आपण यांना पाहिलंत का?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 11 October, 2014 - 02:15

तीन दशकांहून अधिक काळ मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटके पाहत आहे. अनेकदा असे होते की एखादा चेहरा आवडतो, पण पुन्हा कुठे फारसा दिसतच नाही. माध्यमांतूनही त्या चेहर्‍याची चर्चा होत नाही. जसे काही हा चेहरा सर्वांच्या विस्मृतीतच गेला आहे. नेमका हा चेहरा मला बर्‍यापैकी आठवत असतो, पण इतर अनेकांना त्याचा परिचयच नसतो.

अशाच काही (इतरांच्या) विस्मृतीत गेलेल्या पण मला आवडत असलेल्या या चेहर्‍यांबद्दल.

 1. अभिनव चतुर्वेदी:- हमलोग मालिकेतील नन्हे हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा बुनियाद या मालिकेत आणि रिश्ते मालिकेच्या एका भागात पल्लवी जोशीसोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
 2. डॉ. पलाश सेनः- फिलहाल चित्रपटात सुश्मिता सेन चा नायक, विद्या बालन सोबत एका विडीओ अल्बम मध्ये नायक व गायक देखील. पुन्हा फारसा दिसला नाहीच.
 3. भानू उदय- स्पेशल स्क्वाड या स्टार वाहिनीवरील मालिकेचा नायक. बराच काळ दूर राहून आता पुन्हा सोनी पल वाहिनीवर डॉक्टरच्या भुमिकेत दिसतोय.
 4. लवलीन मिश्रा:- हमलोग मालिकेतील छुटकी हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा स्टार वाहिनीवरील श्श्श कोई है च्या एका भागात इरफान खान सोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
 5. काजल किरणः- हम किसीसे कम नही चित्रपटाची नायिका. पुन्हा मांग भरो सजना या चित्रपटात जितेन्द्रसोबत लहानशा भूमिकेत दिसली होती. विक्रम और वेताल च्या दोन भागांमध्येही तिने दर्शन दिले. तिने बहुतेक सर्व बी ग्रेड चित्रपटांतूनच काम केले. तिचे कराटे, सबूत, भागो भूत आया, अंदर बाहर, हमसे बढकर कौन व सात बिजलीयां हे चित्रपट माझ्या संग्रहात आहेत.
 6. वैशाली दांडेकरः- अधांतरी मालिकेची नायिका आणि हमाल दे धमाल चित्रपटात नायिकेची बहीण. पुन्हा दर्शन नाही.
 7. शीतल क्षीरसागरः- रात्र आरंभ चित्रपटातील डॉक्टर. पुन्हा कधीच कुठल्याच चित्रपटात, मालिकेत दिसली नाही. काल अचानक महाराष्ट्र टाइम्स च्या पुणे टाईम्स पुरवणीत दिसली. http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/44755907.cms?prtpa... सत्ताधीश-किस्सा खुर्चीचा, गारंबीचा बापू, इत्यादी नाटकांतून काम करत असते, अर्थात मी अजून पाहिली नाहीत. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आगामी चित्रपटातूनही तिचे दर्शन होईल.
 8. नंदिनी जोग:- काही दूरचित्रवाणी मालिका तसेच पंढरीची वारी, आघात, थांब थांब जाऊ नकोस लांब, कळत नकळत आणि आईशप्पत अशा काही चित्रपटांमधून दिसलेली ही अभिनेत्री आता गायबच झाली आहे.
 9. वन्या जोशी:- हिमालय दर्शन, मैला आंचल, मंझिले, अशा दूरदर्शन मालिका आणि सरदार व संशोधन या चित्रपटांतून दिसलेली ही अभिनेत्री आता कास्टिंग डायरेक्टर बनली आहे.
 10. वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.
 11. सोनाली जोशी:- एक्स्क्यूज मी चित्रपटातून आणि एका हिन्दी मालिकेतून श्रेयस तळपदेसोबत दिसलेली अभिनेत्री.
 12. फातिमा शेखः- देव आनंद यांच्या सौ करोड या चित्रपटाची नायिका
 13. सारा खान:- ढुंढ लेंगी मंझिले हमें ही दूरचित्रवाणी मालिका आणि पेबॅक हा चित्रपट यात मुख्य भूमिका केल्यावर ही मध्यंतरी टोटल सियप्पा चित्रपटात नायिकेची बहीण म्हणून दिसली होती.
 14. गायत्री जोशी:- स्वदेस चित्रपटाची नायिका आणि मॉडेल. आयएमडीबीनुसार वाँटेड देखील तिच्या नावावर दिसतोय, मला तरी त्यात दिसली नाही. इतरत्रही फारसे दर्शन नाहीच.
 15. बरखा मदन:- काही दूरदर्शन मालिका, खिलाडीयोंका खिलाडी चित्रपटात सहनायिका, भूत चित्रपटातील भूत आणि सोच लो चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका केल्यावर आता संन्यास घेऊन बौद्ध भिक्खू झाली आहे.
 16. अपर्णा टिळकः- फुटपाथ चित्रपटा इम्रान हाश्मीची नायिका, जीत या स्टार वाहिनीवरील अंकूर नय्यर ची नायिका, लेफ्ट राईट लेफ्ट व कही किसी रोज या मालिकांमधील काही भागांत लहानशी भूमिका तसेच जुन्या सब टीवीवरील एका विनोदी मालिकेत कंवलजीत सिंहच्या मुलीची भूमिका करून आता गायब झाली आहे.
 17. पल्लवी कुलकर्णी:- क्या हादसा क्या हकीगत, वैदेही आणि कहता है दिल या मालिका तसेच बॉबी देओलच्या क्रांती चित्रपटात त्याची बहीणीची भूमिका करून सध्या गायब. https://www.youtube.com/watch?v=Rp_dqBOC9t8&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
 18. वैदेही अमृते:- अभिनेत्री / मॉडेल. गृहस्थी मालिकेत किरणकुमार सोबत होती.
 19. अमृता रायचंदः- चित्रपट - बात बन गयी, मालिका - माही वे, रिअ‍ॅलिटी शो - ममी का मॅजिक, जाहिराती - व्हर्लपूल, पॉण्ड्स व इतर अनेक.
 20. आरती चांदूरकरः- खतरनाक चित्रपटात महेश कोठारेंची नायिका https://www.youtube.com/watch?v=B7fYRg2vdb4&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
 21. इंदु वर्मा:- सिद्धांत मालिकेतली आर्किटेक्ट अलका, नायक अ‍ॅडव्होकेट सिद्धांतची क्रमांक २ ची प्रेयसी.
 22. जमुना:- दो फंटूश, अंधेरा चित्रपटांतली नायिका, प्रसिद्ध नृत्यांगना

अज्ञात चेहरे:-

 1. हेच माझे माहेर चित्रपटातील मोहन गोखलेची नायिका.
 2. माझं घर माझा संसार चित्रपटातील अजिंक्य देवची नायिका
 3. देव आनंदच्या बुलेट चित्रपटात डॉ. श्रीराम लागूंच्या कन्येची भूमिका करणारी अभिनेत्री
 4. ताल चित्रपटातील ऐश्वर्या राय सोबत असलेली अभिनेत्री. मी चित्रपट पाहिला नसल्याने तिची भुमिका किती मोठी आहे ते माहित नाही पण इथे https://www.youtube.com/watch?v=p_OoCr4uRhM या गाण्यात ३ र्‍या सेकंदाला निळ्या कपड्यांत दिसतेय. अजून एका गाण्यात अक्षय खन्नाला काही तरी चिडवतेय असे पाहिले होते.
 5. पाप चित्रपटातील जॉन अब्राहम ची बहीण https://www.youtube.com/watch?v=ObRQx4PHeTg&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA

हे चेहरे मी उल्लेख केल्याव्यतिरिक्त आपण कुठे पाहिले असल्यास जरूर नमूद करावे. तसेच आपणांस देखील असे कुठले जनतेच्या विस्मृतीत गेलेले चेहरे आठवत असतील तर त्यांचा देखील उल्लेख करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुक्कड!!!
क्या याद दिलाई !!

गुरु, खोपडी आणि इतर!!
याच ग्रूपची इंतजार मालिका आठवते का?
आटगाव स्टेशनवर शूटींग झालं होतं.

नूक्कड!!! कोण विसरेल. Happy

जून्या मालिकापण बहारदार असायच्या. हल्लीच्यांना दाराबाहेर हाकलावेसे वाटते. Proud

फर्मान नावाची एक जुनी शेरिल होती, कंवलजित (अनुराधा पटेल चा नवरा) हिरो असलेली,त्याची नायिका "दिपीका देश्पांडे" होती, ती आता कुठे असते?त्यात बिघड्लेल्या मुलाची भुमिका राजा बुंदेला ने केली होती.

हसरतें आणि खानदान ह्या सेरिअल्स आठवतात का? त्यातले कलाकार कुठे आहेत?
शेफाली छाया आणि हर्ष छाया हे नवरा- बायको असतांना एका जुन्या सेरिअल मधे एकत्र होते, तिचे नाव काय?

शेफाली छाया आणी हर्ष छाया हयांचा घटस्फोट झाला आहे. शेफालीने विपुल शहाशी लग्न केले आणी हर्ष छायाने सुनीता सेनगुप्ताशी लग्न केले.

आत्ताच सुनिता सेनगुप्ता चे फोटो बघितले .
ती वरुण बडोलाच्या "अस्तित्व एक प्रेमकहाणी" मध्ये त्याची बहिण होती अस वाटतय Happy
हसरते मध्ये शेफाली छाया आणी हर्ष छाया नवरा बायको होते

@ नेत्रा

दीपिका देशपांडे एपिक वाहिनीवरील सियासत या कार्यक्रमात रकिया बेगमचे पात्र साकारत आहेत.

http://www.epicchannel.com/shows/41#tab

याच वाहिनीवरील कही सुनी या कार्यक्रमात मूळ धाग्यात १३ व्या क्रमांकावर उल्लेख असलेली सारा खान ही अभिनेत्री निवेदन करत असते.

http://www.epicchannel.com/shows/47#tab

धनव्याद @चेतन. अजुन एक सिरीयल .."ऐसा भी होता है" मस्तच होती. तिचे निवेदन करणारी मुलगी ही खुप छान होती, नाव माहितेये का कुणाला?
हसरते मधे "सिमा कपुर" नायिका होती, हर्ष आणि शेफाली पाहिल्याचे आठवत नाही.
तसेच नवनीत निशान जी नव्या "फॅमिली ड्रामा" मधे आहे, तिची introducing serial कोणती?

@ नेत्रा

<< हसरते मधे "सिमा कपुर" नायिका होती, हर्ष आणि शेफाली पाहिल्याचे आठवत नाही. >>
बरोबर आहे त्यात मृणाल देव कुलकर्णी नायकाची (हर्ष छाया) पत्नी तर सीमा कपुर प्रेयसी असते. त्यात शेफाली नाहीये. शेफाली आणि हर्ष छाया हे दोघे एका वायुसेनेवर आधारित मालिकेत एकत्र होते. त्यात पल्लवी जोशी देखील होती आणि मैने प्यार किया चित्रपटातली खलनायिका परवीन दस्तूर देखील होती. ह्या मालिकेचे नाव होते आरोहण.

<< तसेच नवनीत निशान जी नव्या "फॅमिली ड्रामा" मधे आहे, तिची introducing serial कोणती? >>
नवनीत निशान तारा मालिकेत प्रथम झळकली. तेव्हा उपग्रह वाहिन्या नुकत्याच दिसायला सुरुवात झाली होती. प्रामुख्याने मनोरंजनात्मक कार्यक्रम हे स्टार व झी टीवी यांवरच होते. तारा झी टीवीवर दिसायची. आम्ही म्हणायचो झी टीवी वर स्टार आला.

<< अजुन एक सिरीयल .."ऐसा भी होता है" मस्तच होती. तिचे निवेदन करणारी मुलगी ही खुप छान होती, नाव माहितेये का कुणाला? >>

ऐसा भी होता है ला सिरीयल (मालिका) म्हणता येणार नाही. तो सुरभी सारखा एक माहितीपर कार्यक्रम होता किंवा आजच्या भाषेत टॉक शो म्हणता येईल. त्यातली निवेदिका चुणचुणीत (स्मार्ट) होती पण आता तीन दशकांनंतर तिचे नाव आठवत नाही. त्यात एकदा दाखविले होते की कितीही मोठा कागद आणला तरी त्याच्या आठ घड्या (दरवेळी क्षेत्रफळ अर्धे व्हायला हवे अशा प्रकारे) घालता येत नाहीत. मग आम्ही बरेच दिवस मोठमोठे कागद (वर्तमानपत्राचे वगैरे) घेऊन असा प्रयोग करीत असू. सहापेक्षा जास्त वेळा घडी घालता येत नसे, पण या सरावामुळे हा कार्यक्रम नेमका लक्षात राहिला.

हसरतेमध्ये नंतर शेफाली होती...सीमा कपूरला तिने शेवटचे काही भाग रिप्लेस केलं होतं. दळवींच्या मूळ कथेवर होती ती मालिका.

@ वेदिका२१
दळवींची मूळ कथा म्हणजे अधांतरी मालिका मराठीतली. तिचा उल्लेख धाग्यात आहे. त्यातली वैशाली दांडेकर देखील सध्या मिसिंग आहेच की.

बरोबर चेतन!
दळवींची कादंबरी. तिचं नाव अधांतरी.
या कादंबरीवर मराठी मालिका -अधांतरी आणि हिंदी हसरते निघाली.
त्याच स्टोरीवर दळवींनीच सावित्री हे नाटक लिहिलं जे बाईंनी(विजया मेहतांनी) दिग्दर्शित केलं होतं.

कुरुक्षेत्र मालिकेतील विजय (तो एका यश नावाच्या चित्रपटात होता ज्या सुबह सुबह जब खिडकी खोले बाजूवाली लडकी) असे गाणे होते. हाही सापडत नाही.

तरूण धनराज गीर नावाचा अभिनेता (तृष्णा सोडून अजुन ) कुठल्या सिरियल मधे होता का ?
केवढी जुनी आठवण काढलीस. हा चेहरा किंवा हि सिरीयल पण आठवत नाही. लहान असताना मोठ्या बहिणी ह्याच्या नावाने का उसासे सोडायच्या हे कळायचं नाही हे फक्त आठवले

मालविका तिवारी आणि सुदेश बेरीची कशिश मालिका, मस्त होती. मालविका एक ठोकळा असुन पण दिसायची मस्त आणि सुदेश तरूण आणि डॅशिंग वाटायचा.

मालविका तिवारी चमत्कार चित्रपटात उर्मिलाची आई दाखविली आहे. ती घशातून काय चमत्कारिक पद्धतीने आवाज काढायची, राणी मुखर्जीच्याच वर्गवारीत तिचा आवाज मोडतो.

तृष्णाचा 'तरुण धनराजगीर' खूप आवडायचा मला तेव्हा. नंतर कुठे बघितला नाही.

स्पार्टा, इंतजारचं गाणं फेमस होतं

इंतजार इंतजार,
भुकेको रोटीका,
बेकारको रोजीका,
लुटेरेको मौकेका,
इंतजार है.

अजून आहे पुढे पण एवढंच आठवतंय.

Pages