युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

खूप उशीरा लिहीत आहे. पण इतर कोणाला उपयुक्त ठरेल.
पुण्यात पौड फाटा येथे (दशभुजा गणपती मंदिराजवळ) नॅक (NAC) नावाचे दुकान आहे तिथे केक, चॉकलेट, आईस्क्रीम ह्यासाठी लागणारे सर्व साहित्य मिळते.
मोर्डे चॉकलेट बार पण तिथे मिळेल.
कोथरूड मध्ये आमच्या किराणा मालाच्या दुकानात देखील मिळते.

माझेमन Happy
रबडी ,
१.यात थोडी मिल्क पावडर घालून आटवून
पेढे
पहिली स्टेप जास्त आटवून....

पुण्यात पौड फाटा येथे (दशभुजा गणपती मंदिराजवळ) नॅक (NAC) नावाचे दुकान आहे तिथे केक, चॉकलेट, आईस्क्रीम ह्यासाठी लागणारे सर्व साहित्य मिळते.
मोर्डे चॉकलेट बार पण तिथे मिळेल.>> ओह्ह ओके.
मी ऐकून होते की असं एक दुकान आहे पौड फाट्या जवळ.
नाव नव्हतं माहिती. तसं मी फार बेकिंग करत नाही पण माहिती असावी.
माहिती बद्दल धन्यवाद मनस्विता.

मी_अनू, मी_अस्मिता धन्यवाद.
बासुंदी, पेढे पदार्थ करून पाहणार आहे. आज मात्र मायबोलीवरच्याच रेसिपीने हयग्रीव केले होते.

पुण्यात पौड फाटा येथे (दशभुजा गणपती मंदिराजवळ) नॅक (NAC) नावाचे दुकान आहे तिथे केक, चॉकलेट, आईस्क्रीम ह्यासाठी लागणारे सर्व साहित्य मिळते.
मोर्डे चॉकलेट बार पण तिथे मिळेल.
कोथरूड मध्ये आमच्या किराणा मालाच्या दुकानात देखील मिळते.>> मनस्विता थॅंक्स माहितीसाठी...तुमचे दुकान कुठे आहे?

आमच्या इथे इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये थालीपीठ भाजणी मिळत नाहीये. (रडणारी बाहुली). त्यामुळे आम्ही आवडत्या भाजणीच्या थालिपीठापासून वंचित राहत आहोत. नुसत्या ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ ठीकठाक झालं. (तरी चांगलं पुण्याहून आणलेलं मालदांडी ज्वारी पीठ होतं. आता संपलं.) तर वेगवेगळी पीठं मिक्स करून भाजणी सदृश प्रकार घरी करण्याचा काही फॉर्म्युला असल्यास कृपया सांगा.

त्यातल्या त्यात 1.5 भाग ज्वारी, 0.5 भाग बेसन, 0.5 भाग तांदूळ पीठ,असल्यास 0.25 भाग बाजरी पीठ, कांदा, हळद, हिंग,ओवा,तिखट,मीठ असे मिक्स करून थालीपीठ चांगले बनेल(अर्थात परदेशात इतके सर्व तुमच्याकडे असेल असं मी मानणं जरा कार्टून पणा ठरेल Happy )

सगळी पिठं veg vegali भाजून घ्या kadhai मध्ये(फार जास्ती नाही)आणि मग मिक्स करून थालीपीठ लावा..मस्त होते.

कोथरूड मध्ये आमच्या किराणा मालाच्या दुकानात देखील मिळते.>> मनस्विता थॅंक्स माहितीसाठी...तुमचे दुकान कुठे आहे? >> हाहाहा... मला क्षणभर कळेना माझं कुठलं दुकान. माझी वाक्यरचना चुकली. आम्ही किराणा माल ज्या दुकानातून घेतो तो ते दुकान.
DP रोडला म्हणजे महेश विद्यालयासमोर मंगल ट्रेडर्स दुकान आहे तिथे मिळेल.

हाहाहा... मला क्षणभर कळेना माझं कुठलं दुकान. माझी वाक्यरचना चुकली. आम्ही किराणा माल ज्या दुकानातून घेतो तो ते दुकान.
DP रोडला म्हणजे महेश विद्यालयासमोर मंगल ट्रेडर्स दुकान आहे तिथे मिळेल.>> हाहाहा .... ओके Happy ....

परवा बऱ्याच महिन्यानंतर डी मार्ट ला शॉपिंग साठी गेले होते तिथे ही मला डिस्काउंटेड रेट मध्ये मिळाले...

जर्दाळूच्या आतल्या बिया वापराव्या का? कशा? मी कधी कधी खलबत्याने ठेचून त्यातला बदाम खाते, कधी टाकूनच देते.
नेटवर बरेच वेगवेगळी मते वाचली. अगदी काही बियांनी कॅन्सर होऊ शकतो ते कॅन्सर बरा करण्यासाठी या बिया वापरतात अशी अगदी विरुद्ध मते आहेत.
अजून काही प्रश्न-
सगळे ड्रायफ्रूट्स भिजवूनच खावे का? म्हणजे - काजू, मनुका, खजूर वगैरे.
अक्रोड ,बदाम भिजवल्याने चवीला चांगले आणि पचायला हलके याव्यतिरिक्त काही फायदा आहे का?
अक्रोड, बदाम (भिजवून किंवा न भिजवता) साल न काढता खाल्ले तर काही वाईट असते का?
त्या सालांमध्ये काहीतरी असते ज्यामुळे बदामातले घटक शरीरात शोषले जात नाहीत असे काहीतरी वाचले.

कधी कधी खलबत्याने ठेचून त्यातला बदाम खाते, कधी टाकूनच देते>>>>> अय्यो का टाकून द्यायचा? मत टेस्ट असते त्या बीची.
अक्रोड ,बदाम भिजवल्याने चवीला चांगले आणि पचायला हलके >>>> अक्रोडाचे माहित नाही,पण बदाम नेहमी भिजवून खावा.तो उष्ण पडत नाही.भिजवल्याने अजून एक फायदा आहे.आठवत नाही,माबोवरच वाचला होता.कुठलातरी घटक पाण्यामधे विरघळतो,त्यामुळे भिजवलेला बदाम परत धुवून खावा.

परवा बऱ्याच महिन्यानंतर डी मार्ट ला शॉपिंग साठी गेले होते तिथे ही मला डिस्काउंटेड रेट मध्ये मिळाले... >> ok ते वापरून काय करणार आहात त्याचा फोटो/कृती येऊ दे.

ok ते वापरून काय करणार आहात त्याचा फोटो/कृती येऊ दे.>> होममेड चाॅकलेट्स... अतिशय सोपे असतात...यू ट्यूब वर दाखवले आहेत ... गेल्या आठवड्यात केले ... मुलींनी संपवले.. पुन्हा केले की फोटो टाकेन

अय्यो का टाकून द्यायचा? मत टेस्ट असते त्या बीची.
>> हो. खरंय. उगीच आळशीपणने एखादेवेळी टाकून दिले गेले आहे.

बदामाच्या माहितीबद्दल धन्यवाद

नुसत्या ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ ठीकठाक झालं. >>
नुस्त्या ज्वारीच्या पीठाच थालीपीठ करताना त्यात भरताच वांग भाजुण किंवा फ्रोजन सोलाणे कुटून किंवा काकडी/झुकीनी, हिरव्या मिरचीचा ठेचा /कोथिंबीर अस घालून करुन बघा. सुंदर लागतात तशी थालीपीठ.

तर वेगवेगळी पीठं मिक्स करून भाजणी सदृश प्रकार घरी करण्याचा काही फॉर्म्युला असल्यास कृपया सांगा.>>
एक वाटी ज्वारीच पीठ + १/४ वाटी बेसन , १/४ वाटी तांदुळ पीठ, १/४ वाटी पेक्षा थोडे कमी गव्हाच पीठ .

नुसत्या ज्वारीच्या पिठाचं किंवा एकुणच थालिपीठ करताना त्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करून किंवा शिजवलेली मसुराची/मुगाची/तुरीची डाळ यापैकी एक घाला. मस्त खुसखुशीत होतात थालिपीठं. बारीक जिरलेला लसूण आणि भाजलेल्या जिर्‍याची पूड पण. बाकी आपल्या आवडी प्रमाणं- कोथिंबीर/पालेभाजी/कांदा/किसलेला दुधी/तांबडा भोपळा.

धन्यवाद सीमा, सिंडरेला.
आज लक्ष्मीची ज्वारी, बाजरी दोन्ही पीठं आणली आहेत. त्यामुळे घरगुती मिक्स बनवता येईल. कांदा, कोथिंबीर नेहमी घालते. आता या इतर भाज्या घालूनही करून बघेन.

फ्रायपावडर ही वस्तू कुणी वापरली आहे का?
मी या पावडरची जाहिरात दिवाळी अंकांंमध्ये गेली काही वर्षे बऱ्याच वेळा पाहिली आहे. ही त्यांची वेबसाईट आहे.

http://frypowder.co.in/

त्यांचं असं म्हणणं आहे की तळताना ही पावडर वापरली की तेलाची, इंधनाची बचत होते, लोणी कढवताना त्यात ही पावडर घातली की बेरी कमी राहते वगैरे वगैरे.
पण प्रत्यक्षात कुणी ही पावडर वापरून पाहिली आहे का?

त्यांचं असं म्हणणं आहे की त्यात फक्त असे नैसर्गिक घटक आहेत, जे आरोग्याला अपायकारक नाहीत. सिलिका आणि सायट्रिक ऍसिड हे त्यातले मुख्य घटक आहेत. ती तेलात किंवा तुपात विरघळत नाही. शरीरात गेली तरी अत्यंत कमी प्रमाणात जाते आणि त्याचा आपल्याला काही अपाय होत नाही. तळून झालं की तेल फिल्टर करून घ्यायचं (हा फिल्टरही ते विकतात) आणि ते तेल परत वापरता येतं.

(स्वगतः)
पावडर आणि फिल्टर यांच्या खर्चात कदाचित किंचीत जास्त तेल वापरलं जाणं परवडत असेल, जर घरात अगदी कधीतरीच तळणी होत असेल तर.
पदार्थाची चव आणि बाकी प्रॉपर्टी बदलत नसतील तर वापरुन बघायला हवी. सारखं तळण होतं अश्या व्यावसायिकांना खूप उपयोग होईल.

Pages