आपण यांना पाहिलंत का?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 11 October, 2014 - 02:15

तीन दशकांहून अधिक काळ मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटके पाहत आहे. अनेकदा असे होते की एखादा चेहरा आवडतो, पण पुन्हा कुठे फारसा दिसतच नाही. माध्यमांतूनही त्या चेहर्‍याची चर्चा होत नाही. जसे काही हा चेहरा सर्वांच्या विस्मृतीतच गेला आहे. नेमका हा चेहरा मला बर्‍यापैकी आठवत असतो, पण इतर अनेकांना त्याचा परिचयच नसतो.

अशाच काही (इतरांच्या) विस्मृतीत गेलेल्या पण मला आवडत असलेल्या या चेहर्‍यांबद्दल.

 1. अभिनव चतुर्वेदी:- हमलोग मालिकेतील नन्हे हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा बुनियाद या मालिकेत आणि रिश्ते मालिकेच्या एका भागात पल्लवी जोशीसोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
 2. डॉ. पलाश सेनः- फिलहाल चित्रपटात सुश्मिता सेन चा नायक, विद्या बालन सोबत एका विडीओ अल्बम मध्ये नायक व गायक देखील. पुन्हा फारसा दिसला नाहीच.
 3. भानू उदय- स्पेशल स्क्वाड या स्टार वाहिनीवरील मालिकेचा नायक. बराच काळ दूर राहून आता पुन्हा सोनी पल वाहिनीवर डॉक्टरच्या भुमिकेत दिसतोय.
 4. लवलीन मिश्रा:- हमलोग मालिकेतील छुटकी हे पात्र. या मालिकेनंतर पुन्हा स्टार वाहिनीवरील श्श्श कोई है च्या एका भागात इरफान खान सोबत पाहिले होते, पुन्हा दर्शन नाहीच.
 5. काजल किरणः- हम किसीसे कम नही चित्रपटाची नायिका. पुन्हा मांग भरो सजना या चित्रपटात जितेन्द्रसोबत लहानशा भूमिकेत दिसली होती. विक्रम और वेताल च्या दोन भागांमध्येही तिने दर्शन दिले. तिने बहुतेक सर्व बी ग्रेड चित्रपटांतूनच काम केले. तिचे कराटे, सबूत, भागो भूत आया, अंदर बाहर, हमसे बढकर कौन व सात बिजलीयां हे चित्रपट माझ्या संग्रहात आहेत.
 6. वैशाली दांडेकरः- अधांतरी मालिकेची नायिका आणि हमाल दे धमाल चित्रपटात नायिकेची बहीण. पुन्हा दर्शन नाही.
 7. शीतल क्षीरसागरः- रात्र आरंभ चित्रपटातील डॉक्टर. पुन्हा कधीच कुठल्याच चित्रपटात, मालिकेत दिसली नाही. काल अचानक महाराष्ट्र टाइम्स च्या पुणे टाईम्स पुरवणीत दिसली. http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/44755907.cms?prtpa... सत्ताधीश-किस्सा खुर्चीचा, गारंबीचा बापू, इत्यादी नाटकांतून काम करत असते, अर्थात मी अजून पाहिली नाहीत. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी या आगामी चित्रपटातूनही तिचे दर्शन होईल.
 8. नंदिनी जोग:- काही दूरचित्रवाणी मालिका तसेच पंढरीची वारी, आघात, थांब थांब जाऊ नकोस लांब, कळत नकळत आणि आईशप्पत अशा काही चित्रपटांमधून दिसलेली ही अभिनेत्री आता गायबच झाली आहे.
 9. वन्या जोशी:- हिमालय दर्शन, मैला आंचल, मंझिले, अशा दूरदर्शन मालिका आणि सरदार व संशोधन या चित्रपटांतून दिसलेली ही अभिनेत्री आता कास्टिंग डायरेक्टर बनली आहे.
 10. वंदना पंडितः- अष्टविनायक चित्रपटातून सचिन पिळगांवकर सोबत दिसलेली ही अभिनेत्री पुन्हा कुठेच दिसली नाही.
 11. सोनाली जोशी:- एक्स्क्यूज मी चित्रपटातून आणि एका हिन्दी मालिकेतून श्रेयस तळपदेसोबत दिसलेली अभिनेत्री.
 12. फातिमा शेखः- देव आनंद यांच्या सौ करोड या चित्रपटाची नायिका
 13. सारा खान:- ढुंढ लेंगी मंझिले हमें ही दूरचित्रवाणी मालिका आणि पेबॅक हा चित्रपट यात मुख्य भूमिका केल्यावर ही मध्यंतरी टोटल सियप्पा चित्रपटात नायिकेची बहीण म्हणून दिसली होती.
 14. गायत्री जोशी:- स्वदेस चित्रपटाची नायिका आणि मॉडेल. आयएमडीबीनुसार वाँटेड देखील तिच्या नावावर दिसतोय, मला तरी त्यात दिसली नाही. इतरत्रही फारसे दर्शन नाहीच.
 15. बरखा मदन:- काही दूरदर्शन मालिका, खिलाडीयोंका खिलाडी चित्रपटात सहनायिका, भूत चित्रपटातील भूत आणि सोच लो चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका केल्यावर आता संन्यास घेऊन बौद्ध भिक्खू झाली आहे.
 16. अपर्णा टिळकः- फुटपाथ चित्रपटा इम्रान हाश्मीची नायिका, जीत या स्टार वाहिनीवरील अंकूर नय्यर ची नायिका, लेफ्ट राईट लेफ्ट व कही किसी रोज या मालिकांमधील काही भागांत लहानशी भूमिका तसेच जुन्या सब टीवीवरील एका विनोदी मालिकेत कंवलजीत सिंहच्या मुलीची भूमिका करून आता गायब झाली आहे.
 17. पल्लवी कुलकर्णी:- क्या हादसा क्या हकीगत, वैदेही आणि कहता है दिल या मालिका तसेच बॉबी देओलच्या क्रांती चित्रपटात त्याची बहीणीची भूमिका करून सध्या गायब. https://www.youtube.com/watch?v=Rp_dqBOC9t8&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
 18. वैदेही अमृते:- अभिनेत्री / मॉडेल. गृहस्थी मालिकेत किरणकुमार सोबत होती.
 19. अमृता रायचंदः- चित्रपट - बात बन गयी, मालिका - माही वे, रिअ‍ॅलिटी शो - ममी का मॅजिक, जाहिराती - व्हर्लपूल, पॉण्ड्स व इतर अनेक.
 20. आरती चांदूरकरः- खतरनाक चित्रपटात महेश कोठारेंची नायिका https://www.youtube.com/watch?v=B7fYRg2vdb4&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA
 21. इंदु वर्मा:- सिद्धांत मालिकेतली आर्किटेक्ट अलका, नायक अ‍ॅडव्होकेट सिद्धांतची क्रमांक २ ची प्रेयसी.
 22. जमुना:- दो फंटूश, अंधेरा चित्रपटांतली नायिका, प्रसिद्ध नृत्यांगना

अज्ञात चेहरे:-

 1. हेच माझे माहेर चित्रपटातील मोहन गोखलेची नायिका.
 2. माझं घर माझा संसार चित्रपटातील अजिंक्य देवची नायिका
 3. देव आनंदच्या बुलेट चित्रपटात डॉ. श्रीराम लागूंच्या कन्येची भूमिका करणारी अभिनेत्री
 4. ताल चित्रपटातील ऐश्वर्या राय सोबत असलेली अभिनेत्री. मी चित्रपट पाहिला नसल्याने तिची भुमिका किती मोठी आहे ते माहित नाही पण इथे https://www.youtube.com/watch?v=p_OoCr4uRhM या गाण्यात ३ र्‍या सेकंदाला निळ्या कपड्यांत दिसतेय. अजून एका गाण्यात अक्षय खन्नाला काही तरी चिडवतेय असे पाहिले होते.
 5. पाप चित्रपटातील जॉन अब्राहम ची बहीण https://www.youtube.com/watch?v=ObRQx4PHeTg&list=UUmYSGwSGkdFBeN1Kxm8wjWA

हे चेहरे मी उल्लेख केल्याव्यतिरिक्त आपण कुठे पाहिले असल्यास जरूर नमूद करावे. तसेच आपणांस देखील असे कुठले जनतेच्या विस्मृतीत गेलेले चेहरे आठवत असतील तर त्यांचा देखील उल्लेख करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहीरांची पत्नी???? अहो मुलगी म्हणा(टायपो झालेला दिसतोय) आणि देवदत्त साबळ्यांची बहीण! केदार शिंदेची मावशी.

'दिलवाले दुल्हनिया मधे....' सिमरनच्या लहान बहिणीची भुमिका केलेली मुलगी कोण ? > ती अनिल कपूर च्या २४ मधे होती.

'दिलवाले दुल्हनिया मधे....' सिमरनच्या लहान बहिणीची भुमिका केलेली मुलगी कोण???>>> ती २४ मधे होती. आदित्य सिंघनियाची प्रेस सेक्रेटरी.

जिगर मधे अजय देवगणच्या बहिणीचे काम कोणी केले होते? ती हिरॉईन करिश्मापेक्षा दिसायला खूपच चांगली होती Happy

याच्या अगदी एक उलट धागाही काढायला हवा!

आपण यांना का पाहिलंत?

१) राहुल अग्निहोत्री
२) टीना मुनीम
३) राहुल रॉय
४) सोनम
आणि असे अजुन बरेच!

Lol

@ चीकू,
सुकन्या कुलकर्णी >>>>>>

ओह सुकन्या कुलकर्णी होती का ती? तरीच चेहरा ओळखीचा वाटत होता Happy

७ ते ८ वर्षापुर्वी एक मालिका दुरदर्शन वर रवीवारी ८ का ८.३० ला लागायची त्यात एक चीनी का नेपाळी राजघराने दाखवले जायचे व त्याचे कीचन आणी त्यातली स्वयंपाक करणारे यावर मालीका आधारीत होती.त्यात स्वयंपाकाच्या विवीध पध्तती दाखवल्या जायच्या राजघराण्यामधले राजकारण त्यातली ती नायीका स्वयंपाकघराची हेड बनते शेवटी आणी नंतर ती डॉक्टर पण बनते मस्त मालीका होती...मला खुप आवडली होती मी आणि माझा भाऊ न चुकता पाहायचो... >>>> घर का चिराग Happy Jewel in palace Happy
मस्त होती ती मालिका. माझ्याही घरात आम्हा भाउबहिणींची आवडती Happy माझा भाऊ तिला खायची सिरीयल म्हणायचा Happy

अंदाज अपना अपना मधे "आनंद अकेला" या भुमिकेत कोण आहे ?
तसेच याच चित्रपटात हॉटेलचा एक मालक आहे, ज्याला आमिर/सलमान जोडीला पाहून रामभरत भेट आठवते. या कलाकाराचे नाव काय ?
आणि हे दोघे अन्य कोणत्या चित्रपट, मालिकांमधे होते ?

या धाग्याच्या पहिल्याच पानावर ममता कुलकर्णींबद्दल विचारणा झालीय. त्यांना केनयात ड्रग ट्रॅफिकिंगच्या संशयावरून अडकवल्याची केनयातील बातमी आहे.

नाही. मिस्टर इंडिया मधला कॅलेंडर वेगळा - ते सतिश कौशिक आहेत.

अंदाज अपना अपना मधला लॉज मधला मॅनेजर वेगळा. ते हरीश पटेल (सेवा लाल)

HP.jpg

जावेद खान अमरोही हे आहेत. ते अंदाज अपना अपना मधे होते पण लॉज वाले नव्हे. ते आमिर व सलमानला मदत करणारे असे दाखवलेत (Anand Akela).

JKA.jpg

अंदाज अपना अपना मधला लॉज मधला मॅनेजर म्हणजे हरिश पटेल.

गुंडा या अजरामर पिक्चरमधला इबू हटेला!

नाम है मेरा इबू हटेला
मां मेरी चुडेल की बेटी
बाप शैतान का चेला
खाएगा केला?

Biggrin

.

नीलींमा आझमी LAI BHAARI MADHE RITESH CHI AAI DAAKHVALI AAHE>>> इकडे थोडा bmw झाला आहे.. लई भारी मधली रितेश ची आई तन्वी आझमी !

Pages