शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

8. आरसपानी (नेत्रदीपक)
माबोकराने काठी घेऊन केलेले = रसपा
अशुद्धलेखनाचे तुकडे = आनी+ पानी

८.कोदंडपाणी.... दंड/कोदंड= काठी
Submitted by देवकी >>>> नाही देवकी.... हे उत्तर आधी आलेय... पण हे माबोकर नव्हेत.

६ मेघ + डंब (dumb) + री (अनुमो.)
8. आरसपानी (नेत्रदीपक)
Submitted by कुमार१ >>>> वा !! एकदम २ चौकार..... नवे क्ल्यू देऊन खूपच सोपे केले का मी?

एक गूढकोडे. ( पुढे चालू )
सगळे शब्द ५ अक्षरी. शब्द आणि त्याची उकलही द्यायची आहे.
काही ठिकाणी शब्द + शोधसूत्र दिलेले आहे. काही ठिकाणी नुसते शोधसूत्र.
* = शोधसूत्रात / उत्तरात मराठी व्यतिरिक्त इतर भाषा आहेत.

शोधसूत्रे वाचण्यासाठी सोपी करून दिलीत.

१. लाभापुरतीच // आनंदी + गंमत जंमत

३. समग्र + पचवणारे / उत्तेजन देणारे // घरातील मानाचे व्यक्तित्व
४. सात दगड अन स्वतः ला // चुलीचे चटके नाहीत

६. जलद + अक्कलशून्य + अनुमोदन // राजाच्या डोक्यावर चक्क ? *

८. एका माबोकराने काठी घेऊन केलेले // अशुद्धलेखनाचे तुकडे // नेत्रदीपक खरे
९. वैरभावचिन्ह // पीडेने त्रस्त + अस्ताव्यस्त निषधराज

जास्तीचे क्ल्यू ---
१ मी म्हणतेय तो ह्यॅ ह्यॅ ह्यॅ वाला लाभ हो
३ मध्ये शरीरशास्त्रीय संकल्पना आहे. ( उदा -- रंजक, सारक, पाचक )
४.मध्ये पारंपरिक पैलू आहे + १० मधील शोधसूत्राच्या एक पाऊल पुढे जावे लागेल हे सांगितले आहेच. पण एकच हं
९. वैरभाव चिन्ह खूप जुने आहे. नाही म्हणजे नाहीच पटणार.... स्थायीभाव वैर.

आरसपानी (नेत्रदीपक)
माबोकराने काठी घेऊन केलेले = रसपा
अशुद्धलेखनाचे तुकडे = आनी+ पानी......... Va डॉक्टर!

३. कुल ( समग्र) दीपक (मानाचे) >>>
घरातील मानाचे व्यक्तित्व --- कुलदीपक >>>>
बरोबर. स्प बदलूया थोडेसे...
दीपक = पाचक रसांची वृद्धी करणारे / पचन सुलभ करणारे ( आले लसूण मसाल्याचे पदार्थ इत्यादि @ आयुर्वेद)

९. वैरभावचिन्ह = अनळ
निषधराज = नळ
? अ * * नळ / अन **ळ
नवीन Submitted by कुमार१ >>>> नाही
नल राजा बरोबर
वैरभावचिन्ह हे फलित आहे. नल पीडेने त्रस्त होऊन अस्ताव्यस्त झाला की
वैरभावचिन्ह // पीडेने त्रस्त + अस्ताव्यस्त निषधराज

तुम्ही द्रविडसारखी संयमी खेळी करून एकटेच मॅच पार नेणार बहुतेक ....

हो, punekarp

पारितोषिक (लाभ)
.... असेच काही ?
४. ? ** प्रयाग / ** संन्यास
Submitted by कुमार१ >>>> नाही ..... क्ल्यू बघा नीट.....
नदीच्या प्रवाहात पुढे नका जाऊ.... शोधसूत्रात १ पाउल पुढे जा म्हटलं मी
पारितोषिक मेहनतीचे काम हो ह्यॅ ह्यॅ करून थोडीच मिळते?

9 अहिनकुल
साप मुंगूस -- वैरभाव प्रतीक
नल अस्ताव्यस्त (न आणि ल च्या मध्ये कु)

तोच विचार करतेय.
कु प्रत्यय वाईट गोष्टीशी जोडतो आपण. म्हणून पीडा असं म्हणू शकतो

4 शिळासप्तमी
शिळा - दगड
शब्दाचा अर्थ - शिळे खाणे, चुलीला सुट्टी
क्लु उपयोगी पडला. षष्ठीच्या एक पाऊल पुढे

शिळासप्तमी >>>> बरोबर
शिळा सप्त मी = सात दगड अन स्वतः
शिळासप्तमीला नैवेद्य आदल्या दिवशी करून ठेवतात. चुलीला विश्रांती = चुलीचे चटके नाहीत
सात दगड अन स्वतः ला // चुलीचे चटके नाहीत

राजाही त्रस्त होण्याइतकी पीडा हो...... कु ने कशी भागेल?
पोचलायत.... नलाच्या भाषेत विचार करा नि काम तमाम

बसवा की तुम्हीच.
पोचलायत.... फ क्त अर्धी रन हवीये ...... नलाच्या भाषेत विचार करा नि काम तमाम -- हे दिलय की

नल राहू दे की. बापडा आधीच त्रस्त. त्याला ळ चं वेटोळं कशाला?
अ हि न कु ल व्या कु ळ यातली ५ उचला फक्त

Pages