शिवसेना भाजप नेमका सुरा कोणी खुपसला ?

Submitted by हस्तर on 13 November, 2020 - 18:28

माझे उत्तर आहे भाजप
१) २०१४ मध्ये राष्ट्रवादी कडून छुपा पाठिंबा घेतला ,नाकारू शकले असते
२) शिवसेने ला दुय्यम मंत्रीपदे दिली ,आठवले साहेबांना मात्र काही झाले तरी मंत्रिपद
३) २०१९ ,पहिल्यांदा राष्ट्रवादी बरोबर युती भाजप ने केलीये ,शिवसेना बोलली असेल कि पाठिंबा आहे काँग्रेस चा पण त्यांनी पहिल्यांदा युती केली नाही ,
४) शिवसेनेच्या कट्टर वैरी नारायण राणे यांना पक्षात घेतले

शिवसेनेने सामना मध्ये आदळ आपट केली वगैरे वगैरे छोटी गोष्ट आहे ,युती तोडली नाही व पहिले पाऊल उचलले नाही काँग्रेस बरोबर

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

देशाचा आता पर्यंतचा सर्वात नालायक पंतप्रधान अशी प्रतिमा आहे त्यांची. >>>>>अंध भक्त पुणेकर
वटवृक्ष हा आयडी तो पण अंध भक्त च आहे >>>>>>>
बरं झाले एक तरी डोळस गुलाम दिसला !
येथील आय डी चा अपमान होवू द्या हो !
पण पंतप्रधान बद्दल तरी किमान नीट भाषा वापरा .
आणि आम्ही मनमोहन यांचा आदराने " राष्ट्रीय मुका प्राणी " असा केला तरी लोकांना खटकते

https://www.loksatta.com/mumbai-news/congress-to-fight-bmc-elections-alo...

सन २०२२ मध्ये होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवेल, यासाठी शिवसेनेशी युतीची गरज नाही, असं मुंबई महापालिकेतील विरोधीपक्ष नेते रवि राजा यांनी म्हटलं आहे. पण सध्या काँग्रेस आणि शिवसेना राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा भाग आहेत.

यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवेल असे संकेत दिले होते. मात्र, पालिकेतील काँग्रेसच्या विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी आपल्याच प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात होणाऱ्या निवडणूका महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र येऊन लढवतात का? हे पहावं लागणार आहे.

https://www.loksatta.com/mumbai-news/following-the-congress-energy-depar...

काँग्रेसकडील खात्यांची अर्थकोंडी
ऊर्जा खात्यापाठोपाठ आदिवासी विकास विभागाच्या मदतयोजनेस खीळ

सुरे मारी जोरात चालू आघाडीतील घटकपक्षांमध्ये आपापसात..

काँग्रेसकडील खात्यांची अर्थकोंडी
ऊर्जा खात्यापाठोपाठ आदिवासी विकास विभागाच्या मदतयोजनेस खीळ >>>>>>>
काँग्रेस च्या मंत्र्याने सवयी प्रमाणे योजना च खाऊ गाधड्या आणल्या असतील !
मग उठा ने आम्ही नाही त्यातले दाखवण्यासाठी खीळ लावली असेल !

>>समजा आज नसला म्हणजे यानंतर होणारच नाही?? कल किसने देखा है???<<
अरेच्च्या! मी म्हणतोय झाला नाहि, आणि तुम्ही वाचतांय होणार नाहि. उद्या कोणि झालांच तर आनंद आहे, पण तशी चिन्हं आहेत का कुठे?

बाकि, पवारसाहेबांच्या कारकिर्दिचा आढावा घेण्याचा हा धागा नाहि, याबाबतीत सहमत. पण त्याचं कारण विषयांतर नसुन इथल्या काहिंचं (तुमच्या सकट) अज्ञान हे आहे. गाढवापुढे वाचली गीता... असं काहिसं करण्याचा तो प्रकार अस्ल्याने मी सुद्धा थांबणार आहे...

जाताजाता, पवारसाहेबांचं कृषीक्षेत्रातलं योगदान शेतकर्‍यांना, आंणि बीसिसिआयचा कायापालट केल्या बाबतचं मत क्रिकेटर्स आणि क्रिकेटप्रेमींना विचारा. इतके दिवस आपण कातडं पांघरुन का/कसे राहिलो, हा प्रश्न तुम्हाला सतावेल...

तर महापालिका निवडणुकीचा धागा येऊ दया आता. आली ती घटिका. माझे दोन शब्द . शेणा-राकॉ-सोनिया यांच्या विरुद्ध कमळ आणि पेंटर असतील. धनाजी वाकडे जोपर्यंत त्यांचे पत्ते उघड करत नाहीत तोवर नक्की अंदाज येणार नाही तसा. त्यांचे आणि पेंटरचे सम्बन्ध पाहता ते पाव्हण्याच्या चपलेने इच्चू मारण्याचा प्रयत्न करणार. इथं चप्पल पेंटर आहे पण इच्चू कमळ होतंय का शेणा ते निकालच सांगतील. बाकी पेंटरचा पासवान व्हायची शक्यता आहे पण पेंटर तसा एवढा बावळतबी नाही आणि अजून नवीन विधानसभा निवडणूक बाकी हाये. एवढं बोलून दोन शब्द संपवतो . जय हिंद जय मोदी जय श्रीराम जय गोमाता

जय शहा

सध्या जय शहा किरकेट बघायला दुबईला गेले हैंत

सध्या बहुतेक बातम्या मुंबई केंद्रित येतायेत आणि दोन्ही बाजूंचे रोजचे आरोपप्रत्यारोप पाहून तर जवळ वाटायलय सर्व. आपण नको मागे राहायला

बाकी पवार साहेबांच्या कारकीर्दीचा आढावा नाही घेतला तरी चालेल पण तुमच्याच "महाराष्ट्राच्या ऐतिहासीक आणि सामाजिक संस्कृतीची जाण, वारसा जपणारा, आस्था आणि कळकळ बाळगणारा नेता" या विधानाला पुष्टी देणारे काही असेल तर जाणून घ्यायला आवडेल.... म्हणजे काही भरीव कार्य, उपक्रम, योजना वगैरे!

सिरिअसली विचारतोय!

तुमच्याच "महाराष्ट्राच्या ऐतिहासीक आणि सामाजिक संस्कृतीची जाण, वारसा जपणारा, आस्था आणि कळकळ बाळगणारा नेता" या

तुमच्याच
म्हणजे हा महाराष्ट्र तुमचा नाही का.
विरोधी विचारी असला तरी आम्ही तुम्हाला आमचेच समजत होतो.

सातवी ड, जिथे कळत नाही तिथे डोके लावू नकोस.
तुला आधी ती पाच कामे का काय ती विचारलेली त्याचे उत्तर आले का?

पुणेकर
खालच्या दर्जा ची भाषा मी वापरायला सुरावत केली तर 1 तासात येथून काढता पाय घेशील.

तशी भाषा तू जास्त वेळ ऐकू शकणार नाहीस.
त्या मुळे तुझ्या लायकी मध्ये रहा.

पुणेकर
राजकारण ची ABCD
पण तुझी पाठ नाही.
तुझा बाप आहे मी राजकारण आणि त्या विषयात.
मला शिकवायच्या भानगडीत परत पडू नकोस

मायबोलीवरील सर्वज्ञ सभासद, एकेरीवर आल्याबद्दल क्षमा असावी.
आमची केवळ इतुकीच नम्र विनंती आहे की आपणास विचारलेल्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर आपणाकडून अपेक्षित आहे.
आपण ते दिल्यास ही अवघी मायबोली आपल्या ऋणात असेल Happy

>>सिरिअसली विचारतोय!<<
तुम्हाला सिरियस्ली माहित नाहि? इतरांना "सातवी ड" संबोधीत करणार्‍याला महाराष्ट्रातल्या गेल्या ३०-४० वर्षातल्या घडामोडींचं आकलन नाहि? मग तुम्ही आणि "गाढवापुढे वाचली गीता..." ग्रुप मधे फरक काय?

असो, इथुन सुरुवात करा; नंतर मराठी साहित्य, नाट्यसृष्टि, क्रिडा इ. मधे पवारसाहेबांचं किती योगदान आहे यांवर वाचन करा. यापुढे स्पून फिडिंगची माझ्याकडुन तरी अपेक्षा ठेउ नका...

हेमंत , शाब्दिक मर्यादा ठेवा !

राजकारण विषयावर चर्चा करताना नेत्यांवर घासरा पण एकमेकांवर नको !
गरज पडली तर पुणेकरांना आठवी फ म्हणा !
आहे काय त्यात Happy

राज,
बघितली ती मुलाखत..... मुलाखत म्हणून आवडली...... पण "महाराष्ट्राच्या ऐतिहासीक आणि सामाजिक संस्कृतीची जाण, वारसा जपणारा, आस्था आणि कळकळ बाळगणारा नेता" या दाव्याला पुष्टी देणारे फारसे काही त्या मुलाखतीतून हाती लागले नाही.... असो!
असे एखादे ठोस विधान करताना त्याला पुष्टी देणारी काही ठळक उदाहरणे (फक्त भाषणे आणि कौतुक सोहळे नव्हे तर काही योजना, उपक्रम, भरीव योगदान वगैरे) देता येणे याला स्पून फिडींग म्हणत नसावेत.
माझा नसेल पवारांबद्दल तितका अभ्यास पण तुमचा आहे तर ऐकायला आवडेल!

बाकी ते सातवी ड ला वगैरे वेगळी पाश्र्वभूमी आहे.... आणि एखाद्या नेत्याच्या योगदानाबद्दल माहिती नसलेली माहिती जाणून घेण्याच्या प्रयन्ताला आकलन नसणे वगैरे म्हणणार असाल तरी माझी काही हरकत नाही Happy

>>हेमंत , शाब्दिक मर्यादा ठेवा !<<

त्यांची अडचण समजून घ्या!
ब्लॅंकेट स्टेटमेंट करणाऱ्या बऱ्याच मंडळींना नेमके प्रश्न विचारले की ते त्रागा करतात.... आगपाखड करतात.
असो!
परत एकदा सभ्य भाषेत त्यांना तीच विनंती केली आहे.... बघुया उत्तर येते का ते!
Happy Happy

मजा आहे या धाग्यावर Lol
बादवे ते वटवृक्ष यांनी काय प्रश्न विचारला होता? जमलं तर मी उत्तर देतो Happy

सर्वात नालायक पंतप्रधान अशी प्रतिमा आहे त्यांची>>> असे तुम्हाला व काही जणांनाच वाटते मात्र सामान्य जनतेला तसे वाटत नाही म्हणून मोदी दोनदा निवडून आलेत नाही का .

असे तुम्हाला व काही जणांनाच वाटते मात्र सामान्य जनतेला तसे वाटत नाही म्हणून मोदी दोनदा निवडून आलेत नाही का .>>>> अहो ते आपल्यासारखे सामान्य नाहीत, असामान्य आहेत.

बरेच दिवस विचारायचं विचार करत होतो. भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडी नावाचा कायतरी प्रकार एवढ्यात समजला. ते ठीक आहे पण त्याचा आचार्य तुषार भोसले नावाचा कोणीतरी चेहरा आहे. त्यांच्या काही क्लिप्स टीव्हीवर पाहूनपाहून मला थोडी शंका आली म्हणून त्यांचे फेसबुक पेज शोधले तर तिथे खजिनाच सापडला. त्यांचे बोलण्याची लकब मला फारच आवडली. हे भोसले कुठले आहेत मूळचे ते कोणाला माहित आहे का? आमचे पाव्हणे तसे बेळगावपासून वरती बडोदा-देवास पर्यंत आहेत पण असा टोन मी पहिल्यांदाच ऐकतोय. दिसायलाबी लैच "'चिकणे'' आहेत हे भोसले Biggrin
हे एक सॅम्पल - https://youtu.be/eVQ1vxZyBMc

>>परत एकदा सभ्य भाषेत त्यांना तीच विनंती केली आहे.... बघुया उत्तर येते का ते!
Happy Happy<<

अजुनही उत्तर आलेले नाही!
असो.... तेच अपेक्षित होते Proud

पुणेकर साहेब
तुमचे उत्तर मी वर दिलेलं आहे.
परत एकदा वाचा बरे पाठी मागच्या पोस्ट.

पाच कामे?
नाही लिहलीयत साहेब तुम्ही! परत एकदा तुम्हीच वाचा Happy

पेंग्विन्सनी जी काय पाच-सहा लोकउपयोगी कामे केली आहेत ती खालीलप्रमाणे.

  • माझे घर माझी जबाबदारी
  • माझे लाईटबिल माझी जबाबदारी.
  • घरात बसून कोमट पाणी प्या.
  • खोट्या केस मधे अडकवून, अर्णबला जेल मधे टाकणे.
  • टिका करते म्हणून, कंगनाच्या घरावर बुलडोजर फिरवणे
  • कोरोना काळात केलेला तांदूळ घोटाळा.
  • लोकांची वीजबिले कमी/माफ करण्याकरता यांच्याकडे पैसा नाही. मात्र मंत्र्याना द्यायला आलिशान गाड्यांसाठी पैसा आहे.
  • फडणविस सरकारच्या लोकउपयोगी योजनांना तात्काळ स्थगित्या देणे. जेणे करुन नविन करारात मनजोगी खंडणी वसूल करता येईल.

याशिवाय केलेली अजून काही कामे असतील तर ती इतरांनी लिहावी

सतत एकमेकांच्या मुलाखती घेऊन एकमेकांची कसचं कसचं म्हणून पाठ थोपटणे.

छ. शिवाजी महाराजांनंतर आम्हीच असा सदैव आव आणणे

उद्धव आले नी लॉक डाऊन सुरू झाले त्या मुळे सरकार ला काम करायला वेळच नाही मिळाला.
ठाण्या मधील क्लस्टर योजनेतील सर्व अडथळे सेना सरकार नीच सोडवले.
कंगना आणि अर्णव हे महाराष्ट्र ची बदनामी करणारी जोडी आहे त्यांना अजुन कडक कलमांखाली अजामीनपात्र गुन्हे दाखल करून अटक केली पाहिजे होती आणि 6 महिने तरी जामीन मिळायला नको होता.
मग सत्तेवर bjp असती तरी हेच मत व्यक्त केले असते.

>>लोकांचे प्रश्न कोणते आहेत त्यांची समस्या काय आहेत ह्याची माहिती फडणीसांनी शरद पवार ह्यांच्या कडून समजून घ्यावेत त्यांचा जन संपर्क आणि अभ्यास दांडगा आहे.
. अमित शाह आणि मोदी ह्यांचा सल्ला घेतलं तर
राम मंदिर
Arnob Goswami ची पाठराखण.
Kangna ची घराची समस्या.
मंदिर उघडणे.
लव जिहाद
हे सर्व जनतेचे खरे प्रश्न आहेत आणि ते प्रधम सोडवा असा सल्ला मिळेल.

Submitted by Hemant 33 on 18 November, 2020 - 10:50<<

ह्या प्रतिसादात सातवी ड साहेबांनी असा सूर लावला आहे की Arnob Goswami ची पाठराखण, Kangna ची घराची समस्या इत्यादी मोदी शहांच्या प्रायोरिटी आहेत जनतेच्या नाही .
आणि आता वरच्या प्रतिसादात ते म्हणत आहेत की कंगना आणि अर्णव हे महाराष्ट्र ची बदनामी करणारी जोडी आहे त्यांना अजुन कडक कलमांखाली अजामीनपात्र गुन्हे दाखल करून अटक केली पाहिजे होती आणि 6 महिने तरी जामीन मिळायला नको होता.

कळला का वैचारिक गोंधळ?

एनीवेज अजुन ५ कामे सांगितली नाहीत ते नाहीतच!

उद्धव आले नी लॉक डाऊन सुरू झाले त्या मुळे सरकार ला काम करायला वेळच नाही मिळाला.
--

उद्धव ठाकरेना काय रस्त्यावर जाऊन दगड फोडायचे काम करायचे होते की काय ?

करोना काळात विरोधी पक्ष नेते सर्व महाराष्ट्रभर फिरुन लोकांच्या समस्या जाणून घेत होते, त्यावेळी कोथळा सम्राट काय करत होते, तर 'घरात राहून गोट्या खेळा, साबणाने हात धूवा, कोमट पाणी व फेसबुकवर येऊन रटाळ फेसबुक लाईव्ह, कीती हॉस्पिटल्सना भेटी दिल्या ? तिथल्या समस्या जाणून घेतल्या ?

याच करोना काळात संपूर्ण कोकणाला वादळाने झोडपून काढले, अनेक लोकांचे प्रचंड प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले. किती कोकणी लोकांना मदत मिळाली ? किती दौरे केले कोकणाचे ? एक काय तो हवाई दौरा केला होता, कश्यासाठी अन्वय नाईक कडून अलिबागमधे ज्या जमिनी घेतलेल्या त्या शाबूत आहेत की नाहीत हे पाहून कोकण हवाई दौरा आटोपता घेतला होता मामूनी.

या पावसाळ्यात अतिवॄष्टीने महाराष्ट्रात अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले. किती भरपाई मिळाली शेतकर्‍यांना ? फडणविस सरकारच्या काळात हेच मामू प्रत्येक शेतकर्‍याला २५ हजाराची मदत तातडीने सरकारने करावी असे शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन सांगत होते, आता ते स्वत: कीती शेतकर्‍यांच्या शेतात गेले व किती तातडीची मदत केली ?

अव्वाच्या सव्वा येणार्‍या लाईट बिलांचा विषय तर वेगळाच आहे.

उगा करोना होता म्हणून काहीच काम करता आले नाही असल्या 'थापा' दुसरिकडे मारा.

एवढे प्रश्न महाराष्ट्र समोर आहेत आणि सरकार शांत आहे.
मग ह्या प्रश्न साठी विरोधी पक्ष रस्त्यावर का उतरला नाही.
विरोधी पक्षाला ह्या प्रश्न पेक्षा अर्णव आणि कंगना का जवळची वाटली.
पूर्ण bjp अर्णव साठी रस्त्यावर होती.

{{{ उद्धव आले नी लॉक डाऊन सुरू झाले त्या मुळे सरकार ला काम करायला वेळच नाही मिळाला. }}}

उलट लॉकडाउन मुळे रस्ते रिकामे असताना, नालेसफाई, रस्तादुरुस्ती मेट्रो उभारणी इत्यादी कामे वेगात करता आली असती. यांनी काय केले तर कंगनाचे घर तोड, अर्णवला घरातुन पूर्वकल्पना न देता उचलून जेलमध्ये टाक असली बिनगरजेची कामे केली.

तिकडे पावसाचे पाणी साठून नाल्यात एक बाई वाहून गेली तरी यांना त्याचे सोयरसुतकच नाही.

भाजपाच्या काळात कोलापूर सांगली व्हावून गेले

आणि भाजपाची कोल्हापूरची घाण वहात पुण्यात गेली म्हणे

हे लोक अजुन विरोधी पक्षांच्या मोडमधून बाहेर आलेले नाहीत..... स्वता सत्तेवर आले तरी सगळे विरोधी पक्षाने करावे ही यांची अपेक्षा.
आंदोलने करा, राजकारण करु नका, केंद्राकडून फंड मिळवून द्या.... मग तुम्ही काय करणार? नुसते फेसबुक लाइव्ह?

वरची पोस्ट पाहून वाटले केंद्रसरकेरविषयी बोलताय. स्वतःला काही जमत नाही, मग सदैव नेहरूंकडे बोट दाखवायचे.

तुम्हाला तिकडे राहुल गांधींच्या भाषेच्या पातळीबद्दल काहीतरी विचारले होते.... काय म्हणणे आहे त्यावर तुमचे?

रागाची भाषा, वागणं अतिशय सभ्य आहे असं माझं म्हणणं आहे. राजकारणात न शोभण्याइतपत चांगलं. ओबामा म्हणतो ते बरोबर आहे की राजकारणी म्हणून अजून अपरिपक्व आहे तो. कदाचित म्हणूनच चांगला सुसंस्कृत आहे. किंवा उलटही असु शकेल की तो इतका सभ्य, सुसंस्कृत आहे की हल्ली अनेक भारतीयांना ज्या प्रकारचे बढाईखोर, द्वेषपुर्ण, मारो-काटो-बदला लो बोलणारे नेते आवडतात तसा तो नसल्याने पाॅप्युलर नाही.

काँग्रेस समर्थक - राहुलजी चांगले व्यक्ती आणि चांगले राजकारणी आहेत
भाजप समर्थक - मोदीजी चांगले व्यक्ती आणि चांगले राजकारणी आहेत
खरी परिस्थिती - ,,,,,,,,,,,,,,चांगले व्यक्ती आणि खराब राजकारणी आहेत.
,,,,,,,,,,,,,,,खराब व्यक्ती आणि चांगले राजकारणी आहेत.

(गाळलेल्या जागा भरा)

पवारसाहेबांचं कृषीक्षेत्रातलं योगदान? !!!

विदर्भात पूर्ण वाट लावली त्यांनी घातलेल्या कर्जमाफीच्या अटींमुळे!

बाकी काका आजकाल कर्तृत्ववान मराठा स्त्रीला मुख्यमंत्री करायच्या मागे लागलेत म्हणे!

बाकी काका आजकाल कर्तृत्ववान मराठा स्त्रीला मुख्यमंत्री करायच्या मागे लागलेत म्हणे!
नवीन Submitted by रॉनी on 21 November, 2020 - 19:29
---
त्यांचा रोख सुप्रिया सुळेंकडे दिसतोय ! अरेरे, आता पेंग्विन्स व अजित पवारांचे काही खरे नाही.

महाराष्ट्रात.
उध्दव ठाकरे.
शरद पवार
अजित पवार.
राज ठाकरे
आदित्य ठाकरे
हे सर्व आताचे नेते बिन कामाचे आहेत.
मग महाराष्ट्र मधील कर्तृत्व वान नेता कोण त्याचे नाव तरी जाहीर करा.
सर्वानाच त्या महान व्यक्ती चे नाव माहीत पडेल.

मग महाराष्ट्र मधील कर्तृत्व वान नेता कोण त्याचे नाव तरी जाहीर करा.
>>

हेमंत 33

तूमच्यामध्ये लय पोटेनशील हय!

हेमंत 33
तूमच्यामध्ये लय पोटेनशील हय!
नवीन Submitted by रॉनी on 21 November, 2020 - 19:49
--

सहमत ! Proud
आणखी एक 'भावी' मुख्यमंत्री.

रागाची भाषा, वागणं अतिशय सभ्य आहे असं माझं म्हणणं आहे. राजकारणात न शोभण्याइतपत चांगलं. ओबामा म्हणतो ते बरोबर आहे की राजकारणी म्हणून अजून अपरिपक्व आहे तो. >>>>>>>>
ओबामा त्याच्या स्टेटस मुळे राहुल ला ' बालिशपणा , मंदबुद्धी ' शब्द वापरू शकला नाही .
त्यामुळे राहुल ला अजुन शिकण्याची इच्छा असलेला ' विद्यार्थी ' म्हणाला !
५० वर्षांच्या व्यक्तीला कोणी विद्यार्थी असं संबोधित करत का?
विद्यार्थी म्हणणे सुद्धा राहुल चा अपमान नाही का ?
तरी पण लिबरल ने दिलेला मार समस्त लिबरल गँग नी गोड च मानून घेतला आहे !
काय सांगावे विरोध केला तर अमेरिकन सरकार कोणत्याही कारणासाठी व्हिसा ban करेल !
Happy

मी काही काँग्रेस चा समर्थक नाही पण bjp राहुल गांधी ची भीती बाळगून आहे.
हे मात्र खरे आहे.
राहुल गांधी च साधा स्वभाव कधी लोकांना आवडेल आणि तयारीच्या,चॅप्टर नेत्यांना जनता
कधी धोबी पछाड देईल ह्याचा भरवसा नाहीं.
त्या मुळे शक्य होईल तेवढी टीका राहुल वर केली जाते.

Pages