आपण यांना पाहिलंत का?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 11 October, 2014 - 02:15

तीन दशकांहून अधिक काळ मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटके पाहत आहे. अनेकदा असे होते की एखादा चेहरा आवडतो, पण पुन्हा कुठे फारसा दिसतच नाही. माध्यमांतूनही त्या चेहर्‍याची चर्चा होत नाही. जसे काही हा चेहरा सर्वांच्या विस्मृतीतच गेला आहे. नेमका हा चेहरा मला बर्‍यापैकी आठवत असतो, पण इतर अनेकांना त्याचा परिचयच नसतो.

अशाच काही (इतरांच्या) विस्मृतीत गेलेल्या पण मला आवडत असलेल्या या चेहर्‍यांबद्दल.

  1. अभिनव चतुर्वेदी:- हमलोग मालिकेतील नन्हे हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा बुनियाद या मालिकेत आणि रिश्ते मालिकेच्या एका भागात पल्लवी जोशीसोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
  2. डॉ. पलाश सेनः- फिलहाल चित्रपटात सुश्मिता सेन चा नायक, विद्या बालन सोबत एका विडीओ अल्बम मध्ये नायक व गायक देखील. पुन्हा फारसा दिसला नाहीच.
  3. भानू उदय- स्पेशल स्क्वाड या स्टार वाहिनीवरील मालिकेचा नायक. बराच काळ दूर राहून आता पुन्हा सोनी पल वाहिनीवर डॉक्टरच्या भुमिकेत दिसतोय.
  4. लवलीन मिश्रा:- हमलोग मालिकेतील छुटकी हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा स्टार वाहिनीवरील श्श्श कोई है च्या एका भागात इरफान खान सोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
  5. काजल किरणः- हम किसीसे कम नही चित्रपटाची नायिका. पुन्हा मांग भरो सजना या चित्रपटात जितेन्द्रसोबत लहानशा भूमिकेत दिसली होती. विक्रम और वेताल च्या दोन भागांमध्येही तिने दर्शन दिले. तिने बहुतेक सर्व बी ग्रेड चित्रपटांतूनच काम केले. तिचे कराटे, सबूत, भागो भूत आया, अंदर बाहर, हमसे बढकर कौन व सात बिजलीयां हे चित्रपट माझ्या संग्रहात आहेत.
  6. वैशाली दांडेकरः- अधांतरी मालिकेची नायिका आणि हमाल दे धमाल चित्रपटात नायिकेची बहीण. पुन्हा दर्शन नाही.
  7. शीतल क्षीरसागरः- रात्र आरंभ चित्रपटातील डॉक्टर. पुन्हा कधीच कुठल्याच चित्रपटात, मालिकेत दिसली नाही. काल अचानक महाराष्ट्र टाइम्स च्या पुणे टाईम्स पुरवणीत दिसली. http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/44755907.cms?prtpa... सत्ताधीश-किस्सा खुर्चीचा, गारंबीचा बापू, इत्यादी नाटकांतून काम करत असते, अर्थात मी अजून पाहिली नाहीत. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आगामी चित्रपटातूनही तिचे दर्शन होईल.
  8. नंदिनी जोग:- काही दूरचित्रवाणी मालिका तसेच पंढरीची वारी, आघात, थांब थांब जाऊ नकोस लांब, कळत नकळत आणि आईशप्पत अशा काही चित्रपटांमधून दिसलेली ही अभिनेत्री आता गायबच झाली आहे.
  9. वन्या जोशी:- हिमालय दर्शन, मैला आंचल, मंझिले, अशा दूरदर्शन मालिका आणि सरदार व संशोधन या चित्रपटांतून दिसलेली ही अभिनेत्री आता कास्टिंग डायरेक्टर बनली आहे.
  10. वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.
  11. सोनाली जोशी:- एक्स्क्यूज मी चित्रपटातून आणि एका हिन्दी मालिकेतून श्रेयस तळपदेसोबत दिसलेली अभिनेत्री.
  12. फातिमा शेखः- देव आनंद यांच्या सौ करोड या चित्रपटाची नायिका
  13. सारा खान:- ढुंढ लेंगी मंझिले हमें ही दूरचित्रवाणी मालिका आणि पेबॅक हा चित्रपट यात मुख्य भूमिका केल्यावर ही मध्यंतरी टोटल सियप्पा चित्रपटात नायिकेची बहीण म्हणून दिसली होती.
  14. गायत्री जोशी:- स्वदेस चित्रपटाची नायिका आणि मॉडेल. आयएमडीबीनुसार वाँटेड देखील तिच्या नावावर दिसतोय, मला तरी त्यात दिसली नाही. इतरत्रही फारसे दर्शन नाहीच.
  15. बरखा मदन:- काही दूरदर्शन मालिका, खिलाडीयोंका खिलाडी चित्रपटात सहनायिका, भूत चित्रपटातील भूत आणि सोच लो चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका केल्यावर आता संन्यास घेऊन बौद्ध भिक्खू झाली आहे.
  16. अपर्णा टिळकः- फुटपाथ चित्रपटा इम्रान हाश्मीची नायिका, जीत या स्टार वाहिनीवरील अंकूर नय्यर ची नायिका, लेफ्ट राईट लेफ्ट व कही किसी रोज या मालिकांमधील काही भागांत लहानशी भूमिका तसेच जुन्या सब टीवीवरील एका विनोदी मालिकेत कंवलजीत सिंहच्या मुलीची भूमिका करून आता गायब झाली आहे.
  17. पल्लवी कुलकर्णी:- क्या हादसा क्या हकीगत, वैदेही आणि कहता है दिल या मालिका तसेच बॉबी देओलच्या क्रांती चित्रपटात त्याची बहीणीची भूमिका करून सध्या गायब. https://www.youtube.com/watch?v=Rp_dqBOC9t8&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
  18. वैदेही अमृते:- अभिनेत्री / मॉडेल. गृहस्थी मालिकेत किरणकुमार सोबत होती.
  19. अमृता रायचंदः- चित्रपट - बात बन गयी, मालिका - माही वे, रिअ‍ॅलिटी शो - ममी का मॅजिक, जाहिराती - व्हर्लपूल, पॉण्ड्स व इतर अनेक.
  20. आरती चांदूरकरः- खतरनाक चित्रपटात महेश कोठारेंची नायिका https://www.youtube.com/watch?v=B7fYRg2vdb4&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
  21. इंदु वर्मा:- सिद्धांत मालिकेतली आर्किटेक्ट अलका, नायक अ‍ॅडव्होकेट सिद्धांतची क्रमांक २ ची प्रेयसी.
  22. जमुना:- दो फंटूश, अंधेरा चित्रपटांतली नायिका, प्रसिद्ध नृत्यांगना

अज्ञात चेहरे:-

  1. हेच माझे माहेर चित्रपटातील मोहन गोखलेची नायिका.
  2. माझं घर माझा संसार चित्रपटातील अजिंक्य देवची नायिका
  3. देव आनंदच्या बुलेट चित्रपटात डॉ. श्रीराम लागूंच्या कन्येची भूमिका करणारी अभिनेत्री
  4. ताल चित्रपटातील ऐश्वर्या राय सोबत असलेली अभिनेत्री. मी चित्रपट पाहिला नसल्याने तिची भुमिका किती मोठी आहे ते माहित नाही पण इथे https://www.youtube.com/watch?v=p_OoCr4uRhM या गाण्यात ३ र्‍या सेकंदाला निळ्या कपड्यांत दिसतेय. अजून एका गाण्यात अक्षय खन्नाला काही तरी चिडवतेय असे पाहिले होते.
  5. पाप चित्रपटातील जॉन अब्राहम ची बहीण https://www.youtube.com/watch?v=ObRQx4PHeTg&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA

हे चेहरे मी उल्लेख केल्याव्यतिरिक्त आपण कुठे पाहिले असल्यास जरूर नमूद करावे. तसेच आपणांस देखील असे कुठले जनतेच्या विस्मृतीत गेलेले चेहरे आठवत असतील तर त्यांचा देखील उल्लेख करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण चेसुगु (धागाकर्ते) यान्ना पाहिलत का सध्या कोणत्या अवतारात माबोवर वावरत आहेत

२०१४ चा धागा आहे आणि चेसुगु चे लिखाण किन्वा प्रतिसाद पण दिसत नाहित

http://www.bookganga.com/ebooks/Books/details/4781547033038536397?BookNa...
या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असणार्‍या मराठी अभिनेत्रीचं नाव काय? यांनी आभाळमाया मधे क्षितिज झारापकर यांच्यासोबत काम केलं होतं.

https://youtu.be/PQ866yYfDdM
या जाहिरातीत ऋषिकेश देशपांडे या नटासोबत जी अभिनेत्री आहे(उपवर मुलीची आई)त्यांचं नाव काय?

>> वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत सौमित्रच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव वंदना पंडित असं असून १९७९ सालीच्या अष्टविनायक या चित्रपटामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती:

https://www.loksatta.com/manoranjan-news/ashtavinayak-fame-actress-vanda...

उभे कुंकू लावणारी डॉली ठाकोर आहे का?तिच्या उजव्या/डाव्या बाजूच्या हिंदी वृत्तनिवेदिका आहेत.फक्त बॉबवाली ओळखता येत नाही.

सरला माहेशवरी आणि नीती रवींद्रन आहेत एकदम उजव्या साईडच्या.. डॉली नाहीये ह्याच्यात.

हो, या साऱ्या दूरदर्शनवरच्या पूर्वीच्या वृत्तनिवेदिका आहेत. मलाही साऱ्या माहित नव्हत्या. एका फेसबुक पोस्टवरून त्यांची नावे याप्रमाणे: संगीता बेदी, साधना श्रीवास्तव, मिनू तलवार, मृणालिनी, निती रवीन्द्रन आणि सरला माहेश्वरी

(हा धागा चार ग्रुप्स मध्ये आहे. त्यामुळे "ग्रुपमध्ये नवीन" यावर क्लिक केल्यास तो मलासुद्धा चार वेळा दिसतोय)

Golmal सिरीज मधला नागबाबा

त्याचे नाव कुठेच नसते

मला आधी सडक 2 मधला मकरंद जोशी व्हिलन तसाच दिसल्याने तोच वाटला होता

मेजवानी च्या या एपिसोड मध्ये कविता मेढेकर होस्ट आहेत. त्यांनी त्यापूर्वी व नंतर सुद्धा काही चित्रपटांतून काम केल्याचे विकिपीडियावरील माहितीवरून कळते

वाह दुरशर्शन डेज च्या बातम्या देणार्‍या सगळ्या तरीपण २ नं. निळीसाडीवाल्या आणि त्या शेवटून दुसर्‍या ज्यांना चेहेर्‍यावर चामखीळ आहे त्या दोघीच ओळखू आल्या.

फार पूर्वी आकाशवाणी वर आरसा ही कौटुंबिक श्रुतिका लागायची >> वा !! खूप छान आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद ! खूप आवडायची हि श्रुतिका

हा स्मरण रंजनाचा छान धागा आहे ! सुरु करणाऱ्यांचे आणि पोस्ट्स टाकणाऱ्यांचे आभार !!

लाऽऽऽऽ... ला ला ला... लाऽऽऽ ला ला ला ला लाऽऽऽ....

लिरील गर्ल करेण लुनेल हिचा मृत्यू झाल्याची अफवा त्या काळात जोरदार पसरली होती. अर्थातच ती अफवा होती.
आज अनायासे एक आर्टिकल वाचायला मिळाले त्यानुसार करेण सध्या न्युझीलंड इथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.

युट्युबवर काहीबाही पाहत असताना कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडवर जाऊन पडलो. ज्यात आशा पारेख, हेलन आणि वहिदा रहमान या एकेकाळच्या तीन दिग्गज अभिनेत्री आल्या होत्या. त्यामध्ये आशा पारेख आपल्या सुरवातीच्या प्रवासाविषयी बोलताना म्हणाल्या "मला गूँज उठी शहनाई या चित्रपटासाठी लीड ऍक्टरेस म्हणून साइन-इन केलं होतं. राजेंद्रकुमार हिरो होते. चित्रपटाचे आठ-दहा दिवसांचे शूटिंगही झाले आणि अचानक निर्मात्यांनी सांगितले कि हि मुलगी स्टार मटेरियल वाटत नाही". आणि आशा पारेख यांना त्यांनी त्या चित्रपटातून काढून टाकले.

आशा पारेख स्टार मटेरीयल नाहीत म्हणून त्यांना काढले खरे, पण अखेर कोणत्या हिरॉईनला त्यांच्या जागी घेतले असेल बरे? असे कोण 'स्टार मटेरियल' असेल बरे ते? अशी उत्सुकता चाळवल्याने थोडे गुगलून पाहिले आणि गूँज उठी मध्ये हिरॉईन अमिता नावाची हिरॉईन होती असे कळले. थोडे उत्खनन करता कळले कि अमिता (मूळ नाव कमर सुलताना) त्या काळात आघाडीची हिरॉईन होती. शम्मी कपूर, राजेंद्र कुमार सारखे हिरो असलेल्या काही गाजलेल्या चित्रपटांत ती हिरॉईन होती. एकदा तर फिल्म-फेअर साठी सुद्धा तिचे नामांकन झाले होते. पण तरीदेखील पुढे तिची कारकीर्द घडू शकली नाही. मग साईड-रोल, नकारात्मक भूमिका अशा भूमिका करता करता ती बाजूला पडत गेली. नंतर तिने स्वतःहूनच सिनेसन्यास घेतला. विकिपीडिया मधील उल्लेखानुसार १९६८ मधल्या "हसीना मान जायेगी" या चित्रपटांनंतर गायब झालेली अमिता थेट २००५ साली लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड घेताना दिसली. त्यानंतर पुन्हा गायब झाली ती आजतागायत.

Amita_color2.png

अमीता म्हटल्यावर तुमसा नहीं देखा आणि मेरे मेहबूब हे दोन चित्रपट आठवतात. सर पर टोपी लाल .... हो त्तेरा क्या कहना आणि मेरे मेहबूब में क्या नही? - जाने मन इक नजर देख ले ही गाणी.

आता योगायोग बघा.
मेरे मेहबूब मध्ये राजेंद्रकुमार नायक आणि अमीता साइड हिरॉइन. साधनासाठी त्याग करते.

तुमसा नहीं देखा बद्दल विकीवर म्हटलंय की नासिर हुसैन ने या चित्रपटाची पब्लिसिटी अमीताला केंद्रस्थानी ठेवून केली होती. नायक शम्मी कपूरच्या करियरला या चित्रपटामुळे उभारी मिळाली.

पुन्हा विकीमधून - गूंज उठी शहनाई हातातून गेल्याच्या आठ दिवसांत आशाला दिल देके देखो मिळाला. नायक शम्मी कपूर. दिग्दर्शक नासिर हुसैन. पुढे आशा आणि नासिर हुसैन यांनी एकत्र अनेक चित्रपट केले.

मला ती 'सर पे टोपी' मध्ये टॉमबॉइश वाटलेली स्मरते. कदाचित तसा पोशाख असेल मग. परत बघावं लागेल गाणं.

Pages