शिवसेना भाजप नेमका सुरा कोणी खुपसला ?

Submitted by हस्तर on 13 November, 2020 - 18:28

माझे उत्तर आहे भाजप
१) २०१४ मध्ये राष्ट्रवादी कडून छुपा पाठिंबा घेतला ,नाकारू शकले असते
२) शिवसेने ला दुय्यम मंत्रीपदे दिली ,आठवले साहेबांना मात्र काही झाले तरी मंत्रिपद
३) २०१९ ,पहिल्यांदा राष्ट्रवादी बरोबर युती भाजप ने केलीये ,शिवसेना बोलली असेल कि पाठिंबा आहे काँग्रेस चा पण त्यांनी पहिल्यांदा युती केली नाही ,
४) शिवसेनेच्या कट्टर वैरी नारायण राणे यांना पक्षात घेतले

शिवसेनेने सामना मध्ये आदळ आपट केली वगैरे वगैरे छोटी गोष्ट आहे ,युती तोडली नाही व पहिले पाऊल उचलले नाही काँग्रेस बरोबर

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२०१४-१९ मधे युतीत असताना ऊद्धवने अनेकदा फडणवीसना धमक्या दिल्या होत्या त्या पण विसरता कामा नये.

कार्य समाप्त झाले की कर्ता स्वाहा होतो हे विधिलिखित आहे
राम मंदिर , 3 तलाक , 370 , बुरखा, अतिरेकी , पाकिस्तान सीमा वगैरे हिंदुत्वीय प्रश्न समाप्त झाले आहेत

आता युत्या या स्थिर सरकार , रस्ते , सोयी ह्यावरच होतील , त्याला कोणतेही पक्ष आले तरी जनतेने चालवून घ्यावे

ऑ ?
मला वाटलेलं सगळ्यांनीच सगळ्यांच्या पाठीत जाहीरपणे सुरा खुपसला, जनतेच्या पाठीत तर चार चार सुरे !

शेवटी ह्या सत्ताधारी लोकांमधील सत्ता मिळवण्यासाठी चाललेलं डावपेच आहेत.
तत्व वैगेरे काही नसते .
मेहबूबा मुफ्ती bjp ल सत्ता मिळवण्यासाठी महत्वाची वाटते .सेना मराठी पना सोडून हिंदुत्व च्या पाठी जाते.
आज ज्या नेत्यांसाठी दुसऱ्या पक्षातील लोकांबरोबर भांडण केलेली असतात तोच नेता त्या पक्षाला जावून मिळतो.
कार्यकर्ते हा माझा आणि हा तुझा करत असतो.

सेना आणि भाजप दोघांनी एकमेकांच्या पाठीत सुरे खुपसले होते , यात दुमत नाही .
पण सेनेने हिंदुत्व विरोधी पक्षां बरोबर युती करून आत्मघाती स्फोट केला , ज्याची झळ भाजपला हि बसली त्यामुळे भाजप विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे .
फरक इतकाच आहे असे आत्मघाती स्फोट करणाऱ्यांना मूठभर लोकांचे समर्थन असते ,म्हणून सेनेच्या च ठिकर्या उडण्याची शक्यता जास्तच वाटते .
अजुन पुढील चार वर्ष इतर दोन्ही ठग पक्षांना खुश ठेवण्यासाठी आणि सेक्युलर पण दाखवण्यासाठी हिंदुत्व बाबत सेना सतत बोटचेपे पणा घेणार ( सध्याची उदाहरणे --- पालघर , भोंगा बंद साठी भोसले नामक तरुणीची केस , शिवाजी महाराज आणि इतर देवतांचा अपमान करणाऱ्या स्टँड अप कॉमेडियन बद्दल सेना मुग गिळून गप्प बसली ) आणि पुढील विधानसभेला तोंडावर पडणार हे नक्की !

पालघर केस मध्ये दणगेखोरणा अटक झाली आहे

भोंगे सर्वत्र चालू आहेत , फडणवीसच्या मुलीला ऑब्जेशन नाही , बाकीच्या पोरी शाळा सोडून का लढत बसलेत कुणास ठाऊक
असो, करिशमाला न्याय मिळालेला आहे, तिथला भोंगा काढला आहे, तसे तिने फोटोही दिले आहेत , जे फडणीस सरकारला जमले नव्हते , ते आघाडीने करून दाखवले

https://www.opindia.com/2020/08/bmc-removes-illegal-loudspeaker-mosque-k...

शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता भाजपातच आहे, कोण तो ?

कॉम्पुटर बाबा भाजपा विरुद्ध बोलला म्हणून त्याचे बांधकाम एमपी सरकारने फोडून काढले

आणि वर , सरकारी कामात हस्तक्षेप केला म्हणून त्याच्यावरच केस केली

https://www.thequint.com/news/india/computer-baba-booked-for-manhandling...

अय्या! भाजप नेते पुन्हा पुन्हा मोदींना "आजचे शिवाजी महाराज" असं काय काय म्हणतात., तशी पुस्तकं छापतात. महाराजांचा यापेक्षा मोठा अपमान काय असेल?

पालघरमध्ये मेले त्यापेक्षा जास्त साधू आणि पुजारी "उत्तम" प्रदेशात मेले आणि मरताहेत.

तिकडे पुण्यभूमी आहे , मेले की लगेच मोक्ष मिळतो , रात्री अडीचलाही मिळतो , तत्काळ सेवा

योगी सरकार म्हणजे भीष्मांचार्य नव्हे , भीष्म मरण्याचा मुहूर्त बघत ताटकळत झोपले होते , तसे हिकडे नाही , तत्काळ मोक्ष मिळतो

छत्रपती चे नाव सर्वच घेतात त्यांच्या मार्गावर एक तरी चालला आहे का.
निवडणुकी पुरते ठीक आहे हो.
त्यांच्या गड किल्याची काय अवस्था आहे हे बघितल्यावर महाराजांचा अपमान करणारे सर्वच पक्षात आहेत.

महाराजांचे वारसच गड किल्ले त्यागुन खाली पठारावर महाल बांधून राहू लागले, 200 वर्षे झालीत त्याला

त्यात आजच्या नेत्यांचा काय दोष ?

! भाजप नेते पुन्हा पुन्हा मोदींना "आजचे शिवाजी महाराज" असं काय काय म्हणतात., तशी पुस्तकं छापतात. महाराजांचा यापेक्षा मोठा अपमान काय असेल?>>>>>>>>
त्या लेखकाने ती चूकच केली आहे !
सवंग लोकप्रियता मिळवण्याच्या हट्टापायी त्याने लेखण केले असावे !
महाराजांची तुलना कोणाशीही होवू शकत नाही .

' हिंदुत्व फक्त आमचेच ' अशी सतत बोंब करणाऱ्या ग्लोबल टाइम्स च्या संपादक चे फक्त हिंदू देवता विरुद्ध कॉमेडी करून पोट भरणाऱ्या कुणाल kamra बरोबर हसत खेळत फोटो प्रसिद्ध झाले आहेत !
शत्रू ला शत्रू न मानता जिवलग मित्र मानण्याची संपादकीय वृत्ती जनतेत चांगलीच लोकप्रिय होत आहे Happy

हवा जशी असेल तसे सर्वच पक्ष टोपी फिरविणार पुढच्या निवडणुकीत.
कोण कोणाबरोबर असेल.कोणत्या पक्षाला कोणता पक्ष आवडेल हे आताच कोणी ठरवू नये.

राष्ट्रवादी चा पाठिंबा घेवून फडणवीस झाले होते ना मुख्यमंत्री 4 तास तरी.
राष्ट्रवादी हिंदुत्व वादी पार्टी आहे का.
मग का घेतला होता राष्ट्रवादी चा पाठिंबा.

तुम्हाला किल्ल्याच्या नावाने रडत बसायला लावून मोदी सरकार नवीन संसद बांधणार

कमळ, मोराच्या थीमवर होणार नव्या संसद भवनाचे सुशोभिकरण; भारतीय टच देण्याचा प्रयत्न
सन २०२२ पर्यंत होणार तयार, ८६१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

फडणवीस चूक करायला तो काही त्यांचा निर्णय थोडी होता.
केंद्रीय स्तरावर निर्णय झाल्या शिवाय फडणवीस बोहल्यावर थोडीच चढले असतील.

वटवृक्ष, अहो मागे पडला फार !

फोटो महिनाभरापूर्वी आलेत, आज व्हीडो आलाय.

आणि दाखवा बघू कामराची हिंदू देव देवतां'विरुद्ध' कॉमेडी, नाय मी लय शोधली मला काय सापडे ना.

< फक्त हिंदू देवता विरुद्ध कॉमेडी करून पोट भरणाऱ्या कुणाल kamra बरोबर हसत खेळत फोटो प्रसिद्ध झाले आहेत !>

अय्या! फ्रान्समधल्या त्या कार्टून छापणार्‍या चार्ली हेब्दो आणि ते दाखवणार्‍या शिक्षकाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचं तुम्ही जोरदार समर्थन करता ना?

कुणाल कामराचे दाभोलकर - कलबुर्गी करणार की काय?

अय्या! फ्रान्समधल्या त्या कार्टून छापणार्‍या चार्ली हेब्दो आणि ते दाखवणार्‍या शिक्षकाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचं तुम्ही जोरदार समर्थन करता ना? >>>>>>
अच्छा ! म्हणजे त्या कार्टून मुळे झालेल्या हत्याकांडाचे तुम्ही समर्थन करताय तर !
नाही म्हणजे तुमचा सूर तर तसाच वाटतोय !
आणि हो मी कार्टून च समर्थन केले नाही , करणार ही नाही !

आँ? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचं तर कौतुक करत होता!

सूर असा तसा वाटत असेल तर कान तपासून घ्या.

फ्रान्स च्या अध्यक्षाचे कधीच कौतुक केलेले नव्हते ! पण लाळघोटे पना न ठेवता सक्त कारवाई करतोय म्हणून मॅक्रोन कौतुकास नकीच पात्र आहे
त्याच्या निर्णयाचे समर्थन करण्यात कसला आलाय कमीपणा ?
पण कल बूर्गी बाबत काळजी दाखवून , कार्टून छापणाऱ्या चार्ली हेबदो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन न करता तुम्ही मात्र उघडे पडले आहात !
त्यामुळे भरपूर काही तपासण्याची गरज तुम्हालाच आहे Happy

{{{ भाजप नेते पुन्हा पुन्हा मोदींना "आजचे शिवाजी महाराज" असं काय काय म्हणतात., तशी पुस्तकं छापतात. महाराजांचा यापेक्षा मोठा अपमान काय असेल? }}}

महाराष्ट्रात जाणता राजा कोणाला म्हंटलं जातं? नेमकं किती वर्षांपासून?

जाणता राजा म्हटले म्हणून काय झाले ?

ते तर विशेषण आहे

उदा आमचे मनमोहन काँग्रेस सरकार जाणता राजा होते

पवारांचा राजकीय प्रवास बघितल आहे.
त्यांचा प्रतेक गावात संपर्क होता गावातील लोकांना नावानिशी ओळखायचे,प्रतेक गावाची खडानखडा माहिती होती,समस्या माहीत होत्या.
जनसंपर्क होता .
म्हणून त्यांना जाणता राजा म्हणत असतील.

सेना आणि भाजप दोघांनी एकमेकांच्या पाठीत सुरे खुपसले होते , यात दुमत नाही .
पण सेनेने हिंदुत्व विरोधी पक्षां बरोबर युती करून आत्मघाती स्फोट केला , ज्याची झळ भाजपला हि बसली त्यामुळे भाजप विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे .

सुरुवात भाजपा ने केलि

कॉमी ,
स्टँड अप कॉमेडी करणाऱ्या मुन्ना वर फारुख आणि अदर मलिक यांनी हिंदू धर्माची विटंबना करण्याची तर हद्द गाठली होती , पण त्यांचा निषेध करायचे सोडून
या कामरा ने फक्त हिंदू धर्मावर टीका करण्याचा हा व्हिडिओ बनवून भर टाकली होती

यात त्याने ' मंदिर वही बनायेंगे ' या घोषणेवर विटंबना केली पण मस्जिद वर एक ही शब्द नाही !
" ४० % यूपी मध्ये बाथरूम नाही तर प्रसाद खाऊन कुठे सोडणार ? "असे वाक्य वापरले , म्हणजे संडास कुठे करणार ?
मग यूपी मधील मुस्लिम ईद ला बिर्याणी खाल्ल्या वर कुठे सोडतात ? हा प्रश्न त्याला नाही पडला .

मला नेहमी प्रश्न पडतो या kamra , स्वरा , जावेद यांना फक्त हिंदूंच्या उणीवा दिसतात का ? मुस्लिमांच्या का दिसत नाही ? मग यांचा सेकुलारिझम यांनी खुंटीला टांगून ठेवला आहे का ?
यांना समर्थन करणारे पण असेच ढोंगी असतात का ?

https://youtu.be/3Su_ydENa2w
या कामरा ने मुस्लिम धर्मावर टीका करण्याचा व्हिडिओ तुम्हाला सापडला तर अवश्य इथे टाका !

पर्फेक्ट मृदुला. पण त्या आधी बुडात दम लागतो जो या सेक्युलर्स मध्ये नाही. त्यांना वाटते की हिंदु हजारो वर्षापासुन झोडले जातायत, मग जाऊ द्या, आपण पण वाहत्या गंगेत हात धुऊन काढु.
तिकडे बघा. मी सचीन पगारेंच्या धाग्यावर पपुची लिंक काय दिली, सेक्यु विकु लग्गेच धावत आले. अजून गुलाम यायचे बाकी आहेत. हे दुसर्‍यांना भक्त म्हणतात पण स्वतः ला गुलाम म्हणतांना दातखीळ बसते यांची. विकुंना उत्तर नंतर. प्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

श्रीमद्भगद्गीता अध्याय २ श्लोक ११ :
अशोच्यानन्वशोचस्त्वम प्रज्ञावादांश्च भाषसे |

हे अर्जुना, तू ज्या विषयी शोक करू नये अशा गोष्टींविषयी शोक करतोस ( व ज्या विषयी करावा त्या विषयी करत नाहीस, ) व शहाणा असल्याचा आव आणतोस !

४०% यू पी मध्ये संडास नाहीत ही खरी शोक करण्याची गोष्ट आहे, ति सोडून कुणा एका टिनपाट कॉमेडियन ने केलेल्या विनोदावर आदळ आपट कशाला ?

हिंदू हजारो वर्षे झोडले जाताहेत म्हणे

तुमचे इतके चार वर्ण , ग्रंथ , विमान , ब्रह्माअस्त्र काय करत बसलेत ?

हिंदू हजारो वर्षे झोडले जाताहेत म्हणे

तुमचे इतके चार वर्ण , ग्रंथ , विमान , ब्रह्माअस्त्र काय करत बसलेत ??>>>>> इतके वर्ष झोपले होते ना, आता बघा काय होते ते. मला नॉस्ट्रेडेमस बाबाची भविष्यवाणी खरी वाटायला लागली आहे. Proud

मूळ मुद्यावरून लक्ष भरकटवणे हे सर्व राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते.
जनतेला त्यांनी अशी सवय लावली आहे की राजकारण हे असेच असते.
नाहीतर त्यांचे दुकान बंद होईल.

म्हणून राजकीय पक्षाचे नेते व समर्थक यांना कुठलेच आरोप प्रत्यारोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण सर्वच पक्षांनी मूळ मुद्यांना हरताळ फासून राजकारणाचे दुकान चालू ठेवले आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान , मर्द मावळे , आमच्या बापाची मुंबई , हिंदुत्वाचे ठेकेदार , महाराजांच्या नाव घेवून सतत पेटणारे आणि पेटवणारे असे नामांकित संपादक अशा टिन पाट विनोदी माणसाबरोबर गुजगोष्टी करतात की ज्याची टीम सतत हिंदूविरोधी आणि महाराज विरोधी टिंगल टवाळी करत होती !
हा मुख्य मुद्दा वेड्याना दाखविण्यासाठी ही आदळ आपट !

Proud

मग बाहेरचे लोक येऊन झोडपणार हे भविष्य सांगायला तुमच्यात 1000 वर्षांपूर्वी कोणी नव्हते का ?

तेंव्हाच खैबर खिंड बुजवून टाकली असती तर पावनखिंडीत देशपांडे धारातीर्थी पडले नसते !

तेंव्हाच खैबर खिंड बुजवून टाकली असती तर पावनखिंडीत देशपांडे धारातीर्थी पडले नसते !>>>> काये, इथे जसे काही घरचे भेदी आहेत ना तसे त्या काळात पण होते. महाराजांना त्यांनी सतत विरोध केला. अगदी मिर्झा राजे जयसिंग पासुन सुर्याजी पिसाळ वगैरे होतेच की आणी अजूनही आहेत. आपल्याच लोकांना विरोध करण्याची परंपरा अजून आहे.

काहीच्या काही !
कोण ते मुन्ना फारुख त्यांचा निषेध तुम्हाला वाटतो तुम्ही करा, ह्याने करावे आणि त्याने करावे अपेक्षा करू नका. कामरा काय स्टॅन्ड अप युनियनच्या अध्यक्षपदी आहे काय सगळ्या वाईट स्टॅन्ड अप वाल्यांचा निषेध करायला ?

मंदिर वही बनायेंगेची नक्कल हि हिंदू देवदेवतांच्या वर नाही, भाजप वर टीका आहे. तुमचा मूळ दावा होता हिंदू देवदेवतांच्या विरुद्ध जोक केलेत.

>>>मला नेहमी प्रश्न पडतो या kamra , स्वरा , जावेद यांना फक्त हिंदूंच्या उणीवा दिसतात का ?-कुठली हिंदुधर्मातली उणीव सांगितली आहे काम्राने ?

एका टॉयलेट जोकने इतका ऑफेन्ड होतो काय तुमचा रिलिजियस शेंतिमेन्ट ?

कामराने मुसलमान किंवा इतरत्र, हिंदू सकट कोणत्याही धर्मावर टीका केलेली नाहीच आहे. हेच सांगतोय.

बाकी, जावेद बद्दल बोलता आहेत तर, मी तर जावेदने सुद्धा स्पेसिफिकली हिंदू धर्मावर टीका केलेली पहिली नाहीये (इथे चूक असू शकते). आणि जावेद नास्तिक आहे, मुसलमान नाही. तो अधार्मिक पण आहे. मुस्लिम मूलतत्ववाद्यांना कायमच त्याच्यावर राग राहिला आहे.

https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/j...

आणि थोडे आडवे तिडवे प्रतिसाद दिले, थट्टेच्या रूपातच होते, तरी स्वारी. माझं म्हणणं हे आहे, कि तुम्ही केवळ सिलेक्टिव्हली पाहता आहात. कामराचं सोडून द्या, तो उथळ माणूस आहे पण जावेद ? तो अत्यंत व्होकली धार्मिकतेच्या विरोधी आहे. तुम्ही त्याच्याशी तुमचे राजकीय मत जुळत नाही म्हणून काहीही शिक्के मारत आहात.. पण तुम्हाला तुमच्या पोलिटिकल चष्म्यातून जे 2-3 मिनिटांचे व्हिडीओ आणि फोटो युट्युब, ट्विटर वर दिसतात ना, ते फेस व्हॅल्यू वर घेऊं नका. थोडा आंतरिक विचार पहा. लगेच इथे तिथे का नाय बोलला का नाय बोलला करून उपयोग काय ?

शांतता राखा.
दिवाळी चा दिवस आहे.

तर मुख्य मुद्दा बाजूलाच राहिला !
हा !
पुरोगामी डगला घातलेल्या संपादकांनी हता सरशी राम सीता वर अश्लील कॉमेंट्स करणाऱ्या फारुक ची ही गळाभेट घ्यावी !
नाही तरी सत्तेत भाग घेतल्यापासून या टिन पाट कॉमेडियन नी शिवाजी महाराज आणि देवतांचे केलेले अपमान यांना दिसलेच नव्हते !
म्हणजे फरक किती आहे बघा .
ती कंगना मुंबई बद्दल काय एक शब्द बोलली तर रोज मीडिया समोर येवून तिच्यावर चवताळून हल्ला करणारे पुरोगामी संपादक येथील जनतेने पाहिले , आणि शिवाजी महाराजांचा विनोद निर्मिती साठी वापर करून अपमान करणाऱ्या Joshua च्या वेळी साधा निषेध करायला मीडिया समोर न येणारे संपादक ही येथील जनतेने पाहिलेत .

पवारांना त्यांच्या जनसंपर्कातून लोक जाणता राजा म्हणत असतील तर तितकेच चाहते आज मोदींचेही असतील. एकतर दोन्ही चूक आहे किंवा दोन्ही अतिउत्साहीपणा म्हणून दुर्लक्ष करण्यासारखे

पण सध्या दुर्लक्ष करणे वगैरे प्रकार जुने झालेत. कोणीही सोम्या गोम्या काहीतरी बरळतो की एकदम राज्याचा, देशाचा, थोर व्यक्तींचा अपमान वगैरे होतो. पब्लिक जाम ओव्हरसेन्सिटिव्ह झाले आहे आजकाल.

>>>पब्लिक जाम ओव्हरसेन्सिटिव्ह झाले आहे आजकाल.
+123456789

वटवृक्ष.
हिंदू धर्मावर जे जोक केले जातात,टिंगल टवाळी केली जाते हे करणारे कोण आहेत.
हे डाव्या विचारसरणी ची काही अती शहाणे आहेत.
सर्व धर्मांना समान समजणारे उदारमतवादी लोक नाहीत.
पण ह्या डाव्यांना सर्वधर्म समभाव वाले आपण समजतो ते चूक आहे .

त्यांचे विचार च एवढे विचित्र असतात की ते स्वतः सोडून बाकी ते कोणालाच पटत नाही.
अती डावी विचार सरणी जगाने नाकारलेली आहे .
त्यांचं कोणीच ऐकून घेत नाही मग हिंदू धर्मावर टीका केली की तेवढीच थोडी फार प्रसिध्दी मिळते.
मला पण ही लोक बिलकुल आवडत नाहीत.
सतत रडत असतात.कधीच हे समाधानी नसतात.
धार्मिक मग ते कोणत्या ही धर्माचे असतील खालच्या पातळीवर जावून दुसऱ्या धर्मावर कधीच टीका करत नाहीत.

Pages