शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लंबक? झोका? ओळंबा
आकारान्त ३ अक्षरी बघावे लागेल पण दिशा हीच का?

सरळ नाही तो खेकडा नव्हे ना? किंवा बुद्धीबळातला उंट?

तिरपा >>> होय, हा फक्त १ चा अर्थ.
२ त्यात बसवा ....
हे करु का ते करु ? घरगुती उपकरण .... तिरपेपणा....

चिमटा >> नाही. जरा लांब पट्ट्या घ्या .... एका इन्ग्लिश अक्शराप्रमाणे ठेवा...

कागद कशाने कापाल ?

कातर

कातरा

3. कातरा
१.सरळ नाही हो तो ! ….. तिरका

२. मग नक्की काय करावे ? .....पेच

फक्त ५ राहिले ...

5. ***
१. कोणाला आवडेल असे भुसार घ्यायला ? शी !
२. नको ती वाईट अवस्था कोणावर.

अच्छा कातरच होते का? मी चिमट्यापेक्षा (पापड भाजायच्या) मोठे काय.... ज्याने कागद कापणार शोधतेय.

शोधाशोधीत एक विचूका सापडला अटीत बसणारा
वाकडा विचुका = वेडावांकडा
विचुक-का = असंबद्ध; भलभलतें; विसंगत

भुसडा

भुसडा >>> बराच जवळ जात असल्याने पर्यायी बरोबर.

२ अर्थ अधिक येण्यासाठी मा * * असा शब्द आहे.
सहज बघा.

सर्वांना धन्यवाद.

सर्व उत्तरे :
1. हलका
१. ग्राहकाची नापसंती दर्शवतो …. हलका (माल)
२. दुर्जनाचे वैशिष्ट्य…….. हलकट

2. चपका
१.सोनाराची कृती … मोरचूद, टाकणखार, काव इत्यादि लावून दागिना किंवा सोनें तावणें व तें विस्तवांत घालणें.
२.आपणही मारू शकतो. …..चापट

3. कातरा
१.सरळ नाही हो तो ! ….. तिरका

२. मग नक्की काय करावे ? .....पेच

4. गचका
१. प्रवासात होणारा त्रास ...आचका, धक्का
२. धक्कादायक घटना …दुर्दैवाचा आघात

5. मातेरा
१. कोणाला आवडेल असे भुसार घ्यायला ?....केरकचरा मिश्रित धान्य
२. नको ती अवस्था कोणावर……दुर्दशा

सहज म्हणून आज वाचलेली उपयुक्त माहिती लिहितो.

‘मूग गिळून बसणे’ या वाक्प्रचाराबाबत काही गैरसमज आहेत. जालावर अनेकांनी आपापल्या व्युत्पत्या लिहिल्या आहेत. इथे एक लक्षात घ्यायचे आहे, की मूग/ मुग याचे दोन अर्थ आहेत;

१. कडधान्य आणि
२. मूक किंवा गप्प बसणे.

संबंधित वाक्प्रचारामध्ये मूग धान्याचा काही संबंध नाही. तिथे मूक (मराठी) साठीचा मूग हा प्राकृत शब्द आहे.

मूग गिळून बसणे = मौन स्वीकारणे

काय बंद वगैरे आहे की काय?
मी एक देतो शब्द ओळखा. पण माझा प्रोब्लेम असा आहे की मला नेहमी पहायला जमणार नाही. तुम्ही उत्तर लिहून ठेवा. मी जमेल तेंव्हा येउन बरोबर की चूक सांगीन. पण तुम्ही तुमचा वेगळा खेळ चालू ठेवा.

क्लू. :- महाकाय सुरवातीपासून किल्यावरून अग्नीपर्यंत (५)

अगडबंब >>> बरोबर मानव

क्लू : टांग मारून लोण चढवा तरीही सपशेल पराभव (४).

Pages