युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

सिलिका आणि सायट्रिक ऍसिड हे त्यातले मुख्य घटक आहेत.
>>
वाळु अन लिंबू?

त्या विस्।नुजी रसोईवाल्यांना झैरातीचे पैसे मिळत अस्तील नक्कीच.

गुड जाॅब मेधा तैं. मटारची आमची गरज इतकी मोठी आहे की उन्हाळ्यात सगळे मटार खाल्ले तरी आता परत लावले पण ते स्नेल्सनी (मोठ्यागोगलगायूी) खाल्ले मग शेवटी होलसे ल मधून मोठी झीपर बॅगवाल्या दोन डिलीव्हरीज मागवल्या Wink

डॉ. वर्षा जोशींनी माझ्या इमेलला उत्तर दिलंय.
त्यांनी इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती वाचली आणि त्यांना असं दिसलं की apparantly या पावडरमुळे पदार्थातलं पाणी आणि गरम तेल यांच्यातली रासायनिक अभिक्रिया (ज्यामुळे एरवी हानिकारक घटक निर्माण होतात) टाळली जाते.

पण त्यांच्याही मते, घरगुती वापरायला या पावडरची काही गरज नाही. बाहेर रेस्टॉरंट्समध्ये खूप वेळ तेल तापत राहणार असतं त्यामुळे ठीक आहे.

माझे prawns 7..8 min शिजल्यावर पण अतिशय रबर सारखे chiwat होतात prawns माऊ शिजायला काही युक्ति आहे काय?

7..8 min शिजल्यावर पण अतिशय रबर सारखे chiwat होतात......
एवढा वेळ शिजवत नाहीत.3_४ मिनिटात कोलंबी शिजते.तुम्ही कोलंबीची आमटी करता tyaveli रंग बदलला ki kolambi शिजली हे लक्षात ठेवा.मात्र फ्राय करताना कुरकुरीत होण्यासाठी जास्त वेळ ठेवायची.

मसाला चांगला भाजल्यावर तेल सुटते मगच कोळंबी टाकायची. 3-4 मिनिटे मसाल्यात परतली की लगेच शिजते आकार पण कमी होतो कोळंबीचा. त्यावरुन समजावे भाजी तयार झाली.

मी कधीच कोळंबी केली नाहीये, मला आवडत नाही म्हणून पण मुलाला आणि नवर्याला आवडते.. तर आता करून पाहायचे ठरवलं...कोळंबी घेताना मासेवाले साफ करून देतात तितके पुरेसे असतं कि आपण पुन्हा विशेष साफ करावं लागतं...बीगीनर्स साठी काही टिप्स असतील तर सांगा....

साफ करून देतात तितके पुरेसे असतं कि आपण पुन्हा विशेष साफ करावं लागतं.>>>> कोलंबीच्या पाठीला चीर देऊन एक काळा धागा असतो,तो काढावा लागतो.काढायला आला नाही तरी चालेल.पण खातेवेळी काढला तरी येतो.

कोलंबीच्या पाठीला चीर देऊन एक काळा धागा असतो,तो काढावा लागतो>>>>>>>>
हा हे करताना पाहिले आहे सासू बाईंना... खूप वेळखाऊ काम आहे...अवघड वाटतंय मला..

अवघड काही नाही मृणाल. एक लहान टोकदार सूरी घेऊन तो काळा धागा काढता येतो. तो काढावाच नाहीतर पोट खराब होते असे नवर्‍याने सांगीतले. मी व्हेज आहे पण नवरा खातो. तो आणतो आणी हे करतो. आणी कोळंबी फ्राय करायची असेल तर जास्त वेळ फ्राय करु नये नाहीतर चिवट होते. इती नवरा. जागुचे धागे वाच.

https://www.maayboli.com/user/379/created?page=2>>>>> कोळंबी शोधत बस यात.

ओके ओके बघते...सेम हियर मी पण खात नाही.. आणि नवर्यासाठी कधी बनवावे असे मनावर पण घेतले नाही Wink
पण मुलाला आवडते म्हणून म्हटलं ट्राय करावे... शोधाशोध करून बनवेन Happy
धन्यवाद!!

कर दिया ना कंफुझ.
इथे वाचुन कुठे मनाशी ठरवत होते की ह्या वर्षी मटार स्टोर करुन ठेवुया. पाच सहा महिने टिकतील असे.
मानवनी दिलेली निशामधुची लिंक बघितली. सोबत मधुरा ची पण पद्धत बघितली. दोन्ही सेम आहेत.
तर लगेच मीरा म्हणते की ब्लांच न करत स्टोर करता येतात. Uhoh
ब्लांच न करता रहातात का नीट? की ब्लांच करुन जास्त टिकतात?

दुपारी खाण्यासाठी स्नॅक्स बनवायचे आहे, पण रेडी टू इट पाहीजे, जसे उपमा, भाजून ठेऊ शकतो आणि ऐन वेळी फक्त पाण्यात उकळून खाऊ शकतो, किंवा कटलेट सारखे प्रकार जे हेलदी आहेत आणि सोपे पण
असे प्रकार सुचवा , मी फुल टाइम काम करते , प्रत्येक वेळी मुलाला नवीन करून देणे जमत नाही,

माझ्याकडे पाव किलो मेथी मुठीयाचे पाकीट आहे. इथे उंधियोची भाजी मिळत नाही, त्यामुळे उंधियोत वापरता येणार नाही.

तर नुसतेच उचलून खाण्याशिवाय अजून कशात वापरता येईल?

कांदा टोमॅटो ची झणझणीत रस्सा भाजी करायची अन गॅस वरून उतरवायच्या आधी मुठीया त्यात घालायच्या अन लगेच चपाती सोबत खायचे.
छान लागतात पण चपाती/पोळी सोबतच चांगले लागतात भाकरी बरोबर मजा नाही येत

कढी-गोळे मध्ये चांगले लागतील वर म्हटल्याप्रमाण््. मी तर ते असेच परतून पण खाऊ शकते. खूप थंडीपण आहे. भेज दो यहाॅं पर Wink

मी तीन किलो मटर ब्लांच करून झिप लॉक बैग्समधे भरून फ्रीजरमधे ठेवले.. उद्या सकाळी नऊ ते संध्याकाळी सातपर्यंत लाईट नसणार..(प्रत्येक महिन्यात असा एक दिवस असतो)
मटर खराब तर होणार नाहीत ना??

कढी-गोळे मध्ये चांगले लागतील वर म्हटल्याप्रमाण््. मी तर ते असेच परतून पण खाऊ शकते. खूप थंडीपण आहे. भेज दो यहाॅं पर >>> मम Lol

आमटीत पण छान लागतील.

मेथी मूठीया चाट करता येइल का ? जसे पालक पकोडा चाट असते.
पकोडी वर फेटलेले दही ,गोड चटणी ,जीरे पुड ,चाट मसाला , बारीक चिरलेला कांदा , वरुन बारीक शेव घालुन.
किंवा जसे तो गट्टे का पुलाव असतो ना तसे मूठीया घालुन पुलाव केला करता येइल. वेज पुलाव करतो तसे मूठीया तळून त्यात बाकी भाज्या बरोबर घातल्या तर.

मृणाली, आजच चार पाच प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये 75% पाणी भरून फ्रिजरमध्ये ठेवा. जेव्हा लाईट जातील तेव्हा या बर्फाने मटार थंड/फ्रोजन राहतील. काठोकाठ भरू नका कारण बर्फ पसरतो आणि बाटली फुटू शकते.

Pages