आपण यांना पाहिलंत का?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 11 October, 2014 - 02:15

तीन दशकांहून अधिक काळ मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटके पाहत आहे. अनेकदा असे होते की एखादा चेहरा आवडतो, पण पुन्हा कुठे फारसा दिसतच नाही. माध्यमांतूनही त्या चेहर्‍याची चर्चा होत नाही. जसे काही हा चेहरा सर्वांच्या विस्मृतीतच गेला आहे. नेमका हा चेहरा मला बर्‍यापैकी आठवत असतो, पण इतर अनेकांना त्याचा परिचयच नसतो.

अशाच काही (इतरांच्या) विस्मृतीत गेलेल्या पण मला आवडत असलेल्या या चेहर्‍यांबद्दल.

 1. अभिनव चतुर्वेदी:- हमलोग मालिकेतील नन्हे हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा बुनियाद या मालिकेत आणि रिश्ते मालिकेच्या एका भागात पल्लवी जोशीसोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
 2. डॉ. पलाश सेनः- फिलहाल चित्रपटात सुश्मिता सेन चा नायक, विद्या बालन सोबत एका विडीओ अल्बम मध्ये नायक व गायक देखील. पुन्हा फारसा दिसला नाहीच.
 3. भानू उदय- स्पेशल स्क्वाड या स्टार वाहिनीवरील मालिकेचा नायक. बराच काळ दूर राहून आता पुन्हा सोनी पल वाहिनीवर डॉक्टरच्या भुमिकेत दिसतोय.
 4. लवलीन मिश्रा:- हमलोग मालिकेतील छुटकी हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा स्टार वाहिनीवरील श्श्श कोई है च्या एका भागात इरफान खान सोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
 5. काजल किरणः- हम किसीसे कम नही चित्रपटाची नायिका. पुन्हा मांग भरो सजना या चित्रपटात जितेन्द्रसोबत लहानशा भूमिकेत दिसली होती. विक्रम और वेताल च्या दोन भागांमध्येही तिने दर्शन दिले. तिने बहुतेक सर्व बी ग्रेड चित्रपटांतूनच काम केले. तिचे कराटे, सबूत, भागो भूत आया, अंदर बाहर, हमसे बढकर कौन व सात बिजलीयां हे चित्रपट माझ्या संग्रहात आहेत.
 6. वैशाली दांडेकरः- अधांतरी मालिकेची नायिका आणि हमाल दे धमाल चित्रपटात नायिकेची बहीण. पुन्हा दर्शन नाही.
 7. शीतल क्षीरसागरः- रात्र आरंभ चित्रपटातील डॉक्टर. पुन्हा कधीच कुठल्याच चित्रपटात, मालिकेत दिसली नाही. काल अचानक महाराष्ट्र टाइम्स च्या पुणे टाईम्स पुरवणीत दिसली. http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/44755907.cms?prtpa... सत्ताधीश-किस्सा खुर्चीचा, गारंबीचा बापू, इत्यादी नाटकांतून काम करत असते, अर्थात मी अजून पाहिली नाहीत. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आगामी चित्रपटातूनही तिचे दर्शन होईल.
 8. नंदिनी जोग:- काही दूरचित्रवाणी मालिका तसेच पंढरीची वारी, आघात, थांब थांब जाऊ नकोस लांब, कळत नकळत आणि आईशप्पत अशा काही चित्रपटांमधून दिसलेली ही अभिनेत्री आता गायबच झाली आहे.
 9. वन्या जोशी:- हिमालय दर्शन, मैला आंचल, मंझिले, अशा दूरदर्शन मालिका आणि सरदार व संशोधन या चित्रपटांतून दिसलेली ही अभिनेत्री आता कास्टिंग डायरेक्टर बनली आहे.
 10. वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.
 11. सोनाली जोशी:- एक्स्क्यूज मी चित्रपटातून आणि एका हिन्दी मालिकेतून श्रेयस तळपदेसोबत दिसलेली अभिनेत्री.
 12. फातिमा शेखः- देव आनंद यांच्या सौ करोड या चित्रपटाची नायिका
 13. सारा खान:- ढुंढ लेंगी मंझिले हमें ही दूरचित्रवाणी मालिका आणि पेबॅक हा चित्रपट यात मुख्य भूमिका केल्यावर ही मध्यंतरी टोटल सियप्पा चित्रपटात नायिकेची बहीण म्हणून दिसली होती.
 14. गायत्री जोशी:- स्वदेस चित्रपटाची नायिका आणि मॉडेल. आयएमडीबीनुसार वाँटेड देखील तिच्या नावावर दिसतोय, मला तरी त्यात दिसली नाही. इतरत्रही फारसे दर्शन नाहीच.
 15. बरखा मदन:- काही दूरदर्शन मालिका, खिलाडीयोंका खिलाडी चित्रपटात सहनायिका, भूत चित्रपटातील भूत आणि सोच लो चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका केल्यावर आता संन्यास घेऊन बौद्ध भिक्खू झाली आहे.
 16. अपर्णा टिळकः- फुटपाथ चित्रपटा इम्रान हाश्मीची नायिका, जीत या स्टार वाहिनीवरील अंकूर नय्यर ची नायिका, लेफ्ट राईट लेफ्ट व कही किसी रोज या मालिकांमधील काही भागांत लहानशी भूमिका तसेच जुन्या सब टीवीवरील एका विनोदी मालिकेत कंवलजीत सिंहच्या मुलीची भूमिका करून आता गायब झाली आहे.
 17. पल्लवी कुलकर्णी:- क्या हादसा क्या हकीगत, वैदेही आणि कहता है दिल या मालिका तसेच बॉबी देओलच्या क्रांती चित्रपटात त्याची बहीणीची भूमिका करून सध्या गायब. https://www.youtube.com/watch?v=Rp_dqBOC9t8&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
 18. वैदेही अमृते:- अभिनेत्री / मॉडेल. गृहस्थी मालिकेत किरणकुमार सोबत होती.
 19. अमृता रायचंदः- चित्रपट - बात बन गयी, मालिका - माही वे, रिअ‍ॅलिटी शो - ममी का मॅजिक, जाहिराती - व्हर्लपूल, पॉण्ड्स व इतर अनेक.
 20. आरती चांदूरकरः- खतरनाक चित्रपटात महेश कोठारेंची नायिका https://www.youtube.com/watch?v=B7fYRg2vdb4&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
 21. इंदु वर्मा:- सिद्धांत मालिकेतली आर्किटेक्ट अलका, नायक अ‍ॅडव्होकेट सिद्धांतची क्रमांक २ ची प्रेयसी.
 22. जमुना:- दो फंटूश, अंधेरा चित्रपटांतली नायिका, प्रसिद्ध नृत्यांगना

अज्ञात चेहरे:-

 1. हेच माझे माहेर चित्रपटातील मोहन गोखलेची नायिका.
 2. माझं घर माझा संसार चित्रपटातील अजिंक्य देवची नायिका
 3. देव आनंदच्या बुलेट चित्रपटात डॉ. श्रीराम लागूंच्या कन्येची भूमिका करणारी अभिनेत्री
 4. ताल चित्रपटातील ऐश्वर्या राय सोबत असलेली अभिनेत्री. मी चित्रपट पाहिला नसल्याने तिची भुमिका किती मोठी आहे ते माहित नाही पण इथे https://www.youtube.com/watch?v=p_OoCr4uRhM या गाण्यात ३ र्‍या सेकंदाला निळ्या कपड्यांत दिसतेय. अजून एका गाण्यात अक्षय खन्नाला काही तरी चिडवतेय असे पाहिले होते.
 5. पाप चित्रपटातील जॉन अब्राहम ची बहीण https://www.youtube.com/watch?v=ObRQx4PHeTg&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA

हे चेहरे मी उल्लेख केल्याव्यतिरिक्त आपण कुठे पाहिले असल्यास जरूर नमूद करावे. तसेच आपणांस देखील असे कुठले जनतेच्या विस्मृतीत गेलेले चेहरे आठवत असतील तर त्यांचा देखील उल्लेख करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हवा, हवा, , , ए खुषबु लूटा दे . . . . गाणारा पाकिस्तानी गायक ? नंतर त्याचा कुठलाही अल्बम आल्याचे ऐकिवात नाही. हवा, हवा अल्बमने बरीच हवा केली होती, काही वर्षांपुर्वी !

नझीमा ही अभिनेत्री कुणाला माहिती आहे का? खालील भूमिकांमधे तिला बघितलं आहे.
आये दिन बहार के मधे आशा पारेख ची मैत्रिण
जिद्दी मधे आशा पारेख ची बहीण
आरजू मधे राजेन्द्र कुमार ची बहीण.
त्यानंतर कुठल्याच सिनेमात ती फारशी दिसली नाही.

@ चौथा कोनाडा

तो पाकिस्तानी नसून बांग्लादेशी आहे. {अर्थात बांग्लादेशी असला तरी १९६२ चा जन्म म्हणजे तो मूळचा पाकिस्तानीच (कारण बांग्लादेश १९७१ ला निर्माण झाले) हे सूत्र लावणार असलात तर तो गायक पाकिस्तानीच असल्याचे म्हणावे लागेल. अर्थात या सूत्राचा वापर करून १९४७ पूर्वी जन्मलेले सारेच पाकिस्तानी नागरिक मूळचे भारतीयच म्हणावे लागतील.}

Hasan Jahangir

HAWA HAWA AYE HAWA KHUSHBU LUTA DE ( Singer, Hassan Jahangir )

Hawa Hawa e Hawa by Hasan Jahangir 2012

@ चीकू,

नझीमा ही शक्यतो बहिणीच्या भूमिकांमध्येच असायची, छान दिसायची. मेरे भैय्या चित्रपटात विजय अरोराची बहीण होती. भावाबहिणीच्या नात्यावरच हा चित्रपट असल्याने तिला मोठ्या लांबीची भूमिका होती. नंतर मात्र तिने देव मुखर्जी (जॉय मुखर्जीचा भाऊ, काजोलचा काका) सोबत एका चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका केली, पण तो तद्दन बीग्रेड चित्रपट होता. बाजारू पद्धतीने चित्रीत केलेल्या या चित्रपटानंतर तिची पत घसरली आणि बहीणीच्या भूमिका मिळणे देखील कठीण झाले.

@ रावी

एक जुनी सिनेअभिनेत्री (होम्ट्युटर) , अमोल पालेकर ,त्याचा रॉबिन नावाचा मुलगा, आजोबा ( ते बहुतेक बावरची मधे पण आजोबाच होते ) अशी एक सीरियल लागायची डीडी वर. त्याचं नाव आठवत नाहीये.

>>> ती होमट्युटर होती रामेश्वरी. 'दुल्हन वही जो पिया मन भाये' आणि 'सुनयना' फेम. आजोबा होते हरिंद्रनाथ चटोपाध्याय. सिरीयल कोणती ते आठवत नाहीये. पण त्यातला एक सीन आठवतोय. अमोल पालेकर तिला एक चॉकलेट देऊ करतो तर ती ते नाकारते आणि सांगते की "मै कॅलरी कॉन्शस हूं" . ही कन्सेप्ट मी पहिल्यांदा तिच्याकडून ऐकली.

सिरीयल पडोसी? आडोस पडोस?

@ सुनिधी

श्रीदेवी ला पल्ल्लो म्हणताना बरीच चेष्टा झालेला विमलचा extraordinary देखणा मॉडेल गायब झाला.

>>> त्याचं नाव दिपक मलहोत्रा. त्याने लुबना अ‍ॅडम या कोरीओग्राफरशी लग्न केलं होतं. आता त्यानं डिनो मारटेल्ली असं नाव घेतलं आहे. कारण काय ते माहित नाही. तो आता न्युयॉर्कमध्ये असतो आणि त्याचं एक रेस्टॉरंट आहे बहुतेक.

उडानची नायिका कविता चौधरी. नंतर सर्फ की कुठल्यातरी साबणाच्या जाहीरातीत दिसली होती. बाकी कुठे पाहिल्याचे आठवत नाही.

बी आर चोप्रांच्या महाभारतात मुकेश खन्नाच्या आधी 'रिषभ शुक्ला' नावाचा एक देखणा अभिनेता भीष्माची भूमिका करत होता त्याचाही पत्ता नाही नंतर... मुकेश खन्ना त्याची रीप्लेसमेंट होता की वय वाढलेला भीष्म हे कळले नाही

हो का? मग अन्नू मलिकचा भाऊ होता बहुतेक भीष्म पण कोणीतरी होता हे नक्की... कुणाला आठवतेय का मंडळी??

उडानची नायिका कविता चौधरी>>>> ती पोलीस असते त्यात .मी सिरीयल पाहीलेली आठ्वत नाही. कारण मी तेव्हा फारच लहान होते.पण आमच्याकडे ती सिरियल पहायचे सगळेजण .असे घरातले सांगतात.

जरा उलट विचारते आहे त्याबद्दल माफ करा, पण कोणी सांगु शकते का 'होणार सुन मी ह्या घरची' यामधील बेबी आत्याने कोणत्या दोन हिंदी चित्रपटात लहान रोल केले होते. सोपे आहे .तरीही सांगा. Happy
मला एकच माहीत आहे. (हिन्ट-- यात हिरो चोर असतो)

Happy हा दुसरा चित्रपट मी पण गुगलुन शोधला .माझी पाहण्याची कपॅसिटी नाही तो दुसरा चित्रपट ,कीतीही अतर्क्य असला तरी Proud

कोणी पल्लवी जोशी यांची "आरोहण" नेव्ही वाली सिरीयल पाहीली आहे का? त्यात तीचा हीरो असतो तो व दुसरा जो पल्लवीला नंतर आवडतो तो सिरीयल मधला त्याचा भाउ कोण ?

. मस्त होती ती सिरियल . Happy मला आवडली होती.पल्लवीने मस्त काम केले होते.

दस्तक सिनेमात सुश्मिता सेन होती ना?
जादूभरी ऑखोवाली सुनो तुम ऐसे मुझे देखा ना करो.. त्याचा हिरो मुकूल देव कुठे गेला ? Uhoh

अग जुना दस्तक . माई री मदन मोहन च गाण होत तो दस्तक . माझ्या मते त्याचे डायरेक्टर बी आर ईशाराशी तिने लग्न केल. पण पुढे काहीच माहित नाही. राधा सलुजा बद्दल अजिबातच माहिती नाही Happy

दक्षिणा

दस्तक नावाचे दोन चित्रपट आहेत. तुम्ही उल्लेखिलेला तो सुश्मिता सेनचा नव्वदीच्या दशकातला सुजा म्हणत आहेत तो जुना मागच्या पिढीतला.

डागा उर्फ शरद सक्सेना आजही अनेक पिक्चरमध्ये दर्शन देत असतो.
तेजा - तो चैनीत आहे. वरती रंभा त्याच्या टकलावर तेल थापत्ये आणि उर्वशी पंख्यान् वारा घालते म्हणतात (जय पुलं!) - अजित वाच्छानी २००३ मधे गेला.
कॅलेंडर - सतिश कौशिक दिग्दर्शनात गेला. मधून-मधून भयानक चित्रपट काढत असतो Happy

अरे अजित वाच्छानी (यांची पत्नी चारूशीला साबळे - शाहीरांची मुलगी) गेले ? Sad
माहिती नव्हते. मिस्टर इंडिया सोडल्यास त्यांनी काम केलेले काहीच आठवत नाहीये आत्ता.

तसेच चारूशीला साबळे पण अश्विनी ये ना या गाण्यात (चित्रपटात) भुमिकाच केलेली आहे की अजुनही काही चित्रपट, मालिका, इ. केले होते ?

Pages