अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

भरदाव वेगाने अंगावर चालून येणाऱ्या घोड्यांचे मोठमोठे आवाजही होते.. >>>> बोकलत जर तिथे गेले तर चांदण्या रात्री ते वाळवंटात त्या घोड्यांवर बसुन टगडक टगडक करुन फिरुन पण येतील.

लॉकडाऊन काळात घडलेली ही सत्यकथा आहे. आमच्या समोर काका राहतात. त्यांच्याकडे त्यांचा मुलगा वर्क फ्रॉम होम घेऊन राहायला आला होता. बऱ्याच दिवसांची पगारी सुट्टी घेऊन मुलगा घरी आलाय म्हणून आनंदी आनंद होता. एक दिवस बाहेर वाळत टाकलेले कपडे संध्याकाळी काढायला काकी विसरल्या. रात्री साधारण दीड दोनच्या सुमारास मुलाला खिडकीबाहेर कोणाच्यातरी असण्याची चाहूल लागली. सुरवातीला मांजर असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. पण नन्तर काचेवर टकटक झाली तेव्हा त्याने बारकाईने बाहेर बघितलं तर त्याला त्याचे कपडे घातलेले एक व्यक्ती दिसली. त्या व्यक्तीचा चेहरा व्यवस्थित दिसत न्हवता म्हणून तो काचेजवळ गेला तर बाहेर एक पाठमोरी व्यक्ती बाहेर उभी होती. याने खिडकी उघडून कोण आहे म्हणून विचारलं तर ती व्यक्ती भेसूर हसू लागली. तो प्रकार पाहून याने जोरात आरडाओरडा केला त्यामुळे काका काकी याच्या रूममध्ये आले. बाहेर बघताहेत तर कोणीही न्हवतं. पण वाळत टाकलेले कपडे अस्ताव्यस्त खाली पडले होते. नंतर त्यांनी एका बाबाला बोलावलं. त्या बाबाला बघूनच मी तो नकली आहे हे ओळखलं. पण मी काही बोललो नाही. बाबाने त्यांना काहीतरी थातूरमातूर उपाय सांगितले आणि 500 रुपये घेऊन गेला. दुसऱ्या रात्री त्या वाईट शक्तीची वाट पाहत मी बाजूच्या नारळाच्या झाडावर बसून होतो. अपेक्षेप्रमाणे ती वाईट शक्ती आली. पुढची गोष्ट नंतर कधीतरी सांगतो.

आमच्या समोर काका राहतात. त्यांच्याकडे त्यांचा मुलगा वर्क फ्रॉम होम घेऊन राहायला आला होता. बऱ्याच दिवसांची पगारी सुट्टी घेऊन मुलगा घरी आलाय म्हणून आनंदी आनंद होता.>>>>>> ओके !

त्या बाबाला बघूनच मी तो नकली आहे हे ओळखलं. पण मी काही बोललो नाही. बाबाने त्यांना काहीतरी थातूरमातूर उपाय सांगितले आणि 500 रुपये घेऊन गेला. दुसऱ्या रात्री त्या वाईट शक्तीची वाट पाहत मी बाजूच्या नारळाच्या झाडावर बसून होतो.>>>>>> मला वाटले की नारळाच्या झाडावर तो मुलगाच त्या भेसूर माणसाच्या भीतीमुळे चढुन बसला की काय ! Uhoh

नमूद करत असलेला अनुभव अगदीच 2 5 दिवसा आधीचा आहे.. मी कोथरूड, पुणे येथे राहतो, बहीण मुंबई ला असते, माहेरपणाला म्हणून आलेली बहीण आणि 2 भाच्या म्हणजे आनंदी आनंद गडे... त्यांच्या हसण्या खेळण्यात दिवस कसा निघून जातो कळत नाही... शेवटी कितीही हवी हवीशी वाटली, तरी बहिणीला सुध्दा तिचा प्रपंच आहेच... 2 लहानग्या मुली, जवळचं समान हे सगळं सांभाळत बहिणीला बस ने पाठवण शक्य नव्हतं, पुन्हा आत्ताच्या परिस्थिती मध्ये इन्फेक्शन ची भीती ही होतीच... म्हणून तिला कार ने सोडायला निघालो... सोबत वडील देखील होते...

दुपारची जेवणं उरकली आणि निघालो... चांदणी चौक ओलांडून हायवे ला लगेस्टोवर आमच्या चिमण्यांचा कीलकीलात बंद देखील झाला होता... हलक्या आवाजात गाणी लाऊन प्रवास सुरू होता... थोड्या वेळाने बहिणीचा ही डोळा लागला..

सगळं काही व्यवस्थित होत...शिवाय मुंबई पुणे हे अंतर ही आजकाल काही वाटत नाही.. त्यामुळे वडिलांशी बोलत बोलत आरामात चाललो होतो... मोजून 3 नंबर च्या बोगद्याच्या 100 200 मीटर अलीकडे एक दुधाचा टँकर रस्त्याच्या डाव्या कडेला खडकात घुसलेला दिसला... परिस्थिती बघता... अधल्या दिवशी अपघात झालेला वाटत होतं... चालक किंवा सहकारी वाचला असण्याची शक्यता शून्य होती.. त्या टँकर ची विशेषतः म्हणजे की त्यावर कोणतंच ब्रांडिग नव्हतं... मी गमतीनी बाबांना म्हणालो... च्यायला आपला ड्रायव्हर पिऊन चालवतो हे कळू नये म्हणून टँकर च ब्रांडीग काढून टाकलेल दिसतेय यांनी... इतकं म्हणून आमची कार बोगद्यात घुसली... आणि तिथेच खटकल...

माणसाला निसर्गदत्त अशी काही देणगी असते... आदिमानव जेव्हा जंगलात राहत होता तेव्हा स्वा संरक्षण मिळावा म्हणून असो... किंवा काही अघटीत घटना टाळता याव्यात म्हणून परमेश्वराने दिलेली सूचना असो... आपण त्याला आजच्या काळात सिक्स्थ सेन्स म्हणतो... तो सुप्त अवस्थेतून अशाच वेळी जागृत अवस्थेत येतो... अन् तेही क्षणार्धात... बोगद्या मध्ये येण्या आधीच हाताला सवय असल्या प्रमाणे मी गाडीचे दिवे लावून ठेवले होते... पण बोगद्यात घुस्ता क्षणी कळलं की हा अंधार अतिशय अनैसर्गिक आहे... हात बिम वर देखील दिवे थोडाही प्रकाश देत नव्हते... रस्त्यावरचे रिफ्लेक्टर चमकेनात... अन् क्षणभर डोळ्या समोर पूर्ण पणे अंधारी आली... थोडसं दिसायला लागला तेव्हा एक गाडी क्या अतिशय जवळ आमची गाडी येऊन पोचली होती... (मी ताशी 110 ने होतो)

हे सगळ काही अक्षरशः 20 ते 30 सेकंद इतक्याच वेळात घडल... पण तोवर अगदी मणक्यातून एक थंड लहर गेली... हातावरच्या अन् दाढीच्या केसांनी ठर्राऊन उठाव केला... शहर्यान मागे शाहरे आले... मनातल्या मनात दत्त गुरूंचा धावा केला आणि गाडी चटकन बाजूच्या लेन मध्ये टाकून पुढे निघालो.. झाला प्रकार वडील देखील अनुभवत होते.. त्यामुळे आम्ही काहीच न बोलता... बोगद्यातून बाहेर आलो... सगळं काही पूर्ववत झाल्यावर मी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा वडिलांनी खुणेनेच मला गप्प करून गाडी पुढे न्यायला सांगितलं... बहिणीला सोडून आम्ही घरी परतल्यावर विचारलं तेव्हा म्हणाले... गाडीत त्या तिघी होत्या.. म्हणून काही बोललो नाही... पण तू डावीकडे बघितलं नाहीस ते बरंच झालं... "तिकडे बोगद्यात दोन जण जखमी अवस्थेत बसून आपल्या कडेच बघत होते!!"

©मिलिंद जोशी, कोथरुड, पुणे.

कथा नावा सकट शेअर करण्यास ना नाही...

हे मी नजर धाग्यावर लिहिले आहे , आता इथे पुन्हा

हा आमच्या हॉस्पिटलात घडलेला खरा प्रसंग

बर्डे ला आम्ही केक आणतो , गेली 7 वर्षे अगदी धार्मिक वातावरण , सगळे सण , दिवे , आरती आणि बर्टडे केक सुरू आहे

एक जण नवा आला , दुसऱ्या एकाच्या बर्डेला बोलला , मी केक आणतो

तो गेला केक आणायला , आता त्या दोघांचे काहीतरी भांडण होते / असावे , तर त्याने केकवर लिहून आणले happy birthday Dian डायन !

ही घटना फेब्रुवारी 2020 ची
मी त्याला जोरदार झापला , काय केलेस हे रे मुर्ख माणसा !

त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा चशमा मोडला , तो दुरुस्तीला टाकावा तर दुसर्याचीही काच मोडली , मग दोन्ही दुरुस्त केले, 1800 रु बुडाले , माझा पूर्वीचा एक चशमा हिरवा होता , आता दोन्ही काळे आहेत Sad

एक जण गाडीवरून पडला
दुसर्याच्या घरी काहीतरी झाले

त्यानंतर करोना आला
अर्ध्या staff वर 4 महिने काम केले

4,5 जण स्वतः आजारी पडले , त्यात मीही

इन्क्रीमेंट बुडाले , म्हणजे अजून आले नाही

ज्याने डायन ला बोलावले , त्याची करोना काळात दुसरीकडे ट्रान्सफर झाली , त्याच्या शिवाय आणि त्याचा रिप्लेस मेंट न येता आम्ही 3,4 महिने एक्स्ट्रा काम केले

आणि सध्या सगळ्यांचे बर्डे बंद पडले आहेत
Sad

भूत नसतं म्हणणारे, भूतांचे किस्से सांंगणाऱ्यांची चेष्टा करणारे लोक हो, हे बघा घरातील सीसीटीव्ही कॅमेरात कॅप्चर झालेले भूत.
आता भीती वाटेल तुम्हाला रात्री झोपनाना.

बाप रे.
किती डरावने आहे कैप्चर झालेले भूत.
बरं झाले सकाळी पाहिले. रात्री पाहिले तर खरं खूपच भीती वाटली असती.

मला एक खतरनाक अनुभव आला आहे पण लिहायचा कंटाळा > किस्सा आहे म्हणता पण लिहायचे मात्र टाळता, असा अमानवीय छळ नका करू वाचकांचा.

हम्म! जिद्दु , भूत वगैरे प्रत्यक्ष कोणी पाहीलेल नसल्याने यावर कोणी विश्वास ठेवत नाही. पण काही ठिकाणी असा अतृप्तपणा नक्कीच जाणवतो. काही लोकांच्या घरात प्रसन्नता जाणवते तर काही लोकांच्या घरी उदासीन वाटते. कुंडलीत चतुर्थात वा द्वितीयात राहु असल्यास असे हमखास आढ्ळते.

पण इतकी अब्जावधी, खर्व, निखर्व लोक मेलीत यातली मग किती भूते झाली अ॑सतील हा प्रश्न पण मनात येतो.

रश्मी, मी मायबोलीवर तज्ज्ञांच्या कमेंट्स वाचून आता विवेकी आणि विज्ञानवादी झालो असल्याने माझा भूतप्रेत आणि ज्योतिष यावर विश्वास नाही. धाग्यावर दुष्काळ पडल्याचे पाहून जुन्या पुस्तकाचे फोटो काढून टाकलेत. तेवढाच विरंगुळा !

मी मायबोलीवर तज्ज्ञांच्या कमेंट्स वाचून आता विवेकी आणि विज्ञानवादी झालो असल्याने माझा भूतप्रेत आणि ज्योतिष यावर विश्वास नाही. >> Lol

पण काही ठिकाणी असा अतृप्तपणा नक्कीच जाणवतो. काही लोकांच्या घरात प्रसन्नता जाणवते तर काही लोकांच्या घरी उदासीन वाटते >>>

या बाबतीत माझ्या सोबत झालेला एक किस्सा....
गेल्या वर्षी आमच्या ऑफिस मध्ये एका कलीगला तडकाफडकी कामावरून कमी केला, आणि तेही डिपार्टमेंट हेडच्या हेकेखोरपणामुळे आणि वरून त्या साहेबांनी फतवा काढलेला की त्याचा सेंडऑफ नाही करायचा ऑफिसमध्ये...झाल्या प्रकाराने ऑफिसमधल वातावरण तंग झालं होत, माझं पर्सनली विचारलं तर, इतका राग राग होत होता की  मी सेकन्डभर सुद्धा त्या डिपार्टमेंट हेडने केलेल्या अन्याय शिवाय कोणता विचार करू शकत नव्हतो. आमच्या दुसऱ्या एका प्रोजेक्ट मध्ये आफ्टरनून शिफ्ट मध्ये लोक यायची. त्या टीम मधली २ जण आली, एक मुलगी जी माझ्या शेजारी बसायची तीला काहीही याबाबत माहीती नव्हतं, तिला येऊन पाचच मिनिटं  झाली असतील-नसतील, ती मला बोलली की, आज जबसे ऑफिस आयी हुं, मेरा माईंड बहुत डिस्टर्ब हो गया है. बहुत अनकंफर्टेबल लग राहा है....जैसे आजू-बाजू बहुत  ज्यादा निगेटिव्ह व्हाइब्स हो. त्यानंतर मी तिला झाला प्रकार सांगितला.
संध्याकाळी ती  जेंव्हा टी-ब्रेक ला बाहेर गेली त्यानंतर तिने मला सांगितलं की बाहेर जातेही वो इफेक्ट चला गया, पर ऑफिसमे कुछ तो इशु  है. 

मी मायबोलीवर तज्ज्ञांच्या कमेंट्स वाचून आता विवेकी आणि विज्ञानवादी झालो असल्याने माझा भूतप्रेत आणि ज्योतिष यावर विश्वास नाही>>>
Lol बरं देवावर? Light 1 घ्या.

हा.आ.
पुढे काय झालं सांगा ना..नारळाच्या झाडावर बसल्यावर भूत आले होते त्याचे..

हा.आ.
पुढे काय झालं सांगा ना..नारळाच्या झाडावर बसल्यावर भूत आले होते त्याचे..
Submitted by mrunali.samad >>
ओ ताई, ती गोष्ट बोकलत सांगत होते आणि तुम्ही विचारताय हाआ यांना.
भलताच अमानवी झाला आहे हा धागा. Lol

अर्र हो ना Lol

डिंकवाच्या लाडवांवर तुष्ट भूतनी किस्सा डेंजर आहे...

Pages