ओटस्, मुएस्ली, कॉर्न फ्लेक्स, आटा मॅगी..????

Submitted by _आनंदी_ on 16 April, 2014 - 02:20

मुलगी १ वर्ष, ९ महिन्यांची झाली आहे.. म्हणजे पावणे दोन म्हणता येईल...
तिला सकाळी नश्त्याला ओटस देत आहोत .. आत्ताच चालु केले आहेत ..

तिच्या या वयाला ओटस्, मुएस्ली, कॉर्न फ्लेक्स, आटा मॅगी, व्होल व्हिट/ मिक्स्ड फ्लोरचे ओट्स चे बिस्किट मिळतात ते ठिक आहेत का?

मसाला ओट्स आवडत आहेत तिला म्हणुन विचारत आहे..
किंवा फायबर फूड सजेस्ट करा ना...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चुकुन दोन धागे झाले .. हाच पाहुया...
शी साफ होत नाहिये तिची .. खाते बर्‍यापैकी .. भात वरण, दुध/भाजी पोळी ई. पण शी ला त्रास्च होतो..
म्हणजे रोजच्या रोज होत नाही आणि साफ होत नाही..
डोक ना सांगितले त्यानी फायबर फूड .. पालेभाज्या ई सांगितल्या .. ओट्स ई, वर लिहिलेल्या गोष्टिंबद्दल काय मत आहे?

?????? Sad

बाळ खुप लहान आहे. पचनसंस्था आणि एकंदरच आहाराच्या आवडी आणि सवयी निर्माण व्हायला थोडा अवधी द्या. घरी जे रोज जेवण बनवता, तेच तिला खाऊ द्या. घरच्या जेवणातही सर्व प्रकारच्या भाज्या, उसळी येतील असे पहा. त्यात पुरेसा चोथा असतोच.

खारिक, बदाम, केळं, पेरु, डाळिंब इ. नैसर्गिक गोष्टी सारक आहेत. यापैकी काहितरी एक रोज देऊ शकता. खारिक, बदाम ने प्रकृती पण सुधारेल. पालेभाज्या आणि भाकरी रोज्च्या जेवणात असेल तर पोट साफ व्हायला मदत होईल. ओट्स, मुएस्ली, कॉर्न फ्लेक्स, बद्द्ल माहित नाही पण मॅगी नक्कीच चांगले नाही. घरगुती रोजचे जेवण व्यवस्थित जेवली तर हळूहळू पोटाचे आरोग्य सुधारेल. तुम्ही घरातच सासूला, आईला सल्ला विचारलात तर जास्त चांगला आणि पर्सलाइस्ड सल्ला मिळेल. माझ्या साबानी सांगितले तसे तंतोतंत सूचना मी माझ्या मुलाच्या वेळेस वापरल्या त्याचा मला खूप चांगला उपयोग झाला आणि होतोय. तसेच मुलांचे जेवण आधी उरकून घेऊ नका त्यांना आपल्या बरोबर जेवाय्ला बसवा आणि आप्ल्या पानांत काय काय आहे ते सर्व त्यांच्या पानांत वाढायचे आणि त्याना खायला प्रोत्साहित करायचे.

ऑल द बेस्ट.

मॅगी, मसाला ओटस हे कधीतरी खायला ठिक आहे. मोठ्यांनीसुद्धा. लहानांना तर न दिल्यास बरे.
दोन्हीमधे एमएसजी आहे.
नाचणीचे सत्व, वेगवेगळ्या भाकर्‍या, पालेभाज्या उत्तम.
पोळ्यांसाठीचे गव्हाचे पीठ थोडे भरड असलेले असेल तर पोटाला चांगले.

- गव्हाच्या कणकेची दूध गूळ घातलेली खीर
- रव्याची खीर
- तांदूळ-मूगडाळ यांचा मऊ भात
- गव्हाची पोळी, घरचं तूप लावून
- केळ्याची शिकरण - पोळी
- दूध साखर पोळी
- सातूचं पीठ, दूध, गूळ
- लाही पीठ, दूध, गूळ
- साळीच्या लाह्या
- राजगिर्‍याच्या लाह्या, दूध, गूळ
- तांदूळाच्या पिठाचं मिरची/तिखट न घालता केलेलं धिरडं
- थोड्या प्रमाणात फळं
- भाज्यांचं सूप
- रोज तिखट-मसाला घालण्यापूर्वी शिजलेली भाजी मुलीसाठी चमचा-दोन चमचे वेगळी काढून ठेवा. जेवताना तिच्या पानात तीच वाढा.

धन्यवाद खुप महत्वाचे सल्ले आणि माहिती दिली सगळ्यानी...
मसाला ओट्स आणि ओटमिल मध्ये फरक असतो का?
कधी कधी ओट्स देणे पण चांगल नाही का?

बाकी ती भात वरण नीट खाते .. पण डॉ. च म्हणन आहे की पॉलिश्ड तांदुळातुन काहिच फायबर मिळत नाही .. मग अनपॉलिश्ड कसे ओळखायचे? नेहमीच्या किराणामालाच्या दुकानात मिळेतिल काय?

रोज दुध- पोळी , वेग वेगळी फळे पण खाते...

वरची माहिती वाचुन मला वाटतय ओट्स सध्या देउ नये अथवा कमी कधितरीच द्यावे..
कॉर्न फ्लेक्स बद्दल काय मत आहे??
ललिता यांची यादी तर खुपच आवडली नक्की प्रयत्न करेन

अच्छा... नुसत्या ओट्समिल बद्दल काय मत आहे सगळ्यांच ?
आणि कॉर्न फ्लेक्स?
दुकानात हातसडीचा तांदुळ मागुन बघते आता... आम्ही ठाण्यात राहातो..

आनन्दी मुलीच्या एवढ्या लहान वयात सध्या तरी ओटस बाजूला ठेव. कधीतरीच ठीक आहे. मॅगी अज्जीब्बात नक्को. तो विचारच करु नकोस.

ललिता-प्रीतीने चान्गले लिहीले आहे. सध्या नाचणी उन्हाळ्यासाठी फार उपयुक्त. नाचणी सत्वाची खीर ( दूध्+साखर्+वेलची) किन्वा हिन्ग, मीठ घालुन सत्व शिजवणे ( लापशी सारखे) नाचणी, राजगिर्‍यात भरपूर कॅल्शियम असतेच.

सध्या तुला पॉलिशच तान्दूळ मिळतील तसे हातसडीचे कोकण वगैरे ठिकाणी मिळतात. नाहीतर मुम्बईतच काही सुपर मार्केट मध्ये बघ. पोह्याची पण खीर देऊ शकतेस.

तुपात भिजवलेला खजूर कुस्करुन तिला दे. तसे रोज नाही दिला तरी चालेल. पण मौसमातली फळे जरुर दे. आम्बा देताना त्या रसात थोडे साजूक तुप घाल, बाधणार नाही.

हातसडीचा तांदूळ नाही मिळाला तर भातातच भरपूर भाज्या घालून शिजवायचे. किंवा भाज्या वेगळ्या शिजवून त्या ब्लेंड करून त्याचे सुप वरणात मिसळायचे.

इतक्या लहान बाळाला ओट्स नकोच. नाचणीचे सत्व वगैरे अवश्य द्या.

ओक्के.. धन्यवाद सर्वांना... नीट यादी बनवुन तिचा खाउ प्लॅन करते आता,,..
खुप मदत झाली सगळ्यांची धन्यवाद.. Happy

मला एक प्रश्न पडलाय. मुलांना ओट्स का देऊ नाही? माझी मुलगी ४ वर्षाची आहे आणि तिला ओट्स खूपच आवडतात. मी सहसा तिला ओट्स्+दूध्+साखर असं शिजवून देते. मसालाओट्स वैगरे नाही देत. प्लेन "क्वाकर" चेच देते आहे.

हातसडीचा तांदूळ >> ठाण्यात स्टारबझारमधे '२४मंत्रा ऑर्गॅनिक' चे 'हँडपाऊंडेड सोनामसुरी' नावाने हातसडीचे तांदुळ मिळतात. नेहेमीच्या तांदुळापेक्षा जरा महाग आहेत. चवीला चांगले लागतात.
तसेच टाटा शक्तीच्या अनपॉलिश्ड डाळीही मिळतात. यांची किंमते नेहेमीच्या डाळीइतकीच आहे.

कोकणात तो लाल तांदूळ मिळतो तो हातसडीचा असतो का?

तसं असेल तर आनंदी, माझ्या नवऱ्याने नुकताच ठाण्यातून लाल तांदूळ आणलाय जरा महाग आहे ७०रु. किलो, निमकर म्हणून कोणी आहेत त्यांच्याकडे कोकणातल्या हापूस आंबे आणि इतर कोकणातली प्रॉडक्ट अशी सध्या विक्री चालू आहे. स्टेशनकडून गोखले रोडला गेल्यावर mango mall आहे त्याच्या पुढे आहे ते.

अन्जू हातसडीचे पोहे खाल्ले असशीलच.( कोकणात तुमचे येणे जाणे असले तर) आणी नसेल तर करुन बघ. जबरी चव असते. साधे पोहे विसरशीलच.:स्मित: मला नक्की आठवत नाही पण हातसडीचे पोहे सुद्धा थोडेसे लालसर असतात

लाल तांदूळ वेगळा. तो पचायला जड असतो. इतक्या लहान मुलांना त्याची फार तर पेज द्या.

तांदूळ पॉलिशचा असला तरी सोबत वरण द्याल त्यात शिजताना सालीसकट लाल भोपळा, गाजर, कोबी वगैरे शिजवा. असे वरण, भात्+तुप दिलेत तर फायबरही मिळेल. पौष्टीकता वाढते. वरण-भाताच्या ऐवजी तांदूळ+सालीची मूगडाळ+ भाज्या घालून मऊ खिचडीही देऊ शकता.

भाज्यांचे सूप देताना त्यातही डाळ शिजवून घालता येते.

बाकी वरती मिळालेले इतर सल्ले तुमच्या बाळाच्या योग्य वाढीच्या दृष्टीने योग्यच आहेत.

>>मला एक प्रश्न पडलाय. मुलांना ओट्स का देऊ नाही? >>
गोगो, देऊ नये असे नाही पण पारंपारीक भारतीय जेवणातून चौरस आहार मिळत असेल तर मुद्दाम आटापिटा करुन महागडे ओट्मिल देण्याची गरज नाही. त्यातून ते झटपट होणारे असेल तर नकोच.
मैद्यापासून बनवलेले पॅनकेक, वाफल्स, ब्रेड झालेच तर इतर साखरेत घोळवलेली सिरीअल्स, बटाट्या व्यतिरिक्त दुसर्‍या भाज्या आहारात नसणे अशा परीस्थितीत इथे अमेरिकेत डॉक्टर ओटमिलचा पर्याय सुचवतात. पण भारतात पोळी, भात, वेगवेगळ्या पिठांच्या भाकर्‍या, मोड आलेली कढधान्ये, डाळी, पालेभाज्या, फळभाज्या, फळे, दूध, दही, चालत असेल तर अंडी, मासे वगैरे विविध पर्याय वापरुन चौरस आहार देता येत असेल तर ओटमिलची फारशी गरज नाही.

मसाला ओट्स इंस्टंट असतात आणि त्यात प्रिझर्वेटिव्हज असतात त्यामुळे मोठ्यांनीही कधीतरीच खावे. सिरियल्स सुद्धा प्रोसेस्ड फूडच आहे. मुलांना रोजच्यारोज न दिलेले चांगले !

साधे ओट्स हे हेल्दी फूड म्हणून गणले जाते आणि लहान मुलांना द्यायला काहीच हरकत नसावी. मात्र आपल्याकडे आपण पिढ्यानपिढ्या ओटस खाऊन मोठे झालो नाही त्यामुळे आपला पिंड ज्या पदार्थांवर पोसला गेला असे गहू, तांदूळ, नाचणी इत्यादी धान्यं देण्याकडे कल दिसतो.

मी बरेचदा रोल्ड ओट्स आणि बदाम मिक्सरमधून भरड एकत्र फिरवून ठेवते. बदाम आपल्या आवडीप्रमाणे घ्यावेत. आयत्यावेळी बोलमध्ये काही टेबलस्पून्स हे भरड मिश्रण, चिरलेला गूळ किंवा गुळाची पावडर, दूध, वेलचीपूड, एक चमचा साजूक तूप असे घालून मावेत शिजवून घेते. घट्ट झाल्यास दूध घालून सारखे करुन घ्यायचे.
गव्हाच्या खिरीपेक्षा हा पर्याय मला झटपट वाटतो आणि आमच्याकडे सर्वांना आवडतो. तूप घालायला विसरु नये. नुसते ओट्स पोटाला जरा कोरडे पडतात असे मला वाटते ( ते moisturizing म्हणून वापरत असले तरी ! )

स्वाती सुरेख पोस्ट, अचूक सल्ला.:स्मित:

आनन्दी इथेच मायबोलीवर मुलान्च्या सन्गोपनाच्या बाफवर अजून उपयुक्त बाफ आहेतच. ते पण बघ.

http://www.maayboli.com/node/7044

http://www.maayboli.com/node/46396

http://www.maayboli.com/node/18473

हे वरील बाफ उपयुक्त आहेतच, सावकाश वाचुन बघ. अगदी भविष्यात सुद्धा उपयोगी पडतील.:स्मित:

अजून आहेत पण टाईपताना दमले.:फिदी:

अजून एक : लहान मुलांना (खरेतर मोठ्यांना सुद्धा) कारणाशिवाय आणि गरजेशिवाय साखर घातलेले पदार्थ खायला देऊ नये. साखर पचविण्यासाठी हाडांतले कॅल्शियम वापरले जाते आणि लहान मुलांची हाडं अजून बळकट होत असतात. जमेल आणि शक्य असेल तिथे गूळ वापरावा.

धन्यवाद सर्वांना पुढचे प्रतिसाद आत्ता वाचले...
खुप छान पर्याय दिले आहेत सगळ्यांनी..
हातसडीचा तांदुळ मिळाला की सांगेन ...
हात सडीचा तांदुळ जर लाल नाही दिसत तर काही वेगळा दिसतो का?
बघुन ओळखता येण्या सारखा??...

आनंदी, हातसडीचा तांदूळ लाल असतो. कारण त्याला पॉलिश केलेले नसतेच. वर दिलेले सल्ले योग्य आहेत आणि तेच वापरले तर उत्तम..

आम्ही आमच्या सोळा महिन्याच्या बाळाला रोज नाश्त्याला ओट्स पॉरिज देतो. रोल्ड ओट्सची दूध आणि सुकामेवा घालून केलेली खीर. आम्हीही तेच खातो. सकाळी सकाळी भात/ भाजी असे काही खाववत नाही.

ओट्स आणि एक संत्रे नाश्त्याला.
दरेक दोन तीन तासांनी खाऊ (फळांच्या फोडी, भाज्यांच्या फोडी, ब्रेडस्टिक्स, चीजस्टिक्स इत्यादी)
दुपारचे आणि रात्रीचे जेवण आपण खाऊ तेच.

कॅल्शियमसाठी दूधाऐवजी चीज द्या असा सल्ला मिळाला आहे. तरी अधून मधून पेय म्हणून गाईचे दूध देतो.

सर्वांना धन्यवाद .. सुचनांचा खुप उपयोग होतोय .. शनीवार पासुन मिशन सुरु केले आहे .. बाळ पण शहाण्यासारखं सगळ खाउन आवडते/ नावडते प्रकार सांगत आहे..

गव्हाची कुरडई गरम पाण्यात भिजवुन फोडणी देउन खुप आवडलिय..
राजगिर्‍याच पिठ आणल आहे .. त्याचे काही जरा तिखट मिठाची पाककृती आहे काय?
नाचणी ची पण तिखट मिठाची पाककृती आहे काय?

प्लेन ओट्स क्वॅकर्स चे आणले आहेत कधी तरीच देईन ...... किंवा आम्हीच खाउन टाकु..
खारिक खजुर पण आणले आहेत..

खारकेची बारिक पावडर बाजारात मिळते काय?

फळं खुप आवडीने खात आहे.. बाळ आवडीचे आणि पौष्टिक खात आहे मग मी पण खुश..
सगळ्याना खरच खुप धन्यवाद..

खारिक पावडर आणि हातसडीचे तांदुळ तुला ठाण्याच्या ठक्कर च्या दुकानात मिळतिल. नागरिक स्टोअर च्या लाईन मधे सरळ कोपिनेश्वर मंदिरपर्यंत जायचे. तिथेच आहे ठक्कर.

मनोमय स्वाती धन्यवाद..
मनोमय ... तुम्ही थोडी टायपिंग साठी मदत मागत होता .. तर क्ष लिहिण्यासाठी Ksh कॅपिटल के आणी एस एच टाईप करा.. Happy

Pages