तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

Justice for Kangana
Justice for Rhea
Justice for this
Justice for that
..
...
...

Just ice for me Wink
“Saturday Vibes”

लोकहो.. आज काय स्पेशल ?
आज माझी मार्गरीटा पार्टनर, माझी वहिनी आली आहे घरी.. आज मैफिल रंगणार

जियो म्हाळसा...
आज एक 60 चा शिवास सोबत थोडे तंदुरी चिकन...

आज बेत झकास होता.. गेला आठवडा दारू पिण्यात गेला म्हणून झकास काही खाल्लं नव्हतं. म्हणून आज फिश फ्राय, potato wedges, दाणे + वाटाणे एकत्र शिजवून काहीतरी.. सोबत तोंडी लावायला ओल्ड monk

१३ सप्टेंबरनंतर आज बसलोय. दुपारी जेवण भरपूर झाल्याने फक्त भेळ, गव्हाचा चिवडा आणि ओल्ड monk.. सोबत A R rahman meets berklee... (https://www.youtube.com/playlist?list=PLG0f76gvWfh810C24WDXBbwITTD4r0nlZ)

जवळपास 4 वर्षांनी एकटा बसून पितोय..

आज आमच्याकडे घरगुती पाणीपुरीचा बेत आहे.
काही घरगुती मद्य त्यात टाकून चांगले लागण्यासारखे असेल तर सुचवा.

अस्सल आणि जुने मध टाकून बघ
>>>
पाणीपुरीत?
अस्सल नाहीये पण सध्या.. मुंबईला असताना तिथे समोरच पोळ्याला लागायचा तेव्हा टोपभर घरात केव्हाही पडलेला असायचा. आता बाजारातला डाबर हनी वगैरे असतात ते..
असो पण पाणीपुरीत मध?

रच्याकने

आज माझ्याकडे Teacher's 50 आणि मसाला काजू.....

सोबत रेख्ता लाईव्ह मधल्या गझल.........

अहो कटप्पा, काढा धागा आताच. म्हणजे तुमचे वाचून कुणी सोडली तर त्या व्यक्तीला येत्या ३१ डिसेंबरला स्वतःची परीक्षा घेता येईल.

म्हाळसा किंवा अजून कुणी ज्यांना या 31 डिसेंबरला प्यायचीच आहे ते तो धागा १ जानेवारी नंतर वाचतील.

असा धागा काढलेला आहे म्हणुन कुणाला ३१ डिसेंम्बरला पिताना गिल्ट वाटणार असेल ते त्यांनी प्यावीच का? Wink

म्हाळसा ठीक आहे. आज खरे तर खूप इच्छा झालीय प्यायची पण कंट्रोल करतोय. आज फार मनस्ताप झालाय.>> ज्याच्यामुळे मनस्ताप होतोय त्याला घेऊनच प्यायला बसा..

<< आज खरे तर खूप इच्छा झालीय प्यायची पण कंट्रोल करतोय. आज फार मनस्ताप झालाय. >>
Not a good sign. दारू प्यायची म्हणजे कशी मजेसाठी, आपल्या इच्छेनुसार प्यायची.

बायको ब्लॅक डॉग प्रीमियम घेऊन आली मागच्या आठवड्यात
रु 1300 ची हाफ
मी किंमत ऐकूनच उडालो
आणि त्याहून कहर म्हणजे सोबत sprite आणलं
म्हणलं मी अजिबात allow करणार नाही
हा अपमान आहे व्हिस्कीचा
काढून घेतली आणि कपाटात ठेवली
म्हणलं आता सोडा आणल्यावर मगच Happy

काल (रविवार)राॅकफोर्ड पिली सोबत मस्त चना रोस्ट व तळलेल्या मिरच्या आणि चाट मसला......रविवार मार्गी लागला

कंट्रोल करतोय. आज फार मनस्ताप झालाय. >>
Not a good sign. दारू प्यायची म्हणजे कशी मजेसाठी,
>>>

मनस्ताप होतो तेव्हाच मजेची गरज असते ना..

खरा मित्र वा मैत्रीण तीच ना जी सुखातच नाही तर दु:खातही साथ देईन

असो, मी पाणीपुरीच्या पुरीत लिंबाच्या रसात रामदेवबाबांचे मध टाकून पाहिले, सोबत पाणीपुरीचे तिखट पाणी आणि कांदा बटाटा जिन्नस होतेच. छान लागले.

जर पाणीपुरीचे तिखट पाणी हटवले आणि त्या जागी सुकी हिरवी चटणी घेत सुखा पुरी तयार केली तर तो चखना म्हणून छान लागेल असाही एक विचार मनात आला. पण मद्याची चव मी आता विसरलो असल्याने नेमके गेस करता आले नाही.

Pages