तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

काळाची गती चक्राकार असते. आता हळूहळू थंडीचा कडाका वाढेल... मग कुणाकुणांस ओल्ड मंक वगैरे शिवाय भागणारच नाही, अशी जोरकस तलप येईल.. ते पोहोंन अनेकांस तत्संबंधी संसर्ग होवून तलफांच्या लाटांवर लाटा येतील..! आणि परिणामी असे जिव्हाळ्याचे धागे आपसूकच उसळी मारतील..! इंतजार करावा. Wink Happy

अरे हा धागा इतका थंड का
>>
शाहरूखचा मुलगा पकडला गेला. इथेही धाड पडली तर.. ही भिती आहे जनमाणसांत Happy

लॉक डाऊन नंतर च्या काळात मस्त मैफिली झाल्या
भावाने आणलेली laphroaiag ट्राय केली
अहाहा कसला मस्त स्मोक फ्लेवर आहे त्याला
लैच खास
डबल ब्लॅक सोबत ही पण आता ऑल टाईम फेवरेट

नंतर मग अमृत अमलगम घेतली
ती पण सुरेख स्मूद आहे

Jimador हा टकीला शॉट पण घेतला
अप्रतिमच

अर्थात या सगळ्या खिशाला भोक पडणाऱ्या दरवा असल्याने बजेट मध्ये शोधत होतो तर दोन उत्तम व्हिस्की मिळाल्या

एक म्हणजे विल्यम्स लॉसन
आपल्याकडे 1800 ला मिळते, एकदम उंची चव आणि किंमत त्या मानाने माफक

अजून स्वस्तात तर मग ओकस्मिथ सिल्व्हर
आधी गोल्ड ट्राय केली पण मग त्यापेक्षा सिल्व्हर खूप मस्त आहे
बऱ्याच अंशी उत्तम व्हिस्की च्या जवळ जाणारी आहे
800 ला मिळते

बघा एकदा ट्राय करून, मी नक्कीच रेकमेंड करीन

अजुन एक
Ardbeg ही स्कॉच ट्राय केली
ऑन द रॉक्स कसली सुंदर लागते

आणि दोन दिवसांपूर्वी नाशिक ला गेलो असताना सिन्नर जवळ एक वायनरी ला भेट दिली. एक ट्रेकर च ती वायनरी चालवतात. नवरा बायको मिळून.
अतिशय उत्साही आणि हसतमुख जोडपे,साडेतीन एकरात लावलेल्या द्राक्षापासून वेगवेगळ्या वाईन्स तयार करतात
आम्हला त्यांनी सगळी प्रोसिजर समजावून सांगितली, द्राक्षाचे प्रकार, वाईन चे रेड आणि व्हाइट, ड्रॅय आणि स्वीट असे बरेच
आणि लगेच त्या त्या वाईन चे टेस्टिंग करायला दिले
आमच्यातले जे कट्टर न पिणारे होते त्यानाही ती टेस्ट करावी वाटली

निफा वाईन्स म्हणून आहेत
मी एक रेड वाईन घेऊन आलोय
नेमका आता त्यांचा स्टॉक संपत आलेला

अरे हा धागा इतका थंड का
<<
कारण, गरम दारू सहसा पीत नाहीत. थंडच घेतात.

पण तरीही ही घ्या गरम हॉट टॉडी ची रेस्पी :

ग्लासाच्या बुडाला मधाचे कोटिंग करावे.
त्यात ६० मिलि व्हिस्की. स्कॉच्/बर्बन दोन्ही चालते. किंवा डार्क रम.
एक दालचिनीची काडी स्टरर म्हणून वापरायला.
यात गरम पाणी, किंवा कोरा चहा. (गरम पाणी + चहापत्ती. उकळायचं नाहिये. २-३ डिप डिप केल्यासारखं टीबॅग वालं ही चालतं.
वर लिंबाची स्लाईस, अन स्टार अनिस उर्फ चक्रीफूल उर्फ बाजा.

सर्दीकरता उत्तम.

फटू जालावरून साभार.

निफा वाईन्स म्हणून आहेत...

सिन्नर नाही, निफाड जवळ आहे. म्हणून नाव निफा ठेवलंय त्यांनी.
आणि मी चुकत नसेल तर वायनरी मालक दक्षिण ध्रुवीय पेंग्विनांचा तिथे मुक्कामी अभ्यास करून आलेले आहेत.

सिन्नर जवळ मिडरी(mead) आहे. मधापासून बनवलेली दारू.
संचालक दोन मुली आहेत. रसायनशास्त्र शिकलेल्या. एकदा नक्की चाखून बघा.

होय, ते सांगितले त्यांनी
मुळात रेग्युलर ट्रेकर आहेत
हिमायलन ट्रेक्सपण केले आहेत

अच्छा सिन्नर जवळ नाहीये का
मला तेवढेच आठवले कारण आम्ही तहाराबाद वरून येताना गेलेलो तेव्हा सिन्नर च्या अलीकडे कुठेतरी होती ही

नवरा बायको दोघेही जाम गपिष्ट आहेत
त्यांची मुलगी पण आता कॉफ़ी चा व्यवसाय करते इतक्या लहान वयात

हो. पिंपळस रामाचे म्हणून गाव आहे. माझ्या घरापासून 20 km आहे. म्हणून माहीत आहे बाकी काही नाही. माझे अजून जाणे झालेले नाही

असं म्हणतात पुढील कविता दमांनी वि.रा. भाटकर या नावाने लिहिली...दारु कशी प्यावी कधी ग्लासात भरुन, कधी मोरीत भरुन, कधी कपाटात भरुन छान पध्दत आहे...आपण अजमावून पहा...
' मला दारू चढत नाही' ही कविता सन १९९३च्या 'अपूर्व'- दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. मूळ कविता अशी :-

मला दारू चढत नाही
दारूबंदी असूनही
मी दारू खूप पितो पण मला दारू
कधी चढत नाही.
याचं एक कारण आहे.
दारू पिण्याची माझी एक
स्पेशल सिस्टीम आहे.
ती अशी-
दारू प्यायची असली म्हणजे
मी ती रात्री झोपण्यापूर्वी पितो.
तेव्हा आधी बायकोच्या खोलीत
हळूच डोकावून पाहतो.
बायको पलंगावर
गाढ झोपलेली असते.

मग मी माझ्या खोलीत येतो.
दारूची बाटली आणि ग्लास
टेबलावर घेऊन बसतो.
प्रथम मी
बाटलीचं बूच काढतो.
मग तिच्यातली भरपूर दारू
ग्लासात ओतून घेतो.
बूच बाटलीला परत लावून टाकतो
आणि बाटली
कपाटात ठेवून देतो.
मग ग्लासातली
सगळी दारू मी पिऊन टाकतो.
मग मोरीत जाऊन
ग्लास धुऊन टाकतो-
आणि फळीवर ठेवून देतो.
मग मी पुन्हा बायकोच्या खोलीत
हळूच डोकावून पाहतो.
बायको पलंगावर
गाढ झोपलेली असते.
बघितलंत?
या कानाचा
त्या कानाला पत्ता नाही
आणि दारू मला
चढलेलीसुद्धा नाही.

मग जरा वेळाने
मी पुन्हा बाटली आणि
ग्लास काढतो.
बाटलीचं बूच काढतो.
भरपूर दारू
ग्लासात ओतून घेतो.
मग बाटलीला बूच लावून
मोरीत ठेवून देतो. मग ग्लासातली
सगळी दारू पिऊन
कपाटात जाऊन
ग्लास धुऊन टाकतो.
आणि फळीवर ठेवून देतो.
मग हळूच बायकोच्या खोलीत
डोकावून पाहतो.
बायको पलंगावर गाढ झोपलेली
असते.
बघितलंत?
या कानाचा त्या कानाला
पत्ता नाही आणि दारू मला
अजून चढलेली नाही.

मग थोड्या वेळाने मी पुन्हा
बाटली आणि ग्लास काढतो
ग्लासाचं बूच काढतो
भरपूर दारू कपाटात ओतून घेतो.
मग बाटलीला बूच लावून
ती बायकोच्या पलंगावर ठेवून देतो.
मग मोरीतली सगळी दारू पिऊन
कपाटात जाऊन
ग्लास धुऊन टाकतो
आणि फळीवर ठेवून देतो.
मग हळूच
बायकोच्या कानात
डोकावून पाहतो.
बायको मोरीत
गाढ झोपलेली असते. बघितलंत?
या कानाचा त्या कानाला
पत्ता नाही आणि दारू मला
अजून चढलेली नाही.

मग थोड्या वेळाने
मी पुन्हा
बाटली आणि ग्लास काढतो.
बाटलीचं बूच काढतो.
भरपूर दारू
मोरीत ओतून देतो.
मग कपाटाला बूच लावून
मोरीत ठेवून देतो.
कपाटातली सगळी दारू पिऊन
ग्लासात जाऊन
मोरी धुऊन टाकतो.
आणि फळीवर ठेवून देतो.
मग बाटलीच्या कानात
हळूच डोकावून पाहतो.
बाटली अजून कपाटावर
गाढ झोपलेली असते.
बघितलंत?
या बाटलीचा त्या बाटलीला
पत्ता नाही आणि दारू मला
अजून चढलेली नाही.

मग थोड्या वेळाने
मग पुन्हा
मोरी आणि कपाट काढतो.
मोरीतली दारू
कपाटात ओतून घेतो.
अगदी भरपूर. बरं का!
मग कपाट
मोरीत ठेवून देतो.
हो, ठेऊन देतो
मग मोरीतली सगळी दारू
पिऊन टाकतो.
सगळी पितो बरं का!
मग मी बायकोच्या खोलीत जाऊन
कपाट धुऊन टाकतो.
अगदी साफ धुऊन टाकतो
बरं का!.
आणि फळी
कपाटावर ठेवून देतो.
मग कपाटातल्या मोरीत
हळूच डोकावून बघतो
हळूच, बरं का!
बायको मोरीत
गाढ झोपलेली असते.
हा: हा: हा:!
बघितलंत?
या बायकोचा त्या बायकोला
पट्टा नाही
आणि मी इटकी
दारू प्यायलो
पण अजून मला
च्यढली णाही खर्र ना ?

साभार
https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%...

दारू पिताना मी कधी रिस्क घेत नाही.

मी संध्याकाळी घरी येतो,
तेव्हा बायको स्वयंपाक करत असते,
शेल्फमधील भांडयांचा आवाज येत असतो.
मी चोरपावलाने घरी येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही.
कारण मी कसलीच रिस्क घेत नाही. ||१||

वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो.
चटकन एक पेग भरून आस्वाद घेतो.
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो.
अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो
शिवाजीमहाराज मंद हसत असतात.
स्वयंपाकघरात डोकावून बघतो
बायको कणीकच मळत असते
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही.
कारण मी कसलीच रिस्क घेत नाही. ||२||

मी: “जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं?”
ती: “छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ!”

मी परत बाहेर येतो.
काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो.
बाटली मात्र मी हळूच काढतो.
वापरात नसलेल्या फळीच्या मोरीवरून ग्लास काढतो.
पटकन पेगचा आस्वाद घेतो.
बाटली धुवून मोरीत ठेवतो.
काळा ग्लासपण कपाटात ठेवतो.
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही.
कारण मी कसलीच रिस्क घेत नाही. ||३||

मी : “अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही.”
ती: “नाही काऽऽय! अठ्ठावीस वर्षाची घोडी झालीय म्हणे!”
मी : (आठवून जीभ चावतो) “अच्छा .. अच्छा ..”

मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते.
फळीवरून बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो
शिवाजीमहाराज मोठ्ठयाने हसतात
फळी कणकेवर ठेवून शिवाजींचा फोटो धुवून
मी काळ्या कपाटात ठेवतो
बायको गॅसवर मोरीच ठेवत असते
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही.
कारण मी कधीच …. ||४||

मी (चिडून) : “जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जिभच कापून टाकीन तुझी … ”
ती: “उगीच कटकट करू नका.. बाहेर जाऊन गप पडा.”

मी कणकेतून बाटली काढतो
काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो
मोरी धुवून फळीवर ठेवतो
बायको माझ्याकडे बघत हसत असते.
शिवाजीमहाराजांचा स्वयंपाक चालूच असतो
पण या जाधवांचा त्या जाधवांना पत्ता नाही.
कारण मी …. ||५||

मी (हसत हसत): “जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं म्हणे!”
ती (ओरडून): “तोंडावर पाणी मारा ऽऽऽ ”

मी परत स्वयंपाकघरात जातो.
हळूच फळीवर जाऊन बसतो
गॅसही फळीवरच होता.
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो.
मी डोकावून बघतो.
बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते.
या घोडीचा .. त्या घोडीला पत्ता लागत नाही.
अर्थात शिवाजीमहाराज कधीच रिस्क घेत नाहीत.
जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत
मी फोटोतून बायकोकडे बघत हसत असतो
कारण पण मी कधीच रिस्क … ||६||

काय खतरा फोटू आहे!
ब्रिगेडी गुडघा गँगनी ह्यात शिवाजी आला म्हणून रणकंदन केलेलं वाचलं हल्ली! Biggrin

शुभरात्री च्रप्स, चीअर्स!

लॉकडाऊनमध्ये पुढे आलेले पोट जरा कमी करायला मॉर्निंग वॉल्कला जायची सवय अंगी बाणवतोय. उद्या दुसराच दिवस आहे. त्यामुळे लवकर जातो आज झोपायला. जर आठवडाभर यश मिळाले तर छान धागाच काढतो लोकांना प्रेरणा देणारा Happy

मी इतक्यात काही नवीन ब्रँड ट्राय केले
ओकस्मिथ सिल्व्हर आणि गोल्ड
इंडियन ब्लेंडेड स्कॉच सारखी व्हिस्की
त्यापैकी गोल्ड इतकी नाही आवडली पण सिल्व्हर मस्त आहे आणि खिशाला पण परवडणारी

नंतर अमृत ची टू इंडिज रम
अमृत अमलगम ही लैच प्रीमियम दर्जाची आहे त्यामानाने रम स्वस्त आहे
बरीच स्मूद आहे रम च्या तुलनेत
त्यामुळे सुरवातीला छान वाटली
पण नंतर लक्षात आलं की यात रम चा पंच नाही आणि स्कॉच इतका फाईननेस नाही
मधेच काहीतरी आहे दोन्हीच्या

सांगताना अत्यंत दुःख होत आहे कि, गेले वर्षभर आम्ही टिटोटलर झालेले आहोत (एखादा अपवाद वगळता ). दारूच्या वरचढ धुंदी तिच्या डोळ्यात असल्याने गरज पडली नाही. शिवाय, चुकून ह्या धुंदीचा पत्ता त्या धुंदीला लागला तर दोघांना कायमचे मुकावे लागेल. एव्हाना आम्हाला लागलेला शोध असा कि, मद्य साहित्य नुसते वाचले तरी त्याची अनुभूती प्राप्त होते. सबब, मद्य साहित्य इथे गोळा करावे हि विनंती.

सांगताना अत्यंत दुःख होत आहे कि, गेले वर्षभर आम्ही टिटोटलर झालेले आहोत
<<
आम्ही यंदाच्या वर्षी..

गेल्या वर्षी झालेल्या थट्टी फस्टच्या पार्टिनंतर ओठांना थेंबही लागला नाहिये हो.

***

रच्याकने तो विनोद होता. मीही सुमारे गेले वर्षभरात १-२ वेळाच २-४ पेग्ज एन्जॉय केलेत. तेही विशेष वेळी स्पेशल सोबत असताना. आजकाल फार घ्यावी वाटत नाही. ठाऊक नाही का ते.

(डेव्हलपिंग डिस्टेस्ट फॉर अल्कोहोल इज साईन ऑफ लिव्हर सेल फेल्युअर. आय क्नो. सगळं वर्क-अप नॉर्मल आहे बादवे. सो जास्त काळजी करू नका.)

डेव्हलपिंग डिस्टेस्ट फॉर अल्कोहोल इज साईन ऑफ लिव्हर सेल फेल्युअर. >>>

हे नव्हतं माहिती

कोरोना झाल्यावर किती महिने पुढे घ्यायची नाही? नेटवर चार ते सहा आठवडे म्हणत आहेत
बरोबर आहे का ते

तीन महिन्यात दारू सोडवा वाली पावडर तर नाही मिसळत आहे ना खाण्यात?
>>>

हे असे करणे कायद्याने गुन्हा नाही का?
भले घरचे असलात तरी आपल्याच माणसांचे सुख हिराऊन घ्यायचा हक्क त्यांना कोणी दिला?
झाल्यास तुम्ही बोला त्या व्यक्तीशी की बाबा रे तुझ्या मद्यपानाचा आम्हाला त्रास होतो. पण हे फसवून दारू सोडवणे तात्विकदृष्ट्या पटत नाही.

Pages