Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नल सुशेगाद राहिला अस्ताव्यस्त
नल सुशेगाद राहिला अस्ताव्यस्त करायला हवा
नकुलव्याळ (/ उलटे करा )
नकुलव्याळ (/ उलटे करा )
व्याळ = साप
तुम्हीच करा उलटे.... आणि करा
तुम्हीच करा उलटे.... आणि करा पूर्ण
वैरभावचिन्ह
व्यालनकुल
छान होते !
छान होते !
एक गूढकोडे. सगळे शब्द ५
एक गूढकोडे. सगळे शब्द ५ अक्षरी. शब्द आणि त्याची उकलही द्यायची आहे.
काही ठिकाणी शब्द + शोधसूत्र दिलेले आहे. काही ठिकाणी नुसते शोधसूत्र.
* = शोधसूत्रात / उत्तरात मराठी व्यतिरिक्त इतर भाषा आहेत.
१. लाभापुरतीच आनंदी गंमत जंमत --- खुषमस्करी
२. टपरीवरचा चहा अन्नाबरोबर? सरी सरी चालतोय की...! * --- आमटीभात
३. समग्र पचवणारे / उत्तेजन देणारे घरातील मानाचे व्यक्तित्व --- कुलदीपक
४. सात दगड अन स्वतः ला चुलीचे चटके नाहीत --- शिळासप्तमी
५. गरम अधिक थंड = कोमट नव्हे, औषधी गुणाचे -- रक्तचंदन
६. जलद अक्कलशून्य अनुमोदन राजाच्या डोक्यावर चक्क ? * --- मेघडंबरी
७. सोहळा की लढाई..... का बरं असं असावं? --- कार्यकारण
८. एका माबोकराने काठी घेऊन केलेले अशुद्धलेखनाचे तुकडे नेत्रदीपक खरे -- आरसपानी
९. वैरभावचिन्ह पीडेने त्रस्त अस्ताव्यस्त निषधराज --- व्यालनकुल
१०. कुरळे केस शुक्ल षष्ठी युक्त पुण्यसलिला --- अलकनंदा
कुमार सर, punekarp अभिनंदन
विक्रमसिंह, अश्विनी११, श्रवु्, कविन, हीरा, Mr.India, देवकी, आणि सर्व प्रयत्न करणार्यांना आभार व दिलगिरीही...
सॉरी, थोडे कठीण झाले पण .....
सॉरी, थोडे कठीण झाले पण ..... त्यामुळे भाग घेण्याचा मूड येत नाही ना....
ते क्ल्यू अजून सोपे हवे होते बहुतेक....पण लिहीताना लक्षात नाही आले की इतके घोळात घेईल हे कोडे.
चालू असलेली सर्व कोडी संपली आहेत. नवीन येऊ द्या...
आता श्रमपरिहार म्हणून सोपे
आता श्रमपरिहार म्हणून सोपे देतो काही तासांत...
(कोणी इच्छुक नसल्यास )
कारवी. कोडे छान होते. क्लू पण
कारवी. कोडे छान होते. क्लू पण उत्तम. मला आवडलेले खुषमस्करी, आमटीभात, कार्यकारण, मेघडंबरी, रक्त्रचंदन
पण शब्द कोषात बघून सोडवायचे असेल तर मजा जाते.
वेगळी भाषा असेल तर ती सांगायला हवी. तामिळ ते इंग्रजी फारच मोठा स्पॅन झाला.
पुढच्या वेळेस जास्त प्रयत्न करीन.
कुमारजी मी मधेच कामात अडकलो होतो. म्हणुन तुमचे कोडे लिहिता आले नाही. पण १ ते ४ तसेच होते.
मी भाप्रवे मधेच आहे. जमेल तसा येत जाईन जमेल तसे सोडवत जाईन.
धन्यवाद
धन्यवाद
शब्दकोषात बघून मीही नाही रचत. सामान्य माणसे कुठे कोश वापरतात सर्रास.... मग अनोळखी वाटते....
पण एखादेवेळी घ्यावा... त्याने कोश चाळला तरी जातो, असे माझे मत.
त्याने मग जुने मराठी शब्द / नवीन अर्थ माहीत होतात किंवा आठवतात.
इथे फक्त नंदा कोशातला आहे. बेबी नंदा क्ल्यूपेक्षा वेगळे काही देता येईल का बघताना सापडला.
वेगळी भाषा असेल तर ती सांगायला हवी. >>>
* = शोधसूत्रात / उत्तरात मराठी व्यतिरिक्त इतर भाषा आहेत. हे त्यासाठीच दिले होते.
मृणाली येतात इथे कधीतरी. सरी सरी त्यांना सुचले असते नक्की. पण त्या नाही आल्या....
टपरीवरचा चहा अन्नाबरोबर? xx xx चालतोय की...! -- फक्त यानेही आले असते.
पण सूचना हव्याच.... पुढची कोडी रचताना जुन्या चुका टाळायला.
कोडे छान होते पण थोडे कठीण
कोडे छान होते पण थोडे कठीण गेले क्लू सोडवायला . असे कोडे सोडवणे नवीन आहे माझ्यासाठी . त्यामुळे अभ्यास वाढवला पाहिजे हे जाणवले . पण मजा येतेय मला .
खाली एक उतारा दिलेला आहे.
खाली एक उतारा दिलेला आहे. त्यामध्ये 14 गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. गाळलेल्या जागी जेवढे (अंक) असतील तितक्या अक्षरी संबंधित शब्द आहे. आता हे सर्व मराठी शब्द अन्य एकाच शब्दाचे 14 विविध अर्थ आहेत. तो मूळ शब्दही तुम्हीच ओळखायचा आहे. त्याचे अर्थ म्हणून जे शब्द निवडाल, ते संबंधित वाक्याशी सुसंगत असावेत. पूर्ण सर्व जागा भरेपर्यंत कोणी मूळ शब्द सांगू नये वा विचारू नये ! (मनात अंदाज घ्यावा). एकेक उत्तर देताना संबंधित वाक्याचा थोडा भाग डकवा म्हणजे नीट कळेल.
.........................
संस्थेची वार्षिक सभा वादळी झाली. थकबाकीदारांना (२) करण्याबाबतचा (३) एकमताने मंजूर झाला. त्यानंतर एक तासाचा (३) घेऊन लोक जेवायला जमले. गप्पा मारताना अध्यक्ष व सचिव म्हणाले, की सर्वांनी मिळून हे काम करावे. आम्हीच काय (२) घेतलाय का ?
खुद्द तेच असे म्हटल्याने सुभानराव यांच्या मार्गातला (४) दूर झाला. नुकतेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले एक (४) संपले होते. जर का ते या संस्थेवर बिनविरोध निवडून आले, तर तो त्यांच्या भावी आयुष्यातील एक नवा (३) ठरणार होता. खरेतर त्यांना सतत अधिकारपदाची सवय. पण गेली दहा वर्षे त्यात (२- या शब्दात अनुस्वार नाही) पडला होता.
सर्वांची जेवणे एकत्र चालू होती. पण सभासदांच्या ठराविक उभे राहण्यातून जणू दोन (२) पडले होते. सध्याची कार्यकारणी अध्यक्षांवर नाराज होतीच. वरून एक आणि आतून वेगळेच असा हा माणूस. त्यांच्या कारभारात जो काय ‘माल’ उचलला जायचा, तो सगळा ते एकटेच हडप करायचे. बाकीच्यांपुढे फेकायचे फारतर एखादा (३). याउप्पर संकुलातल्या दुकानदारांकडून सुद्धा (३) वसूल करायचे.
जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यातल्या गाण्याची (५) सुरेख होती आणि साथीच्या कलाकाराचा (५) देखील तोडीस तोड होता.
कार्यक्रम संपल्यावर जाताना एक विचार मनात आला. हे सगळे एकाच संकुलात राहतात खरे. पण एकमेकाशी असे शत्रुत्व ठेवतात, जसे काही त्यांचे राहण्याचे (३) फार विखुरलेले आहेत !
.............................................
१४ पैकी ११ शब्द अगदी नेहमीचे. काळजी नसावी !
संस्थेची वार्षिक सभा वादळी
संस्थेची वार्षिक सभा वादळी झाली. थकबाकीदारांना ( रद्द) करण्याबाबतचा (ठराव ) एकमताने मंजूर झाला. त्यानंतर एक तासाचा ( विराम)घेऊन लोक जेवायला जमले. गप्पा मारताना अध्यक्ष व सचिव म्हणाले, की सर्वांनी मिळून हे काम करावे. आम्हीच काय ( ठेका)घेतलाय का ?
खुद्द तेच असे म्हटल्याने सुभानराव यांच्या मार्गातला ( अडथळा) दूर झाला. नुकतेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले एक (४) संपले होते. जर का ते या संस्थेवर बिनविरोध निवडून आले, तर तो त्यांच्या भावी आयुष्यातील एक (पडाव) ठरणार होता. खरेतर त्यांना सतत अधिकारपदाची सवय. पण गेली दहा वर्षे त्यात ( खाडा )या शब्दात अनुस्वार नाही) पडला होता.
सर्वांची जेवणे एकत्र चालू होती. पण सभासदांच्या ठराविक उभे राहण्यातून जणू दोन (गट) पडले होते. सध्याची कार्यकारणी अध्यक्षांवर नाराज होतीच. वरून एक आणि आतून वेगळेच असा हा माणूस. त्यांच्या कारभारात जो काय ‘माल’ उचलला जायचा, तो सगळा ते एकटेच हडप करायचे. बाकीच्यांपुढे फेकायचे फारतर एखादा ( तुकडा). याउप्पर संकुलातल्या दुकानदारांकडून सुद्धा (३) वसूल करायचे.
जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यातल्या गाण्याची (५) सुरेख होती आणि साथीच्या कलाकाराचा (५) देखील तोडीस तोड होता.
कार्यक्रम संपल्यावर जाताना एक विचार मनात आला. हे सगळे एकाच संकुलात राहतात खरे. पण एकमेकाशी असे शत्रुत्व ठेवतात, जसे काही त्यांचे राहण्याचे (विभाग) फार विखुरलेले आहेत !
पडाव, खाडा , गट, >> हे गटात
पडाव, खाडा , गट, >> हे गटात बसणारे नाहीत.
बाकी बरोबर, छान !
१४ पैकी ६ बरोबर :
ठराव, विराम , अडथळा , मक्ता / ठेका , तुकडा, विभाग (प्रदेश )
संस्थेची वार्षिक सभा वादळी
संस्थेची वार्षिक सभा वादळी झाली. थकबाकीदारांना (२)अर्ज करण्याबाबतचा (३)ठराव एकमताने मंजूर झाला. त्यानंतर एक तासाचा (३)विश्राम घेऊन लोक जेवायला जमले. गप्पा मारताना अध्यक्ष व सचिव म्हणाले, की सर्वांनी मिळून हे काम करावे. आम्हीच काय (२)मक्ता घेतलाय का ?
खुद्द तेच असे म्हटल्याने सुभानराव यांच्या मार्गातला (४)अडसर दूर झाला. नुकतेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले एक (४)महापर्व संपले होते. जर का ते या संस्थेवर बिनविरोध निवडून आले, तर तो त्यांच्या भावी आयुष्यातील एक नवा (३) अध्याय ठरणार होता. खरेतर त्यांना सतत अधिकारपदाची सवय. पण गेली दहा वर्षे त्यात (२- या शब्दात अनुस्वार नाही)खन्ड
पडला होता.
सर्वांची जेवणे एकत्र चालू होती. पण सभासदांच्या ठराविक उभे राहण्यातून जणू दोन (२) गट पडले होते. सध्याची कार्यकारणी अध्यक्षांवर नाराज होतीच. वरून एक आणि आतून वेगळेच असा हा माणूस. त्यांच्या कारभारात जो काय ‘माल’ उचलला जायचा, तो सगळा ते एकटेच हडप करायचे. बाकीच्यांपुढे फेकायचे फारतर एखादा (३)तुकडा. याउप्पर संकुलातल्या दुकानदारांकडून सुद्धा (३)मुद्दल वसूल करायचे.
जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यातल्या गाण्याची (५)जुगलबंदी सुरेख होती आणि साथीच्या कलाकाराचा (५)स्वररियाझ देखील तोडीस तोड होता.
कार्यक्रम संपल्यावर जाताना एक विचार मनात आला. हे सगळे एकाच संकुलात राहतात खरे. पण एकमेकाशी असे शत्रुत्व ठेवतात, जसे काही त्यांचे राहण्याचे (३) फार विखुरलेले आहेत !
संस्थेची वार्षिक सभा वादळी
संस्थेची वार्षिक सभा वादळी झाली. थकबाकीदारांना (दंड) करण्याबाबतचा (ठराव) एकमताने मंजूर झाला. त्यानंतर एक तासाचा (अवधी) घेऊन लोक जेवायला जमले. गप्पा मारताना अध्यक्ष व सचिव म्हणाले, की सर्वांनी मिळून हे काम करावे. आम्हीच काय (ठेका) घेतलाय का ?
खुद्द तेच असे म्हटल्याने सुभानराव यांच्या मार्गातला (अडसर) दूर झाला. नुकतेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले एक (नष्टचक्र/ दीर्घपर्व) संपले होते. जर का ते या संस्थेवर बिनविरोध निवडून आले, तर तो त्यांच्या भावी आयुष्यातील एक नवा (अध्याय) ठरणार होता. खरेतर त्यांना सतत अधिकारपदाची सवय. पण गेली दहा वर्षे त्यात (खंड) पडला होता.
सर्वांची जेवणे एकत्र चालू होती. पण सभासदांच्या ठराविक उभे राहण्यातून जणू दोन (गट) पडले होते. सध्याची कार्यकारणी अध्यक्षांवर नाराज होतीच. वरून एक आणि आतून वेगळेच असा हा माणूस. त्यांच्या कारभारात जो काय ‘माल’ उचलला जायचा, तो सगळा ते एकटेच हडप करायचे. बाकीच्यांपुढे फेकायचे फारतर एखादा (तुकडा). याउप्पर संकुलातल्या दुकानदारांकडून सुद्धा (खंडणी) वसूल करायचे.
जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यातल्या गाण्याची (शब्दरचना) सुरेख होती आणि साथीच्या कलाकाराचा (आत्मविश्वास) देखील तोडीस तोड होता.
कार्यक्रम संपल्यावर जाताना एक विचार मनात आला. हे सगळे एकाच संकुलात राहतात खरे. पण एकमेकाशी असे शत्रुत्व ठेवतात, जसे काही त्यांचे राहण्याचे (ठिकाण) फार विखुरलेले आहेत !
संस्थेची वार्षिक सभा वादळी
संस्थेची वार्षिक सभा वादळी झाली. थकबाकीदारांना (दंड) करण्याबाबतचा (ठराव ) एकमताने मंजूर झाला. त्यानंतर एक तासाचा ( विराम)घेऊन लोक जेवायला जमले. गप्पा मारताना अध्यक्ष व सचिव म्हणाले, की सर्वांनी मिळून हे काम करावे. आम्हीच काय ( वसा)घेतलाय का ?
खुद्द तेच असे म्हटल्याने सुभानराव यांच्या मार्गातला ( अडथळा) दूर झाला. नुकतेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले एक (प्रकरण) संपले होते. जर का ते या संस्थेवर बिनविरोध निवडून आले, तर तो त्यांच्या भावी आयुष्यातील एक (अध्याय) ठरणार होता. खरेतर त्यांना सतत अधिकारपदाची सवय. पण गेली दहा वर्षे त्यात ( २ या शब्दात अनुस्वार नाही) पडला होता.
सर्वांची जेवणे एकत्र चालू होती. पण सभासदांच्या ठराविक उभे राहण्यातून जणू दोन (गट) पडले होते. सध्याची कार्यकारणी अध्यक्षांवर नाराज होतीच. वरून एक आणि आतून वेगळेच असा हा माणूस. त्यांच्या कारभारात जो काय ‘माल’ उचलला जायचा, तो सगळा ते एकटेच हडप करायचे. बाकीच्यांपुढे फेकायचे फारतर एखादा ( तुकडा). याउप्पर संकुलातल्या दुकानदारांकडून सुद्धा (खंडणी) वसूल करायचे.
जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यातल्या गाण्याची (५) सुरेख होती आणि साथीच्या कलाकाराचा (५) देखील तोडीस तोड होता.
कार्यक्रम संपल्यावर जाताना एक विचार मनात आला. हे सगळे एकाच संकुलात राहतात खरे. पण एकमेकाशी असे शत्रुत्व ठेवतात, जसे काही त्यांचे राहण्याचे (३) फार विखुरलेले आहेत !
अध्याय, दंड, खंडणी बरोबर
अध्याय, दंड, खंडणी, प्रकरण बरोबर
शब्दरचना >> थोडा सुधारणे
....एकूण १० बरोबर
राहिले :
राहिले :
गेली दहा वर्षे त्यात (२- या शब्दात अनुस्वार नाही) पडला होता.
राहण्यातून जणू दोन (२) पडले होते.
जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यातल्या गाण्याची (५) सुरेख होती आणि साथीच्या कलाकाराचा (५) देखील तोडीस तोड होता.
राहण्यातून जणू दोन (भाग) पडले
राहण्यातून जणू दोन (भाग) पडले होते.
गेली दहा वर्षे त्यात (खोडा)
गेली दहा वर्षे त्यात (खोडा) पडला होता.
राहण्यातून जणू दोन (तट) पडले होते.
जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यातल्या गाण्याची (स्वररचना) सुरेख होती आणि साथीच्या कलाकाराचा (५) देखील तोडीस तोड होता.
संस्थेची वार्षिक सभा वादळी
संस्थेची वार्षिक सभा वादळी झाली. थकबाकीदारांना दंड करण्याबाबतचा ठराव एकमताने मंजूर झाला. त्यानंतर एक तासाचा विराम घेऊन लोक जेवायला जमले. गप्पा मारताना अध्यक्ष व सचिव म्हणाले, की सर्वांनी मिळून हे काम करावे. आम्हीच काय ठेका घेतलाय का ?
खुद्द तेच असे म्हटल्याने सुभानराव यांच्या मार्गातला अडथळा दूर झाला. नुकतेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले एक प्रकरण संपले होते. जर का ते या संस्थेवर बिनविरोध निवडून आले, तर तो त्यांच्या भावी आयुष्यातील एक (पडाव) ठरणार होता. खरेतर त्यांना सतत अधिकारपदाची सवय. पण गेली दहा वर्षे त्यात खळ पडला होता.
सर्वांची जेवणे एकत्र चालू होती. पण सभासदांच्या ठराविक उभे राहण्यातून जणू दोन भाग पडले होते. सध्याची कार्यकारणी अध्यक्षांवर नाराज होतीच. वरून एक आणि आतून वेगळेच असा हा माणूस. त्यांच्या कारभारात जो काय ‘माल’ उचलला जायचा, तो सगळा ते एकटेच हडप करायचे. बाकीच्यांपुढे फेकायचे फारतर एखादा तुकडा. याउप्पर संकुलातल्या दुकानदारांकडून सुद्धा खंडणी वसूल करायचे.
जेवणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यातल्या गाण्याची काव्यरचना सुरेख होती आणि साथीच्या कलाकाराचा तालप्रकार देखील तोडीस तोड होता.
कार्यक्रम संपल्यावर जाताना एक विचार मनात आला. हे सगळे एकाच संकुलात राहतात खरे. पण एकमेकाशी असे शत्रुत्व ठेवतात, जसे काही त्यांचे राहण्याचे विभाग फार विखुरलेले आहेत !
भाग बरोबर.
भाग बरोबर.
स्वररचना >>> काव्यरचना .
२ राहिले.
खळ, तालप्रकार
खळ, तालप्रकार
सर्व बरोबर !
मूळ शब्द ?
मूळ शब्द खंड
मूळ शब्द खंड
अगदी बरोबरसर्वांचे आभार !
अगदी बरोबर
सर्वांचे आभार !
कोडे छान होते पण थोडे कठीण
कोडे छान होते पण थोडे कठीण गेले क्लू सोडवायला . असे कोडे सोडवणे नवीन आहे माझ्यासाठी
Submitted by अश्विनी११ >>>>
या धाग्यावर बहुतेक १-२ च गूढकोडी झालीत. तुम्ही नव्याने येत असाल तर शब्द्खेळ-२ हा याआधीचा धागा बघा. २-३ गूढकोडी + उत्तरे वाचलीत की येईल लक्षात कसे रचतात / सोडवतात.
थकबाकीदारांना दंड
थकबाकीदारांना दंड करण्याबाबतचा ठराव
एक तासाचा विराम घेऊन
आम्हीच काय मक्ता घेतलाय
सुभानराव यांच्या मार्गातला अडसर दूर
आयुष्यातले एक कार्यपर्व संपले होते.
भावी आयुष्यातील एक नवा अध्याय ठरणार
दहा वर्षे त्यात खोडा पडला होता.
उभे राहण्यातून जणू दोन गट / तट पडले
बाकीच्यांपुढे फेकायचे फारतर एखादा तुकडा.
दुकानदारांकडून सुद्धा खंडणी वसूल
त्यातल्या गाण्याची स्वररचना सुरेख होती आणि साथीच्या कलाकाराचा आबोहुनर देखील तोडीस तोड होता.
त्यांचे राहण्याचे प्रदेश फार विखुरलेले
आबोहुनर = आब-ओ-हुनर = चमक व कौशल्य = सफाई आणि कलेची जाणकारी
धन्यवाद.एक नवा प्रयोग.
धन्यवाद.
एक नवा प्रयोग.
५ शब्द ओळखायचे आहेत. सर्व शब्द तीन अक्षरी आणि आकारांत आहेत. प्रत्येक शब्दाचे दोन भिन्न अर्थ आहेत आणि ते ओळखण्यासाठी दोन वेगळी शोधसूत्रे दिलेली आहेत.
1. ***
१. ग्राहकाची नापसंती दर्शवतो
२. दुर्जनाचे वैशिष्ट्य.
...........
2. ***
१. सोनाराची कृती
२. आपणही मारू शकतो.
.....................................
3. ***
१. सरळ नाही हो तो !
२. मग नक्की काय करावे ?
....................................
4. ***
१. प्रवासात होणारा त्रास
२. धक्कादायक घटना
.....................................
5. ***
१. कोणाला आवडेल असे भुसार घ्यायला ?
२. नको ती अवस्था कोणावर.
1. विटका ??
1. विटका ??
1. विटका >> नाही
1. विटका >> नाही
त्याच्या २ ला नाही लागू होत
Pages