शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व नाही.
* सोनाराची क्षारयुक्त कृती >>>>> 'चापट' शी जुळणे.
श्रवु >> आकारांत
...
क्षार = salt

रपका

शिपका >> नाही
आता फक्त १ अक्षर बदला !

हबका नाही.

शिरका

शिरका अ‍ॅसिडिक त्याना क्षारयुक्त हवे ना
वीरू -- सोनार म्हणजे कृती नाजूक असणार. टिपल्यासारखी / डेटॉल लावल्यासारखी

धपका, शिरका >>> नाही.
* पका.....
दुसऱ्याला काय मारतोय आपण हलकेच ? तेच अक्षर सुधारून घ्या की

2. चपका
१.सोनाराची कृती … मोरचूद, टाकणखार, काव इत्यादि लावून दागिना किंवा सोनें तावणें व तें विस्तवांत घालणें.

२.आपणही हलकेच मारू शकतो. …..चापट

1. हलका / कुजका
१. ग्राहकाची नापसंती दर्शवतो
२. दुर्जनाचे वैशिष्ट्य.
...........
2. चपका
१. सोनाराची कृती
२. आपणही मारू शकतो.
.....................................
3. ***
१. सरळ नाही हो तो !
२. मग नक्की काय करावे ?
....................................
4. गचका /झटका / हादरा
१. प्रवासात होणारा त्रास
२. धक्कादायक घटना
.....................................

5. ***
१. कोणाला आवडेल असे भुसार घ्यायला ?
२. नको ती अवस्था कोणावर.

साद,
दिशा बरोबर . आता दुसराही अर्थ पाहा.

म्हणजे वाकडाचा समानार्थी ज्यातून ambiguity, गोंधळ, निर्णय घेताना दुग्ध्यात पडणे इत्यादि दिसेल
हा पण -- **का का? बाकीच्यावरून वाटतेय. असेल तर एक अक्षर शोधायला कमी....

तिरका च घ्या.
'काय करावे' अशी स्थिती झाल्यावर एक छोटे उपकरण .... मनात आणा

Pages