आपण यांना पाहिलंत का?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 11 October, 2014 - 02:15

तीन दशकांहून अधिक काळ मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटके पाहत आहे. अनेकदा असे होते की एखादा चेहरा आवडतो, पण पुन्हा कुठे फारसा दिसतच नाही. माध्यमांतूनही त्या चेहर्‍याची चर्चा होत नाही. जसे काही हा चेहरा सर्वांच्या विस्मृतीतच गेला आहे. नेमका हा चेहरा मला बर्‍यापैकी आठवत असतो, पण इतर अनेकांना त्याचा परिचयच नसतो.

अशाच काही (इतरांच्या) विस्मृतीत गेलेल्या पण मला आवडत असलेल्या या चेहर्‍यांबद्दल.

 1. अभिनव चतुर्वेदी:- हमलोग मालिकेतील नन्हे हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा बुनियाद या मालिकेत आणि रिश्ते मालिकेच्या एका भागात पल्लवी जोशीसोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
 2. डॉ. पलाश सेनः- फिलहाल चित्रपटात सुश्मिता सेन चा नायक, विद्या बालन सोबत एका विडीओ अल्बम मध्ये नायक व गायक देखील. पुन्हा फारसा दिसला नाहीच.
 3. भानू उदय- स्पेशल स्क्वाड या स्टार वाहिनीवरील मालिकेचा नायक. बराच काळ दूर राहून आता पुन्हा सोनी पल वाहिनीवर डॉक्टरच्या भुमिकेत दिसतोय.
 4. लवलीन मिश्रा:- हमलोग मालिकेतील छुटकी हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा स्टार वाहिनीवरील श्श्श कोई है च्या एका भागात इरफान खान सोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
 5. काजल किरणः- हम किसीसे कम नही चित्रपटाची नायिका. पुन्हा मांग भरो सजना या चित्रपटात जितेन्द्रसोबत लहानशा भूमिकेत दिसली होती. विक्रम और वेताल च्या दोन भागांमध्येही तिने दर्शन दिले. तिने बहुतेक सर्व बी ग्रेड चित्रपटांतूनच काम केले. तिचे कराटे, सबूत, भागो भूत आया, अंदर बाहर, हमसे बढकर कौन व सात बिजलीयां हे चित्रपट माझ्या संग्रहात आहेत.
 6. वैशाली दांडेकरः- अधांतरी मालिकेची नायिका आणि हमाल दे धमाल चित्रपटात नायिकेची बहीण. पुन्हा दर्शन नाही.
 7. शीतल क्षीरसागरः- रात्र आरंभ चित्रपटातील डॉक्टर. पुन्हा कधीच कुठल्याच चित्रपटात, मालिकेत दिसली नाही. काल अचानक महाराष्ट्र टाइम्स च्या पुणे टाईम्स पुरवणीत दिसली. http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/44755907.cms?prtpa... सत्ताधीश-किस्सा खुर्चीचा, गारंबीचा बापू, इत्यादी नाटकांतून काम करत असते, अर्थात मी अजून पाहिली नाहीत. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आगामी चित्रपटातूनही तिचे दर्शन होईल.
 8. नंदिनी जोग:- काही दूरचित्रवाणी मालिका तसेच पंढरीची वारी, आघात, थांब थांब जाऊ नकोस लांब, कळत नकळत आणि आईशप्पत अशा काही चित्रपटांमधून दिसलेली ही अभिनेत्री आता गायबच झाली आहे.
 9. वन्या जोशी:- हिमालय दर्शन, मैला आंचल, मंझिले, अशा दूरदर्शन मालिका आणि सरदार व संशोधन या चित्रपटांतून दिसलेली ही अभिनेत्री आता कास्टिंग डायरेक्टर बनली आहे.
 10. वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.
 11. सोनाली जोशी:- एक्स्क्यूज मी चित्रपटातून आणि एका हिन्दी मालिकेतून श्रेयस तळपदेसोबत दिसलेली अभिनेत्री.
 12. फातिमा शेखः- देव आनंद यांच्या सौ करोड या चित्रपटाची नायिका
 13. सारा खान:- ढुंढ लेंगी मंझिले हमें ही दूरचित्रवाणी मालिका आणि पेबॅक हा चित्रपट यात मुख्य भूमिका केल्यावर ही मध्यंतरी टोटल सियप्पा चित्रपटात नायिकेची बहीण म्हणून दिसली होती.
 14. गायत्री जोशी:- स्वदेस चित्रपटाची नायिका आणि मॉडेल. आयएमडीबीनुसार वाँटेड देखील तिच्या नावावर दिसतोय, मला तरी त्यात दिसली नाही. इतरत्रही फारसे दर्शन नाहीच.
 15. बरखा मदन:- काही दूरदर्शन मालिका, खिलाडीयोंका खिलाडी चित्रपटात सहनायिका, भूत चित्रपटातील भूत आणि सोच लो चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका केल्यावर आता संन्यास घेऊन बौद्ध भिक्खू झाली आहे.
 16. अपर्णा टिळकः- फुटपाथ चित्रपटा इम्रान हाश्मीची नायिका, जीत या स्टार वाहिनीवरील अंकूर नय्यर ची नायिका, लेफ्ट राईट लेफ्ट व कही किसी रोज या मालिकांमधील काही भागांत लहानशी भूमिका तसेच जुन्या सब टीवीवरील एका विनोदी मालिकेत कंवलजीत सिंहच्या मुलीची भूमिका करून आता गायब झाली आहे.
 17. पल्लवी कुलकर्णी:- क्या हादसा क्या हकीगत, वैदेही आणि कहता है दिल या मालिका तसेच बॉबी देओलच्या क्रांती चित्रपटात त्याची बहीणीची भूमिका करून सध्या गायब. https://www.youtube.com/watch?v=Rp_dqBOC9t8&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
 18. वैदेही अमृते:- अभिनेत्री / मॉडेल. गृहस्थी मालिकेत किरणकुमार सोबत होती.
 19. अमृता रायचंदः- चित्रपट - बात बन गयी, मालिका - माही वे, रिअ‍ॅलिटी शो - ममी का मॅजिक, जाहिराती - व्हर्लपूल, पॉण्ड्स व इतर अनेक.
 20. आरती चांदूरकरः- खतरनाक चित्रपटात महेश कोठारेंची नायिका https://www.youtube.com/watch?v=B7fYRg2vdb4&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
 21. इंदु वर्मा:- सिद्धांत मालिकेतली आर्किटेक्ट अलका, नायक अ‍ॅडव्होकेट सिद्धांतची क्रमांक २ ची प्रेयसी.
 22. जमुना:- दो फंटूश, अंधेरा चित्रपटांतली नायिका, प्रसिद्ध नृत्यांगना

अज्ञात चेहरे:-

 1. हेच माझे माहेर चित्रपटातील मोहन गोखलेची नायिका.
 2. माझं घर माझा संसार चित्रपटातील अजिंक्य देवची नायिका
 3. देव आनंदच्या बुलेट चित्रपटात डॉ. श्रीराम लागूंच्या कन्येची भूमिका करणारी अभिनेत्री
 4. ताल चित्रपटातील ऐश्वर्या राय सोबत असलेली अभिनेत्री. मी चित्रपट पाहिला नसल्याने तिची भुमिका किती मोठी आहे ते माहित नाही पण इथे https://www.youtube.com/watch?v=p_OoCr4uRhM या गाण्यात ३ र्‍या सेकंदाला निळ्या कपड्यांत दिसतेय. अजून एका गाण्यात अक्षय खन्नाला काही तरी चिडवतेय असे पाहिले होते.
 5. पाप चित्रपटातील जॉन अब्राहम ची बहीण https://www.youtube.com/watch?v=ObRQx4PHeTg&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA

हे चेहरे मी उल्लेख केल्याव्यतिरिक्त आपण कुठे पाहिले असल्यास जरूर नमूद करावे. तसेच आपणांस देखील असे कुठले जनतेच्या विस्मृतीत गेलेले चेहरे आठवत असतील तर त्यांचा देखील उल्लेख करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला २ नायिका खुप आवडल्या होत्या, त्यांनी काम पण मस्त केले होते त्या हरवल्या आहेत.
एक होती लकीअली बरोबर 'सुर'ची नायिका.
दुसरी मिलिंद सोमण व तनुजा असलेल्ता सिनेमात होती जी सोमणला पटवायला तनुजाची मदत घेते.

श्रीदेवी ला पल्ल्लो म्हणताना बरीच चेष्टा झालेला विमलचा extraordinary देखणा मॉडेल गायब झाला.

अजुन एक हीरो आहे, जो उत्तम काम करतो. हरवला नाही पण फार कमीवेळ दिसतो, हल्लीतर पाहिल्याचे आठवतच नाही तो म्हणजे अक्षय खन्ना.

१. बूम बूम आणि पेज थ्री फिजा मधला विक्रम सलूजा.
२. नवनीत निशान
३. तारा मालिकेतली ग्रिशा कपूर
४. देख भाई देख मधली किर्ती दिवान

अलंकार जोशी, शोले मधे बालकलाकार होते .पल्लवी जोशी चा सख्खा भाउ.बिजनेसमन झाले आहेत अमेरिकेत.

दुसरी मिलिंद सोमण व तनुजा असलेल्ता सिनेमात होती जी सोमणला पटवायला तनुजाची मदत घेते. >>>>-तीच नाव मीरा वासुदेवन ती त्या चित्रपटानंतर गायब झाली .काही अ‍ॅड्स मधेही होती, साउथ चित्रपटात गेली बहुतेक .ती चा रुल्स-प्यार का फॉर्मुला पाहीलाय गाणी छान होती त्यातल तीचं स्वप्न वालं 'उलझनों को दे दीया है तुम्ने जो मेरा पता ' गाणं मस्त आहे .

अंकुश चित्रपटातले अनेक लोक, त्यातले दोन व्हिलन (राजा बुंदेला बरोबर अजुन एक जण होता)
आणि नानाच्या गँगमधे एकजण दाढीवाला मराठी कलाकार कोण होता,
हे लोक कुठे गेले ?

<< नानाच्या गँगमधे एकजण दाढीवाला मराठी कलाकार कोण होता >>

सुहास पळशीकर. अनेक मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये त्याला पाहिलंय. नाना पाटेकरची नक्कल करणं यालाच अभिनय समजतो, मग त्याला कुठवर सहन करणार?

अजून एक असाच प्रतिनाना होता - उदय म्हैसकर. त्याचं बहुदा आजारपणामुळे निधन झालंय - नक्की ठाऊक नाही.

सुहास पळशीकर आणि उदय म्हैसकर = प्रतिनाना >>> असहमत..दोघांची सह्याद्री वाहिनीवर अनेक सिरियल्स पाहिली आहेत.. कधी जाणवलं नाही असं.

अजून एक कलाकार आठवला... मदन जैन. सारांश मधला सोनी राजदान चा बॉयफ्रेन्ड.दूरदर्शन वर बर्‍याच सिरियल्स मधे होता. सध्या गायब..

सुहास पळशीकर आणि उदय म्हैसकर = प्रतिनाना >>> असहमत..दोघांची सह्याद्री वाहिनीवर अनेक सिरियल्स पाहिली आहेत.. कधी जाणवलं नाही असं.>>> +१

अलंकार जोशी शोलेमधे ??? कोणती व्यक्तिरेखा आहे ? Uhoh

यावरून आठवला मास्टर राजू, मोठा झाल्यावरचे दोन चित्रपट आठवतात,
वोह सात दिन आणि अजुन एक अनिलकपूरचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलेला त्यामधे हिरोईनचा भाऊ आहे तो.

अलंकार शोलेमधे ??? कोणती व्यक्तिरेखा आहे ? >>>> त्यात तो लहान मुलगा जो संजीव कुमार यांचा नातु आहे.,ज्याला गब्बर ठाकुरच्या घरच्या इतर लोकांसोबत मारुन टाकतो .परत कुठेही लागला तर नक्की बघा तसंही शोले लागल्यावर तो न बघणे म्हणजे पाप असते .. Happy .
मास्टर राजू, मोठा झाल्यावर>> मी एका पौराणिक सिरीयलीत नारद झालेले पण पाहीलय. परीचय मधे क्युट वाटलेला लहान मुलगा,पण मोठेपणी नाय आवडला.

अरे हां दीवार ला कशी विसरेन त्याच लहान मुलाच्या हातावर ते प्रसिध्द वाक्य गोंद्ले होते. त्या काळच्या बहुतेक हिरोंच्या लहाणपणीचे रोल त्याने केले होते ,जास्त अमिताभचे केले आहेत .

परवा कुठल्याशा ट्रॅवल चॅनलवर चंद्रचूडसिंगला अ‍ॅज अ होस्ट म्हणून पाहिलं. प्रचंड जाड झालाय, पण डोळे अजूनही तसेच झोपेतून उठ्ल्यावर एक्स्प्रेशनमध्ये आहेत.

तो खुबसुरत मधला राकेश रोशनचा भाऊ रणजित चौधरी, क्वीन लतिफाच्या Last Holiday या मुव्हीत दिसला होता.. आम्ही असले उडालो होतो त्याला(त्यांना) पाहून!

अरे खुबसुरत मधे एक मुस्लिम कपल आहे फॅमिली फ्रेन्ड, पिया बावरी गाण्यात पत्ते, कॅरम खेळतात.
त्यातला तो मित्र कोण आहे ?
तो गोलमाल मधे अमोल पालेकरचा मित्र आहे पान खाणारा,
तसेच नरम गरम मधे स्वरूप संपतचा भाऊ आहे पद्मा चव्हाण बरोबर नाटकात काम करणारा

हो त्या मित्राचे नाव कुठेही नाही विकीवर. पण तो चांगला अभिनय करायचा छोट्या भूमिकेत पण.
नरम गरम मधे रामलीलेच्या सीन मधे पण भारी आहे.
त्याचा कुठेतरी चांगला जम बसला असावा ही ईच्छा.

देवांग पटेल आठवतो का कोणाला?
त्याची गाणी आठवतात का गोविन्दा वर चित्रीत झालेली.

माझी अशी इच्छा आहे की या धाग्यावर मी लवकरच यो यो हनी सिंग बद्दल लिहावं.
तो का गायब होत नाही :रागः

धीरजकुमार अजुन हयात आहेत ना ? चेहरा चांगलाच लक्षात आहे पण त्यांचे सिनेमे, मालिका, इ. काहीच आठवत नाहीये आत्ता. Sad

Pages