आपण यांना पाहिलंत का?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 11 October, 2014 - 02:15

तीन दशकांहून अधिक काळ मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटके पाहत आहे. अनेकदा असे होते की एखादा चेहरा आवडतो, पण पुन्हा कुठे फारसा दिसतच नाही. माध्यमांतूनही त्या चेहर्‍याची चर्चा होत नाही. जसे काही हा चेहरा सर्वांच्या विस्मृतीतच गेला आहे. नेमका हा चेहरा मला बर्‍यापैकी आठवत असतो, पण इतर अनेकांना त्याचा परिचयच नसतो.

अशाच काही (इतरांच्या) विस्मृतीत गेलेल्या पण मला आवडत असलेल्या या चेहर्‍यांबद्दल.

 1. अभिनव चतुर्वेदी:- हमलोग मालिकेतील नन्हे हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा बुनियाद या मालिकेत आणि रिश्ते मालिकेच्या एका भागात पल्लवी जोशीसोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
 2. डॉ. पलाश सेनः- फिलहाल चित्रपटात सुश्मिता सेन चा नायक, विद्या बालन सोबत एका विडीओ अल्बम मध्ये नायक व गायक देखील. पुन्हा फारसा दिसला नाहीच.
 3. भानू उदय- स्पेशल स्क्वाड या स्टार वाहिनीवरील मालिकेचा नायक. बराच काळ दूर राहून आता पुन्हा सोनी पल वाहिनीवर डॉक्टरच्या भुमिकेत दिसतोय.
 4. लवलीन मिश्रा:- हमलोग मालिकेतील छुटकी हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा स्टार वाहिनीवरील श्श्श कोई है च्या एका भागात इरफान खान सोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
 5. काजल किरणः- हम किसीसे कम नही चित्रपटाची नायिका. पुन्हा मांग भरो सजना या चित्रपटात जितेन्द्रसोबत लहानशा भूमिकेत दिसली होती. विक्रम और वेताल च्या दोन भागांमध्येही तिने दर्शन दिले. तिने बहुतेक सर्व बी ग्रेड चित्रपटांतूनच काम केले. तिचे कराटे, सबूत, भागो भूत आया, अंदर बाहर, हमसे बढकर कौन व सात बिजलीयां हे चित्रपट माझ्या संग्रहात आहेत.
 6. वैशाली दांडेकरः- अधांतरी मालिकेची नायिका आणि हमाल दे धमाल चित्रपटात नायिकेची बहीण. पुन्हा दर्शन नाही.
 7. शीतल क्षीरसागरः- रात्र आरंभ चित्रपटातील डॉक्टर. पुन्हा कधीच कुठल्याच चित्रपटात, मालिकेत दिसली नाही. काल अचानक महाराष्ट्र टाइम्स च्या पुणे टाईम्स पुरवणीत दिसली. http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/44755907.cms?prtpa... सत्ताधीश-किस्सा खुर्चीचा, गारंबीचा बापू, इत्यादी नाटकांतून काम करत असते, अर्थात मी अजून पाहिली नाहीत. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आगामी चित्रपटातूनही तिचे दर्शन होईल.
 8. नंदिनी जोग:- काही दूरचित्रवाणी मालिका तसेच पंढरीची वारी, आघात, थांब थांब जाऊ नकोस लांब, कळत नकळत आणि आईशप्पत अशा काही चित्रपटांमधून दिसलेली ही अभिनेत्री आता गायबच झाली आहे.
 9. वन्या जोशी:- हिमालय दर्शन, मैला आंचल, मंझिले, अशा दूरदर्शन मालिका आणि सरदार व संशोधन या चित्रपटांतून दिसलेली ही अभिनेत्री आता कास्टिंग डायरेक्टर बनली आहे.
 10. वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.
 11. सोनाली जोशी:- एक्स्क्यूज मी चित्रपटातून आणि एका हिन्दी मालिकेतून श्रेयस तळपदेसोबत दिसलेली अभिनेत्री.
 12. फातिमा शेखः- देव आनंद यांच्या सौ करोड या चित्रपटाची नायिका
 13. सारा खान:- ढुंढ लेंगी मंझिले हमें ही दूरचित्रवाणी मालिका आणि पेबॅक हा चित्रपट यात मुख्य भूमिका केल्यावर ही मध्यंतरी टोटल सियप्पा चित्रपटात नायिकेची बहीण म्हणून दिसली होती.
 14. गायत्री जोशी:- स्वदेस चित्रपटाची नायिका आणि मॉडेल. आयएमडीबीनुसार वाँटेड देखील तिच्या नावावर दिसतोय, मला तरी त्यात दिसली नाही. इतरत्रही फारसे दर्शन नाहीच.
 15. बरखा मदन:- काही दूरदर्शन मालिका, खिलाडीयोंका खिलाडी चित्रपटात सहनायिका, भूत चित्रपटातील भूत आणि सोच लो चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका केल्यावर आता संन्यास घेऊन बौद्ध भिक्खू झाली आहे.
 16. अपर्णा टिळकः- फुटपाथ चित्रपटा इम्रान हाश्मीची नायिका, जीत या स्टार वाहिनीवरील अंकूर नय्यर ची नायिका, लेफ्ट राईट लेफ्ट व कही किसी रोज या मालिकांमधील काही भागांत लहानशी भूमिका तसेच जुन्या सब टीवीवरील एका विनोदी मालिकेत कंवलजीत सिंहच्या मुलीची भूमिका करून आता गायब झाली आहे.
 17. पल्लवी कुलकर्णी:- क्या हादसा क्या हकीगत, वैदेही आणि कहता है दिल या मालिका तसेच बॉबी देओलच्या क्रांती चित्रपटात त्याची बहीणीची भूमिका करून सध्या गायब. https://www.youtube.com/watch?v=Rp_dqBOC9t8&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
 18. वैदेही अमृते:- अभिनेत्री / मॉडेल. गृहस्थी मालिकेत किरणकुमार सोबत होती.
 19. अमृता रायचंदः- चित्रपट - बात बन गयी, मालिका - माही वे, रिअ‍ॅलिटी शो - ममी का मॅजिक, जाहिराती - व्हर्लपूल, पॉण्ड्स व इतर अनेक.
 20. आरती चांदूरकरः- खतरनाक चित्रपटात महेश कोठारेंची नायिका https://www.youtube.com/watch?v=B7fYRg2vdb4&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
 21. इंदु वर्मा:- सिद्धांत मालिकेतली आर्किटेक्ट अलका, नायक अ‍ॅडव्होकेट सिद्धांतची क्रमांक २ ची प्रेयसी.
 22. जमुना:- दो फंटूश, अंधेरा चित्रपटांतली नायिका, प्रसिद्ध नृत्यांगना

अज्ञात चेहरे:-

 1. हेच माझे माहेर चित्रपटातील मोहन गोखलेची नायिका.
 2. माझं घर माझा संसार चित्रपटातील अजिंक्य देवची नायिका
 3. देव आनंदच्या बुलेट चित्रपटात डॉ. श्रीराम लागूंच्या कन्येची भूमिका करणारी अभिनेत्री
 4. ताल चित्रपटातील ऐश्वर्या राय सोबत असलेली अभिनेत्री. मी चित्रपट पाहिला नसल्याने तिची भुमिका किती मोठी आहे ते माहित नाही पण इथे https://www.youtube.com/watch?v=p_OoCr4uRhM या गाण्यात ३ र्‍या सेकंदाला निळ्या कपड्यांत दिसतेय. अजून एका गाण्यात अक्षय खन्नाला काही तरी चिडवतेय असे पाहिले होते.
 5. पाप चित्रपटातील जॉन अब्राहम ची बहीण https://www.youtube.com/watch?v=ObRQx4PHeTg&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA

हे चेहरे मी उल्लेख केल्याव्यतिरिक्त आपण कुठे पाहिले असल्यास जरूर नमूद करावे. तसेच आपणांस देखील असे कुठले जनतेच्या विस्मृतीत गेलेले चेहरे आठवत असतील तर त्यांचा देखील उल्लेख करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सघळा Nostalgia....
वाचून आठवणींमधे रमायला छान वाटतयं...

बर्याच सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे च्या आईचा रोल करणार्‍या अभिनेत्रीचं काय नाव आहे????? सेम टू सेम , दे दणादण मध्ये आईचा रोल केला आहे..

सतीश शहा सारखाच दिसणारा एक अभिनेता पूर्वीच्या अनेक चित्रपटांत (म्हणजे ८० च्या आसपास) असायचा. गंभीर व चरित्रभूमिका करायचा. (मला आठवते त्यानुसार चेहरेपट्टी व शरीरयष्टी साधारण सतीश शहा सारखीच). कुणाला आठवतोय का?

त्रिदेव मध्ये "ओये ओये गर्ल" म्हणून प्रसिद्धीच्या झोतात झालेली सोनम नावाची अभिनेत्री सुद्धा नंतर कुठे गायबच झाली

हेच माझे माहेर चित्रपटातील मोहन गोखलेची नायिका>>>>>>>>> शर्मिला मेढेकर -कुलकर्णी आहे तिचा नाव .. 'घाबरायचं नाही ' या चित्रपटात पहिले होते

माझे विचारणे चुकीचे आहे कदाचित.
फार पूर्वी आकाशवाणी वर आरसा ही कौटुंबिक श्रुतिका लागायची. त्यात चिंतुअण्णा या पात्राबरोबर इतर पात्रं साकार करणारी स्त्री पात्र होते . त्यात खूप सुंदर हसणाऱ्या ताई व इतर जणांची नावे कुणाला माहीत आहे काय नि जूने कार्यक्रम ऐकता येतात काय?

नीलम प्रभू उर्फ करुणा देव का, नंतर त्यांनी यशवंत देव यांच्याशी लग्न केलं. तेव्हा नीलम प्रभू नावाने होत्या, बबन प्रभू यांची पत्नी.

टेकाडे भाऊजी वाली श्रुतिका का. त्यात बाळ कुडतरकर पण असायचे आणि तिसरे टेकाडेभाऊजी कोण ते विसरले.

नीलम प्रभू उर्फ करुणा देव का, नंतर त्यांनी यशवंत देव यांच्याशी लग्न केलं. तेव्हा नीलम प्रभू नावाने होत्या, बबन प्रभू यांची पत्नी>>+११ त्या वारल्या ना मागे केव्हातरी !?
टेकाडे भावजी, प्रभाकर पंत आणि मीनावहिनी ची पुन्हा प्रपंच ना ?

पुन्हा प्रपंच

बाळ कुरतडकर टेकाडेभाउजी होते.

सुचेता, सेम पिंच. मी पण मालविका तिवारीबद्दलच लिहिणार होते आणि हीच सिरियल. सुदेश बेरी होता ना हिरो यात? > हो . मालविका तिवारी शाहरुख च्या चमत्कार मध्ये होती. नंतर बघितलेले आठवत नाही .

लीना भागवत ही एक माझी आवडती अभिनेत्री, खूप सुंदर हास्य असणारी अलिकडे दिसली नाही. बहुतेक जान्हवीच्या मालिकेत होती.

Akashvani Pune warun prsaarit hot ase. Sangli pan sahakshepan karat ase. Nabhonatya ha prakar atyant famous hota. Good old days.

अनू अगरवाल. खलनायिका मधे होती. नंतर अपघात होउन स्मृती गेली आणि काही वर्षे कोमात होती. >>>>>>> हो. त्या अपघातामुळे तिचा चेहरा सुद्दा न ओळखण्यासारखा झालाय. सध्या ती गरीब मुलान्साठी काम करते.

हिरोचं नाव काय होते? >>>>>>>>> राहुल रॉय

आशिकी गर्लची स्टोरी:

https://www.bhaskar.com/bollywood/news/anu-agarwal-bollywood-actress-tea...

नीलम प्रभू उर्फ करुणा देव का, नंतर त्यांनी यशवंत देव यांच्याशी लग्न केलं. तेव्हा नीलम प्रभू नावाने होत्या, बबन प्रभू यांची पत्नी.

टेकाडे भाऊजी वाली श्रुतिका का. त्यात बाळ कुडतरकर पण असायचे आणि तिसरे टेकाडेभाऊजी कोण ते विसरले.>>>>> प्रपंच ही मालिका जेंव्हा लोकाग्रहास्तव परत सुरु केली ती "पुन्हा प्रपंच".
बाळ कुरतडकर: प्रभाकर पंत
नीलम प्रभू: मीना
प्रभाकर जोशी: टेकाडे भटजी
विमल जोशी: मिसेस टेकाडे

प्रपंच ही मालिका जेंव्हा लोकाग्रहास्तव परत सुरु केली ती "पुन्हा प्रपंच". >>> बरोबर, पुन्हा प्रपंच जास्त आठवतेय. प्रपंचच्या वेळी अगदीच लहान होते बहुतेक पण टेकाडे भाऊजी नाव गमतीचे वाटायचे.

हा प्रभाकर जोशी बरोबर. मला मिसेस टेकाडे आठवतंचं नाहीयेत.

सकाळी मुंबई आकाशवाणीवर निवेदक म्हणून मीरा सरैया असायच्या, त्यांचाही आवाज छान होता. आपली आवड, कॉफी हाऊस हेही रात्री आवडीने ऐकले जायचे घरोघरी.

आरसा आठवत नाहीये मात्र पण ह्या निमित्याने लहानपणीचा रेडीओ आठवला. सकाळची शाळा थंडीत सात वीस ची असायची तेव्हा सात पाचच्या बातम्या सुरु झाल्या की बाहेर पडायचं मैत्रिणीबरोबर शाळेत जायला हा नियम होता, सुधा नरवणे द्यायच्या बातम्या.

बरोब्बर शाळेला निघताना सकाळी हे कानावर पडायचं. सुधा नरवणे आपल्याला बातम्या देत आहेत. अतिशय स्पष्ट, स्वच्छ आवाज. आताच ऐकल्याचा भास झाला.

सुधा नरवणे काही वर्षापूर्वी ह्रदयविकाराने गेल्या तेंव्हा हे जुने दिवस आठवले.

आणि संध्याकाळी ७ वाजता "आकाशवाणी मुंबई, ललिता नेने प्रादेशिक बातम्या देत आहे.." हे आठवले कि अजूनही बालपणातील संध्याकाळ जशीच्या तशी आठवते. हि प्रतिक्रिया लिहिताना सहज शोध घेतला असता त्यांचा फोटो असलेली बातमी पाहायला मिळाली. (आजतागायत "खूप लहानपणी ऐकलेला चिरपरिचित आवाज" हीच फक्त त्यांची ओळख होती. ह्या धाग्याच्या निमित्ताने पहिल्यांदा त्या कशा दिसतात हे पाहायला मिळाले)...

https://www.loksatta.com/manoranjan-news/lalita-nene-presenting-regional...

सकाळी साडेआठ आणि दुपारी दीड वाजता दिल्लीहून मराठी बातम्या देणाऱ्यांचे पण आवाज अजूनही आठवतात. त्यात एक नंदकुमार कारखानीस आणि दुसरे दत्ता कुलकर्णी. हे दोघेही आपापल्या शैलीत एकदम रुबाबदारपणे बातम्या देत असंत. सांगली आकाशवाणीवर तेंव्हा वामन काळे अतिशय प्रसिद्ध निवेदक होते. त्यांनी सांगितलेल्या त्या काळातल्या काही ह्र्दय आठवणी इथे वाचायला मिळतात:

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/-/article...

धाग्याच्या शिर्षकाला अनुसरून बोलायचे तर आकाशवाणीवरच्या या सगळ्या प्रसिद्ध कलाकारांना/निवेदकांना "पहायचा" योग मला कधी आलाच नाही. पण एक अपवाद. वामन काळे यांच्या नंतर दत्ता सरदेशमुख म्हणून एक निवेदक आले. इतके नैसर्गिक सहजसुंदर आणि ओघवते निवेदन. जराही कृत्रिमपणाचा लवलेश नाही. अविर्भाव नाही. असे वाटायचे कि हा मनुष्य निवेदन करत नाही तर आपल्याशी गप्पा मारतोय. कर्मधर्मसंयोगाने एकदा त्यांच्याशी भेटीचा योग आला होता. ते हि आकाशवाणी क्वार्टर्स मधल्या त्यांच्या घरीच! त्यांच्याशी बोलताना अक्षरशः रेडीओ आपणाशी बोलतोय असे तेंव्हा वाटून गेले होते Happy यात तसूभरही अतिशयोक्ती नाही. एक फार फार वेगळी अनुभूती. तो अख्खा दिवस मी अद्यापही विसरलो नाही. सध्या दत्ता सरदेशमुख अजून आकाशवाणी सांगलीवर आहेत का (इतक्या वर्षांनी ती शक्यता कमीच). नसतील तर कुठे आहेत. काय करतात. काही माहिती नाही.

जाता जाता: या सगळ्या निवेदकांचा इतका लहानपणी प्रभाव होता कि आपणही पुढे निवेदकच व्हायचे असे ध्येय ठरविले होते आणि त्या काळात अस्मादिकानी आकाशवाणीवर जाऊन निवेदक पदासाठी ऑडीशन पण दिली होती Happy

Pages