिंक बघितली. सोबत मधुरा ची पण पद्धत बघितली. दोन्ही सेम आहेत.
तर लगेच मीरा म्हणते की ब्लांच न करत स्टोर करता येतात.
ब्लांच न करता रहातात का नीट? की ब्लांच करुन जास्त टिकतात?
मी पण ब्लँच न करताच फ्रिजर
मी पण ब्लँच न करताच फ्रिजर मध्ये ठेवते. वर्षभर वापरु म्हणले तरी 4महिन्यातच संपतात
दुपारी खाण्यासाठी स्नॅक्स
दुपारी खाण्यासाठी स्नॅक्स बनवायचे आहे, पण रेडी टू इट पाहीजे, जसे उपमा, भाजून ठेऊ शकतो आणि ऐन वेळी फक्त पाण्यात उकळून खाऊ शकतो, किंवा कटलेट सारखे प्रकार जे हेलदी आहेत आणि सोपे पण
असे प्रकार सुचवा , मी फुल टाइम काम करते , प्रत्येक वेळी मुलाला नवीन करून देणे जमत नाही,
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/46396>>>>> अश्विनी हा बाफ वाचुन बघ.
https://www.maayboli.com/node/48544>>>>> हा बाफ खूप छोट्या मुलांसाठी असला तरी पदार्थ सेम आहेत.
माझ्याकडे पाव किलो मेथी
माझ्याकडे पाव किलो मेथी मुठीयाचे पाकीट आहे. इथे उंधियोची भाजी मिळत नाही, त्यामुळे उंधियोत वापरता येणार नाही.
तर नुसतेच उचलून खाण्याशिवाय अजून कशात वापरता येईल?
रस्स्यात, कढीत घालून चांगले
रस्स्यात, कढीत घालून चांगले लागतील असे वाटते.
कांदा टोमॅटो ची झणझणीत रस्सा
कांदा टोमॅटो ची झणझणीत रस्सा भाजी करायची अन गॅस वरून उतरवायच्या आधी मुठीया त्यात घालायच्या अन लगेच चपाती सोबत खायचे.
छान लागतात पण चपाती/पोळी सोबतच चांगले लागतात भाकरी बरोबर मजा नाही येत
कढी-गोळे मध्ये चांगले लागतील
कढी-गोळे मध्ये चांगले लागतील वर म्हटल्याप्रमाण््. मी तर ते असेच परतून पण खाऊ शकते. खूप थंडीपण आहे. भेज दो यहाॅं पर
मी तीन किलो मटर ब्लांच करून
मी तीन किलो मटर ब्लांच करून झिप लॉक बैग्समधे भरून फ्रीजरमधे ठेवले.. उद्या सकाळी नऊ ते संध्याकाळी सातपर्यंत लाईट नसणार..(प्रत्येक महिन्यात असा एक दिवस असतो)
मटर खराब तर होणार नाहीत ना??
कढी-गोळे मध्ये चांगले लागतील
कढी-गोळे मध्ये चांगले लागतील वर म्हटल्याप्रमाण््. मी तर ते असेच परतून पण खाऊ शकते. खूप थंडीपण आहे. भेज दो यहाॅं पर >>> मम
आमटीत पण छान लागतील.
सॅलड सँडविचेस मध्ये वापरता
सॅलड सँडविचेस मध्ये वापरता येतील का? की कडक आहेत फार?
मेथी मूठीया चाट करता येइल
मेथी मूठीया चाट करता येइल का ? जसे पालक पकोडा चाट असते.
पकोडी वर फेटलेले दही ,गोड चटणी ,जीरे पुड ,चाट मसाला , बारीक चिरलेला कांदा , वरुन बारीक शेव घालुन.
किंवा जसे तो गट्टे का पुलाव असतो ना तसे मूठीया घालुन पुलाव केला करता येइल. वेज पुलाव करतो तसे मूठीया तळून त्यात बाकी भाज्या बरोबर घातल्या तर.
मृणाली, आजच चार पाच
मृणाली, आजच चार पाच प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये 75% पाणी भरून फ्रिजरमध्ये ठेवा. जेव्हा लाईट जातील तेव्हा या बर्फाने मटार थंड/फ्रोजन राहतील. काठोकाठ भरू नका कारण बर्फ पसरतो आणि बाटली फुटू शकते.
अमुपुरी भारी आयड्या
अमुपुरी भारी आयड्या
Pages