शिवसेना भाजप नेमका सुरा कोणी खुपसला ?

Submitted by हस्तर on 13 November, 2020 - 18:28

माझे उत्तर आहे भाजप
१) २०१४ मध्ये राष्ट्रवादी कडून छुपा पाठिंबा घेतला ,नाकारू शकले असते
२) शिवसेने ला दुय्यम मंत्रीपदे दिली ,आठवले साहेबांना मात्र काही झाले तरी मंत्रिपद
३) २०१९ ,पहिल्यांदा राष्ट्रवादी बरोबर युती भाजप ने केलीये ,शिवसेना बोलली असेल कि पाठिंबा आहे काँग्रेस चा पण त्यांनी पहिल्यांदा युती केली नाही ,
४) शिवसेनेच्या कट्टर वैरी नारायण राणे यांना पक्षात घेतले

शिवसेनेने सामना मध्ये आदळ आपट केली वगैरे वगैरे छोटी गोष्ट आहे ,युती तोडली नाही व पहिले पाऊल उचलले नाही काँग्रेस बरोबर

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy
Happy
महाराष्ट्रीय राजकारणातील अविस्मरणीय अनुभव !
२०१९ ला ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदा मतदान केले होते ते आयुष्यभर विसरणार नाहीत !

जे बिपीन रावांना समजले ते देवेंद्र रावांना समजले नाही. हत्तीच्या.>>>>> देवेंद्रांचा प्रशासकीय अनूभव जास्त आहे राजकारणापेक्षा. काका फार मुरलेले आहेत. आपल्या राजकीय गुरुपासुन पुतण्यापर्यंतचा प्रवास हा अमानवीय आहे. पण काय होते की काका टोमणे मारायला जातात आणी स्वतःच तोंडावर आपटतात ते ही त्यांच्या नातवाकडुन. मग सारवासारव, समजावणी असे करत बसावे लागते. ते काका नाही काक आहेत.

खुर्चीतुन पाय उतार झाल्यावर देवेंद्र मुंबईत घर शोधत होते. बाकी नटमोगरे स्वतःचे घर असतांनाही बंगले बळकावुन बसले अगदी पेपि पण नव्या घरात तुरुतुरु चालत गेले आणी वीज बिल पण माफ करुन घेतले.

>>>> काका फार मुरलेले आहेत. आपल्या राजकीय गुरुपासुन पुतण्यापर्यंतचा प्रवास हा अमानवीय आहे. पण काय होते की काका टोमणे मारायला जातात आणी स्वतःच तोंडावर आपटतात ते ही त्यांच्या नातवाकडुन. मग सारवासारव, समजावणी असे करत बसावे लागते. ते काका नाही काक आहेत.

हे सगळे व्यक्तिगत स्पेक्युलेशन आहे. राजकीय टिप्पणी म्हणून त्यात काही अर्थ नाही. बिपीन रावांनी पण तेच केलं, देवेंद्र साहेबांना व्हाईटवॉश करायला, म्हणून प्रतिक्रिया दिली. देवेंद्र राजकारणात किती का अडाणी असोत, ज्या व्यक्तीला व्होकली भ्रष्टाचारी म्हणले आहे त्याच्याशी युती करताच कशाला ? काकांच्या नावाने गळे काढण्याचा नैतिक अधिकार, of all people, देवेंद्रना तर आजिबात नाही.

>>>>खुर्चीतुन पाय उतार झाल्यावर देवेंद्र मुंबईत घर शोधत होते. बाकी नटमोगरे स्वतःचे घर असतांनाही बंगले बळकावुन बसले अगदी पेपि पण नव्या घरात तुरुतुरु चालत गेले आणी वीज बिल पण माफ करुन घेतले.
मग ? का करू नये तसं ? समजा उद्धव शिफ्ट झालेही नसते, तरीही घर मोकळे करणे ही फडनवीसांची ड्युटी होतीच. उगाच नटमोगरे म्हणून आणि 'उन्हातान्हात भटकणारे देवेंद्र' अशी प्रतिमा रंगवून काहीही होत नाही.

मग ? का करू नये तसं ? समजा उद्धव शिफ्ट झालेही नसते, तरीही घर मोकळे करणे ही फडनवीसांची ड्युटी होतीच.>>>>> कॉमी, दिल्लीपासुन गल्लीपर्यंत , कालपासुन आजपर्यंत किती खासदार / आमदारांनी स्वतःहुन बंगले रिकामे केलेत? अखिलेश यादवने काय केले हे माहीत असेलच. आज कोणीही पं. लालबहादूर शास्त्री नाही. देवेंद्र निदान पुष्कळ बरे.

ज्या व्यक्तीला व्होकली भ्रष्टाचारी म्हणले आहे त्याच्याशी युती करताच कशाला ? काकांच्या नावाने गळे काढण्याचा नैतिक अधिकार, of all people, देवेंद्रना तर आजिबात नाही.>>>>>> देवेंद्र कुठे म्हणालेत? मी म्हणतेय तसे. सामनाचा अग्रलेख वाचला होता ना अजीत पवारांवर. हो मला पण खटकले होते देवेंद्रांनी अजीत पवारांशी युती केली तेव्हा. पण आपलया सारख्या सामान्यांना विचारतो कोण?

भाजपाचे, किमानपक्षी महाराष्ट्रातील भाजपाचे नेते सरकारी मालमत्ता ढापणार नाहीत हे योग्य आहे. देवेंद्रांकडून हे अपेक्षितच आहे. पण उद्धव ठाकरेंनी बंगला वापरला यात कोणत्याही दृष्टीने काहीही गैर नाही.

भाजपने डिक्लेर केलेले की नितीश साहेबांना मुख्यमंत्री होणार न त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवली अन जिंकली.

भाजपने महाराष्ट्रात असे काहीच डिक्लेर केलेलं नव्हते. त्यामुळे शिवसेनाने युती तोडली असा सरळ अर्थ निघतोय.

Bjp मध्ये मलई खाणारे उच्च वर्गीय ,आणि श्रीमंत लोक आहेत .
आणि अडाणी ,गरीब,जुन्या काळात वावरणारे अत्यंत मागास विचाराचI लोक मतदार आहेत.

>>> यापेक्षा वेगळे चित्र नक्की कोणत्या पक्षात आहे, भारतात किंवा इव्हन जगात? Happy

मुख्य म्हणजे नितीश १५ वर्षे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या इमेजच्या नावावरच मते मागितली होती. याउलट महाराष्ट्रात फडणवीस हे गेल्या चाळीस वर्षांमधले पहिलेच आणि एकमेव मुख्यमंत्री आहेत ज्यांनी विधानसभेचा पूर्ण कार्यकाळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम केला आहे. त्यांची इमेजही क्लीनच राहिली आणि ते स्वतःही मी पुन्हा येईन म्हणत होते तेव्हा शिवसेनाही मौन बाळगून होती. तेव्हा भाजपने शिवसेनेच्या पाठीत सुरा खुपसला वगैरे म्हणण्यात अर्थ नाही आणि "आमच्या दणक्यामुळे भाजपने नितीशना मुख्यमंत्री होऊ दिले" ही वल्गना तद्दन मूर्खपणाची आहे. आधी एक तर स्वतः बिहारात निवडणूक लढवायची त्यातही कोणत्याही पक्षाला पाठिंबा यूती वगैरे प्रकार नाही, मग निवडणूकांचा निकाल लागल्यावर आधी तेजस्वीचे कौतूक, मग पुन्हा नितीशकुमारांचे त्यानंतर पुन्हा नितीशकुमारांचा पक्ष तिसर्‍या क्रमांकाचा असल्याने त्यांना मुख्यमंत्री पदावर बसण्याचा अधिकार नाही वगैरे कोलांट उड्या मारायच्या हे पाहिल्यावर अशा पक्षाच्या नुसत्या पाठीत सुरा खुपसून उपयोगाचे नाही तर त्याच सुर्‍याने या पक्षाची पार खांडोळी करावी असेच पुढच्या वेळी मतदारांच्या मनात आल्यास नवल ठरणार नाही.

बाकी फडणवीस, काका, नितीश कुमार हे राजकारणी आहेत. यातले कोणी काही वेगळे आहेत अशा समजात वावरणार्‍यांना ते कधीतरी कळेल.

काका टोटल भारी होते आधी. अजूनही मला बराच आदर आहे. पण गेल्या १०-१२ वर्षातील त्यांचे राजकारण चांगले नाही. ब्रिगेडचे राजकारण त्यांनी चालू दिले - ते त्यांना माहीत नव्हते किंवा रोखता आले नाही हे अशक्य आहे. तेवढे एक जर त्यांनी सोडले तर ते अजूनही मुमं झाले तरी पाठिंबा आहे. जेव्हा ते पंप्र च्या रेस मधे होते तेव्हा तर नक्कीच होता. त्यांच्याइतका विविध क्षेत्रातील जाणकार माणूस राज्यात नसेल. पण त्यांनाही हे माहीत असेल की राष्ट्रवादीची धाव ५०-६० जागांच्या पुढे जात नाही. त्यांचा प्रभाव ओसरल्यावर तर तितकीही जाइल का शंका आहे. तेव्हा भाजप, सेना कोणाच्यातरी बरोबर जाणेच श्रेयस्कर आहे. मूळ काँग्रेसला राज्यात रिकव्हर व्हायला बरीच वर्षे लागतील, ते ही त्यांचे पुन्हा स्वागत करायला बसलेत असे नाही. तर दुसर्‍या बाजूने इतर बहुजन समाज व दलित पक्षांना आता भाजपइतकाच राष्ट्रवादीचा तिटकारा आहे. मग भाजप पेक्षा सेना बरी असे त्यांना वाटले असावे. बाकी त्यांचे फॅन्स, अमुकचे धोतर सोडले, आणखी कोणाचे थोबाड फोडले, फेकून दिले वगैरे काहीका बकेनात.

भाजप पेक्षा सेना बरी असे त्यांना वाटले असावे.
Submitted by फारएण्ड on 17 November, 2020 - 23:41

सेनेला दाबता येईल, कह्यात ठेवता येईल असा विश्वास त्यांना सेनेच्या सध्याच्या नेतृत्वाने करुन दिला आहे. भाजप मात्र राष्ट्रवादीला आपल्या मागे फरफटवत नेऊ शकते आणि याच आत्मविश्वासातून तो भाजपने पहाटेच्या शपथविधीचा डाव खेळला होता. जर तो डाव यशस्वी झाला असता तर राष्ट्रवादी तीनेक वर्षांत महाराष्ट्रातला पीडीपी बनला असता. याची जाणीव झाल्यानेच काकांनी पुतण्याला यूटर्न घ्यायला लावला.

एके काळी पंतप्रधान पदाचे दावेदार असलेल्या काकांना बहुमताने फक्त राष्ट्रवादी चे राज्यात सरकार स्थापन आज पर्यंत करता आलेले नाही .
राहुल ची अवस्था ही तीच !
विरोधी पक्षाचे अधिकृत स्थान मिळविता येत नाही , आणि त्याच्या गुलामांना राहुल मध्ये पंतप्रधान मटेरियल दिसतंय !

मामीनी गाणं गायलं तरीही काय हरकत नाही पण स्वतःची कुवत तरी ओळखावी. त्यांचं लेटेस्ट गाणं ऐकलं . भसाडा या शब्द पण फिका पडेल इतका भयानक आवाज आहे. यापेक्षा मुंबईत जे ट्रेनमध्ये गाणी गातात त्यांचा आवाज सुरेल असतो. मामीनी दुसरं काहीतरी करियर करावं . गाना उनके बस की बात नहीं .

>>त्यातील जातीयवादी रोख तर एक मिनीट बाजूला ठेवा, कितीही उघड असला तरी. पण बायकोने काय करायचे ते तिचे स्वातंत्र्य आहे म्हणणारा नेता व पक्ष प्रतिगामी, आणि ही असली वरची वाक्य मिरवणारे पुरोगामी असे सध्याचे लॉजिक आहे.<<

फारेन्ड, ही आख्खी पोस्टच मस्त आहे.
इथे मायबोलीवरही दुसऱ्यांच्या बायकांनी काय करावे आणि काय नको असे फुकटचे सल्ले देणारे पुरोगामी आहेत Proud

>>मुख्य म्हणजे नितीश १५ वर्षे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या इमेजच्या नावावरच मते मागितली होती<<

मस्त पोस्ट फक्त सुरा वगैरे खुपसला वगैरेला काही अर्थ नाहीत.
शिवसेनेला बार्गेनिंगची संधी दिसली आणि त्यांना जोर चढला.... भाजपाने त्यांना हलक्यात घेतले कारण शिवसेना कॉंग्रेस वगैरेशी युती करेल असे भाजपाला वाटले नाही.... पण शिवसेना आणि राष्ट्रवादी-कॉंग्रेस एकत्र येतायतच म्हंटल्यावर भाजपाने अजित पवारांच्या भरवश्यावर एक डाव खेळून बघितला आणि तो खेळला नसता तरी चालला असता हे आता भाजपावाले मान्यही करतात... तो का खेळला हेही फडणवीसांनी सांगितलेले आहे.... फक्त आता तो खेळल्यामुळे ते मोरली शिवसेनेला नावे ठेवू शकत नाहीत.

भाजपाने आता मागे वळून न पाहता फक्त लोकांचे प्रश्न लावून धरले तरी पुढच्या विधानसभा निवडणूकीत त्यांना फेव्हरेबल कंडीशन मिळू शकते... आणि भाजपा ते करतेय असे सध्यातरी दिसतेय!

भाजपाने आता मागे वळून न पाहता फक्त लोकांचे प्रश्न लावून धरले तरी पुढच्या विधानसभा निवडणूकीत त्यांना फेव्हरेबल कंडीशन मिळू शकते... आणि भाजपा ते करतेय असे सध्यातरी दिसतेय!

लोकांचे प्रश्न कोणते आहेत त्यांची समस्या काय आहेत ह्याची माहिती फडणीसांनी शरद पवार ह्यांच्या कडून समजून घ्यावेत त्यांचा जन संपर्क आणि अभ्यास दांडगा आहे.
. अमित शाह आणि मोदी ह्यांचा सल्ला घेतलं तर
राम मंदिर
Arnob Goswami ची पाठराखण.
Kangna ची घराची समस्या.
मंदिर उघडणे.
लव जिहाद
हे सर्व जनतेचे खरे प्रश्न आहेत आणि ते प्रधम सोडवा असा सल्ला मिळेल.

पुणे वाले की फुगे वाले.
Bjp ni जनतेच्या प्रश्न साठी आंदोलन केल्याचे 1 तरी उदाहरण ध्या.
त्यांना मुळात जनतेच्या प्रश्नात इंटरेस्ट च नाही.

कोकणच्या वादळग्रस्तांना नुकसान भरपाई, कोविड सेंटर्सची पाहणी आणि सुधारणा सुचना, पूरग्रस्तांच्या भेटीगाठी, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि आता वाढीव लाईटबीलाचा प्रश्न.... प्रत्येक वेळी फडणवीस फील्डवर उतरलेले आहेत, योग्य सुचना, सल्ले दिलेले आहेत, सुधारणा सुचवलेल्या आहेत !

याउलट कंगना/अर्णव बद्दल भाजपाच्या प्रमुख नेत्यांना फार कमी बोलताना बघितलेय.

आता सोशल मिडियावर बाष्कळ बडबड करणाऱ्या वाचाळवीरांना तुम्ही भाजपाचे प्रतिनीधी समजत असाल तर तो तुमच्या बुद्धीचा दोष समजावा लागेल.... याउलट शिवसेनेचे प्रमुख नेते, प्रवक्ते कुठल्या मुद्द्यावर बोलत असतात हे एकदा बारकाईने बघा म्हणजे कुणाचा प्रेफरन्स काय ते तुम्हाला कळेल अशी अपेक्षा आहे!

आणि आता विरोधी पक्ष नेत्यांनीच केंद्रातून फंड वगैरे आणून द्यावेत ही अपेक्षा असेल तर तुम्ही फारच भाबडे आहात Proud

पण शिवसेना आणि राष्ट्रवादी-कॉंग्रेस एकत्र येतायतच म्हंटल्यावर भाजपाने अजित पवारांच्या भरवश्यावर एक डाव खेळून बघितला आणि तो खेळला नसता तरी चालला असता हे आता भाजपावाले मान्यही करतात. >>>>>>>>
काकांच्या राजकीय खेळी फक्त सुप्रिया आणि रोहित च्या भवितव्य साठी चाललेल्या आहेत असे वाटते !
पुढील निवडणुकीत पुन्हा जर पुन्हा हे तिन्ही पक्ष सरकार स्थापन करत असतील तर कांकाची मुख्य अट सुप्रिया ना मुख्यमंत्री पद हीच असण्याची शक्यता आहे .
कारण दादा आणि काका नी सध्या मिटवून घेतलय , पण नंतर दादा बंड पुकारून भाजप गोटात शामिल होण्याची शक्यता वाटते .
तसेच ' ए लाव रे तो व्हिडिओ ' वाले पेंटर साहेब पण भाजप ला चिकटण्याची शक्यता वाटते !
त्यामुळे खरा रणसंग्राम पुढील निवडणुकीत च आहे !

हे सर्व जनतेचे खरे प्रश्न आहेत आणि ते प्रधम सोडवा असा सल्ला मिळेल.>>>≥>
सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या सोडवल्या फक्त पाच समस्या सांगा बरं !

फार एणड १७-११ रोजी ही १३-१५ ची पोस्ट आवडली.
फक्त ब्रिगेड आणि मराठा राजकारण याविषयी किंचित भिन्न दृष्टिकोन.
मराठवाडा विद्यापीठ नाम बदल आणि मराठा आरक्षण या दोन मुद्यांवर पवार ठाम विरोधी होते. आणि तरीही मराठा मतदार त्यांच्या पाठीशी होते. विद्यापीठ नामांतरात त्यांना निष्ठावान मतदारांचा प्रचंड विरोध सहन करावा लागला आणि नाही म्हटले तरी त्यांचा मतदार पाया कमकुवत व्हायला सुरुवात झाली. भाजपने संधीचा फायदा घेत शिवाजी महाराजांच्या नावावर पवारांच्या पाठीराख्यांमध्ये शिरकाव केला. जन्मदिन, पुण्यतिथी, राज्यभिषेक दिन धूम धडाक्याने गावोगावी साजरे केले, मशाल मिरवणुका काढल्या, छोटे पुतळे उभारले. शिवाजी महाराज आणि फक्त हिंदुत्व यांची जोमदार आणि बेमालूम सांगड घातली. मराठा आरक्षणासाठी सुरुवातीला गुळमुळीत आणि नंतर पाठिंब्याची भूमिका घेतली. आरक्षणासाठी जे भव्य प्रचंड आणि शिस्तबद्ध शक्तिप्रदर्शन झाले ते भाजपाच्या पाठिंब्यामुळे झाले. सगळा बांधीव मराठा मतदार अलगद भाजपाच्या ओंजळीत आला. पवार आतापर्यंत जी गोष्ट देत नव्हते किंवा सबूरीचे धोरण ठेवत होते ती गोष्ट आता तात्काळ मंजूरच होऊन गेली. पवार नुसते पाहात राहिले. त्यांना आपल्या भूमिकेपासून सन्मानाने मागे हटणे शक्य नव्हते. मेटे खेडेकर यांच्याशीसुद्धा भाजपने संधान बांधले. एकूण भाजपने पवारांच्या मराठा गडाचे तट व्यवस्थित पोखरले. अशावेळी समतोल भूमिका सोडून टोकाची किंवा जहाल भूमिका घेणे गड राखण्यासाठी पवारांना भाग पडले असावे.

यशाला भरपूर बाप असतात
अपयश अनाथ असते >> काँग्रेसचं अपयश अनाथ नाही. त्याला आई आणि मुलगा आहेत.

फारएन्ड, पोस्ट मस्त आहे.

@हीरा, तुमची टाईमलाईन चुकतेय.
पवारांनी anti-brahmin राजकारण करायला सुरुवात केली तेव्हा भाजप महाराष्ट्रात सेनेचा छोटा भाऊ होता आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर राजकारण सुरू असायचे.
पवारांनी जे केलं ते भाजपला उत्तर म्हणून नाही. ही पवारांचीच ओरिजनल कल्पना होती. उलट त्यांच्या राजकारणाला उत्तर देण्याचा अयशस्वी प्रयत्न फडणविसनी केला.

पवारसाहेबांनी ब्राह्मणविरोधी (ब्रिगेडि) राजकारण केलं असा जो सूर लागलेला आहे तो कशाच्या बळावर? पवारसाहेबांनी दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामींबाबत मत प्रदर्शित केलं म्हणुन? इथे केवळ फूट सोल्जर्स हवेत गोळीबार करतायंत, आणि त्यांचे नेते मात्र पवारसाहेबांना नाईलाजाने का होइना, गुरुस्थानी मानुन मोकळे झालेले आहेत... Wink

काँग्रेसचं अपयश अनाथ नाही. त्याला आई आणि मुलगा आहेत. >>> Happy

हीरा - मराठा मोर्चाबद्दल म्हणत असाल तर ती गेल्या ३-४ वर्षातील बाब आहे. मी साधारण २००४ पासून म्हणतोय.

राज - हे एखाद दुसर्‍या उल्लेखाबद्दल नाही. गेल्या १५ वर्षांत दिसलेले राजकारण आहे. आणि "पवारांनी केले" असे मी म्हणत नाही- वरतीही म्हंटलेले नाही, पण चालू दिले हे नक्की. त्यांच्या पाठिंब्याशिवाय किंवा किमान मूकसंमती शिवाय त्यांचा पक्ष व ब्रिगेड हे करणे अशक्य आहे. तुमच्या भाषेत बोलायचे तर "अंडर हिज वॉच" Happy

Bjp , सेना सत्तेवर असताना मराठा आरक्षण हा विषय पेटवला गेला आणि मोठं मोठे मोर्चे निघाले .
पण हे कोणत्या राजकीय पक्षाच्या आशीर्वाद नी होत आहे हे गुलदस्त्याच ठेवले गेले .
नेते विना आणि राजकीय पक्षांच्या सहकार्य विना एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकत्र येणे केवळ अशक्य आहे.
आणि शिस्तबध्द मोर्चे निघणे हे त्या हून जास्त अशक्य आहे.
मराठा मोर्चा चे छुपे पाठी राखे हे पवार च असावेत असा अंदाज खूप लोकांचा आहे.
त्याच काळात अजुन पण खूप घडामोडी झाल्या त्याचा अर्थ कसा लावायचा हेच सहज समजणार नाही.
संभाजी भिडे
संभाजी ब्रिगेड
सोशल मीडिया वर हिंदू ची संस्कृती आणि देवता ह्यांची नालस्ती करणारा प्रचार पण त्याचे पोस्ट करते हे पाटील,कुलकर्णी,जाधव असे आडनावाचे.

सातवी ड.... ते बाकी सगळे असू दे!
तुम्हाला वरती वटवृक्ष या आयडीने एक प्रश्न विचारलाय.... त्याचे उत्तर द्या ना जरा!

>>तुमच्या भाषेत बोलायचे तर "अंडर हिज वॉच"<<
इतर फुटकळ घटना सोडता, तुमचा रोख भांडारकर संस्थेच्या विध्वंसा बाबतीत असेल तर त्याच्याशी पवारसाहेबांचं नांव जोडणं अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासीक आणि सामाजिक संस्कृतीची जाण, वारसा जपणारा, आस्था आणि कळकळ बाळगणारा नेता पवारसाहेबांनंतर पुढे झाला नाहि...

महाराष्ट्राच्या ऐतिहासीक आणि सामाजिक संस्कृतीची जाण, वारसा जपणारा, आस्था आणि कळकळ बाळगणारा नेता पवारसाहेबांनंतर पुढे झाला नाहि...>>>>

महाराष्ट्र अजून शिल्लक आहे हो, नेते यापुढेही तयार होतील...

सोशल मीडिया वर हिंदू ची संस्कृती आणि देवता ह्यांची नालस्ती करणारा प्रचार पण त्याचे पोस्ट करते हे पाटील,कुलकर्णी,जाधव असे आडनावाचे. >>>>>>
हेमंत , अचानक तुम्ही हवेत गोळीबार चालू कसं काय चालू करता ?
थांबा ! आणि डिटेल्स वाचा
या वरील उल्लेखलेल्या नावांनी पोस्ट आम्हाला तर कधीच आढळल्या नाही , पण मुल्ला खान शेख यांच्या नावाने खूप वेळा दिसल्या .

शिवाजी महाराज आणि देवतांचे बदनामीकारक फोटो टाकल्या मुळे काही प्रमाणात दंगली ही झाल्या , आय पी अड्रेस नुसार आरोपी पकडले गेले ते ही मुल्ला शेख च निघाले , त्या दंगली त हडपसर मध्ये एका मुस्लिम युवकाच्या हात्ये प्रकरणी धनंजय देसाई नामक कोणीतरी कार्यकर्ता बरेच दिवस जेल मध्ये होता .

खात्री करण्यासाठी गुगलून बघू शकता !

राज,
एकेकाळी मराठी ब्राह्मण समाजात पवार म्हणजे फार लाडकं प्रस्थ होतं. पवार पंतप्रधान होतील अशी होपफुल चर्चा असे. सोनिया बाईंविरुद्ध बंड करून वेगळा पक्ष स्थापला तेव्हा तर कौतुकाच्या लाटा आल्या होत्या- एकमेव ताठ कण्याचा नेता वगैरे.
नंतर पवारांचं 15 वर्ष राज्य असताना अँटी ब्राह्मण राजकारण, ब्रिगेड वगैरे जे सुरू झालं त्याच्याशी पवारांचा काही संबंध नाही असं तुम्ही म्हणत असाल तर ते निरागस आणि क्युट आहे. पण ब्राह्मण समाजात असं perception बनलंय खरं की ज्या पवारांनी पंतप्रधान व्हावं म्हणून आपण शुभेच्छा देत होतो , ज्यांना आपला नेता मानत होतो त्यांनी आपल्यालाच लक्ष्य करण्याचं राजकारण खेळलं.

>>पण ब्राह्मण समाजात असं perception बनलंय <<
विचारतो कोण ब्राम्हण समाजाला? त्यांना सगळेच आजपर्यंत गृहीत धरत आलेत.... ब्राम्हण नेत्यांचाही ब्राम्हण समाजाला काही एक उपयोग नाही आणि ब्राम्हण समाज आपल्या नेत्यांकडून तसल्या अपेक्षाही करत नाही.

पण या जातीयवादी इमेजचा शहरी, सुसंस्कृत आणि जातीपातीच्या पार पुढे निघून आलेल्या प्रगल्भ मतदारबहुल विभागात मात्र राष्ट्रवादीला तोटा नक्कीच होतो!

राज, पोस्ट्स आवडल्या.
शिवसेनेने हिंदुत्वाला घट्ट पकडल्यानंतर मराठा समाजात चलबिचल झाली आणि अनेकजण विशेषत : कोंकणी मराठ्यांवरचा समाजवादी आणि त्यांचे पुलोआ वाले काँग्रेसी वारस शरद पवार यांचा प्रभाव जाऊन ते हिंदुत्ववादी झाले आणि त्यांचा कल भाजपाच्या हिंदुत्वाकडे सुद्धा झुकला. हे अगदी हळू हळू पण प्रभावीपणे घडले. देशावर विद्यापीठ नामांतर आणि मराठा आरक्षण विरोध यामुळे पवारांच्या पाठीराख्यांत अस्वस्थता निर्माण झाली. त्यांचा करिश्मा कमी झाला. 2005पासून भाजपने अतिशय धूर्तपणे चाली खेळल्या. बहुसंख्याकांच्या जोरावरच सत्ता मिळू शकते हे लक्षात आल्यावर त्यांनी वारकरी पंथात कडवे हिंदुत्व आणले, खेडोपाडी कीर्तन सप्ते, पारायणे, भजन मंडळे यांची धामधूम माजवली. देवळांची उभारणी, जीर्णोद्धार ( घडीव दगड काढून टाकून तिथे टाईल्स बसवणे) यांची लाट उसळवली. दुष्काळग्रस्त गावातूनही समाराधना आणि पारायणासाठी पाचदहा लाखाची वर्गणी जमू लागली आणि या साऱ्या कष्टांचे फळ भाजपला मिळाले. बहुसंख्यांक जाती त्यांच्या वळचणीला आल्या. ह्या वर्गाला परत आणायचे तर तेव्हढीच जहाल कृत्ये करावी लागणार होती, जे पवारांचे धोरण नव्हते. पण तरीही हाताबाहेर गेलेल्या अनुयायांचा अनुनय थोड्या प्रमाणात करणे भाग पडले. भांडारकर प्रकरणात त्यांची चिथावणी होती हे मात्र मान्य नाहीं.

>>महाराष्ट्राच्या ऐतिहासीक आणि सामाजिक संस्कृतीची जाण, वारसा जपणारा, आस्था आणि कळकळ बाळगणारा नेता पवारसाहेबांनंतर पुढे झाला नाहि...>>>>
महाराष्ट्र अजून शिल्लक आहे हो, नेते यापुढेही तयार होतील...<<
तुमच्या नजरेत कोणि नेता (उभरता) आहे असं वाटतंय. त्याचं नांव सांगुन आम्हाला उपकृत करुन टाका...

>>महाराष्ट्राच्या ऐतिहासीक आणि सामाजिक संस्कृतीची जाण, वारसा जपणारा, आस्था आणि कळकळ बाळगणारा नेता<<

म्हणजे नक्की काय?

हीरा - तुमच्या पोस्टमधल्या घटनांचे टायमि़ग चुकले आहे. ब्रिगेड च्या बर्‍याचश्या काड्या २००४-०५ मधेच होत्या. तेव्हा तुम्ही लिहीलेले भाजपबद्दलचे वर्णन लागू होत नव्हते. भाजप तेव्हा नगण्य होता. मुळात या गोष्टींचा भाजपशी संबंध नव्हता. मराठा मतदार सेनेपासून राष्ट्रवादीकडे वळवण्याकरता हे केले गेले असे मी वाचले आहे. आणि ते पटण्यासारखे वाटते. भांडारकर, शिवधर्म, भटमुक्त गावे वगैरे प्रकार २००४ सालीच सुरू झाले. इथे जुन्या माबोवर सुद्धा बाफ आहेत तेव्हाचे. तोच फॉर्म्युला मागच्या वर्षी अनाजीपंत वगैरे वापरून मागच्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात वापरला गेला.

बाकी चिथावणी वगैरे मी म्हंटलेले नाही.

मुळात या गोष्टींचा भाजपशी संबंध नव्हता. मराठा मतदार सेनेपासून राष्ट्रवादीकडे वळवण्याकरता हे केले गेले असे मी वाचले आहे.

हीच शक्यता जास्त आहे.माझा पण तोच अंदाज आहे.
आणि विविध जातीचे मोर्चे निघाले .
धनगर,कुणबी,तेली अशा विविध जातीचे आरक्षण चे राजकारण सुरू झाले ते bjp ला शह देण्यासाठी च होता.
हिंदू धर्मात विभागणी करून bjp ची vote बँक तोडणे हा हेतू असावा.
हिंदुत्व वाच्या राजकारण ला जातीय राजकारण करून आरामात शह दिला जावू शकतो असा विश्वास बऱ्याच राजकीय पशा ना आहे.

तुमच्या नजरेत कोणि नेता (उभरता) आहे असं वाटतंय. त्याचं नांव सांगुन आम्हाला उपकृत करुन टाका...>>>>

समजा आज नसला म्हणजे यानंतर होणारच नाही?? कल किसने देखा है???

बाकी शरद पवारांना तुम्ही म्हणता ती जाण वगैरे भरपूर असेल पण तिचा उपयोग त्यांनी सार्वजनिक आयुष्यात लोकहितासाठी अजिबात केला नाही. कृषिमंत्री असताना शेतकरी आत्महत्या करत होते आणि हे साहेब क्रिकेटचे अध्यक्षपद आपल्याकडे राखण्यात मश्गुल होते. असो. ह्या बाफचा विषय शरद पवार हा नाही.

2 वर्षात 13 बँका बुडाल्या त्या वर लक्ष ध्या.
--

त्या बुडालेल्या १३ बँकाची नावे लिहा इथे.

सातवी ड.... ते बाकी सगळे असू दे!
परत एकदा सुचवतोय की तुम्हाला वरती वटवृक्ष या आयडीने एक प्रश्न विचारलाय.... त्याचे उत्तर द्या ना जरा!

अंध भक्त पुणेकर
वटवृक्ष हा आयडी तो पण अंध भक्त च आहे.
त्यांचा प्रश्न होता ठाकरे नी जनतेच्या हिताची कोणती 5 काम केली ते सांगा.

ठाकरे सतेवर आले आणि covid19 ची साथ सुरू झाली ती कठीण परिस्थिती ठाकरे नी अत्यंत योग्य हाताळली.
केंद्र सरकार चे सहकार्याचे धोरण नसताना.
मोदी सत्तेवर येवून एवढी वर्ष झाली तरी.
देशातील गरिबी
देशातील बेरोजगारी
बँक fraud
पाकिस्तान चे हल्ले.
भ्रष्ट प्रशासन.
ह्या सर्व गोष्टी ना आज सुद्धा अंध भक्त नेहरू,मनमोहन जी,इंदिराजी ह्या सर्व कर्तव्य दक्ष पंतप्रधान असणाऱ्या लोकांना दोष देतात.
स्वतः काही तरी जबाबदारी घ्या .
किती दिवस काँग्रेस च्या जीवावर जगणार.

मोदी ना अर्थ शास्त्र मधले काही समजत नाही असे त्या क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात.
देशाचा आता पर्यंतचा सर्वात नालायक पंतप्रधान अशी प्रतिमा आहे त्यांची.
आणि त्या मुळे देशाची अर्थ व्यवस्था डब्यात गेली आहे.
बँका संकटात सापडल्या आहेत .
पण अंध भक्तांना देशा समोर नक्की समस्या काय आहेत ह्याची जाणीव च नाही.
हे आपले राम मंदिर,लव्ह जिहाद,आणि कोणत्या देशाने ह्यांना प्रचंड किमतीत विकली ती विमान ह्या भोवतीच फिरत आहेत.

अहो परत तेच!
लोकांना प्रश्न विचारताना स्वता पण तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे किमान सौजन्य बाळगा!

Pages